Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 18, 2008

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » नाव आणि प्रतिमा » Archive through March 18, 2008 « Previous Next »

Yogesh_damle
Saturday, March 15, 2008 - 3:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संघमित्रा म्हटलं की मला भिक्षुणीसारखा चीवर परिधान केलेली एक विरागी साधक डोळ्यांपुढे येते.

झकास, थ्रेड उघडल्याउघडल्या तुझीच पोस्ट डोळ्यांपुढे आली, आणि 'बादलीने भागणार नाय, बंब मागवा' वाचून डोळे फिरले. :D


Manuswini
Saturday, March 15, 2008 - 8:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे आयडी पेक्षा लिखाणाच्या स्टाईलवरून लिहिता येइल नै का?
बर्‍याच दिवसाने इथे फिरकले. चालु द्या.

सध्या बादल्या वाटप चालु आहे असे दिसते. पण पाणी टंचाईचा जरा विचार हसु द्या.
'बाकी चालू द्या '(बा. चा. द्या.) :-)

त. ट. : अरे बापरे हे असे शॉर्ट्फ़ॉर्म लिहिणे प्रश्स्त नाही हे लिहिल्यानंतर लक्षात आले. म्हणून पुर्ण लिहिले ते लक्षात असू द्या. :-)


Chyayla
Sunday, March 16, 2008 - 12:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संघमित्रा वाचलं की भारताच्या संघाची मैत्रीण असावी असे वाटते

म्हणजे ती "मंदिरा बेदी" वैगेरे आहे की काय?

गिरीराज चा सगळ्यानी गिर्या करुन टाकला एवढ उंच, उत्तुंग नाव पण त्याला अगदी गिरवुन टाकला. (हिंदी वाला)
गिर्याचे सगळे पोस्ट एकदम धमाल याला खास करुन मिस्किल टोमणे छान मारता येतात. (नेहमी बंब घेउन फ़िरत रहा रे ब्वा) मला वाटत गिर्या लिहितानाच दात विचकुन हासत असणार आणी आम्हालाही तसच हसवणार.. तेव्हा हा स्मायली गिर्याला बहाल...

दक्षिणा साठी योगेश ला अनुमोदन.


Abhijeet25
Sunday, March 16, 2008 - 9:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटले कि ते संघमित्र आहे. आधी वाटलेले कि कट्टर कार्यकर्ता आहे संघाचा.

Tonaga
Sunday, March 16, 2008 - 1:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला तर ती आर पी आयची कार्यकर्तीच वाटली....

Nandini2911
Monday, March 17, 2008 - 3:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी आणि आयटी डुप्लिकेट आयडी आहोत असं ते पोस्ट वाचून मला पण वाटलं होतं.. :-):-):-):-)
दक्षिणा, अचाट अतर्क्य मालिका बघणं सोडून न्युज चॅनल्स बघ..
योगेश दामले कसा दिसतो ते कळेल
बाकी दामले भाऊ, बर्‍याच दिवसात दिसला नाहीत... कधीतरी पॉलिटिक्स सोडून आयपी एल कव्हर करा.. मायबोलीकर म्हणून तुम्हाला एस्पेशल exclusive देईन.


Bee
Monday, March 17, 2008 - 4:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योगेश, तु बातम्या वाचतोस का? कुठल्या भाषेत?

नंदीनी, योगेश दामले, बातम्या वाचतात का?

मी रोज न्यूज चॅनेल बघतो, पण बातम्या देणार्‍यांची नावे लक्षात नाही ठेवत.


Tulip
Monday, March 17, 2008 - 7:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

lol बी न्यूज चॅनल्सवर बातम्या फक्त 'वाचून' दाखवण्याचे दिवस गेले कधीच. पण तरी हे पोस्ट वाचल्यावर योगेश तु दूरदर्शनवरच्या पूर्वीच्या प्रदीप भिडे सारखा दिसलास एकदम. की अनंत भावे म्हणू

Deepanjali
Monday, March 17, 2008 - 7:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

lol Tulip ! :-)
योगेश दामले कुठल्या News channel वर असतो ?


Yogesh_damle
Monday, March 17, 2008 - 7:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी वार्तांकन (reporting) जास्त करतो, निवेदन ( anchoring ) अगदी क्वचित (आत्तापर्यंत एकदाच). कालच एक अर्ध्या तासाचा special दिला होता शास्त्रीय संगीतावर्- मुंबईचं भेंडीबाजार घराणं.

प्राणी पाणवठ्यावर यायच्या ठरलेल्या वेळा असतात तशा माझ्याही आहेत- :-) सहसा संध्याकाळी साडेपाच, सात आणि साडेदहा- मुंबईच्या बातम्या असतात तेव्हां. सहसा हिंदीतच असतो, येऊन-जाऊन कधीतरी इंग्रजीत.

नंदिनी मला 'हम दिल दे (के) चुके' सनम मधल्या ऐश्वर्यासारखी वाटते (नावात बरंच काही असतं!)

Tulip बद्दलची माझा कल्पनापण नावामुळेच- लाल, पिवळ्या आणि गुलाबी रंगाशिवाय काहीच न नेसणारी... :-)

Bee सुद्धा मला नावामुळेच भा. रा. तांब्यांसारखे वाटतात... गूढ, पोक्त... :-)


Giriraj
Monday, March 17, 2008 - 7:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी - ही मला खूप मोठी बाई आहे असे वातले होते पण निघाली पोरटीच! म्हणजे नंदिनी क्र.२ अगदी 9/11 सारखी! :-)

मित्रा - कायम आकाशाकडे नजर लावून नवनवीन शब्द शोधत असाविशी वाटते!

दिपांजली - हातात दिवे घेऊन नाचत असेल असे वाटते.. म्हणूनच सांगावसं वाटतं 'जपुन ग बाई,डोईवरची जरीची चुनरी सांभाळून नाच! :-)

झक्की - अनुपम खेर!



Limbutimbu
Monday, March 17, 2008 - 9:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकासच जस चित्र काढल होत तसाच दिसावा अस वाटत होत अगदी मोठ मोठ्या मिश्या असलेला गलेलठ्ठ धिप्पाड कोल्हापुरी पाटील असावा वगैरे वगैरे वाटत होत
प्रत्यक्ष भेटला....
हा असा आला हो मोटर सायकल वरुन
मी पहिल्यान लक्षच दिल नाही
आला, बाजुला गाडी लावलीन, शेजारी येवुन उभारलान, मायबोलीका अस विचारलन, मी हो म्हणल, झकोबा का? अस विचारल! हो म्हणाला!
आपाद मस्तक न्याहाळल
तोवर त्यान हेल्मेट काढल!
पुन्हा स्वारिला वर पासुन खालवर पाहुन घेतल
(आता वर पासुन खाल वर पहायला अशी मान तरी कितिकशी हलवावी लागत होती म्हणा???????)
अन मी जो खो खो खो खो हसत सुटलो रस्त्यातच पोट धरुन, खोट वाटत असेल तर विचारा झकोबाला इथेच, मग माझ हसण बघुन तोही हसायला लागला, थोडावेळ आम्ही दोघान्कडे बोट दाखवित नुस्तेच हसत होतो!
तर झकासराव नावाच हे निघाल सशाच गबदुल्ल्या गोन्डस पिल्लू!


Bee
Monday, March 17, 2008 - 9:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दीपांजली आणि अज्जुका दोघी जणी मला एकमेकींच्या जावा जावा आणि नऊवारी परिधान करून नठून थटून बसलेल्या दिसतात :-)

ट्युलीप, मला नेहमी सोनाली कुलकर्णीसारखी वाटते.. ती कुठल्या तरी सिनेमात संजय सुरीची प्रेयसी होती ना.. नेहमी फ़्रॉक वर असायची ती त्या सिनेमात.. तशी :-)


Dakshina
Monday, March 17, 2008 - 10:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे योगेश, पण चॅनल कोणतं, ते तरी सांग...

Deepanjali
Monday, March 17, 2008 - 10:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दीपांजली आणि अज्जुका दोघी जणी मला एकमेकींच्या जावा जावा आणि नऊवारी परिधान करून नठून थटून बसलेल्या दिसतात :-)
<<<<<

Shyamli
Monday, March 17, 2008 - 12:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



.. .. .. ..

Tonaga
Monday, March 17, 2008 - 1:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काहीच न नेसणारी... >>>>>>>

बाप रे



Abhijeet25
Monday, March 17, 2008 - 3:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी - ही मला खूप मोठी बाई आहे असे वातले होते पण निघाली पोरटीच!>>>>>>>>>>>
गिरिराज १००% अनुमोदन. मला पण असेच वाटले होते. मी नवीन नवीन जेंव्हा मायबोली वर आलो तेंव्हा नंदिनी फ़्रेंड कादंबरी लिहित होती. मला वाटले कोणी तरी मोठी बया आहे दोन चार शाळा नहितर महविद्यालयात जाणारी मुले असलेली.

Mane_guruji
Tuesday, March 18, 2008 - 2:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऍडमीन शिवाजी साटम सारखे, भेदक डोळ्यांचे, गंभीर आवाजाचे असणार असे वाटते. म्हणजे ते एकच व्यक्ती असले तर. अजिबात टाईमपास न चालणारे.

नेमस्तक १-२-३...: हे मेट्रिक्स सिनेमातले एकासारखे एक दिसणारे, सगळे काळा चष्मा आणि सूटाबूटातले खलनायक असावे असे वाटतात. (दिवे घ्या)
कुणी ऍडमीन आणि नेमस्तकाना पाहिले आहे का?


Giriraj
Tuesday, March 18, 2008 - 4:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणी ऍडमीन आणि नेमस्तकाना पाहिले आहे का?>>पाहण्यासारखं काही नाही त्यांच्यात! माणसांसारखीच दिसतात!

ऍडमिन - मला बरेच वयस्कर ग्रूहस्थ वाटले होते पण ते झक्कींना काका म्हणू शकतिल इतकेच आहेत! :-)


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators