Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 13, 2008

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » नाव आणि प्रतिमा » Archive through March 13, 2008 « Previous Next »

Yogesh_damle
Thursday, October 18, 2007 - 5:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण काय रे, आपला चाफा खूप दिवसांत दरवळला नाही?
'छाव्याने सिंहिणीचा चावा घेतला!' :-) ( Bye the way, हा छावा म्हणजे सिंहाचा, की शिवाजी पार्काच्या कट्ट्यावरचा?) :-)

ह्या तिघा चाफ्यांना एकत्र बोलावून 'चाफेकर बंधू' करावं! :-)

Business email-ids हे नाव्-प्रतिमेच्या दालनात एक नवा अध्याय आहेत. काही काही कंपन्यांमध्ये नावाचं पूर्ण स्पेलिंग आणि आडनावाचं आद्याक्षर असा protocol आहे. त्यामुळे माझा आयडी yogeshd असा होतो. आॅफ़िसात दोन मैत्रिणींच्या आयडीज़ च्या नावाने त्यांना हाक मारायला आसुरी आनंद होतो. शिखा द्विवेदी ची 'शिखाड' होते, गरिमा चौहान ची 'गरिमॅक' होते. प्रियांका दुबे ची 'प्रियांकाड' होते! :-)

पुणे विद्यापीठाच्या साइट वर 'दमयंती घारपुरे' म्हणून नाव वाचलं आहे. त्या बिचार्‍या विद्यापीठाच्या naming protocol मुळे 'डम डाॅट घार' होऊन बसल्यात. (मला एक गरुड खजिल होऊन फांदीवर उदास बसल्यासारखं वाटलं! :-)) (इथे मला 'Damn it' वाला damn लिहायच होता, preview मध्ये दिसत नाहिये)

सगळ्यात कहर म्हणजे माझ्या एका मित्राच्या आॅफ़िसमध्ये त्याची सब-आॅर्डिनेट अनु सिंह आहे. आमच्या आॅफ़िसचे naming rules इथे लावले तर तिचा आयडी लोकांना द्यायची पंचाइत होईल! :-)


Chafa
Thursday, October 18, 2007 - 11:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे माझ्या नावानी काय गडबड चाललीये? बाकी ITGirl , तू लोकांच्या चुका काढत्येस जसे स्लार्टीला तू सांगितलेस की ते IT आहे; छावाला चावा म्हटल्याबद्दल चाफ्फ्यावर हसत्येस, पण चाफ्फ्याला माझ्या ID ने हाक मारत्येस त्याचे काय? :-O ~~D अर्थात फक्त तूच नाही, अनेक जण हा वेंधळेपणा करतच असतात. :-O ~~D

योगेश, चाफा नावाचं काही पेवबिव फुटलेलं नव्हतं बरं. माझा ID चांगला सहा वर्ष जुना आहे. त्यानंतर कधीतरी 'चंपक' आला होता. आणि हा 'चाफ्फा' इथे गेल्या वर्षीच आलाय. :-) शिवाय Chapha हा ID कधी पाहिल्याचे आठवत नाही. 'सोनचाफा' दिसायची पूर्वी, आता तीही दिसत नाही. असो, चालू देत तुमचे.

Itgirl
Friday, October 19, 2007 - 2:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वेंधळेपणाच्या बाफ़ वर लिहायला मटेरिअल गोळा कराव म्हटल आणि चुका वगैरे नाही काढत हो कोणाच्या, सगळ मजेतच असत :-) इतरांच्या चुका काढण्याइतका arrogance कमावला नाही अजून, आणि कमवायचा पण नाही :-)

Anaghavn
Wednesday, December 12, 2007 - 11:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झालं!!!!!!!!!!!!! "योगेश दामले" आहे होय तो..मल वाटल "योगेश ढमाले" yogesh damale
म्हणजे sorry हं. माझंच चुकलय ये कळालय मला.


Zakasrao
Thursday, December 13, 2007 - 6:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झालं!!!!!!!!!!!!! "योगेश दामले" आहे होय तो..मल वाटल "योगेश ढमाले">>>>>>.
छे ःए अनघा.
जरा वेगवेगळा वेंधळेपणा कर की.
तेच ते काय :P
दिवे द्याय्चे का??? :-)


Anaghavn
Thursday, December 13, 2007 - 7:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त पैकी तुपाचे पूरणाचे दिवे द्या!!!खूप भूक लागली आहे.
झकास, मी याच वेंधळे पणामुळे तुझ्या ऐवजी मी झक्की यांचं अभिनंदन केलं होतं.जाऊ दे, आता ऊशिरा का होइना पण तुझं अभिनंदन!!
बाळाला म्हणाव,मावशीने थोडा वेंधळे पणा केला आहे,पण तशी चांगली आहे.


Manjud
Thursday, December 13, 2007 - 10:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनघा, तुझा ID मी कायम 'अन - घावन' असा वाचते आणि मग मी घरी जाऊन तांदूळाचे खमंग घावन करत्ये अशी स्वप्न मला पडायला लागतत.

Akhi
Thursday, December 13, 2007 - 10:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

घावन म्हटल्यावर माझी पण भुक चाळवली....

Anaghavn
Monday, December 17, 2007 - 9:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणा आणा, लवकर आणा (अन) घावन


Yogesh_damle
Tuesday, December 18, 2007 - 5:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटतं, 'संजय गांधी अभयारण्य' सारखं
'अनघा वन' असावं!! [: D ]


Anaghavn
Saturday, March 01, 2008 - 11:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"संजय गांधी उद्याना सारखं--अनघा वन"///// काय योगेश, काय गरीबाला त्रास देता?

आलं नाही कुणी इथे बर्याच दिवसात?


Manishalimaye
Tuesday, March 04, 2008 - 2:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मग खरच काय आहे अनघा तुझा आयडी???

Anaghavn
Wednesday, March 05, 2008 - 6:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तो "अनघाव्हीएन" ( anaghavn ) असा आहे.
असो पण माझ्या मुळे कोणाला वनात जाण्याचा, कोणाला "घावन" खाण्याचा आनंद मिळत असेल तर मला आनंदच आहे. :-)
नावात म्हटल तर सगळ आहे, म्हटल तर काहिच नाही.


Chyayla
Wednesday, March 12, 2008 - 12:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनघा-वन विहार व अन्-घावन आहार झाला असेल तर काही मायबोलीवरच्या आयडी बद्दल त्यांच्या नावावरुन व लिखाणावरुन मनात आलेल्या काही प्रतिमा व्यक्त करतोय.

माणुस, एक वेळ अशी होती की अख्या मायबोलीवर आयटीगर्ल च्या शब्दांचे धबधबे पोस्ट रुपानी सर्वत्र दिसायचे आता ते परंपरेचे पार्सल माणुस ने घेतलेले दिसतेय. सोबत नव नवे बाफ उघडण्याचा सपाटा लावलेला दिसतोय. हा माणुस एकदम खेळकर, थोडा भाउक, व ईतरान्ना लवकरच आपलेसे करुन घेणारा दिसतोय. माणुस या आयडी वर सगळीकडे 'स्त्री' वर्गाकडुन मोठ्या प्रमाणात चिमटे, शेरे, कोपरखळ्या मारलेल्या दिसतात... अगदी म्हणजे चारो तरफ गोपीया बीचमे कन्हयाच झाला की याचा.


आणी आता होश्शियाSSSSS र, परित्राणायच हिंदुंना विनाशायच मुसल्मान धर्मसंस्थापनार्थाय संभवामी कलियुगे.. ईति संतु कदाचित शिवाजी महाराजांच्या काळी काही कारणानिमित्य याना लढाई करायला मिळाली नव्हती ती राहिलेली लढाई या जन्मी पुर्ण करणार असे दिसते. किंवा संताजीचा पुनरजन्म झाला असावा.... यांचे मुद्दे पटण्यासारखे असले तरी भाषा मात्र एकदम जहाल की समोरच्याला मिरच्या झोंबायलाच पाहीजे. मते सुद्धा अगदी परखड व बेडर असतात. अर्थात त्यामुळे बरेच जणांच मत या आयडी बद्दल चांगल नसाव. पण तरी लक्षात रहाव व दखल घ्यावी असे एक मायबोलीवरचे व्यक्तिमत्व आहे खासच.

चिन्या १९८५, बारीकसे मिचमिचे डोळे असणारा चिनी माणुस वाटतो, १९८५ चा आणी चिनच्या आक्रमणाचा काय ऐतिहासिक संबंध असावा बरे... तरी लिखाणावरुन एकदम तडफदार व्यक्तिमत्व व सळसळते रक्त असलेला तरुण अशी प्रतिमा निर्माण होते..

कमरेवर हात ठेवुन... देउका, मारुका, अस्सका, तस्सका, दाखवुका(ईंगा) वैगेरे असले भास वा शब्द आठवतात ते अज्जुका हा आयडी बघुन. कोणी काही म्हणा.. "अडलय माझ खेटर..." असा कायम पवित्रा, आपली मते बिन्दास पणे मांडणार. तसे हे व्यक्तिमत्व सामाजिक क्षेत्रात प्रसिद्ध आहे हे त्यांच्या लिखाणावरुन व मिळालेल्या बक्षिसांवरुन मायबोलीकरांच्या लक्षात आले असेलच.

ईथे कुणाला दुखवायचा हेतु नाही केवळ निर्माण झालेली प्रतिमा व्यक्त करतोय त्यामुळे आवश्यक तिथे दिवे घेणे. माझ्याही बाबतित चांगल्या वाईट प्रतिमा मायबोलीकरानी प्रामाणिकपणे सांगितल्या त्या सगळ्यांचा नम्र स्विकार असो तुम्हालाही काय वाटत हे जाणुन घ्यायची उत्सुकता आहे.




Itgirl
Wednesday, March 12, 2008 - 12:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

....म्हणजे चारो तरफ गोपीया बीचमे कन्हयाच झाला की याचा...

जळल्याचा वास येतोय रे समीर!!
आणि तुलाही दिव्यांची माळ :-)


Chinya1985
Wednesday, March 12, 2008 - 10:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रथम च्यायलाला धन्यवाद

माझ्याही बाबतित चांगल्या वाईट प्रतिमा मायबोलीकरानी प्रामाणिकपणे सांगितल्या त्या सगळ्यांचा नम्र स्विकार

बरं आता म्हटलच आहे तर लिहितोच.
chyayla हे नाव वाचले की याच्या पोस्टमधे च्यायला,च्यामायला,च्यामारी,हात्तेच्या इत्यादी शब्दांचा व सौम्य शिव्यांचा वापर असेल अशी समजुन होते पण पोस्ट वाचल्यावर यापैकी काहीच वाचायला मिळत नाही. सॉफ़्ट हिंदुत्ववादी अशी याबद्दल माझ्या मनात प्रतिमा आहे.

ajjuka या स्त्रीला बहुतेक भरपुर खाण्याची अथवा खायला घालण्याची आवड असावी. बघा ना ajunkha, ajunkha .

slarti हे नाव वाचुन वाटते की ही मुलगी आहे किंवा धार्मिक आहे. बघा ना sl aarati पण हा तर नास्तिक पुरुष आहे!!असो यांची मते बर्‍याचदा माझ्या विरुध्द असतात पण मुद्देसुद लेखन करतात.

saavat हे नाव मी आधी एकच a धरुन वाचल होत तेंव्हा ते मला 'सवत' अस वाटल होत. नंतर वाटल की सावंत असाव आणि n विसरला असावा. नंतर कळल की सावट आहे म्हणुन. मग जरा भितीदायक वाटल. ते काय असत ना मृत्युच सावट वगैरे. पण यांच लेखन काही तसं नाही. चांगल लिहितात.

तळटीप्- कुणालाही दुखवण्याचा माझा हेतु नाही. काही आक्षेपार्ह असल्यास क्षमस्व.


Lajo
Thursday, March 13, 2008 - 12:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज बरेच दिवसांनी इथे फिरकले. मज्जा आली वाचुन. च्यायला, तुमच्य अज्जुका च्या वर्णनाला अगदी अनुमोदन. मलाही आसच वाटत हे नाव वाचल की...

चिन्या नावावरून मात्र मला एक वात्रट पोट्टा असावा असं वाटत... आणि आयटीगर्ल स्वत:ला फार मोठी techno savvy समजत असावी असे वाटते. हे फक्त नावा वरून बरऽ का... अगदी झगमगते दीवे घ्याला विसरू नका...


Itgirl
Thursday, March 13, 2008 - 6:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लाजो, बर मग?? :-)
.. .. .. ..


Anaghavn
Thursday, March 13, 2008 - 8:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देऊका मारुका,अस्सका तस्सका--वर्णन तर मस्तये.



Yogesh_damle
Thursday, March 13, 2008 - 8:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लाजो म्हटलं, की तोंडावर पदर ओढून "हाय दैय्या!! लोग क्या कहेंगे?" विचारणारी मुलगी डोळ्यांपुढे येते! :-)

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators