Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 02, 2008

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » मायबोलिकर उखाणे » Archive through April 02, 2008 « Previous Next »

Chyayla
Wednesday, April 02, 2008 - 9:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राफ्याची स्फ़ुर्ती व चाफ़्याची प्रेरणा घेउन हा नवीन फ़ळा जन्माला आलाय. यात कोणाला न दुखवता निव्वळ विनोद व निखळ मनोरंजन होइल याची दक्षता घ्यावी. चला तर सुरु करा उ खाणे

Chyayla
Wednesday, April 02, 2008 - 9:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

यावर तुम्ही मायबोलिकरांवर तुम्हाला जसे विनोदी उखाणे बनवता येतिल तसे खुशाल बनवा. अगदी मग कोणाचा वाजला नसेल(बॅंड) तरी काल्पनिक राव, अमुकराव, तमुकराव तसेच अमकी, टमकी असे बिंदास जोडुन कोटी करु शकता. याशिवाय मला वाटत मायबोलीवरचे प्रसंग, पोस्ट, नाव, प्रतिमा यांचाही वापर करु शकता. अजुन तुम्हाला सुचल्यास जरुर कळवा.

लो. अ. (लोभ असावा)
नाही तर लोचट असावा समजाल म्हणुन स्पष्टीकरण.


Chaffa
Wednesday, April 02, 2008 - 9:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चला तर मग सुरुवात सम्यपासुन
सम्याची समी ( बोले तो सौ ) म्हणेल

उपवासाच्या दिवशी
दाणे खाते सोलुन
समिर रावांच नाव घेते
आधी 'च्यायला बोलुन

आता श्री झकास भाउ तुम्हाला हा उखाणा शोभेल
घाबरु नका कुणी
सगळ्यांनी दिवे लावा
आपल्या मदतिला आहे
झकास बंब सेवा

लिंब्या भाव आता तुम्ही

गावात आलेय सर्कस
तिचा केवढा मोठा तंबु
दोन- तिन मुले झाली तरी
....... राव म्हणे लिंबुटिंबु


Chaffa
Wednesday, April 02, 2008 - 9:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आदरणिय स्वाती जी राहील्याच की खरी गरज त्यांना उखाण्यांची

तर स्वाती

लग्नाची खरेदी करुन करुन
मोडला माझा कणा
सुर्यकांत राव आता ट्रक कॅंसल
सामान न्यायला मालगाडीच आणा


Chaffa
Wednesday, April 02, 2008 - 10:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

यावर सुर्यकांत म्हणतील

सामान न्यायला मालगाडी कशाला!
विमानच ठेवलय राखुन
पण स्वातीचा कणा मोडायचे खरे कारण!
कायम बेल वहाते शंकराच्या पिंडीवर वाकुन!


Chyayla
Wednesday, April 02, 2008 - 10:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफ्या सुरु झालास तर, हे माझ्याकडुनही सुरुवात पण तुझ्यावर मात्र खास उखाणा बनवायचाय, सुचला की लिहेन.

स्वातीनी दिला जेव्हापासुन सुर्याला होकार
कंबरडे मोडले म्हणते घालुन सुर्यनमस्कार
काल मात्र केला हसुन नमस्कार
म्हणे हा झंडु बामचा चमत्कार

फटफटिवर बसुन मिशीवर देतात मोठा ताव
अमुकराव सोडुन केला कोल्हापुरचा झकासराव.

जिलेबीचा घास भरवते च्यायलाSSS
मुकाट्याने थोबाड उघड.. खायलाSSS.



Dakshina
Wednesday, April 02, 2008 - 10:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफ़्फ़ा...
फ़ारच स्पॉन्टेनियस आहेत तुमचे उखाणे... एकदम मस्त.... आवडले...


Swa_26
Wednesday, April 02, 2008 - 10:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा उखाणा चाफीसाठि..

सगळेजण भाळतात
मोराच्या नाचावर
चाफ्याच्या भयकथा वाचुन
माझी बसली पाचावर! :-)


Chaffa
Wednesday, April 02, 2008 - 10:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा:
बदलली नाही कधी मैत्रीण
तिने इतके हाल करुन
मात्र तिच्या तक्रारी केल्या दक्षीणाने!
आख्खा एक BB भरुन! ह्याचा संदर्भ ह्याच ठीकाणच्या माझ्या मित्रांच्या सवयी............. वर मिळेल


Chinya1985
Wednesday, April 02, 2008 - 10:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा वा भारी चाललय इथे. येउ दे ये..ये...ये!!!!

Chyayla
Wednesday, April 02, 2008 - 10:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शंकराच्या पिंडीभोवती घालत होते मनोभावे प्रदक्षिणा.
कुत्रा मागे लागल्यागत राव आले ओरडत दक्षिणाSSS दक्षिणाSSS

घोड्याची वाट पहात होती धुळ्याची प्रिन्सेस
राव उतरल्यावर म्हणाले हीच माझी मिसेस.


Kedar123
Wednesday, April 02, 2008 - 11:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सम्या, चाफ्या

मस्तच धमाल


Meggi
Wednesday, April 02, 2008 - 11:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दोन- तिन मुले झाली तरी
....... राव म्हणे लिंबुटिंबु >>
हा हा हा... धम्माल उखाणे आहेत :-) :-)

Manishalimaye
Wednesday, April 02, 2008 - 1:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>जिलेबीचा घास भरवते च्यायलाSSS
मुकाट्याने थोबाड उघड.. खायलाSSS


दोन- तिन मुले झाली तरी
....... राव म्हणे लिंबुटिंबु<<


अशक्य आहात
अगदी ह. ह. पु. वा. झाली


चालु दे

मी इथे चक्कर मारीनच अधुन मधुन

प्रोत्साहन द्यायला
:-)



Amruta
Wednesday, April 02, 2008 - 4:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कसले भन्नाट उखाणे आहेत. मजा आली वाचायला. :-)

Gobu
Wednesday, April 02, 2008 - 6:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह. ह. पु. वा...
चाफ़ा, ग्रेट आहेस रे...


Chyayla
Wednesday, April 02, 2008 - 11:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ईकडुन ये तिकडुन ये, अख्खी मायबोली भटकुन ये.
प्रोत्साहन द्यायला, या बीबीवर जरुर ये मनिषा लिमये.

भांडी घासता घासता अचानक थांबले मिस्टर लिमये.
'आयोडेक्स मलिये काम पे चलिये' म्हणाली मनिषा लिमये.


Runi
Wednesday, April 02, 2008 - 11:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला आणि चाफ्फा तुम्ही तर एकदम भन्नाट सुटलात

Dineshvs
Thursday, April 03, 2008 - 2:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त उखाणे आहेत इथे.

Princess
Thursday, April 03, 2008 - 2:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला.... :-)) हे चार शब्द

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators