Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Ek goshta sang naaa........

Hitguj » My Experience » बालपणीचा काळ सुखाचा » Ek goshta sang naaa........ « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through March 13, 200235 03-13-02  3:53 pm
Archive through May 10, 200620 05-10-06  9:08 am

Mrinmayee
Wednesday, May 10, 2006 - 1:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किशोर मासिकात आलेली एक लहानपणापासून लक्षात राहिलेली कवीता!
आल्गट्टी गाल्गट्टी शोन्याशी गट्टी फू.....
तुला मी खेलात घेनाल नाही
चाकेत गोल्या देनाल नाही
आलाश तर घेईन गालगुच्चा
अंगावल शोडीन भु
आम्ही शोन्याशि गट्टी फू..
पम गाडी कू गाडी
शेतावलची हम्मागाडी
आम्ही शगले भूर जाऊ
एकताच राहशिल तु
आम्ही शोन्याशी गट्टी फू..
पप्पू बिट्टी वेदाराणी
आम्ही खेलु छापापाणी
तूच एकटा बाथ्थूम्मधे
ललके दोले धू
आम्ही शोन्याशी गट्टी फु!!!!
हा शोन्या तेव्हा फार खोडकर प्राणी असेल असं वाटायचं:-)


Maitreyee
Wednesday, May 10, 2006 - 9:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी आत्ता अमरावतीला गेले होते तेव्हा तिथे एक खूप गोड गाणं ऐकलं

धक्का धक्का मालू नको ले
मालू नको
मी पलून जाईन ले बॉ
माझे पांदले पांदले
कपले भलतीन बॉ

(धक्का मारू नको मी पडेन - विदर्भी बोलीनुसार पडून जाईन आणि माझे पांढरे कपडे धुळीत भरतील!)इतकं गोड वाटते ते ना ऐकायला!
कुणाला हे पूर्ण गाणं माहित आहे का?


Ameyadeshpande
Wednesday, May 10, 2006 - 9:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मणी गिळला गाणं खूप म्हणायचो पण सगळी कडवी लक्षात नाहीत आता

मणी गिळला..मणी गिळला मणी गिळला राजूने
पोटात दूखले(दुसरा 'दू'च उच्चारायचा) ..पोटात दूखले..पोटात दूखले राजूच्या...
डॉक्टरना बोलवावले.. डॉक्टरना बोलवावले.. डॉक्टरनाSSS बोलावले राजूने...
मणी काढला.. मणी काढला.. मणी काढला डॉक्टरने...

ह्या पुढे ही काहीतरी होतं...


Lalu
Thursday, May 11, 2006 - 2:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृण्मयी, ही कविता गदिमांची आहे. ते गेले त्या वेळच्या किशोरच्या मासिकात त्याना पानभर श्रद्धांजली लिहिली होती आणि अंकात ही कविता पण होती. सगळी लिहिल्याबद्दल धन्यवाद. मला शेवटच्या दोन ओळी फार आवडायच्या. :-)

Dakshina
Thursday, May 11, 2006 - 4:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगं माऊडी,
ऐश्याव म्हणजे असंच, त्यला काही अर्थ नाही.
आपण ऐशाब्बास नाही का म्हणत, म्हणजे एखाद्या गोष्टीला जोर लावताना नाही का म्हणत ऐश्याव... तसं...


Dineshvs
Thursday, May 11, 2006 - 4:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालु, किशोर आपले जीव कि प्राण होते नाही.
त्यातल्या पहिल्या कि दुसर्‍या अंकात, आमचे चौदावे वर्ष, या विषयावर, लता पासुन सुनील गावस्करपर्यंत अनेकानी छान लिहिले होते.


Mrinmayee
Thursday, May 11, 2006 - 5:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks लालू! कविता गदिमांची आहे हे मला आठवत नव्हतं. दिनेश, खरं आहे, किशोर अगदी जीवकीप्राण होतं! आईकडे आजही आमचे किशोरचे सगळे अंक वर्षानुसार bind करून ठेवलेत. किशोर, कुमार आणि चांदोबा म्हणजे परवणीच!
by the way , कोणाला किशोर मधली 'खमंग वासाची गोष्ट' आठवतेय का? त्यात खूप लांब नाक होणार्‍या मुलीचं नाव असतं 'दुलदुल'! आठवत असेल तर please टाका न इथे, जशी आठवेल तशी..


Chiku
Thursday, May 11, 2006 - 8:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला फ़क्त दुलदुल आठ्वते. माझी खुप आवडती गोष्ट होति.

Mbhure
Thursday, May 11, 2006 - 9:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्याकडेही जवळ जवळ पहिल्या आठ दहा वर्षाचे किशोरचे अंक Yearly बाईंड केलेले आहेत. वसंत शिरवाडकर त्याचे संपादक होते. त्यावेळी त्याचा दर्जा फारच वरचा होता. ज्ञानदा नाईक संपादिका झाल्यानंतर ' किशोर'चे ' बालवाडी' झाले.

पक्याची गॅंग, पिशी मावशी, इसापाच्या कथा ( Sort of Biography) , वटवृक्षाच्या पारंब्या (भारतीय संशोधक जसे दधीची, च्यवन..), विज्ञाचे वाटाडे (ह्यात पायथगोरस, आर्किमिडीस...) अशी असंख्य वाचनिय आणि माहितीपुर्ण सदर असायची.

अजुनही ते वाचायला कंटाळा येत नाही.


Prasik
Friday, July 14, 2006 - 10:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लहान पनि माज़ा लहान भाउ गोश्ता सागायला हत्त्त करायचा. तेव्हा त्याला म्हनायचो एक होते पोस्थ ज़ालि माज़्हि गोश्त.
लहान पनि सोबत च्या लहान पोरन भुताच्या गोश्ति सान्गुन त्याना घाबारवायला खुप मजा यायचि.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators