Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
एक खरी व्यथा

Hitguj » My Experience » कोणाशी तरी बोलायचंय » एक खरी व्यथा « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through September 09, 200535 09-09-05  9:29 am
Archive through September 12, 200535 09-12-05  12:29 pm
Archive through September 15, 200535 09-15-05  4:59 am
Archive through November 04, 200535 11-04-05  12:46 pm
Archive through November 02, 200620 11-02-06  10:30 am
Archive through April 09, 200820 04-09-08  9:42 am
Archive through April 11, 200820 04-11-08  11:01 am
Archive through April 22, 200820 04-22-08  11:30 am
Archive through April 29, 200820 04-29-08  8:35 am
Archive through June 04, 200820 06-04-08  12:21 pm

Sunidhee
Wednesday, June 04, 2008 - 4:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा, त्याला आरामात विचार ना.. 'तु डिओड्रन्ट वापरत नाहीस का? .. त्याला एकतर समजेल नाहीतर विचारेल, 'अस का विचारतेस', तेव्हा संधीचा फायदा करून घे.. आणि सान्ग डिओड्रन्ट चा उपयोग काय असतो. कळेल त्याला. तरी सुधारणा नसेल तर पुन्हा मात्र सरळ सांगावेस.

Savyasachi
Wednesday, June 04, 2008 - 7:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका, अस प्रेझेंट वगैरे देण्याने त्याचा भलताच गैरसमज देखील होण्याची शक्यता आहे :-)

--- पण तो तिथे ही मला मैत्रिण समजून माझ्याशी 'हितगूज' करायला येतोच

हेहे, मग त्याला 'मायबोलीत' चार शिव्या घाला :-)


Dakshina
Thursday, June 05, 2008 - 4:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सव्यसाची.... हे माझ्याही लक्षात नव्हतं आलं...
हो... मी प्रेझेंट दिलं तर उगिच जास्ती हक्क समजूनच हितगूज करायला यायचा....

सुनिधी, तो एका होमिओपॅथिक डॉक्टरने पछाडलेला माणूस आहे, तो डॉक्टर याला काय पण सांगतो...
आणि हा ऐकतो... म्हणून तो डिओ वगैरे काही वापरीत नाही.... असं त्याने बोलता बोलता सांगितलं होतं.
(अजून बरच काही करत नाही... बहूतेक अंघोळ..पण )



Ajay
Thursday, June 05, 2008 - 5:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी कॉलेजात असताना, एका मित्राबद्दलचा अनुभव सांगतो. तेंव्हा नुकताच pheromones बद्दलचा एक शास्त्रीय लेख त्याला वाचायला मिळाला. त्याने तो आम्हालाही दिला होता. नंतर एका इंग्रजी चित्रपटात घामट नायकाच्या शरीराकडे नायिका कशी आससून पाहते वगैरे दाखवले होते. हे पाहून त्याची पक्की समजूत झाली होती की मुलींना आकर्षित करण्यासाठी नैसर्गिक घामट वास असणे आवश्यक आहे. म्हणुन तो एक दिवसा आड आंघोळ करू लागला. त्याचीच समजूत कशाला, रोज़ त्याच्याकडे पाहून पाहून आपणही तसे करणे आवश्यक आहे(म्हणजे शरीरावर pheromones चा एक लेप चढणार आणि आपल्या animal magnetism पासून मुलीना दूर पळणे शक्यच होणार नाही ) असे आमच्यापैकी बर्‍याच जणाना,मी सुद्धा त्यात आलो, वाटू लागले होते.
आमच्या सुदैवाने आमच्यातल्याच एका मित्राच्या मोठ्या बहिणीला याचा सुगावा लागला (कसा कुणास ठाऊक) आणि तिने मस्तपैकी आमची खरडपट्टी काढून आमची समजूत कशी चुकीची आहे हे पटवून सांगितले.

नुकत्याच वाचलेल्या एका लेखावरून असं दिसतंय (खाली पहा) माझा मित्र आणि दुसर्‍या मित्राची बहीण आपापल्या परीने खरे होते.


http://psychologytoday.com/articles/index.php?term=19960301-000030&page=1
(सात पानी लेख आहे)

Ajay
Thursday, June 05, 2008 - 5:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि हा Newsweek सारख्या मान्यवर मासिकातला लेख :-)

http://www.newsweek.com/id/40963

सांगायचा मुद्दा असा की कदाचीत त्याला आपल्या अंगाला येणार्‍या "सुवासाची" :-) पूर्ण जाणीव असेल आणि तो चांगलाच आहे असा त्याचा गैरसमजही असेल.

Slarti
Thursday, June 05, 2008 - 10:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजय, फारच interesting लेख आहेत दोन्ही. धन्यवाद.

Dakshina
Friday, June 06, 2008 - 5:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्याइथे तर पहीली लिंक blocked sites मध्ये येतेय
दुसरी पाहीली.... चांगली आहे.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators