Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
मै प्रेम की दिवानी हूं! ...

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट - अचाट आणि अतर्क्य » मै प्रेम की दिवानी हूं! « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through March 25, 200820 03-25-08  7:23 am

Ajjuka
Tuesday, March 25, 2008 - 7:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही ही अगं पूनम तेवढ्यासाठी ब. भाउजींना अंशतः माफ करायला हवं!! :P

Deepanjali
Tuesday, March 25, 2008 - 7:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगदी .....
ह्रितिक कसली भयानक तोंडं करतो सारखा !
बडजात्यानी या सिनेमात conservative Romance मधून बाहेर पडायचं ठरवलं आणि मग अपयश मिळाल्यावर म्हणायला मोकळा कि लोकांना नवीन काही आवडत नाही
मग पुन्हा हे दणादण कौटुंबिक romance, लाजून चूर होणे सुरु !
विवाह काढताना एक मात्रं फ़ा sss र चांगलं केलं , नाव च कसं एकदम straigh forward दिलं !
उगीच लोकांनी लग्नाची कॅसेट वगैरे टोमणे मारायला नकोत , किती प्रामाणिक नाव !


Deepanjali
Tuesday, March 25, 2008 - 7:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुभाष घई च्या पकाउ ' यादे ' बद्दल लिहा ना कोणी तरी , करीना आणि ह्रितिक च्या भयानक over acting चा अजुन एक नमुना .. बरोबर जख्खड म्हातारा जॅकी ! :-)
त्यात ह्रितिक अख्खा समुद्र पोहत जातो आणि मग काही तरी एका डॉक्टर चा संवाद आहे वाटतं कि ' समुंदर मे किसी जहरीले किडे ने उसे काट लिया है !"



Psg
Tuesday, March 25, 2008 - 7:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ए मला क्लायमॅक्सचा सीन प्लीज सांगा ना.. आता अगदी उत्कंठा लागून राहिलीये :P

आणि अजून एक्- चित्राचा भयाण नाकातला आवाज!!! काय भयंकर गाणी आहेत या सिनेमातली!! बापरे!

डीजे! यादे!!!!!!!!! का???????????? वाचवा!


Alpana
Tuesday, March 25, 2008 - 8:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह चित्रपट न बघण्याचा शहाणपणा केला होता पण यादे मात्र बहिणीमुळे बघावा लागला... लागल्यानंतर एक आठवड्यानि बघितला... तिकिटे काढताना बहिणीला खुप समजवायचा प्रयत्न केला की अग १०-१५ लोकच दिसताहेत... नको बघायला पन ती ह्रितिक वेडी असल्याने माझे काही चालु शकले नाही....

Shraddhak
Tuesday, March 25, 2008 - 8:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरं, क्लायमॅक्सला हातावरच्या टॅटूमुळे काहीतरी गुपित उघडं पडतं ना की खोटा प्रेम नं १ आणि करीनाचं सूत जुळलंय ते???<<<<<
आधी Vday च्या पार्टीत करीनासाठी Vday contest जिंकण्यासाठी त्याने स्वतःच्या दंडावर बदामामध्ये करीनाचे नाव असा टॅटू गोंदवून घेतलेला असतो.

साखरपुड्याच्या दिवशी जेव्हा तो करीनासमोर येतो तेव्हा ती त्याच्या त्याच हाताचा आधार घ्यायला जाते. तो गरीब असल्याने त्याने हलक्या दर्जाच्या सिल्कचा शर्ट घातलेला असतो नि करीनाची ताकद जास्त असल्याने तो शर्ट बाहीवर फाटतो नि टॅटू दिसतो.


Alpana
Tuesday, March 25, 2008 - 8:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

<तो गरीब असल्याने त्याने हलक्या दर्जाच्या सिल्कचा शर्ट घातलेला असतो नि करीनाची ताकद जास्त असल्याने तो शर्ट बाहीवर फाटतो नि टॅटू दिसतो....>
भन्नाट......

Dakshina
Tuesday, March 25, 2008 - 8:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तो गरीब असल्याने त्याने हलक्या दर्जाच्या सिल्कचा शर्ट घातलेला असतो नि करीनाची ताकद जास्त असल्याने तो शर्ट बाहीवर फाटतो नि टॅटू दिसतो. >>>>>

श्रद्धा....


Ajjuka
Tuesday, March 25, 2008 - 8:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

यादे यादे!! आता नंतर यादे हवा!
मला या सिनेमाबद्दल जाम उत्सुकता आहे. कुठल्यातरी चॅनेलवर ते ३ बहिणींचं गाणं पाह्यलं होतं एकदा आणि एकदा अजून कुठलातरी सीन. पण तरी नक्की काय होतं ते कळलेलं नाही त्यामुळे प्लीज कुणी तरी यादे बद्दल लिहा रे!!


Psg
Tuesday, March 25, 2008 - 8:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जबरी श्र! हेच पाहिजे होतं मला आणि मग ते 'गुपित' उघडं झाल्यानंतरचे त्यांचे ते भयव्याकूळ चेहरे आठवताहेत ना? वा! काय भाव आणलेत चेहर्‍यावर.. हृथिकच्या डोळ्यातलं पाणी खळ्कन आता बाहेर सांडेल असं वाटतं, करीना 'अब क्या होगा' च्या कश्मकश मधे! हाय!

आता माझा दिवस चांगला जाईल (यू मेड माय डे चं स्वैर भाषांतर )


Zakasrao
Tuesday, March 25, 2008 - 10:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तिथल्या पोरांना शाळेत भूगोलाच्या पुस्तकात ' सुंदरनगर: समुद्रसपाटीपासून ० किमी उंचीवर असलेले थंड हवेचे पर्वतीय ठिकाण ' असले वाचावे लागत असेल. मग असले शिक्षण देणार्‍या तिथल्या कॉलेजात शिकलेल्या मुलींना नोकरी मिळण्याची शक्यता खुंटल्याने लग्नाची वाट बघत बसणे आले.) >>>>>>>>
तो गरीब असल्याने त्याने हलक्या दर्जाच्या सिल्कचा शर्ट घातलेला असतो नि करीनाची ताकद जास्त असल्याने तो शर्ट बाहीवर फाटतो नि टॅटू दिसतो. >>>>>
उगीच लोकांनी लग्नाची कॅसेट वगैरे टोमणे मारायला नकोत , किती प्रामाणिक नाव >>>>>>>>>>.



Prajaktad
Tuesday, March 25, 2008 - 2:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पंकज कपूरनी हा बापाचा रोल का केला असावा याचं उत्तर त्याला तरी मिळालं असेल का>>>>
अस्काय ते पुनम? अग तेव्हा तो करिनाचा भावी सासरा होता ना?

तो गरीब असल्याने त्याने हलक्या दर्जाच्या सिल्कचा शर्ट घातलेला असतो नि करीनाची ताकद जास्त असल्याने तो शर्ट बाहीवर फाटतो नि टॅटू दिसतो....खी खी खी आणी पुढच्याच सिन मधे ति फ़ाटकी बाही लपवायला तो कोट असा अर्धा अंगावर घेवुन उभा..
तो टाटु बघुनच सैफ़ ने गोंदवले असावे का?

विवाह काढताना एक मात्रं फ़ा sss र चांगलं केलं , नाव च कसं एकदम straigh forward दिलं !
>>>
तर एक कॉन्वेंटची शाळा असते. फक्त मुलींची. तिथल्या शिक्षिका बर् 0dयाचश्या संतीणी असतात. मुली पण अगदी गो SSSSS ड असतात. पापण्यांची झपझप, तोंडांचे चंबू कित्ती गोड गं बाई!
>>>>,,

Amruta
Tuesday, March 25, 2008 - 2:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कसल अफाट लिहिलय. ह. ह. पु. वा झाली नुसती.
ह्यात खरच ह्रितिक अगदी बघवत नाहि. overacting उतु जाते नुसती.

यादे बद्दल खुप ऐकलय पहायचा योग काहि आलेला नाहिये अजुन. लिहा पटकन कुणितरी.


Manuswini
Tuesday, March 25, 2008 - 5:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका, LOL
सगळ्यांच्या कम्मेन्ट्स एकदम धमाल.
श्र,
अगदी धमाल ... 'तो गरीब असल्याने....'

आणखी एक स्वतला boyfriend असून सुद्धा मित्राला शहर दाखवताना काय ते अंगावर पडून खिदळणे काय नी मी बाई भोळी सारखे वागणे काय नी काय.



Manuswini
Tuesday, March 25, 2008 - 6:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

यादी असाच एक टुकार कंडम मूवी.

गरीब मित्राची मुलगी वगैरे वगैरे... श्रीमंत मित्राचा मुलगा ह्यांचे लफ़डे.
मग प्रेमाचा त्याग वगैरे वगैरे


Asmaani
Saturday, March 29, 2008 - 12:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका, श्रद्धा, अशक्य लिहिलंयत तुम्ही!
btw विवाह मधे ती अमृता इतकी खाली पाहात असते सारखी की बरेचदा ती झोपली असावी अशी शंका येते.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators