Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
यादें

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट - अचाट आणि अतर्क्य » यादें « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through March 26, 200820 03-26-08  5:25 pm
Archive through March 27, 200820 03-27-08  10:17 pm
Archive through April 01, 200820 04-01-08  10:59 am

Tanyabedekar
Tuesday, April 01, 2008 - 2:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साथिया उपरोल्लेखीत अनेक चित्रपटांपेक्षा चांगला होता.. अलेपायुथी हा मुळ तमिळ (दिग्दर्षक मणिरत्नम) हा अजुनच सुंदर आहे.

Farend
Tuesday, April 01, 2008 - 4:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नन्दिनी, जमीर अमिताभ वाला का?

Malavika
Tuesday, April 01, 2008 - 4:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वरच्या लिस्ट मध्ये माझी भर..जब वी मेट

Ajjuka
Tuesday, April 01, 2008 - 5:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>नील ऍन निक्की<<
हा खरोखरी पाहण्याचं धाडस कोणी केलं असेल असं वाटत नाही मला. असेल तर लिहा. त्यातल्या एका गाण्याची एकच ओळ इतकी खतरनाक आहे की बाकीचा प्रोमो सुद्धा बघण्याची गरज नाही. :-)

>>आप मुझे अच्छे लगने लगे, जमीन, जमीर(हा कुणी पाहिलाय का?) तुमको ना भूल पायेंगे, चंद्रमुखी....<<
यातले अर्धे सिनेमे होते हे पण मला माहित नाही.

Amruta
Tuesday, April 01, 2008 - 7:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जब वुई मेट काहि अ. आणि अ. नाहिये. होय आता त्यात करिना आहे म्हंटल्यावर थोडा वाटु शकतो पण मला आवडलेला JWM .

मैने प्यार किया वर लिहा कि कुणितरी. तेव्हा सहि आवडलेला MPK . हे असल कस काय आवडलेल ह्याचच आता आश्चर्य वाटत. :०


Vijaykulkarni
Wednesday, April 02, 2008 - 12:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


प्लीज प्लीज ओम जय जगदीश घ्या आता


Nandini2911
Wednesday, April 02, 2008 - 3:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जमीर अजय देवगण, अमिषा पटेल आणि महिमा चौधरी... वाला...

Ankyno1
Wednesday, April 02, 2008 - 4:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजयकाका यात शिक्षकाच्या भूमिकेत आहेत
अमिषा अतिअल्लड कॉलेजकन्या... पहाताक्षणी कानाखाली खेचावी असं वाटतं
वर्गात उशिरा येते आणि तास चालू असताना फटाके वाजवते असा एक सीन पाहिलाय... पुढचं पाहूच शकलो नाही....


Ajjuka
Wednesday, April 02, 2008 - 6:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय सांगतोस काय अंकर्‍या!
हे एवढं वर्णनच इतक अ आणि अ आहे की पूर्ण सिनेमा किती मोठी डोकेदुखी असेल कल्पनाच करवत नाही.

तुम्हाला माहीतीये का गोविंदा आणि संजूबाबाचा एक सिनेमा होता जो मी ४ वेळा शिक्षा केल्यासारखा पाह्यलाय. (आले व्होल्वोवाल्याच्या मना तिथे प्रवाश्याचे चालेना!) आणि असं असूनही मला अजूनही त्याची इश्टोरी कळलेली नाही. त्यात जॅकी पण आहे. जो या दोघांच्या हिरवीणींचा काका किंवा मोठा भाउ आणि लागलंच तर पोलिस इन्स्पेक्टर का कमिशनर पण आहे. सिनेमाचं नाव आठवण्यासाठी हे एवढं लिहिलं. आता आठवलं 'एक और एक ग्यारह'

JWM हा काही अ आणि अ नाहीये. commercial पण मस्त entertainment आणि डोक्यात न जाणारा chick-flick असं त्याचं वर्णन करता येईल. मी तर बाबा मस्त enjoy केला होता. कधी नव्हे ते शाहिद कपूर मला आवडला.


Shraddhak
Wednesday, April 02, 2008 - 6:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका, ' जय पाजी ' आणि ' वीरू पाजी ' वाला ना? तो खरोखर अचाट नि अतर्क्य!

जब वी मेट नाहीये अ नि अ. साथिया पण नाही. सगळ्यांच सिनेमांना अ नि अ मध्ये घालू नका हो.
:-)

Ankyno1
Wednesday, April 02, 2008 - 6:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्र....

'जयपाजी न वीरूपाजी' वाला तो 'जोडी नं. १'

एक और एक ग्यारह मधे 'तारापाजी आणि सितारापाजी' आहेत....

बाय द वे....
गोविंदा चे सिनेमे म्हणजे होम ग्राऊंड....
वेळ मिळाला की लगेच चीर-फाड सुरू करतो....


Ashbaby
Wednesday, April 02, 2008 - 7:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जब वी मेट हा अतिशय सुंदर पिक्चर आहे. अ. आणि अ. मध्ये त्याची गणना होऊच शकत नाही.

त्याच्या दिग्दर्शकाचा आधीचा 'सोचा न था' पण असाच अतिशय सुंदर चित्रपट होता.

मला दोन्ही पिक्चर थोडेफ़ार वास्तववादी वाटले. असे सगळ्यांच्याच आयुष्यात होईल असे नाही, पण होऊ शकते. (बाकी इतर अ. आणि अ. पाहताना, अरे असे होते काय कधी आणि कुठे? हा प्रश्न सतत पडतो.)

जब वी मेट मध्ये दोघांचेही काम सुरेख झालेय. करीनाच्या व्यक्तिमत्वाला साजेशीच भुमिका होती. तिने सुरवातिची लाऊड आणि आयुष्यात फ़टका बसल्यावर शांत झालेली मुलगी छान दाखवलीय. दिग्दर्शकाची करामत.....

त्यातली एकमेव अ. आणि अ. गोष्ट म्हणजे करीनाची फॅमिली. सगळे अगदी डोके बाजुला ठेऊन वागत होते. नऊ महिने गायब असलेली मुलगी घरी येतेय, तर तिचे स्वागत अगदी रणांगणावर शौर्य गाजवुन आलेल्या वीरासारखे... अरे आधी बघा तरी ती काय परिस्थितीत आहे ते.

अशा सुंदर पिक्चरला नजर लागू नये म्हणून हा डाग बहुतेक.

मला दिल तो पागल है सुध्दा आवडलेला. त्यातही तशा ब-याच अ. आणि अ. गोष्टी आहेत. पण तरीही आवडला. माधुरी आवडली, थोडी प्रौढ वाटली तरीही. आणि तिचे अक्षय शी लग्न करण्याचे रिझनींगही अगदीच अ. आणि अ. वाटले नाही. करिष्मा मात्र अजिबात आवडली नाही. राष्ट्रिय पारितोषिक मिळवण्यासारखे काय केले तिने हे पिक्चर पाहूनही कळले नाही.

मैने प्यार किया हा मी दोनदा थिएटरमध्ये जाउन पाहिलेला एकमेव पिक्चर. मला तेव्हा तो खुप आवडला होता. बहुतेक तेव्हाच्या वयाचा परीणाम असावा. आता बोर होतो पाहताना. चॅनेल बदलते लगेच.


Ajjuka
Wednesday, April 02, 2008 - 7:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्र,
जय नि वीरू की तारा नी सितारा माहित नाही. कोणीतरी पाजी होते एवढं नक्की.
आणि हिरविणी कुठून उचलून आणल्या होत्या कुणाला माहित. पण त्यांनी त्या परत केल्या असाव्यात काम झाल्या झाल्या. कारण नंतर त्या कुठेच दिसल्या नाहीत. :-)


Shraddhak
Wednesday, April 02, 2008 - 7:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्याच्या दिग्दर्शकाचा आधीचा 'सोचा न था' पण असाच अतिशय सुंदर चित्रपट होता.
<<<<<
एकदम मान्य. जरा प्रस्थापित कलाकारांना घेऊन काढला असता हा सिनेमा, तर चाललाही असता कदाचित. अभय देओलने वाईट काम केलं नव्हतं तसं. आयेशा टाकिया मला आवडलीय काही काही सिनेमांमध्ये. हा त्यापैकी एक.
याही सिनेमातलं शेवटचं गाणं सुरेख होतं. ( ओ यारा रब रुठ जाने दे....) सिनेमा चालला नाही हे केवळ दुर्दैव.


अंकुर, बरोबर. तारा आणि सितारा आणि त्यांची तेवढीच अचाट आई हिमानी शिवपुरी. :-P
आणि त्यात हिरविणी म्हणून अमृता अरोरा आणि मोनिका बेदी होत्या, मला वाटतं. अज्जुका, मोनिका बेदी नंतर जेलमध्ये नाही का गेली? मग ती कशी दिसेल सिनेमात?
:-)

त्यातली एकमेव अ. आणि अ. गोष्ट म्हणजे करीनाची फॅमिली. सगळे अगदी डोके बाजुला ठेऊन वागत होते. नऊ महिने गायब असलेली मुलगी घरी येतेय, तर तिचे स्वागत अगदी रणांगणावर शौर्य गाजवुन आलेल्या वीरासारखे... अरे आधी बघा तरी ती काय परिस्थितीत आहे ते.<<<<<<<
मला नाही वाटत असं साधना. कारण, त्यांना पक्की खात्री आहे की, शाहिदने तिच्याशी लग्न केले आहे, ती फ़क्त घरी यायला घाबरतेय. मग शाहिद ( जो तिचा नवराच आहे अशी यांची ठाम समजूत आहे आणि तब्बल नऊ महिने झाल्याने ते लग्न त्यांनी मान्यही केले आहे.) तिला घेऊन येतोय म्हटल्यावर ते स्वागतच करणार ना पहिल्यांदा घरी जावयासकट आलेल्या मुलीचे?



Prachee
Wednesday, April 02, 2008 - 7:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरंच श्रद्धा, 'सोचा न था' चांगला होता. मला तरी आवडला.

Ashbaby
Wednesday, April 02, 2008 - 8:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्म्म्म.....श्रद्धा तसेच असावे बहुतेक.. मला पाहताना ही गोष्ट थोडी खटकली.

दिग्दर्शक इम्तियाज अली आहे. अजुन पिक्चर आले याचे तर पाहायला पाहिजेत.

दोन्ही पिक्चरमधली गाणीही अप्रतिम आहेत.

सोचा न था मधले शेवटचे, 'अभी अभी मेरे दिलमे ये खयाल आया है" आणि ते प्रोपोज करण्याचं गाणं सगळी सुरेख आहेत.

जब वी मेट ची मौजा आणि नगारा सोडून इतर गाणी अतिशय सुंदर आहेत. (मौजा आणि नगारा पण छानच असतील पण..)


Ankyno1
Wednesday, April 02, 2008 - 9:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्र....

परत घोटाळा....
१ और १ मधे अमृता अरोरा आणि नंदिनि सिंग आहेत...

नंदिनी सिंग विषयी थोडंफार....
पहिला सिनेमा- लो मै आ गया (हीरो- विनय आनंद.. गोविंदा चा भाचा, दिग्द.- महेश कोठारे... दे दणादण च्या कथेवर काढलेला हिंदी सिनेमा...)
सिनेमा पडल्यामुळे ही लुफ्तांसा मधे हवाई सुंदरी बनली...
सुभाष घई नी तिथे पाहिली आणि १ और १ मधे रोल दिला...
(नशीब बघा... पहिल्या सिनेमात भाचा... दुसर्‍यात डायरेक्ट मामा...)
पण हा ही सिनेमा नीट चालला नाही....
मग आर्यन्स च्या 'देखा है तेरी आंखो को' गाण्यात छोटुस्सा स्कर्ट घालून (तो ही मर्लिन मनरो स्टाईल उडवत) कॉफी प्यायला आलेली दिसली होती...
कट टू टी.व्ही..... कुठल्याशा साँस-बहू सीरिअल मधे होती असं ऐकलं.... पुढे तिचं काय झालं ते तिलाच माहिती... किंवा सुभाष घई ला... (जो न जाने कोई... वो जाने सुभाष घई...)

मोनिका बेदी-
आबू सालेम नी ठेवलेली... (कायदेशीर विवाहाचे काहीही पुरावे नाहीत... बेकायदेशीर विवाह मान्य नाही.... त्यामुळे 'ठेवलेली' हा शब्द वापरलेला आहे... कोणाच्याही भावना दुखावल्या गेल्यास त्यांनी आबु सालेम ला भेटून त्याच्यावर राग काढावा...)
ही जोडी नं. १ मधे संजय दत्त ची नायिका होती....
प्यार इष्क और मुहोब्बत, जानम समझा करो हे तिचे इतर काही चित्रपट...

१ और १, आणि इतर १ से १ गोविंदा चित्रपटांचे विच्छेदन लवकरंच करण्यात येईल...


Ajjuka
Wednesday, April 02, 2008 - 10:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते युरोपातल्या रेल्वेच्या रुळांवर नाचत नाचत गाणं आहे. तो कुठला? हीरो नं १ की कुली नं १.
भेलपुरीवालं हिरो नं १ मधलं ना?
मोबाइल नंबर वालं? ते कशातलं?


Dakshina
Wednesday, April 02, 2008 - 11:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज्जुका, भेलपुरी वालं कूली नं.१ मधलं आणि
मोबाईलचं गाणं हसिना मान जाएगी मधलं.... त्यात संजू आणि गोविंदा होता...
तो ही एक अ. आणि अ. चित्रपटच होता....


Ankyno1
Wednesday, April 02, 2008 - 11:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

युरोपातल्या रेल्वेरुळांवर गोविंदा बरेचदा नाचलाय....

हीरो नं. १ मधे....
"तेरे बाप के डर से" गात
(पण परेश रावल तर करिश्मा चा दादा आहे.... आई बाप कधीचेच स्वर्गवासी झालेत... मग त्यांचे डर कशाला?)

दीवाना मस्ताना मधे....
"ओ मम्मी मम्मी" गात
या गाण्यात त्या रेल्वे पटरी चा आणि इंजन सकट गाडी चा उल्लेख असल्यानी शूटिंग च्या भाड्यात सवलत मिळाली असावी....


Ankyno1
Wednesday, April 02, 2008 - 11:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोविंदा संजय च्या सिनेमात ते दोघं एकमेकान्ना सारखं पाजी-पाजी तरी करतात..... किंवा 'यार्-यार' तरी....

हसीना मान जायेगी मधे तर वाक्यात किमान ३-४ वेळा 'यार' आलं नाही तर पैसे मिळणार नाहीत असं सांगितलं असावं डेव्हिड नी...

जोडी मधे ते
कंट्रोल यार.... ओय नै होंदा यार...

१ और १ मधे...
होल्ड यार... मै क्या क्लीन बोल्ड यार...
पाजी कुड यू प्लीज एक्सप्लेन... पाजी.. आय थिंक.... आय कांट....

हे संवाद बहुतेक या साठी टाकतात की नंतर कधितरी चॅनेल वाल्यांना (शक्यतो दूरदर्शन) क्विझ मधे प्रश्न टाकायला बरं.... की मोजा लेको, अमुक तमुक वाक्य किती वेळा आलं....


Farend
Wednesday, April 02, 2008 - 2:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे ही चर्चा जनरल अ. आणि अ. मधे पुढे चालू करा, इथे नको! नाहीतर यादे चा अर्थ ज्या चित्रपटाबद्दल चर्चा करताना इतरच चित्रपट जास्त आठवतात तो असा होईल :-)

Tonaga
Wednesday, April 02, 2008 - 4:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्यातली एकमेव अ. आणि अ. गोष्ट म्हणजे करीनाची फॅमिली. सगळे अगदी डोके बाजुला ठेऊन वागत होते.>>>>>कितीही केलं तरी सरदारजी आहेत ते! :-)

Ashbaby
Thursday, April 03, 2008 - 5:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे ही चर्चा जनरल अ. आणि अ. मधे पुढे चालू करा, इथे नको! नाहीतर यादे चा अर्थ ज्या चित्रपटाबद्दल चर्चा करताना इतरच चित्रपट जास्त आठवतात तो असा होईल
>>>>>>>>>>>..

mastach :-) :-)

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators