Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 17, 2008

Hitguj » My Experience » समानता » Archive through March 17, 2008 « Previous Next »

Bsk
Monday, March 10, 2008 - 8:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्यामते असे डीरेक्टली विचारणे अवघड आहे. पण एकंदरीत मोकळेपणाने चर्चा करून माणूस(इथला नाही) समजू शकतो(बर्‍याचदा..) लग्नाच्या आधी खूप बोललं पाहीजे जोडीदाराशी,इतकं मात्र नक्की. फालतू बडबड जरी असली तरी व्यक्ती म्हणून तो उलगडत जातो हळुहळू, आणि ते महत्वाचं..

Manuswini
Monday, March 10, 2008 - 8:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे पण नक्की काय चर्चा व कशी त्याचे काय?

Arch
Monday, March 10, 2008 - 9:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनु, सरळच विचाराव गं
बाबारे, तुझ्या मुला-मुलीच्या आईवडिलांबाबतच्या जबाबदारी किंवा कर्तव्याबाबत काय कल्पना आहेत?

संसाराबाबतीतले आपले सगळे निर्णय एकमेकांच्या सल्ल्यानुसार घेण्याबाबत काय मत आहे? वगैरे वगैरे.


Karadkar
Monday, March 10, 2008 - 9:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटते की सरळ विचारावे आडुन आडुन विचारण्यात काही साध्य होत नाही. आणि मुलाला आवडले नाही अथवा त्याने त्याचा issue केला त्र लक्षात घ्यायचे की त्या गोष्टीमधे wavelength जुळत नाही.
तुम्ही साधारणपणे १ महीना वगैरे comfortably बोलत आहात आणि दोघान्चाही decision positive होईल असे वाटलेच तर बोलायला हवे. अन्यथा सगळ्या ऐर्या-गैर्याबरोबर बोलण्याची काही गरज नाही.
चर्चा सुरु करण्याआधी सरळ सांगावे की हे फ़क्त तुझ्या माझ्यात आहे माझ्या घरच्या किंवा तुझ्या घरच्याना अत्ता काहीही बोलायची गरज नाही आपण निर्णयापर्यंत आलो कि त्यांना सांगुयात.
जवळच्त्या मित्र-मैत्रिणीना पण लगेच आम्ही असे बोललो हे सांगायची गरज नाही असे मला वाटते.
त्यहुनही महत्वाचे म्हणाजे तुमचे स्वत:चे विचार अतिशय सुस्पष्ट असणे अत्यंत महत्वाचे आहे तुमच्यासाठी काय must , काय may be okay काय total no no हे तुम्हाला नीट माहिती असायला हवे.

हे मी मनुला उत्तर म्हणुन लिहिले असले तरी मुलांसाठी तितकेच लागू अहे.

this might sound little weird but, if you are getting married here in US, please go through the laws about the community property, personal property. etc. Do your homework before you start talking. Do not talk in figures (how many $ or Rs. )


Manuswini
Monday, March 10, 2008 - 11:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च आणि कराडकर,
खूप thanks , आता उडी घ्यायचीच आहे तर विचारून घेते. पण काहीच कळत नाही. एकतर हेच समजत नाही की कोणी कसे analysis करेल हे प्रश्ण विचारल्यावर(मनात भीती असते,एकतर आपण चांगल्या भावना ठेवून विचारणार नी समोरचा वेगळाच अर्थ घेणार).
असो,
आर्च तुझे दोन्ही प्रश्ण सहज नी सोपे सरळ आहेत नी कराडकर तुम्ही मांडलेला US मध्ये लग्न करताना विचारात घ्यायला लागण्यर्‍या गोष्टीचा मुद्दा चांगला आहे( तो कधी विचार आलाच नाही डोक्यात..).

आता आणखी, हे 'असे' प्रश्ण फोनवर विचारण्यापेक्षा समोरासमोर प्रत्येक्षात भेटून विचारणे चांगले नाही का?
कराडकर,
पण नक्की तुमचा point नाही कळला? नी काय check करायचे नी कशासाठी उपयोगी तेही नाही कळले.


Ajjuka
Tuesday, March 11, 2008 - 5:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळे सांगतायत तेच...
स्पष्टपणे विषय मांडलेला बरा.
आगाउपणा/ अति शहाणपणा वाटला त्यांना तर they dont deserve you! उनकी उतनी औकातही नही असं समजून टाटा बाय बाय करायचं!
तुला ज्या गोष्टींचं महत्व वाटतं त्या तुझ्या potential जोडिदाराशी बोलणे किंवा चर्चा करणे यात चूक काहीच नाही. (हा मुद्दा फक्त मुलींसाठी कारण मुलींनी असं काही सांगणं हे लग्नाच्या बाजारात उद्धटपणाचं तर मुलाने सांगणं दूरदर्शीपणाचं मानलं जातं.)
हे खालचं सगळ्यांसाठी
आणि माणूस अश्या भेटींमधे अगदी best foot forward ठेवून वागत असला तरी घराची आर्थिक व्यवस्था, मिळकतीचा योग्य विनियोग, आईवडिलांच्या जबाबदार्‍या, घराबद्दल संकल्पना अश्या गोष्टींबद्दल बोलताना त्याचं खरं काय ते दिसून येतंच की.
म्हणजे 'सुनेने अमुक व्रते, तमुक कुळाचार पाळणे कंपल्सरी आहे. ते तू काही झालं तरी केलेच पाहिजेस. नाहीतर ते आईला/ आजीला आवडणार नाही.' असं लग्न ठरायच्या आधीच सांगणारा बायकोच्या मताला किती किंमत देईल ते कळतंच आहे.
असो!


Ashbaby
Tuesday, March 11, 2008 - 5:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकतर हेच समजत नाही की कोणी कसे अनल्य्सिस करेल हे प्रश्ण विचारल्यावर(मनात भीती असते,एकतर आपण चांगल्या भावना ठेवून विचारणार नी समोरचा वेगळाच अर्थ घेणार).

असा वेगळाच अर्थ कोणी घ्यायला लागले तर मग प्रश्नच मिटला.. आपल्यात तिथेच स्पष्ट होईल पुढे जायचे की नाही ते.

all the best Manuswini

Manjud
Tuesday, March 11, 2008 - 5:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वर मांडलेल्या सगळ्याच मुद्द्यांसाठी भाग्यश्री, मिनोती, आर्च, अज्जुका सगळ्यांनाच अनुमोदन.


Dakshina
Tuesday, March 11, 2008 - 6:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझंही अनुमोदन...
आगाउपणा/ अति शहाणपणा वाटला त्यांना तर they dont deserve you! उनकी उतनी औकातही नही असं समजून टाटा बाय बाय करायचं!>>> यासाठी विशेषकरून अज्जुकाला...

Dakshina
Tuesday, March 11, 2008 - 6:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मागे एक दोन पोस्ट्स अशा आहेत ज्यात काही लोकांनी वेगवेगळी मतं सांगितली आहेत. त्या सर्वांना ही माझं अनुमोदन आहे. म्हणजे फ़क्त नवर्‍याने एकट्याने घर चालवावं आणि बायकोने तिचे सर्व पैसे बँकेत ठेवावे असं मला अजिबात म्हणायचं नव्हतं. अज्जुका किंवा मंजू म्हणाली त्याप्रमाणे घर हे दोघांनी गरज ओळखून चालवावं हे ही अगदी खरं. आणि most of the times हा शहाणपणा स्त्रियांकडूनच initiate होतो. (हे माझं निरिक्षण.)
कालच माझ्या मैत्रिणिचा फोन आला होता, तिचा पगार जेमतेम असूनही, तिच्या नवर्‍याने फ़क्त पहिला पगार तिला घेऊ दिला, आणि पुढच्या महीन्यापासून तो घरखर्चाला वापरून टाकू असे सांगितले, शिवाय म्हणाला... तुला करायचेत काय पैसे? असं कशाला म्हणायचं? याची चिड येते. बायकोने विचारलं असंच तर? नवरा गप्प बसेल का? ती बिचारी तो म्हणेल तसं करतेय, आणि 'आदर्श बायको' ठरलेय. उद्या तिला जर का अगदी दोन रुपये सुद्धा स्वतःसाठी खर्च करावेसे वाटले तरिही तिला नवर्‍यासमोर हात पसरावा लागणार....
बायको स्वेच्छेने घरात खर्च करत असेल तर उत्तम, पण जर तिची मदत घ्यावी लागली तर नवर्‍याने पगारातले निदान काही पैसे "तू हातचे ठेव" असे आपण होऊन सांगायला हवे.
अर्थात हे सगळं होण्यासाठी नातं खूप चांगलं हवं दोघांमधलं.


Abhijeet25
Tuesday, March 11, 2008 - 1:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या मते नवर्‍याने बायकोच्या पगारावर कधीही हक्क सांगु नये.

तिला जर घरात तिचे कष्ट कमी करण्यासाठी काही घ्यावयाचे वाटत असल्यास( जे नवर्‍याच्या पगारतुन शक्य नाहि) उदा. कपडे धुण्याचे किंवा भांडी धुण्याचे यंत्र, वगैरे घ्यावयाचे असल्यास तीने घ्यावे.

आणि जर त्या पगाराची गरज घरात नसेल तर उत्तमच
ती तिच्या मर्जीची मालक आहे. ते तिचे स्त्रीधन आहे स्वता:हा कमाविलेले. ती तो पैसा स्वता:च्या घरी देईल किंवा खरेदी मधे उडवेल, दागिने घेईल किंवा कुठेतरी गुंतवून ठेवेल जेणेकरुन तो अगदीच अडीनडीला वापरता येईल ( सासरी किंवा माहेरी). तो सर्वस्वी तिचा प्रश्न आहे.

तिच्या आई-बाबांनी तिला वीस बावीस वर्षे तळहाताच्या फोडासारखे जपुन वाढविलेले आहे. तिचीही काही कर्तव्ये आहेत त्या घराप्रती.




Ajjuka
Tuesday, March 11, 2008 - 1:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>माझ्या मते नवर्‍याने बायकोच्या पगारावर कधीही हक्क सांगु नये.<<
हक्काची भाषा आली की नातं खराब झालंच.
पण तरी एक जण कमावता आणि दुसरा घर सांभाळणारा असं असेल तर कमावणार्‍याच्या कमाईवर दोघांचा सामाईक अधिकार आहे. कमावणारा नवरा असेल वा बायको. सर्वसाधारणतः नवरा कमावणारा आणि बायको घर सांभाळणारी असं असतं पण उलटे चित्रही असू शकते ज्यात चूक, वाईट, लांछनास्पद काही नाही.
पण दोघे कमावते असतील तर घरखर्च, घरासाठीच्या छोट्या मोठ्या खरेद्या, कर्जांचे हप्ते (घरकर्जासारखे!), बचत किंवा investment plans साठीचे लागणारे पैसे यासाठी दोघांच्या पगारातून काही रक्कम काढून ठेवून बाकीच्या पैशाचा विनियोग कसा करायचा हे ज्याने त्याने च ठरवायचं.
मग त्यातून बायकोला सर्प्राइज गिफ्ट घ्यायचं की नवर्‍याला वेकेशन ला घेऊन जायचं की आपापल्या आइवडीलांना मदत करायची की मुलांसाठी काहीतरी करायचं की स्वतःच्या मजेसाठी/ आवडीच्या वस्तूंसाठी उडवायचे, की साठवून ठेवायचे हे स्वतःचं स्वतःच ठरवायला हवं.


Abhijeet25
Tuesday, March 11, 2008 - 5:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी तेच तर म्हणतो आहे.
हक्क सांगू नये पण तिची जर संमती असेल तर तो वापरण्यास हरकत नाही. आणी तिच्या वर तू घरात पगार द्यायलाच हवा अशी भुमिका नको.

तसेही आजकाल एका पगारात घर चालविणे थोडे कठिण आहे या महागाईच्या जमान्यात. पण तिच्यावर ते लादले जावू नये (म्हणजेच हक्क सांगू नये) ईतकेच मला म्हणायचे आहे.


Arch
Tuesday, March 11, 2008 - 5:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

घरातली पैशाची वाटणी (जर दोघे नोकरी करत असतील तर

Total Earning = His Salary + Her Salary
Total Saving = Total Earning - Total Monthly Expenses
Joint Saving = Total Saving - (Saving for her account + Saving for His account)
Her Saving = His Saving ( both should have equal amount.) दोघांनीही आपल्या personal account मधून काहीही खर्च केला तरी दुसर्‍याने त्याची दखल घेऊ नये. आता हे प्रत्येकाने आपापल्या सोयीने ठरवावं एकजण नोकरी करत असला तर फ़क्त Total Earning मध्ये फ़रक पडेल.


Asmaani
Sunday, March 16, 2008 - 1:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपल्याकडे in general एखाद्या सणाच्या किंवा घरगुती function च्या वेळी असणारी परिस्थिती म्हणजे, अक्खी सकाळ खपून बायकांनी स्वयंपाक करायचा. मग obviously पहिली पंगत पुरुषांची बसणार! त्यांचं यथास्थित जेवण झालं की मग बायकांनी जेवायचं.( स्वत्:च वाढून घेउन of course! ) त्यावेळी पुरुष बाहेरच्या खोलीत हास्यविनोद पत्ते खेळणे वगैरे करणार. बायकांचे जेवण होऊन मागचं आवरणं वगैरे होइपर्यंत लगेच चहाची वेळ होतेच.
आजपर्यंत मी एकही असा पुरुष पाहिला नाही की जो बायकांना असं म्हणेल की आम्ही जेवत असतांना तुम्ही आम्हाला वाढलंत. आता तुम्हाला आम्ही वाढतो. no! never!.


Abhijeet25
Sunday, March 16, 2008 - 3:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या घरी या बघायला मिळेल. मी कायम आग्रह करुन करुन त्या सगळ्या बायकांना खायला घालतो (सूड म्हणून).

भरपुर जेवल्या वर जरा पडते म्हणून चांगल्या तास दिड तास झोपतात मग आम्हि सगळे वाट्टेल ते करायला मोकळे.........


Sonalisl
Sunday, March 16, 2008 - 7:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्या घरी कुठलेही कार्य असेल तर जेवण वाढायला माझे चुलते, भाऊ, मामा पुढे असतात. अगदी शेवटची पंगत ऊठेपर्यंत. पाणी देण्यापासुन ते चहा देण्यापर्यंत सगळं. अजुनसुद्धा ती पद्धत मोडली नाही :-)
जेव्हा गावाकडे एकत्र दिवाळी साजरी केली जायची, तेव्हा सगळा फ़राळ करायला सुद्धा आमचे काका लोक मदत करायचे. :-)


Raviupadhye
Monday, March 17, 2008 - 2:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या घरी या.भाज्या साफ करणे.काही चिरणे,बटाटे उकडलेले सोलणे,ताटे घेणे,टेबल लावणे, पाहुणे असले किंवा नसके एकत्रच बसतो,बायकांनी वाढायचा प्रकारच नाही,नन्तर पटापट गरजे एवढी सावरासावर ही सर्व कामे मी व मुली एकत्र करतो,नन्तर सर्व कार्यक्रम एकत्रच,पत्ते,वामकुक्षी,गप्पा इ.
हे पूर्वापार आम्ही पालन केले आहे.खूप मजा येते.-:-)


Uday123
Monday, March 17, 2008 - 6:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अस्मानी: मी देखील थोडा-फ़ार असाच अनुभव घेतला आहे, बर्‍याच ठिकाणी अशी परिस्थिती दिसली. मी तर खात्री करुनच घ्यायचो त्यांनाही जेवायला तेच पदार्थ आहे अथवा नाही, हो कमी जास्त नको पडायला.

आज हळु-हळु परिस्थितीत फ़रक पडतो आहे. आज पुरुषांची बरीच मदत (करायला, खायला, आवरायला) होताना दिसते.


Dhanu66
Monday, March 17, 2008 - 9:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्याही घरी कार्याला, गणपतीत माझे सगळे दिर वाढायला, मागचे आवरायला, आम्हाला वाढायला असतात.
आणी घरी माझा नवरा बरीच मदत करतो. भाज्या आणणे, त्या निवडून ठेवणे, एखादे वेळी ( बहुदा शनीवारी) स्वयंपाक तोच करतो. आणी हो, लोणी काढायचे काम सुध्धा तोच करतो. (कारण मला ते अजीबात आवडत नाही ). :-)


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators