Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 29, 2008

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » माझ्या मित्रांच्या मला आवडणार्‍या / नावडणार्‍या सवई » Archive through February 29, 2008 « Previous Next »

Shonoo
Friday, November 30, 2007 - 1:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आवडणार्‍या सवयी लिहू का थोड्या
एक जोडपं आहे आम्ही दोघे त्या दोघांना एक मेकाच्या लग्ना आधी पासून ओळखतो. दोघे नोकरी करतात. आता शाळकरी मुलं आहेत त्यांना. मुलांच्या soccer, piano, birthday party अशा उचापती चालू असतात. त्यांच्या कडे कधी जेवायला बोलावलं तर पाहुणे यायच्या आधी सर्व स्वैपाक तयार, स्वैपाकघर डिशवॉशर सकट स्वच्छ, आणि सर्व पदार्थ ठेवणीच्या भांड्यातून वाढणार. स्वैपाकाची भांडी कधिही टेबलवर नेणार नाहीत. वेळी अवेळी गेलं तरी काही ना काही दो-चार प्रकार फ्रीजमधे असणारच. अगदी ते दोघे युनिवर्सिटीमधे शिकत होते तेंव्हापासून हीच टापटीप अन नेटकेपणा. आम्ही युनिव्हर्सिटीत असताना कोणाला बोलावले तर शेवटचा पाहूणा आल्यावर गॅस चालू होत असे:-)



Dineshvs
Friday, November 30, 2007 - 2:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोनू, आत्मप्रौढी नाही पण मी आफ़्रिकेत असताना माझ्या घरी पण अशीच बडदास्त ठेवलेली असायची.

आधी नीट प्लॅन केले तर पाहुण्याना पुर्ण वेळ देता येतो ना.


Chinnu
Friday, November 30, 2007 - 3:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

.... अज्जुका धन्स! देवसखी :-)

Chinnu
Friday, November 30, 2007 - 3:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता वर आलचं आहे म्हणून उल्लेख करून लिहीतेय. पंजू मैत्रिणीची आवडणारी सवय म्हणजे आदरातिथ्य. ठेवणीतील सेट, सुबक मांडणी, घर टापटिपीत ठेवलेलं असतं तिचं. तिच्या घरी जायला कधी आमंत्रणं लागत नाही, असं ती नुसतं म्हणत नाही. तिच्या घरी रात्री बेरात्री पर्यंत पार्ट्या रंगलेल्या असतात. जोडपी हसतमुखाने आवभगत करण्यात माहीर.
आणि एक आवडणारी सवय म्हणजे फोन करून विचारपुस करणे. (चांभार चवकश्या नाही!) तेही वेळात वेळ काढून.


Itgirl
Friday, November 30, 2007 - 3:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोनू, चिन्नु, तुम्ही दोघींनी लिहिलेल्या आवडणार्‍या सवयी आवडल्या :-)

Dakshina
Monday, December 03, 2007 - 6:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी पण जरा चांगलं लिहावं म्हणते. मी जिच्या सगळ्या वाईट्ट सवयी लिहील्या आहेत तिच्या अत्यंत भावणार्‍या सुद्धा काही गोष्टी आहेत. ही मुलगी सकाळी उठून सगळ्यांसाठी स्वयंपाक करते. कितीही उशिर झाला तरीही ती निदान भात - वरण का होईना पण करेलच. बाहेरून दमून आलं की विचारपूस करते. दररोज मला दुपारी फोन करून भाजी आवडली का विचारते. त्याचबरोबर ती एक उत्तम समुपदेशक आहे. आमच्याकडे कधीच कामावरून भांडण होत नाही. ज्याला जसं जमेल तसं जे जमेल ते काम करतो. तू इतकंच केलस, मी इत ऽऽ.कं केलं असा dialogue आमच्याकडे कधीही होत नाही. एकमेकांच्या वस्तू वापरणं मला आवडत नसलं तरीही आम्ही वापरतोच. कारण family प्रमाणे रहातो म्हणल्यावर, या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणं क्रमप्राप्त आहे. वीकएन्डला आम्ही शक्यतो एकत्र रहाण्याचा प्रयत्न करतो, कारण आमच्यात खूप attachament आहे, बाकी दिवशी आमच्या वेळा वेगवेगळ्या असल्याने खूप वेळ एकत्र घालवता नाही येत. बहूतेक वेळा असं म्हणलं जातं की मुलिंच्यात युनिटी बिलकूल नसते. पण आम्ही अपवादात्मकरित्या गेली कित्येक वर्षं एकमेकिंबरोबर सुखाने नांदतो आहोत. यांचं सगळं क्रेडीट अर्थात तिलाच.

सर्वांच्या आवडीचे पदार्थ आवर्जून करते, ते ही ज्याला जसे हवेत तसेच. म्हणजे मल फ़क्त एकटीला भाजीत गूळ लागतो, तर ही दररोज तो उपद्व्याप माझ्यासाठी न कंटाळता करते.

अशा बर्‍याच गोष्टी आहेत लिहीण्यासारख्या, आणि या जरी छोट्या छोट्या असल्या तरीही रोजच्या आयूष्यात खूप फ़रक पडतो.


Dakshina
Monday, December 03, 2007 - 6:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या कठीण काळात याच मैत्रिणीने मला खूप आधार दिला. इतकं unconditionally कोणीही कुणासाठी करत नाही. निदान मी तरी नाही पाहीलेलं. त्यामूळेच ती फ़क्त आमच्यातंच नाही तर सर्वांच्यात म्हणजे तिच्या बाहेरच्या मित्र - मैत्रिणींमध्ये पण फ़ार प्रिय आहे. मायबोलीवर वाईट सवयींबद्दल लिहीण्याअगोदर मी तिला सांगितलं की असा असा आहे आणि मी तुझ्या सगळ्या वाईट्ट सवयी तिकडे लिहीणार आहे. आणि विशेष म्हणजे तिने ते खूप sportingly घेतलं होतं.

अशी लिस्ट काढत गेले तर कदाचित चांगल्या गोष्टीच जास्त भरतील. पण आपण कायम वाईटच काय ते ठळकपणे पहातो...


Dineshvs
Monday, December 03, 2007 - 4:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा, मला शेवटचे वाक्य खुपच आवडले.
अगदी मानापासून लिहिलेय ते.


Chaffa
Monday, December 03, 2007 - 4:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आवडणार्‍या सवयी लिहू का थोड्या

बरं वाटल वाचुन निदान BB च्या नावातले आवडणार्‍या या गोष्टीं कडे लक्ष गेले म्हणायचे ( हे मी उपहासाने म्हणत नाहीये, मनापासुन म्हणतोय बरं )


Supermom
Monday, December 03, 2007 - 5:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझीपण एक तेलुगु मैत्रीण आहे. मागच्या वर्षी मी अचानक आजारी पडले. नवरा परदेशात. रात्री बारा वाजता मला खूप chest pain व्हायला लागले. मुले झोपलेली. कसाबसा सकाळी सहा पर्यंत वेळ काढला. मग तिला फोन केला. आधी ती व तिचा नवरा दोघांनीही रात्रीच का उठवले नाही म्हणून भरपूर रागावून घेतले. नवरा लगेच मला दवाखान्यात घेऊन गेला. गेल्यागेल्या तिथे admit च करून घेतले. माझा जीव सगळा मुलांमधे अडकलेला.
सगळ्या tests च्या दिव्यातून जाऊन शेवटी heart चे काहीही नाही. gall stones चे निदान घेऊन मी सन्ध्याकाळी घरी आले तर मुलांना छान अंघोळी घालून, त्यांचे सगळे जेवणखाण नीट पार पडलेले. माझ्यासाठी गरमगरम जेवण तयार. मला परदेशात इतका आधार मिळण्याने रडूच यायला लागले.
निरोप मिळताच माझा नवराही लगेच मिळेल त्या फ़्लाईटने आला. मग एक दिवस काही अजून tests, endoscopy वगैरे करायचे ठरले. ती लगेच येऊन मुलांना घेऊन गेली. आम्ही दोघांनीही पुष्कळ सांगून पाहिले की आता नवरा आला आहे. तर राहू दे. पण ती म्हणाली की 'मी मुलांना घेउनच जाते म्हणजे त्याला तुझ्याकडे नीट लक्ष देता येईल..'
या मैत्रिणीला स्वतची दोन लहान मुले आहेत. त्यांना सांभाळून हे सारे तिने केले. शिवाय या प्रसंगाआधी आमची नुसती थोडीफ़ार ओळख होती हे उल्लेखनीय.


Shonoo
Monday, December 03, 2007 - 6:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजून एका मैत्रिणिची एक आवडणारी सवय
जवळच्या नात्यातल्या, ओळखीच्या मुलांचे वाढदिवस असले की ही त्या सुमारास पालकांनी approve केलेल्या दुकानात त्या मुलालामुलीला घेऊन जाते अन एक ठरावीक किमतीपर्यंत त्या बाळाला shopping करायला देते. अगदीच आई वडिलांना न पटतील अशा गोष्टी घेत नाही. पुन्हा त्या गोष्टी घेताना मुलांना त्यांच्या वयाप्रमाणे तेच गिफ़्ट का हवं हे jusify करावं लागतं.
मुलांना आपल्या मर्जीप्रमाणे shopping करायला मिळाल्याचा आनंद, तिला अन पालकांना पण खात्री की तिचं गिफ़्ट ते मूल नक्की वापरेल


Manuswini
Monday, December 03, 2007 - 7:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी एक मैत्रीण अशी आहे जी कीतीही busy असो पण सहसा चहा तरी घेणार का विचारतेच. नाहीतरी काही तरी करु का विचारते? मी तरी बर्‍यापैकी हक्काने म्हणते, जया चहा करायचा का ग? मी करते, संग मला.
मी एकटी रहाते, मला खाण्याची अवड आहे मग काहीना काही पाठवणार. अर्थात हे प्रेम दोन्हीकडून पण तेव्ह्ढेच आहे.:-)

इथे दोन जुळी मुले असताना, घरात एकटीच सगळे करत असताना मलाच जीवावर येते की चहा कर म्हणून सांगणे. मग मीच करून दोघी पितो. छान गप्पा मारतो..... कधी कधी मी असेच तिच्या घरी तिच्या मुलांशी खेळायला जाते. नवरा दुसरीकडे काम करतो,फक्त Weekend ला घरी येतो. तीलाही बरे वाटते :-)


Dakshina
Tuesday, December 04, 2007 - 5:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद दिनेश...

सुदैवाने, माझ्या सगळ्याच रूममेटस अतिशय समजूतदार आहेत, मुख्य म्हणजे आम्ही खूप भांडतो, पण मनात कोणिच काहीच ठेवत नाही. दुसर्‍या क्षणाला सगळं विसरून परत पूर्वीसारखं. आता माणूस आहे म्हणल्यावर एकमेकांच्या सवयी, बोलणं, वागणं खटकायचंच. पण तरीही आपण जसं आहोत, तसच्या तसं कोणितरी आपल्याला accept केलंय ही गोष्टं किती सुखकारक आहे हे मी तूम्हाला सांगायची काही गरज नाही. space, space म्हणजे काय? आणि तो तुम्हाला कुठे मिळतो? मला वाटतं की तो फ़क्त तुम्हाला अशा माणसांबरोबरच मिळतो, जे तुमच्याशी empathatic असतात.


Anaghavn
Monday, December 10, 2007 - 6:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनु,खरंच भिडस्तपणा आपण जितक्या लवकर शिकु तितकं आप्लल पुढच आयुष्य सुरळीत जाऊ शकतं. कारण समोरचे लोकं बदलले तरी आपण भिडस्तंच राहणार, त्यामुळे लोक बदलले आपण मात्र भिडस्तच्----म्हणजेपुन्हा त्रास आपल्यालाच.
अर्थात हे बोलायला सोप्प आणि करायला अवघड आहे.
माझा स्वतःचा अनुभव आहे. अर्थात तो अनुभव मैत्रिणींबद्दल नसून नातेवाइकांबद्दल आहे,त्यामुळे इथे लिहयचा प्रश्न येत नाही.
अनघा


Anaghavn
Monday, December 10, 2007 - 9:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे "भिडस्तपणा टाळणं" असं मला म्हणायचं आहे.
अनघा


Dakshina
Monday, January 21, 2008 - 12:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्ही ४ जणी रहातो, आमच्यात सगळ्यात लहान आहे ती डॉक्टर आहे, पण मला वाटते की ती आमच्या जबाबदार असण्याचा फ़ायदा घेते. घरी कधीच काही काम करत नाही. तिच्या कामाच्या वेळा पण अशा आहेत की conveniently सगळी कामं आमच्याच गळ्यात पडतात. मला खूप राग येतो. दुसरं म्हणजे, मी एकटीच बंड करते, बाकीच्या दोन जाऊ दे जाऊ दे म्हणून सोडून देऊन कामं करून टाकतात... मग तिचं आणखिनच फ़ावतं आणि मी वाईट ठरते.

Gajanandesai
Friday, February 01, 2008 - 9:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कानात इअरफोन घालून गाणी ऐकत बसायचं आणि वॉकमनबरोबर तेच गाणं आपल्या बेसुर्‍या आवाजात आणि विचित्र चढ-उतारात मोठ्यानं म्हणणं. :-)

Bee
Friday, February 01, 2008 - 10:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



माझा एक मित्र, उरलेले वा नासलेले जेवन भांडी घासताना संडासात ओतायचा आणि वर फ़्लश करायचा तेही अर्धवट. मला तो प्रकार बघताना असे वाटायचे कुणी मला torture करत आहे.


Dakshina
Monday, February 04, 2008 - 5:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी एक मैत्रिण होती, कधिही कुठेही बाहेर गेलं, काही खाल्लं - प्यालं की म्हणायची, माझे पैसे तत्पुरते तू देतेस का? आत्ता माझ्याकडे नाहीएत. मी तुला नंतर देते. आणि ती असं कायम करायची. पैसे परत देण्यासाठीचा तो 'नंतर' कधीच उगवत नसे. आपण मात्रं कधी तिचा खेळ तिच्यावर उलटवण्याचा प्रयत्नं केला तर मात्रं ती फ़ार चतूरपणे सांगायची की नाही गं माझ्या ना आईने उरलेल्या पैशातून हे हे आणायला सांगितलं आहे, त्यामूळे तुझे पैसे तूच दे.... काय हुश्शार असतात लोकं..

Runi
Saturday, March 01, 2008 - 2:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी आत्तापर्यन्त बर्‍याच (१३-१४) रूमपार्टनर्स सोबत रुम-घर शेअर करुन राहिलेलेय. सगळ्यात जास्त मला लक्षात राहिलेल्या पार्टनर्स ह्या एकतर खुप चांगल्या सवयी असलेल्या किंवा अतिशय तापदायक. आधी सगळ्या छान गोष्टीच सांगेन वाईटाच नंतर कधीतरी.
मला ईस्त्री हे काम जगातले सगळ्यात बोअर काम वाटते पण माझी एक इटालीयन पार्टनर होती, हिला ईस्त्री करायला खुप आवडायच इतक की तिचे कपडे ईस्त्री करुन संपले की ती आमच्या पण सगळ्यांच्या कपड्यांना करायची आम्हाला न सांगताच . तिला करु नको म्हणलं तरी पण करायची त्यामुळे जवळ जवळ ३ वर्ष माझे सगळे ड्रेस एकदम तयार असायचे. ती एक अत्यंत कुशल स्वयंपाकी आहे आणि सतत करुन खाऊ घालायची पण आवड आहे त्यामुळे तिच्या सोबत रहातांना आपण एखाद्या प्रेमळ आज्जीसोबत रहातोय असेच वाटायचे, एकमेकींचे कुठलेच काम करतांना आम्हाला काहीच वाटायचे नाही अगदी हक्काने कामे सांगायचो आम्ही एकमेकींना आणि ओरडायचो पण काही आवडले नाही की. सगळ्यात महत्वाचे म्हणजे आमच्या सवयी खुप सारख्या होत्या त्यामुळे स्वच्छतेवरुन आमचे कधीही वाजले नाही.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators