Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 20, 2008

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » मायबोलिकर उखाणे » Archive through June 20, 2008 « Previous Next »

Chaffa
Sunday, May 11, 2008 - 4:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असलेले पाणी चाखणे
यातले गमक समजुन घे
मी तर तुला ओळखु शकणार नाही
पण मला कमी लेखणं सोडुन दे!

जेउन आल्यावरही लिहीतोय उखाणे
उशीर आहे माझ्या झोपेला
बर्‍याच दिवसांनी उखाणे बरसतायत
फ़क्त शब्द चाललेयत टिपेला!


Itgirl
Sunday, May 11, 2008 - 4:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पाणी चाखताना घेतला मोठा घोट
तर चाफ्फ्या, ठसका लागेलच ना?
हलके घेण्याच्या नावाखाली, करायच्या काड्या
उत्तर तुला मिळेलच ना??

असो :-)

उखाण्यांची चाफ्फ्या, हीच तर मजा
हलकेच काढायचे चिमटे
खरतर खुसूखुसू हसू येतय मला
तुझे सूर का चिडके??

:-)





Chaffa
Sunday, May 11, 2008 - 4:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हलकेच घेण्याच्या नावे काड्या करायचा
मला तर नाही बुवा सोस
पण या सगळ्यात फ़िटत रहातेय
चांगले उखाणे वाचायची हौस

चिडके सुर तुला वाटतायत
पण तेही कोकणचेच पाणी आहे
बहुतेक तु आणि मी
एकाच पुस्तकातली कहाणी आहे






Itgirl
Sunday, May 11, 2008 - 5:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे बोलतो आहेस एक
आणि खरडवहीत दुसरेच
खरं खरं सांग चाफ्फ्या
हे त्रांगडे तरी कसले?


Chaffa
Sunday, May 11, 2008 - 5:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे आणि खरडवहीत
मी एकच काही बोलत आहे
पण आयटे ही तुझीच कृपा
तु प्रत्येक शब्दाची साल सोलत आहे!


Itgirl
Sunday, May 11, 2008 - 5:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

...पण आयटे ही तुझीच कृपा
तु प्रत्येक शब्दाची साल सोलत आहे!


अरे चाफ्फा ना तू, बाबा
मैत्रीचा पसरवायचास सुवास...
चिडक्या बिब्ब्याची साल
लावलीस का अंगी?
चिडका चाफ्फा बोलावतील सारे,
म्हणून आता बास!! :-)


अर्रर्र, खरच टिपेला गेले रे शब्द तुझे!! आता तू म्हटल्याप्रमाणे खरच मॉड्स येऊ शकतात!! शांत हो, मग बोलू, ओके? शुभरात्री :-)



Chaffa
Sunday, May 11, 2008 - 5:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल ही होता आणि आजही आहे
माझ्या मैत्रीचा सुवास
थंड पडलेल्या BB ला
जाग आणण्यासाठी हा जुगलबंदीचा प्रयास

आता मात्र शुभरात्री पुन्हा भेटु तेंव्हा भेटु आज तरी मनमुराद मैफ़ल रंगली!
तुला जरी वाटत असले तरी मी भांडत नव्हतो हे नक्की


Itgirl
Sunday, May 11, 2008 - 6:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी कुठे म्हटलेय तू भांडत होतास? माझ्या तर मनातही नव्हते तसले काही....

तुझ्याच उखाण्यांतून 'शब्द चाललेत टिपेला', 'शब्दाची साल सोलत आहे' वगैरे एकेक वाचायला मिळायला लागल्यावर, म्हटले की कदाचित ज sss रासा प्रॉब्लेम व्हायला लागलेला दिसतोय!! असो. :-)



Chinya1985
Monday, May 12, 2008 - 5:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गावागावातुन होउ लागली
आहे बघा दारुबंदी
अन मायबोलिवर गाजतेय
चाफ़ा,आयटिची जुगलबंदी


Gobu
Tuesday, May 13, 2008 - 6:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्या,.. .. सही रे!! !!

Chaffa
Thursday, June 12, 2008 - 12:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्यांशी घेतली कट्टी
तरी मायबोली करांनी धेतले खपवुन
च्यायला दादांची करामत ही
'एंजला' वहीनींना ठेवले लपवुन!


Chinya1985
Thursday, June 12, 2008 - 3:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफ़ा,कळला नाही उखाणा. अर्थ सांग

Chaffa
Thursday, June 12, 2008 - 3:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्या, ह्याचा अर्थ तुला च्यायलाच समजाउन देउ शकेल त्याला विचार जर कुठे सापडलाच तर

Itgirl
Thursday, June 12, 2008 - 4:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही ही ही चाफ्फ्या!! :-)

Zakasrao
Friday, June 13, 2008 - 3:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'एंजला' वहीनींना ठेवले लपवुन>>>>>>>>>>>>>>>
सम्या अभिनंदन रे :-)
हाच अर्थ आहे ना रे चाफ़्या???
:-)
}

Ashwini_k
Saturday, June 14, 2008 - 10:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्यांना बकरा करायला च्यायलाचा platform आहे मायबोली.
एंजला वहिनी नव्हे रे चाफ़्फ़्या, त्याने पाहिली असेल एंजेलिना जोली.

(संदर्भ्: समीरची recent डिस्नेलॅंड व LA भेट.)


Chyayla
Wednesday, June 18, 2008 - 8:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मायबोलीवर वर येत नाही म्हणुन चाफ़्यानी लावली आग.
च्यायल्याच्या लग्नाबद्दल सांगुन दिली मायबोलिकरांना टांग.

कुणी केले अभिनंदन, तर कुणाला वाटली शुद्ध थाप.
तशी चाफ़्याच्या इर्सालपणाची होतीच मुळी छाप.
सांगतो सगळ्याना, नाही आली कुणी माझ्याकडे ओलांडुन माप
तशी एंजेलाची कसली आली, माझ्याशी लग्न करायची टाप?




Ashwini_k
Wednesday, June 18, 2008 - 6:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायलाने ओतले घासलेट तर चाफ़्फ़्याने लावली काडी,
पेनल्टी म्हणून दोघांनी घेऊन द्या आम्हा MB कर करवल्यांना एक एक साडी.


Chaffa
Thursday, June 19, 2008 - 2:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

करवल्यांना साड्या घ्यायला
च्यायला आणेल करन्सी
करवल्यांचा मानपान करु
पण अश्विनी तुझी नाही ना साड्यांची एजन्सी?


Ashwini_k
Friday, June 20, 2008 - 9:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भ्या SSSSSS

मागितली असती गिफ़्ट पेट्रोल डिझेल इंडेनची
झाला असता माझ्या कंपनीचा नफ़ा
नाही ना तुला धोपटू किंवा पिळु शकत मी
कारण तू आहेस दत्तगुरुंचे आवडते फूल चाफ़्फ़ा.





चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators