Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 15, 2008

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » नाव आणि प्रतिमा » Archive through March 15, 2008 « Previous Next »

Deepanjali
Thursday, March 13, 2008 - 8:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लाजो : मला बुनियाद मधली ' लाजोजी ' अनिता कंवल डोळ्या समोर येते .


Chinya1985
Thursday, March 13, 2008 - 11:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

lajo वाचल की मला आमीर खानचा lajjo चित्रपट डोक्यात येतो. पण बहुतेक तो चित्रपट बनणार नाही आता.

Dakshina
Thursday, March 13, 2008 - 11:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लाजो म्हटलं, की तोंडावर पदर ओढून "हाय दैय्या!! लोग क्या कहेंगे?"
विचारणारी मुलगी डोळ्यांपुढे येते!>>>>>>>

योगेश, मलाही अगदी सेम असंच वाटलं...

Dakshina
Thursday, March 13, 2008 - 11:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि बरं का योगेश, तुझं नाव इथे वाचलं की मला
थेट पु.लं. च्या दामले मास्तरांची आठवण येते. आणि
वाटतं की तुझे ही डोळे कदाचित त्यांच्यासारखे हिरवे-बिरवे असतील...


Tonaga
Thursday, March 13, 2008 - 2:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्हणजे हरणटोळ का?... ... ..

Chyayla
Thursday, March 13, 2008 - 2:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आयटे जळतात माझे दुष्मन, आणी मला नको बुवा एवढ्या गोपीका त्यापेक्षा एकच राधा असली तर बास झाल

लाजो अरी ओ लाजो सुनती हो.. वो म्हशीकी शिरगणती हुवी क्या? और ललनवा को चारा पहुचाई दीयो की नाही? असो तु मात्र ईथेच याच बाफ भेटतेस.

चिन्या सावट यांच्या बाबतित योग्य बोललास, आजकाल दिसत नाही ते... मायबोलीवर तसे ईतर प्रकारचे सावट येतच असतात सध्या झक्की म्हणतात त्याप्रमाणे मायबोलीकर खुपच संवेदनशिल, भावनाशील झालेत कुठुन कसा वाद निर्माण होइल सांगता येत नाही


Modgiri
Thursday, March 13, 2008 - 2:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इश्य लाजो काय?
आम्ही तर churrrrrrrrr करुन लाजलो :-)

Chyayla
Thursday, March 13, 2008 - 3:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संघमित्रा अस वाटत ही कायम मित्रांचा संघ बनवुन त्यांच्या संग फ़िरत असते (उगीच कुणी, किती ग बॉयफ़्रेंडस तुला? असे अगावु पणे विचारु नये ) तशीही ती सगळीकडे मैत्रीपुर्णच वागते व लिहिण्यातही कुणाला न दुखवता एक व्यवस्थितपणे विचारांचा समतोल साधलेला दिसुन येतो. आपण तर मुक्तपणे दाद देतो या निरुपद्रवी मनुष्य प्राण्याची.. दुसरी प्रतिमा अशी निर्माण होते की हे नाव बौद्धकालीन वाटत त्यावेळेस अशी नावे प्रचलित होती व आजही ऐकायलाही छान वाटत हे नाव.. आम्रपाली भेटली का ग तुला अस विचारावस वाटत

धोंडोपंत डोक्यावर डुलणारी शेंडी, कपाळावर टीळा, प्रसन्न चेहरा, गोल गरगरीत पोट त्यावर नुकताच वडा पुरणाच जेवुन ढेकर देत वरुन प्रेमाने हात फ़िरवणारे, खांद्यावर पंचा व धोतर घातलेले, वरुन टिपिकल पुणेरी पद्धतीने नाकातुन बोलणे.. " मग कांय पंत आमचंया दक्षिणेंच कांय म्हन्ता.." असो गमतीचा भाग सोडला तर ही व्यक्ति तशी मला विद्वान वाटते यांच्याकडे लेखनाची विशिष्ट शैली व प्रचंड शब्दभांडार दिसतय सोबत जिज्ञासु, अभ्यासु वृत्ती तडक फ़डक पण मजेशीर पोस्ट असतात असे हे आपले धोंडोपंत.. पुरुषांचे सेनापती


Lajo
Friday, March 14, 2008 - 1:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो हो, माझ्या नावावरून लोकांना मी उत्तर प्रदेशिय वाटते तर... कोणाला दूधवाली भैय्यीण तर कोणाला लाजोजी... असो...
अहो च्य्ययला आजकालच्या म्हशी लई द्वाड, गावभर हुंदडतात... मोजता मोजता नाकी दम आला. बाकि ललनवा को चारा पहुचाई दियो और फुलनवा को भेज दियो म्हशी ढुंढनेको...


Mrdmahesh
Friday, March 14, 2008 - 5:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला शैलजा ( ITGirl ) अन् नंदिनी या दोघींची व्यक्तिमत्वं सारखीच वाटतात, म्हणजे "बहुतेकवेळा टी-शर्ट जीन पॅंट घालणार्‍या, बाईक चालवणार्‍या "एकदम ढिश्क्यांव पोरी" पण त्याचवेळी मर्‍हाटमोळे संस्कार झालेल्या आणि ते जपणार्‍या आहेत" असंच वाटत आलेलं आहे.. :-)

Tonaga
Friday, March 14, 2008 - 2:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो, म्हणजे डुप्लिकेट आय डी! द्या टाळी.

Yogesh_damle
Friday, March 14, 2008 - 7:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

MrdMahesh वाचतांना एकदम 'मर्दमहेश' वाटतं! :-)

Chinya1985
Friday, March 14, 2008 - 11:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो ते मर्दमहेशच आहे

Sanghamitra
Saturday, March 15, 2008 - 6:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरेच्या(यला) इथे माझ्या आयडीवर लिहीलंय की.
च्यायला बर्रंच चांगलं लिहीलंय तुम्ही माझ्याबद्दल त्यामुळं एकदम लाजो झाली माझी. :-)
निरुपद्रवी हे माझ्या (एकमेव) बॉयफ्रेंड(पक्षी:नवरा)समोर म्हणून बघा (तो अनुमोदन देईल :-))
आणि संघमित्रा ही बौद्धकालीन राजकन्याच होती. सम्राट अशोकाची मुलगी. मलाही खूप आवडलं हे नाव म्हणूनच तो आयडी घेतलाय.
आणि आम्रपाली बहुतेक रोज भेटते. माझ्या मैत्रीणीकडं येते कामाला.(इथं कुणालाही दुखवायचं, कमी लेखायचं नाहीये. तसं वाटल्यास... पुढचं सूज्ञांना माहीती आहेच) :-)

तुझा मात्र आयडी लिहीताना पण आईचे वटारलेले डोळे आठवतात. कॉलेजात असताना मैत्रिणींची सवय लागली त्यामुळं एकदा चुकून आईसमोर च्यायला म्हणाले होते तेंव्हा चांगला झाप खाल्ला होता.
मलाही बर्‍याच आयड्यांबद्दल लिहू वाटतंय पण हल्ली सगळीकडं पेट्रोल, कोळसे, वाळलेलं गवत वगैरे पडलेलं असतं. ठिणगी पडायचाच अवकाश. म्हणून सध्या नको.


Giriraj
Saturday, March 15, 2008 - 10:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मग दिवे न देता पाण्याची बादली देऊन लिही!
मॉड,तशी सोय उपलब्ध करून देता येईल का? :-)



Giriraj
Saturday, March 15, 2008 - 10:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

modgiri - माझा किंवा मॉड्स चा डुप्लिकेट आयडी आहे असेच वाटले! :-)

दक्षिणा - कधी कधी आया मुलांना चिडवण्यासाठी 'तुला अर्ध्या भाकरीवर आणलय' असं सांगतात तशी आणल्यासारखी वाटली! :-)

बादल्या घ्या!


Sanghamitra
Saturday, March 15, 2008 - 12:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>मग दिवे न देता पाण्याची बादली देऊन लिही!
>> बादल्या घ्या!

काही आशाळभूत लोक हे बाटल्या वाचतील हां आणि तुला शोधायला लागतील.
चला आता सुरू करतेच. याच्यापासूनच. कारण मायबोलीवर पहिला संवाद झाला तो गिरीशीच.
गिरीराज एकदम दिलदार. सारखी इनामं वाटत फिरणारा. आणि शक्य तिथं बादल्या ओतणारा (म्हणजे समझोता एक्सप्रेस).
हे मला आधी चांगले मोठे आणि भारदस्त व्यक्तीमत्व असेल असं वाटलं होतं. नावावरून आणि वाटलेल्या गावांवरून. पण ये तो एकदम कट्टादोस्त (म्हन्जे ज्याच्याबरोबर टवाळक्या करता येतील असा) निकला. :-)



Zakasrao
Saturday, March 15, 2008 - 1:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मोठे आणि भारदस्त व्यक्तीमत्व असेल असं वाटलं होतं>>>>.
तो तर आता देखील तो "भार"दस्तच आहे???
गिर्‍या बादलीने काम नाय भागणार रे.
फ़ायर ब्रिगेडचा बंब घ्या अस म्हणाव आता :-)


Manishalimaye
Saturday, March 15, 2008 - 2:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लाजो मलापण अनिता कवरच आठवते बुनियाद मधली.


झकासराव हा मला अगदीच राहुल सोलापौरकर टाईप वाटला होता
एकदम भारदस्त व्यक्तिमत्वाचा[ तेवढ टक्कल वगळा त्यातुन]पण प्रत्यक्ष भेटले तेव्ह फु sssssssssss स!!! झालं. हा तर अगदीच छोटुस्सा निघाला की.

अज्जुक्का जही वाटली होती अगदी तश्शीच वाटली.



Chinya1985
Saturday, March 15, 2008 - 2:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संघमित्रा वाचलं की भारताच्या संघाची मैत्रीण असावी असे वाटते. म्हणजे ते असतात ना हितचिंतक वगैरे. BCCI मधे एखाद काम करत असावी असे वाटते. त्यामुळे जो कोणि संघात येईल त्याची हितचिंतक असणार्‍यांपैकी.मागे एकदा'सचिन,ढोणीला ओळखते का?' हा प्रश्न विचारावाच अस मनात आलं होत पण म्हटल उगाच हस होईल.



चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators