Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 04, 2008

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » नाव आणि प्रतिमा » Archive through April 04, 2008 « Previous Next »

Ashwini
Tuesday, March 18, 2008 - 4:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

dj, आर्च म्हंटल्यावर अर्चनाच यायला हवी ना, अश्विनी कशी येईल? :-)

Manuswini
Tuesday, March 18, 2008 - 5:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च, ती मनु म्हणजे मी का ग? ह्म्म्म अंदाज चुकला हो :-)

मागे पूनमने( psg ) नी सुमॉने एकदम परफ़ेक्ट वर्णन केले माझे नी मी चाट झाले.

फक्त नावावरून :
अर्चना : नावाच्या मुली मला अजीबात आवडत नाहीत कारण काहीच नाही तसे पण बहुतेक वेळा ज्या प्रत्येक्षात भेटल्या एकदम enutral फ़ीलिन्ग.

केदार : बर्‍यापैकी overmsart ,घमंडी

मला आतापर्यन्त भेटलेल्या नी आवडलेल्या नावात प्रीती,प्रिया, श्रीया,सोनु,सचिन,राहूल,संजय,प्रसाद वगैरे खूप छान वाटलेली.(अजून बरेच आहेत).

(वरील हे सर्व नावावरून लिहिते आहे, उगीच मायबोलीवरील आयडी वरून नाही. गैरसमज नकोत)



Chyayla
Friday, March 21, 2008 - 1:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला, मला माहितच नव्हत माझा आयडी ईतका मशहुर झाला आहे, चक्क एक ऑर्कुट कम्युनिटीच आहे आणी थोडे थोडके नव्हे तर ५०० च्या वर सदस्य आहेत.

आता मला कोणी च्यायला शब्द वाईट आहे म्हटले तर हे पहा..

http://www.orkut.com/Community.aspx?cmm=14268405

ही कम्युनिटी मला दाखवल्याबद्दल मनिषा लिमयेला विषेश धन्स...

Chinya1985
Thursday, March 27, 2008 - 10:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

येथील सर्व आयडींपैकी सर्वात भारी आयडी आहे तो म्हणजे 'सुपरमॉम'.
या स्त्रीबद्दल माझ्या डोक्यात येणारी प्रतिमा अशी- साडी नेसलेली,पदर वगैरे खोचलेला, कडेवर दोन्ही हातांनी दोन मुले घेतलेली आहेत,दोन मुले दोन पायांना पकडुन आहेत,एक मुल पाठीवरुन लोंबकळते आहे व एक बाळ पुण्यामधे बाईक चालवणार्‍या स्त्रीया ज्याप्रमाणे झाशीच्या राणीप्रमाणे बाळ गुंडाळुन लावतात त्याप्रमाणे पोटाशी एक बाळ कपड्यात गुंडाळलेले आहे.


वरील पोस्टद्वारे सुपरमॉम अथवा इतर स्त्रीयांना दुखवण्याचा हेतु नाही पण कोणी दुखावले गेल्यास क्षमस्व व पोस्ट आक्षेपार्ह असल्यास मॉडनी उडवावी.


Sanghamitra
Sunday, March 30, 2008 - 6:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>> कोणी दुखावले गेल्यास क्षमस्व व पोस्ट आक्षेपार्ह असल्यास
चिन्या हा मला नुसत्या आयडीवरूनच टिपी करणारा पण सतत डिफेन्सिव्ह मोडमधे असलेला वाटला होता. पोस्ट्स वाचूनही तसंच वाटतंय.
चिन्या आयडीवरून भविष्य सांगू का तुझं?
" आपण आनंदी स्वभावाचे आहात आणि कुणाला कधी दुखावू शकत नाही. पण लोक नेहमी आपल्या बोलण्यातून वेगळाच अर्थ काढतात. "
:-)
त. टी. : इथं खाली एका होरोस्कोपी बाईची झायरात दिसली म्हणून.. सहज विनोदानं लिहीले आहे. कुणालाही दुखावण्याचा हेतू नाही(यादी देत नाही. हल्ली काय कोणपण दुखावले जाऊ शकते). तसे वाटल्यास माझे भविष्य अचूक नाही असे समजावे(आणि सोडून द्यावे वाद वाढवू नये. तसे करण्याची इच्छा झाल्यास आबुदोआ हे नक्की.)


Tonaga
Sunday, March 30, 2008 - 6:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही कम्युनिटी मला दाखवल्याबद्दल मनिषा लिमयेला विषेश धन्स...

>>>>>हो, त्याने सुरू केलेली कम्युनिटी त्यालाच दाखविल्याबद्दल धन्स.... :-)

Chinya1985
Sunday, March 30, 2008 - 7:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संघमित्रा, काय आहे एकदा दुध पिताना जिभ पोळली की माणुस दही (का लोणी) पण फ़ुंकुन पितो. तशी माझी गत झाली आहे. 'त्या' बाफ़वरील 'त्या' विधानाने इथे दंगलसदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे पोस्टतानाच काळजी घ्यावी असा प्रयत्न आहे.

अजुन एक आयडी. 'daad' या आयडीला नेहमी डेंटिस्टकडे जायची गरज पडत असावी. बघा ना daadh ,daadh (दाढ,दाढ). दाढ दुखत असावी.



वरील पोस्टद्वारे daad अथवा इतर स्त्रीयांना दुखवण्याचा हेतु नाही पण कोणी दुखावले गेल्यास क्षमस्व

Zakki
Sunday, March 30, 2008 - 10:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हल्ली काय कोणपण दुखावले जाऊ शकते

सत्य वचन. म्हणूनच काही सोप्या व कमी शब्दात कसे लिहीता येईल की कुणाला दुखवायला लिहीले नाही. कुणावर टीका नाही वगैरे वगैरेसाठी काहीतरी चिन्ह किंवा शब्द तयार करून तो प्रत्येक लिखाणावर आपोआप टाकल्या जाईल अशी काही सोय करता येईल का, असे संचालकांना विचारले पाहिजे.

अर्थात काही जण मग एकदम खवळून, तुमची अक्कल काढतात, तुमच्या नावाने काय वाट्टेल ते खोटे लिहीतात, ते सगळे काही थांबवता येईल की नाही माहित नाही.


Psg
Monday, March 31, 2008 - 5:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दही (का लोणी) पण फ़ुंकुन पितो
अवांतर: घन पदार्थ फुंकून पीता येतात काय रे?????????????? :-) म्हणी तरी नीट म्हण.. नुस्तं मराठी लिहिलं तर चालतं का हो झक्की? 'बरोबर मराठी' लिहायचा आग्रह नाहीये का? :-)

दिवे दिवे दिवे! :-)


Chyayla
Monday, March 31, 2008 - 7:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणी दुखावले गेल्यास क्षमस्व

चिन्या, त्या दादची दाढ दुखावली ना आता, नुसती क्षमा मागुन काय उपयोग डेंटिस्ट चे भले मोठे बील तु भरणार आहेस?

ऍडमिनला विचार की तुझ्या प्रत्येक पोस्टमागे "कुणी दुखावले गेल्यास क्षमस्व" ही ओळ आपोआप येइल अशी व्ययस्था करता येइल का म्हणुन. असो तुझा आयडी आता अतीसंवेदनशील (आयटेम बॉम्ब) म्हणुन घोषीत करायला हरकत नाही.


दही (का लोणी) पण फ़ुंकुन पितो
पूनम, मला वाटत द्रव पदार्थाने तोंड पोळले म्हणुन तो घन पदार्थही फ़ुंकुन(खात) पित असावा.

टोणगा, नाही रे ती कम्युनिटी मी नाही बनवली, मी तर आताच त्यात शामिल झालोय. त्यात ती कथा पुर्ण करा हा प्रकार अफ़लातुन वाटतो.


Slarti
Monday, March 31, 2008 - 8:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> अतीसंवेदनशील (आयटेम बॉम्ब)
अहो त्या मुद्राराक्षसाला आवरा...


Chinya1985
Monday, March 31, 2008 - 1:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

psg , खरी म्हण नक्की कोणती आहे ते लिहिलच नाहीत.(योग्य म्हणी असा बाफ़ का सुरु नये???)

अरे च्यायला, लोक चिडतात कारण नसताना कुणाचे मन का दुखवा??

स्लार्ती, तुमच्या पोस्टमागील अर्थ नाही कळला



Slarti
Monday, March 31, 2008 - 2:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्या,
ऍटम बॉम्ब - फॅट मॅन, लिट्ल बॉय
आयटेम बॉम्ब - मलाइका अरोरा, राखी सावंत
अन् म्हणीत फुंकून प्यायचे ते ताक.


Tonaga
Monday, March 31, 2008 - 2:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ताकही उकळते असले तर फुंकूनच प्यावे लागणार...

Yogesh_damle
Tuesday, April 01, 2008 - 10:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कशाला उगाच शिळ्या कढीला ऊत? (उकळतं ताक).

(दिवे घ्या, ज्योत से ज्योत जलाते चलो!) :-)


Chinya1985
Wednesday, April 02, 2008 - 6:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काशी नामक व्यक्ती भुगोलतज्ञ असावी. बघा ना Nkashi...NakashI...Nakaashe नकाशे नकाशे

Kashi
Friday, April 04, 2008 - 6:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

chinaya....... nkashi ani kashi he donhi vegvegale ID aahet... tula nkashi baddal lihayche aahena ???

Kashi
Friday, April 04, 2008 - 6:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mazya aakarmanavarun Bhugol tadnya mahanalas tar kahi harkat nahi.... :-) :-)

Rajya
Friday, April 04, 2008 - 6:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ललिता आणि सुपरमॉम, मला ललिता पवारची राहुन राहुन आठवण होते :-)

ऍना मीरा, एक इंग्लिश किंवा अमेरीकन पोरगी परकर पोलके घालुन, हातात वीणा घेऊन जंगलातुन फिरते आहे :-)


Rajya
Friday, April 04, 2008 - 6:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की, एक टकला म्हातारा, डोक्यावर असलेले तुरळक केस सोनेरी झालेले, कानावरचे केस पण सोनेरी झालेले, अंगात बंडी घालुन पाठीला बाक देऊन स्टुलावर बसुन कॉम्पुटर बडवत बसलाय असे वाटते :-) दिवे घ्या हो :-)

ग़ोबु, एक इटुकला पिटुकला गुटगुटीत चेहरा डोळ्यासमोर येतो

दक्षिणा, घनदाट जंगलाच्या मध्यभागी एक पुराणं देऊळ असावं त्या देवळाच्या गाभार्‍यात आपण एकटे उभे आहोत असं काहीसं वाटतं :-)

आयटी आणि पूनम, या दोघी छान छान फ्रॉक घालुन, उंच टाचेचे सॅन्डल घालुन हातात पर्स फिरवीत निघाल्यात असे वाटते :-) या दोघी रस्त्याने निघाल्या की ४, ५ माना तरी नक्की मोडत असतील :-) हे माझे मत पूनमला बघायच्या आधीचे आहे :-)

मयुरेश, हा असाच वाटला होता पण थोडा जाड निघाला

झकास, मिशीवरुन हात फिरवत व दुसर्‍या हाताने दंडाची बेटकुळी कुरवाळत उभा असलेला कोल्हापूरचा पैलवान डोळ्यासमोर येतो :-)

कांदापोहे, हा मलापण आधी बाई वाटला होता :-)

फ, याला मी पाहीलाय पण अजुनही मला बाराखडीच डोळ्यासमोर दिसते :-)

एकटा, आपल्या आवडीचे मांजर कसे आपल्या पायात घुटमळते असे काहीसे वाटते :-)

मिल्या, एक द्वाड कार्टं :-)

मनस्विनी, एक सावळी मुलगी, एक वेणी घातलेली, साडी नेसलेली, एकदम केरळी स्टाईल :-)

लिंबुटिंबु, पोरं झाडावरुन पेरु, आंबे वगैरे पाडताहेत आणि हे ध्यान चड्डी सावरत ते गोळा करतंय असं वाटतंय :-)

तर मंडळी दिवे घ्यालंच :-)

बाकीची ओळख परत कधीतरी :-)



चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators