Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 24, 2008

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » माझ्या हातुन झालेल्या चुका. » Archive through January 24, 2008 « Previous Next »

Rupali_rahul
Friday, April 07, 2006 - 7:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी केलेली एक चुक जी मला आठवली की आजही मला पश्चाताप होतो.

तेव्हा मी शाळेत ३-४ थीत शिकत होते. मी आणि माझी बेस्ट फ़्रेंड नेहमी घरी येताना एकत्र असु आणि आमच्या आया आमच्यामागे. मला शाळेत खुप जण गाल ओढुन तुझ्या खळ्या फ़ार छान आहेत अस म्हणायचे. मला एवढा राग यायच गाल ओढले की आणि नेहमी माझी मैत्रिण मला नेहमी विचारायची, "तुला ह्या खळ्या कशा पडतात?" ह्यावर माझे उत्तर ठरलेल असायच, " मला नाही माहित". असच एका दिवशी नेहमीप्रमाणे आम्ही घरी परत येत होतो. त्यावेळेला पुन्हा तिने तोच प्रश्न विचारला; मला या प्रश्नाचा वीट आलेला असल्या कारणाने मी तिला जरा रागातच बोलले," मी रोज रात्री पेन्सिलच्या टोकाने त्यांना खोल करत बसते."

दुसर्‍या दिवशी मी शाळेत आले तेव्हा पाहिले की तिच्या दोन्ही गालांना बॅंडेज लावल्या आहेत. तिने रात्री मी म्हंटल्या प्रमाणे खरच तसे केले होते.


Sampada_oke
Friday, April 07, 2006 - 8:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुपाली, आता तुला नक्कीच भेटायला हवे... हल्ली खूपदा वाचले की तुझ्या गालाच्या खळ्या फ़ारच छान आहेत म्हणून.:-)

Rupali_rahul
Friday, April 07, 2006 - 11:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग संपदा एवढे काही खास नाहित ग.

Suyog
Friday, April 07, 2006 - 4:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकदा मला माझ्या कम्पनी मधल्या एक मुलीवर क्रश होता हे मी एका मद्रासी सहकार्याला सान्गीतले आणी काही दिवसातच मला भरपुर रटाळ काम देणे सुरु झाले, इतके कि मला कन्टाळुन नोकरी सोडावी लागली. नन्तर कळाले कि त्या मद्राश्याने हे सर्व म्यनेजर ला सान्गितले होते. म्यानेअर पन मद्रासी बाइ एकदम गर्विश्ठ आणि हे दोघे कायम गुडु गुडु बोलत बसायचे. तेव्हा पासुन ठरविले मद्रस्यान्ना काहि मनातले सान्गायचे नही, हे लोक त्याचा आपल्या स्वार्था साथी त्याचा कसा उपयोग करतिल सान्गता येणार नाही.

हे आठवले कि अजुनहि मल वाइट वाटटे.


Raju2203
Friday, April 07, 2006 - 6:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुयोग, मला सुद्दा वाईट वाटले रे................!!! पण सर्वच तसे नसतात रे... माझे काही चान्गले विश्वासु मद्राशी मित्र आहेत मला अजुन तरी त्यान्च्याकडुन वाईट अनुभव नाही आला..........!!!!

Manuswini
Friday, April 07, 2006 - 7:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला एक चुक आठवते लहानपणीची मी असेन ९-१० वर्षाची

आमच्या घरासमोरच college होते.
होळी जवळ आली होती
घरालालागुनच park ही होते
मी आणी माझा लहान भाऊ पाण्याने भरलेले फ़ुगे मारायचो लोकाना येताना घराच्या गच्चीतुन..
त्याच दिवसात बारावी परिक्षा होती वाटते,आठवत नाही, एक मुलगा बिचारा अभ्यास करत बसला होता park मधे..
आमच्या घराच्या गच्चीत मी बघितले park लागुनच होते.
घेतली दूधाची bag पाणी भरुन नेम धरून फेकली. एथे मी bag फेकली आणी पाठीत रट्टा मागे आईचा
बिचारा पुर्ण भिजला होता,सगळी पुस्तके भिजली
आणी नंतर तोच घरी आला(आईने बोलविले) आणी मोठ्या भावाचे कपडे घालुन बसला होता
त्याचा थोड्या gap नंतर paper होता college मधे. आईला खुपच thanks,thanks म्हणत होता. मला मात्र खुप राग आला होता. नंतर वाईट वाटले की बिचार्‍याची सर्व पुस्तके भिजलेली बघुन.

माहीत नाही हा प्रसंग खुप लक्षात आहे माझ्या अजुन.


Zakki
Friday, April 07, 2006 - 8:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुयोग, अमेरिकेतील यहुदि लोकांचे हि असलेच धंदे चालतात. मी अनेऽकदा वैयक्तिक रीत्या अनुभवले आहे. एकदा तर माझा तसला साहेब नि तसलेच काही लोक staff meeting मधे ठरवत होते की दुसर्‍या कुठल्या तरी Dept च्या माणसाला आपण नोकरी सोडायला लावावी. त्यासाठी मला काय करायचे ते सांगण्यात आले. मी स्पष्ट नकार दिला. त्यामुळे मला पण तिथून पद्धतशीरपणे त्रास देऊन, खोटे बोलून, बाहेर घालवले. माझे नशीब, नोकरी सोडावी लागली नाही, पण नंतर अत्यंत वाईट्ट काम काही दिवस करावे लागले! सुदैवाने त्या कंपनीत त्या वेळी तरी बर्‍याच वरचे लोक माझ्या बाजूचे असल्याने मला नोकरी सोडावी लागली नाही.
raju2203 , 'अजून तरी' हे अत्यंत महत्वाचे शब्द आहेत. गोड गोड बोलून पुरेशी माहिती काढायची नि वेळ आली की त्याचा दुरुपयोग करायचा असले धंदे या लोकांना छान जमतात.
हा विषय निघाला की माझे डोकेच सरकते. फक्त अमेरिकेत असल्याने यांच्या विरुद्ध काही बोलता येत नाही, कारण अमेरिकेत 'de facto' यांचेच राज्य आहे.


Nit29
Tuesday, June 27, 2006 - 10:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी सहावीत असताना मला लोह्चुन्बकाचे ख़ुप वेड होते...माझ्या वर्गात एकाकडे दोन होते...मी त्याला ख़ुप वेळा मागितले....पण तो कसे देणार? हे समजुन घेण्याची माझी समजच नव्ह्ती....मधल्या सुटीत एक्दा त्याचे द्प्तर उघडुन दोन्ही चुन्बक फेकुन दिले....त्याला हे समजले नाही की कोणी केले असेल....पण मला आजही त्या गोश्टीचे वाईट वाटते.

Mrinmayee
Monday, August 21, 2006 - 8:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा माझ्या एका डॉक्टर मैत्रिणीचा अनुभव आहे. चुक तर म्हणता येणार नाही, पन मग कुठे टाकावा का किस्सा ते कळलं नाही. (काही जण "कुठेच नको" असंही म्हणतील
internship करताना तिची opthalmology dept मधे ड्युटी लागली. खेड्यातून एक म्हातारे गृहस्थ treatment ला आले होते. हिनी त्यांच्या डोळ्यात औषध घातलं. त्या म्हातारबाबांना त्यांच्या घशात त्या औषधाची चव लागे पर्यंत हिला थांबायचं होत. (का ते मला माहिती नाही). अत्यंत प्रेमानी हिनी त्यांना जरा वेळानं विचारलं,
"आजोबा, आलं का औषध घशात?"
यावर काही उत्तर मिळालं नाही. हीला वाटलं त्यांना कमी ऐकु येत असावं. हीनं परत जरा मोठ्या आवाजात तोच प्रश्ण विचारला. यावेळी आजोबांनी नुसतीच मान डोलवली, त्याचा अर्थ हो की नाही ते कळलं नाही. माझ्या मैत्रिणीनं परत जोरदार आवाजात अगदी ओरडून विचारलं, "अहो SS आजोबा SS आता तरी आलं का औषध घशा SS त?"
"का जिनं का बापा" (म्हणजे काय कुणास ठाउक) हे उत्तर. असं ओरडून तिनी आणखी २-३दा तोच प्रश्ण विचारला. पण बाबाजी मख्ख!
एव्हाना तिचा ओरडून पेशंस संपलेला. तेव्हड्यात तिचा सिनिअर तिथे आला. हीनं सगळा किस्सा वर्णन केल्यावर तो म्हणतो,
"तु ओरडतेस कशाला? आणि हे आजोबा इथल्या खेड्यातले हा अंदाज नाही का आला तुला, हे बघ, त्यांना असं विचारायचं.."
म्हातारबुवांकडे तोंड करून त्यानं विचारलं,
"ओ बावाजी आली का जी दवा नड्डीत ?" (इथे 'नड्डी' म्हणजे 'नरडी-किन्वा नरडं')
"हो जी, हो जी डाक्टरसाहेब" ..यावेळी उत्तर मिळालं.
तोवर स्वत:च्या ओरडण्यावर ही बापडी खजील!


Maanus
Tuesday, September 25, 2007 - 4:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या हातुन नाही, पण हा चोर बघा किती वेडा आहे.

त्याने एका माणसाचा संगणक चोरला, आणि मग त्या चोरलेल्या संगणाकवरुन, संगणक owner च्या flickr account वर स्वतःचा फोटो टाकला

http://www.flickr.com/photos/workspace/1431892021/

Dakshina
Wednesday, January 23, 2008 - 2:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या हातून एक खूप मोठ्ठी चूक झाली आहे. २५ जानेवारी पासून मी माझ्या डिपार्टमेंट मधून रिलिज होऊन प्रोजेक्ट मध्ये शिफ़्ट होतेय. त्यामूळे Handover - Takeover चे काम सुरू आहे. आज Cupboards आणि Drawers साफ़ करताना लक्षात आलं की, एका व्हेंडरची जवळपास ३ लाखाची बिल्स नोव्हेंबर पासून पुढे पासच झालेली नाहीत. ही सर्वथा माझी चूक आहे. ती ही अनावधानाने घडलेली. मध्यंतरी मला याच व्हेंडरचा जेव्हा फोन आला होता, तेव्हा मी छातीठोकपणे सांगितलं होतं की माझ्याकडून सगळी बिलं पास झालेली आहेत, आणि माझ्याकडून काहीही पेंडींग नाही. आज मला हळू हळू ती बिल्स सापडायला लागल्यावर घामच फ़ुटला. आता काय करू? हाच विचार करत अजूनी ऑफ़िसातच बसून आहे. एक - दिड महीना पेमेंट लांबले म्हणून व्हेंडर बोंब मारेल ती निराळी.. पण बॉसला काय सांगू?

Chinnu
Wednesday, January 23, 2008 - 5:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा बॉस ला शांत सुरात सांगून टाकणे बरे. जर बॉस पर्यंत न जाता ती बिलं पास करता येत असतील तर आधी ते कर. काम पूर्ण झाले की मग बॉसला सांग. जर बॉसकडे जावेच लागले तर स्पष्ट सांग हे असे झाले. but prepare to face it. One more thing, dont make fuss of it. चुका सर्वांकडून होतात.

Gobu
Wednesday, January 23, 2008 - 5:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा, शांतपणे विचार करुन मार्ग काढ, टेन्शन घेवु नकोस

Chinnu
Wednesday, January 23, 2008 - 5:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बिल्स पास करून झाली की vendor ला फोन लावून सांग की मला आता invoices मिळाले आणि मी ते forward केले आहेत. payment मिळण्यात vendor चा आनंद असतो. गोब्याला अनुमोदन. Tension घेवु नकोस.

Gobu
Wednesday, January 23, 2008 - 5:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिने, थान्कु!
दक्षिणा, तु वेंडरचा विचार करु नकोस, त्याला काहीही टेकनिकल कारण देवुन बिल लेट कसे झाले हे पटवुन दे... तो जास्त नाराज़ होणार नाही... बॉसला मात्र प्रामाणिकपणे आणि व्यवस्थितपणे सगळे सांग...
(जर हे बॉसपर्यन्त जाणार असेल तर!)
त्या वेंडरची हे बिल लवकरात लवकर पास करायची जबाबदारी तुझी... बिचार्‍याला पैशाची गरज असायची... विनाकारण कुणावर अन्याय व्हायला नको, ओके?!



Raviupadhye
Thursday, January 24, 2008 - 6:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा फ़ार काळजी करू नका,असे कधी कधी होते/ तुमच्या अखत्यारीत delayed बिल पास करायचे असेल तर करून टाका,वेन्डरला विश्वासात घ्या आणि रिलक्स व्हा

Dakshina
Thursday, January 24, 2008 - 10:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. मार्ग थोडक्यात काढलाय मी. मलाही असंच वाटतं की व्हेंडरला थोपवणं तसं सोपं आहे. पण बॉसपर्यंत सुद्धा हे प्रकरण मी शक्यतो जाऊ देणार नाहीए.
सुदैवाने माझा कलिग मला मदत करणार आहे. नेक्स्ट कॉन्टक्ट म्हणून त्यांचं नाव द्यायचं ठरलं आहे. आणि मला खात्री आहे, तो हे निट सांभाळून घेईल.
माझी चूक मला सर्वथा मान्य आहे, आणि बॉसला जाऊन सांगायला ही मला काही प्रॉब्लेम नाहीए, पण नेमकं मला उद्या रिलिज करायच्या वेळी तो काहीतरी गोंधळ घालेल, म्हणून सध्यातरी गप्प रहाण्यातच शहाणपणा आहे.


Upas
Thursday, January 24, 2008 - 3:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मागे कोणी तरी म्हणालं होतं की क्यूट बॉस सुद्धा मायबोलीवर येतात... :-P
नवीन कार्यभारासाठी best of luck दक्षिणा..

Itgirl
Thursday, January 24, 2008 - 4:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो दक्षिणा, मघाशी तुझ्या वरच्या पोस्ट पाहून तुला हेच विचारणार होते की तुझा बॉस तर नाही येत मायबोलीवर? :-)आणि येत असेल तर क्यूट आहे का तो??

Zakki
Thursday, January 24, 2008 - 4:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा, तुम्ही सरकारी (भारतात काय नि अमेरिकेत काय) नोकरीत असता तर उत्तर सोप्पे होते. या माणसाने पैसे दिले नाहीत म्हणून त्याचे बिल पास नाही केले, असे म्हंटले की साहेब खूष!

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators