Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 25, 2008

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » मला चुकीची ऐकू आलेली गाणी » Archive through April 25, 2008 « Previous Next »

Dakshina
Monday, April 21, 2008 - 5:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योगेश......
एक दोन तीन हुश्श....


Mhamaikar
Monday, April 21, 2008 - 10:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला हे गाण लहान अस्ताना अस ऐकु येत होत.

तुम आ गये हो, मूड आ गया है
नही तो सालो से मोच आयी थी.

सग ळे मोठे मला हेच गाण गाय ला सान्गत होते आणि एव्ढे हसत होते मल काहीच कळत नव्ह्त.

अजुन पण हे गाण मी असच गातो. :-)


Mhamaikar
Monday, April 21, 2008 - 10:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आण्खी एक गाणा.

रमैया वस्तरा लै आ, रमैया वस्तरा लै आ
मैने दिल तुझ को दिया.

आणि वस्तरा लै आ ही ओळ मी अक्शन करुन दाखवत होतो.
सगळे खुप हसत होते.

मल कळत नव्हत की वस्तरा आणि दिल चा काय सम्बन्ध आहे.



Mhamaikar
Monday, April 21, 2008 - 11:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थोडा विषयान्तर,
फ़ार पुर्वी सग्ळ्यान्कडे टीवी सेट्स नव्ह्ते, सगळे शेजारी आणी त्यान्ची मुल आम्च्या घरी टीवी पहाय्ला येत. कोण्तीही जाहिरात आली तर आम्ही लहान मुल जोरात ओर्डाय्चो रसना, पर्ले जी.

निरोध ची जाहिरात आली कि सर्व मोठ्या लोकाना टेन्शन यायच, आम्ही लहान मुल जोरात बोलायचो निरोध, सगळ्या मोठी मन्डळि ना टेन्शन. :-)


Vijaykulkarni
Tuesday, April 22, 2008 - 1:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


तो हम साथ साथ है चा जोक नक्कि काय ते लिहा रे कुणीतरी प्लीज


Yogesh_damle
Tuesday, April 22, 2008 - 5:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्हामईकर, लहानपणी आम्ही पोरं कोरसमध्ये अगदी चालीत गायचो-
"ज़रासी सावधानी, ज़िंदगीभर आऽऽऽसानीऽऽ!"
आणि मग त्यामागचं म्युझिक सुद्धा घ्यायचो "टिणिणिणि टिणिणिणि टिणिणिणि टिणिणिणिक्क्क्क!!" :-)


Ashbaby
Wednesday, April 23, 2008 - 6:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या वडिलांची एक आठवण

भजं गोविंदम, भजं गोविंदम,
गोविंदम भजं मुढमते

हे भजन ऐकल्यावर गोविंदाला लोक भजी देउन का टाकत नाहीत असा प्रश्न त्यांच्या मनात यायचा.

साधना


Mhamaikar
Wednesday, April 23, 2008 - 9:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योगेश,
खरच फार मजा येत होति.


Deemdu
Wednesday, April 23, 2008 - 10:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लाज लाजुनी अती मी दमले
थकले रे नंद्लाला


Manishalimaye
Wednesday, April 23, 2008 - 12:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लाज लाजुनी अती मी दमले
थकले रे नंद्लाला




इथे फक्त एकच बदल होता आमच्यात

"टकले रे नंदलाला"

म्हणजे काय तर नंदलाल टकलु वगैरे असावेत आणि म्हणुन हीला लाज वाटली असावी



Yogesh_damle
Wednesday, April 23, 2008 - 1:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ashbaby त्या श्लोकात नंतर
'संप्राप्ते संनिहिते काले, नहि नहि रक्षति डुकृं करणे' अशी ओळ आहे...

लहानपणी शंकराचार्यांच्या श्लोकात डुक्कर कुठून आलं ते कळेना... :-)


Shendenaxatra
Wednesday, April 23, 2008 - 5:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डुकृञ् करणे (वा! बर्‍याच दिवसांनी ञ वापरला) हा संस्कृत व्याकरणातला एक फॉर्म्युला आहे. एक म्हातारा माणूस बिचारा संस्कृत नीट बोलता यावे म्हणून फॉर्म्युले घोकत होता तेव्हा शंकराचार्यांनी त्याला त्यापेक्षा गोविंदाचे भजन कर असा सल्ला दिला अशी ह्या श्लोकाबद्दलची कथा आहे.
(माझ्या मते हे चूक. केवळ तो म्हातारा आहे म्हणून व्यवहारोपयोगी त्याने काही शिकू नये आणि निव्वळ हरीहरी करावे असे सांगणे गैर आहे. )


Mi_anu
Thursday, April 24, 2008 - 3:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते यु मी और हम मधलं गाणं काय आहे? 'मैने तो मांगा था, सहेली जैसा सैंया, पहेली जैसा सैंया बरेली जैसा सैंया इ.इ.' सैंया मैत्रिणीसारखा बायकी दिसणारा हवा की काय? (मित्रासारखा का नको?)

Aashu29
Thursday, April 24, 2008 - 4:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरेलिजैसा सैंया म्हणजे काय? तिकडेही अजय देवगणसारखी आंबट तोंड करुन शिष्ठासारखी फ़िरणारी माणसे असावीत.

Yogesh_damle
Thursday, April 24, 2008 - 5:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते 'बरेली जैसा सैंय्या' नसून 'पहेली जैसा सैंय्या' आहे. "पदरात कोडं पडलं"--- kind of...

Dakshina-- खि खि खि!! :-)


Psg
Thursday, April 24, 2008 - 7:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सहेली जैसा गं अनु- मैत्रीणीसारखा नवरा! (इथे माझ्या नवर्‍याने, 'मैत्रीणीच्या नवर्‍यावर का हिची नजर?' असा एक फालतू विनोदही केला होता)
आणि ते वाक्य 'दिल्लीमें बरेली जैसा सैंया' असं आहे.. नीट ऐक, वेगळं आहे गाणं जरा :-) चित्रित कसं केलं असेल याची उत्सुकता आहे मला :-) 'यू, मे और हम' मधलं आहे ना?


Mi_anu
Thursday, April 24, 2008 - 11:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नीट नाही पण आज सकाळी उडत उडत(मी उडत नाही, गाणं उडत!) रेडियोवर ऐकलं. 'एली' हे अंत्ययमक वापरुन बर्‍याच शब्दांना वेठीला धरलं आहे. 'सहेली जैसा सैया,बरेली जैसा सैया,पहेली जैसा सैया' मध्ये कुठेतरी हवेली जैसा सैय्या पण ऐकल्याचा भास झाला.
(याच नियमाने पुढे 'हथेली जैसा सैय्या,चमेली जैसा सैय्या,दबेली(आपली कच्छी दाबेली) जैसा सैय्या' सुद्धा गाण्यात परफेक्ट बसतील किनै?)


Nandini2911
Friday, April 25, 2008 - 12:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा, कृपया तुमचे पोस्ट डीलीट केलंत तर बरे होईल. तुम्ही भयानक विचित्र काहीतरी लिहिलय. तुम्हाला कदाचित कल्पना नसेल... म्हणून सांगतेय. यौप्पर तुमची मर्जी.

Dakshina
Friday, April 25, 2008 - 1:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नेमस्तक, कृपया माझी पोस्ट उडवून टाका.... माझ्याकडून होत नाहीए....


Admin
Friday, April 25, 2008 - 3:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Done

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators