Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
विधाता

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट - अचाट आणि अतर्क्य » विधाता « Previous Next »

Farend
Thursday, May 01, 2008 - 6:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'विधाता' लावला, आणि चला आणखी एक अ. आणि अ. मिळाला म्हणून खवचट हसू घेऊन बघायला बसलो, आणि यातील दिग्गजांच्या अभिनयाने थक्क झालो. संजीवकुमारच्या अनेक नकला नंतर बघितल्यामुळे मूळ अदाकारीच आता जरा 'अती' वाटते पण ती त्याची चूक नाही. शम्मी ही मस्त. पण खरी मजा आणतो दिलीप कुमार. अमिताभच्या अनेक पिक्चर्स प्रमाणे काही काही ठिकाणी अ. आणि अ. प्रसंगही दिलीप कुमार जबरी उचलतो. उदा: अमरीश पुरीला "हवा मे उडनेवाले जहाज झटके बहुत खाते है" हा आता वरकरणी जड वाटणारा संवाद, पण तो असा दिलाय की आपल्यालाही बघताना काय अमरीश पुरीची खेचलीय असे वाटल्याशिवाय राहात नाही. असे बरेच शॉट आहेत. त्याचे आणि शम्मीचे गाणेही मस्त आहे.

पण याने अगदीच निराशा केली नाही. काही अफलातून प्रसंग आहेत्:

दिलीप कुमार आपल्या नातवाला घेऊन पोलिसांपासून गाडीतून पळून जात असताना त्याची गाडी धडकते आणि तो लहान मुलगा एकदम उडून पडतो ते थेट दिवसातून पाच पैकी एका वेळा नमाज़ पढत असलेल्या संजीव कुमार च्या हातात. हे अबूबाबा नमाज़ पढत असताना रस्त्यावरचे वाहनचालक निर्धास्तपणे गाड्या चालवत असतील, कारण मुले, वस्तू वगैरे गाडीतून उडाल्या तरी कॅच करण्याची खात्री! RTO/DMV वगैरे सुद्धा रस्त्यावर "अबूबाबांची नमाज़ाची वेळ सोडून इतर वेळी सीट बेल्ट लावणे बंधनकारक आहे" वगैरे बोर्ड लावत असतील.

या अबूबाबाने 'पाळल्यामुळे'च कदाचित संजय दत्तला पुढे संजूबाबा म्हणू लागले असतील :-) हा मोठा होतो तो एकदम २-३ कप (चहाचे नव्हे. ते हीरोंना कॉलेज मधे मिळतात ते) घेउनच घरी येतो. यात एक म्हणे "चोरोंको पकडनेका और इमानदारीका" कप असतो. ही स्पर्धा नक्की कशी झाली असावी याचा अंदाज मी लावायचा प्रयत्न केला पण झेपत नाही.

तोपर्यंत बहुधा प्रिन्स चार्ल्स कडून होकार येत नाही म्हणून पद्मिनी कोल्हापुरे याच्या प्रेमात पडते. ही एकदम साधी वगैरे असते. पण मग ती ते "उडीबाबा उडीबाबा" गाणे कसे म्हणणार? म्हणून तिला दारू पाजण्यात येते. (स्वप्नात अशी गाणी दाखवण्याचा शोध नंतर लागला असावा). या गाण्यातील तिचा गेट अप यापेक्षा अ. आणि अ. यात दुसरे काहीही नाही.

मधेच अबूबाबा मारला जातो. मग संजूबाबा "गली गली", एवढेच नव्हे तर समुद्र किनार्‍यांवर सुद्धा त्याच्या खुन्यांना शोधत फिरतो. आता इकडे तिकडे जराही न बघता रागीट चेहरा करून नाकासमोर चालत जाण्याने खुनी कसे सापडणार? म्हणून मग सारिका त्याच्या मदतीला येते. तिचा योग्य उपयोग करून घ्यायचा असल्याने खुन्यांना पकडण्याचे प्लॅन्स समुद्रात ती पोहत असताना करण्यात येतात. ती थेट त्याच्या प्रेमात पडते, पण तो तिला फक्त "अच्छे दोस्त" याच नज़रेने पाहतो, आणि तिच्या कपाळाचे चुंबन घेऊन ते सिद्ध करतो व God bless you वगैरे तारुण्यसुलभ वाक्ये बोलतो. लगेच सारिकाच्या चेहर्‍यावरील seductive वगैरे भाव जाऊन तेथे "अच्छे दोस्त" ची कळा येते. मग दुसरा हीरो नसल्याने तेव्हाच्या पिक्चर्स मधल्या जगण्या मरण्याच्या नियमातील
पोटनियम 2c प्रमाणे ती शेवटी कोठेतरी मरणार हे उघड होते.

हिंदी चित्रपटांचा आणखी एक नियम आहे: श्रेयनामावलीत नाव सहज न दिसणारा पण बर्‍यापैकी फेमस कोणी सुरूवातीला दिसला की हा मारण्यासाठी घेतला असणार हे नक्की होते (यात सुरेश ओबेरॉय, सौदागर मधे जॅकी). मग त्याला काहीतरी अचाट साहस करायला लावून मारले जाते. येथे सुरेश ओबेरॉय इन्स्पेक्टर झाल्या झाल्या एकटा अगदी गणवेष सुद्धा न घालता (म्हणजे साधा ड्रेस असतो. हा काही 'सावरिया' नव्हे) एकदम 'जगावर' च्या एरियात घुसतो. नुसते 'जगावर' नाव ऐकून तरी जरा फौज वगैरे घेऊन जायची, तर नाही.

शेवटी एकदा अमरीश पुरी दिलीप कुमारला पकडून लम्बेचौडे संवाद मारत असताना मदन पुरी त्याला 'ये वक्त डॉयलॉग मारनेका नही है" असे ऐकवतो. ही यातील सर्वात समझदार संवाद. पण अमरीश पुरी ऐकत नाही. त्यातून जर आपल्याला त्या जुल्म के ग्रूपचा चेअरमन व्हायचे असेल तर अड्ड्यात ती दिवे लुकलुकणारी मशीन्स काय आहेत, त्याचा उपयोग कशासाठी करतात, त्या मशीन शेजारी एक रहाटासारखे फिरणारे गंमत म्हणून ठेवले आहे का हे सर्व माहिती करून घ्यायला पाहिजे. अमरीश पुरी ते करत नाही आणि मग त्याची गॅंग त्यातून सर्व दिशेला सुटणार्‍या गोळ्या खाते.

असे काही प्रसंग चुकून चांगला चित्रपट बघितल्याची निराशा येऊ देत नाहीत :-)



Maitreyee
Thursday, May 01, 2008 - 1:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

lol..यात संजू बाबाची जास्त "तारीफ़" केली नाहियेस तू फ़रेन्डा :-) त्यात संजूबाबा ज्या प्रकारे सतत अबूबाबा! अबूबा! अब्बाबा!! असले अगम्य कोकलत असतो त्यावरून तो टारझन किंवा किमान पक्षी मुका, बोबडा इ. वाटतो!

Swaatee_ambole
Thursday, May 01, 2008 - 1:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> यात एक म्हणे "चोरोंको पकडनेका और इमानदारीका" कप असतो. ही स्पर्धा नक्की कशी झाली असावी याचा अंदाज मी लावायचा प्रयत्न केला

धन्य आहे तुझी! असले मूव्हीज चिकाटीने बघून लक्षात ठेवण्याबद्दल तुला कप द्यायला हवा. नेहेमीप्रमाणेच सहीच लिहीलंयस. :-)


Sashal
Thursday, May 01, 2008 - 6:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

LOL

मस्त लिहीलंय ..


Sunidhee
Thursday, May 01, 2008 - 6:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त लिहिलय!! सारीका चा सिन :-) आणि पोटनियम ४ :-) :-)

Chinnu
Thursday, May 01, 2008 - 8:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खी खी खी खी :-)

Zakasrao
Friday, May 02, 2008 - 3:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


जरा आवरतच घेतलस रे. :-)
अजुन यायला हव होत.
तो नमाजच्या वेळचा सीन डोळ्यासमोर येवुन खुप हसलो.
मी पाहिला नाहिये विधाता. आता पहायला लागेल :-)


Bee
Friday, May 02, 2008 - 4:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किती अचूक निरिक्षण पद्धत आहे तुझी.. पोटनियम फ़ारच लॉजिकल झाले आहेत.

Itgirl
Sunday, May 04, 2008 - 5:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


सहीच जमलय!! एकदम खास!!

सीट बेल्ट लावायच्या वेळा, इमानदारीची अन चोर पकडण्याची स्पर्धा, उडी बाबा म्हणण्यासाठी दारू पिणे, अच्छे दोस्त की कळा, सर्व दिशांना सुटणार्‍या गोळ्या!!! सगळंच खास, एकदम अमोल इष्टायलमदी!!


Slarti
Sunday, May 04, 2008 - 8:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इमानदारी का कप हे मात्र खरोखर अ. आणि अ. आहे... हे म्हणजे कॉलेजचे नाव केवळ 'आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज' असे असणे, आंतरमहाविद्यालयीन नृत्यस्पर्धेच्या स्टेजवर मागे 'Intercollegiate Dance Competition' असा बॅनर असणे, तुमच्याकडच्या ड्रायव्हरला त्याच्या नावाने हाक न मारता 'ड्रायव्हर' अशी हाक मारणे, वगैरे पठडीतला प्रकार आहे...
>>> मदन पुरी त्याला 'ये वक्त डॉयलॉग मारनेका नही है" असे ऐकवतो....
हिंदी सिनेमाने अशी स्वतःच स्वतःला टप्पल मारण्याची उदाहरणे विरळाच.
जगावर वरून एक आठवलं... व्हिलन्सच्या नावांची एक जंत्री करायला पाहिजे. जगावर, दिलावर, जग्गू, शाकाल, शाका, जुगराज, ठकराल, वर्धान, सिंघानिया इ. नावे / आडनावे, मग के.टी., जे.पी., डी.के., टी.के., डी. डी., डी. डी. टी. इ. आद्याक्षरी नावे... अन् या आद्याक्षरी नावांची खासीयत ही की त्या केटीची खासम् खास 'मैत्रीण'सुद्धा त्याला केटीच म्हणते !!


Shraddhak
Monday, May 05, 2008 - 5:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमोल, ' संजूबाबा ' ची व्युत्पत्ती जबरी. :-P

झक्कास लिहिलंय. बाकी मी महत्प्रयासाने ' नवा जानी दुश्मन ' पाहून पूर्ण केला. टाकेन लौकरच. :-)

Psg
Monday, May 05, 2008 - 6:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ज ब री लिहिलं आहेस फ़ारेंड! :-)

सारीकावरचा पॅरा सर्वात जबरी!


हे अबूबाबा नमाज़ पढत असताना रस्त्यावरचे वाहनचालक निर्धास्तपणे गाड्या चालवत असतील, कारण मुले, वस्तू वगैरे गाडीतून उडाल्या तरी कॅच करण्याची खात्री!>>>>

Dakshina
Wednesday, May 07, 2008 - 5:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि तिच्या कपाळाचे चुंबन घेऊन ते सिद्ध करतो व God bless you वगैरे तारुण्यसुलभ वाक्ये बोलतो.>>>

फ़ारेंड, तुम्ही भलतेच सभ्य दिसता... कारण कपाळाचे चुंबन घेणे, God Bless You म्हणणे या
(तुमच्य मते) तारूण्यसुलभ घटना असतील

मी तर ऐकलं होतं की 'दुनिया की कोई ताकद अब हमे एक दुजे से जूदा नही कर सकती, राज हम तुम्हारे बिना जी नही सकेंगे.. वगैरे वगैरे वाक्य म्हणजे तारूण्यसुलभता....



Farend
Wednesday, May 07, 2008 - 10:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा, जसे सौदागर मधे pillow fight ही 'मर्दाना हरकत' होती त्या अर्थाने हा संवाद 'तारुण्यसुलभ' म्हंटला होता :-) प्रेम बिम नाही ठीक आहे पण जस्ट फ्रेंड करताना हा संवाद दोन तरूण लोकांतील आहे की आजोबा आणि त्यांच्या नातीतील अशी शंका यावी असा लिहिला आहे.

धन्यवाद सगळ्यांना प्रतिक्रियांबद्दल.


Ramani
Monday, May 12, 2008 - 9:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फारेंडा!! आत्ताच वाचले, ऑफिस्मधे बसुन. खुर्चीतुन पडण्याची वेळ आलीय हसुन हसुन.
सिट बेल्ट लावणेची वेळ, संजुबाबाची व्युत्पत्ती, चोरोंको पकडनेकी और इमान्दारी की स्पर्धा....... ह. ह. पु. वा. रे बाबा.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators