Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 28, 2008

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » मी केलेला इब्लीसपणा » Archive through February 28, 2008 « Previous Next »

Nandini2911
Sunday, December 30, 2007 - 11:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योगेश अरे मी ऍडफ़ॅक्टर्स मधे आहे रे.. जितेंद्र झा माझा बॉस आहे. पट्टाभीच्या टीममधे आहे मी, तू दिल्लीला होतास ना.. मुंबईला आलास की काय??

Yogesh_damle
Tuesday, January 01, 2008 - 4:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'चोर तो चोर...' वाला इब्लिसपणा.

माझ्या एका मैत्रिणीचा वाढदिवस ३१ डिसेंबरला असतो. मी तो साफ़ विसरलो.

१ जानेवारी ला फोन करून " Belated happy b'day and a hny!" अशा शुभेच्छा दिल्या.
"क्यों भाई? वाढदिवस विसरलास माझा?"
"विसरलो नव्हतो, मला नव्या वर्षाचा एक काॅल आणि वाढदिवसाचा दुसरा- अशी उधळपट्टी नव्हती करायची"
"गप्पेऽऽऽ!! मोठा आलास काटकसरी!"
"मग, मला वाटलं एक मारवाडीच एका कोकणस्थाच्या भावना समजेल!!"

:-)


नंदिनी- मला वाटलं तू 'फ़िल्मफ़ेअर' मध्ये आहेस, कारण जितेश तिथे असतो.


Kedar123
Monday, January 07, 2008 - 12:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकदा आमच्या ऑफीसची पार्टी होती. आम्ही लोक गप्पा मारत होतो. आमच्या बरोबर कम्पनीतला एक फिलीपिनो होता. आमच्या गप्पा चालू असताना मध्येच त्या फिलीपोनोने ' आशा भोसले ' चा विषय काढला. तो म्हणाला त्या खूप छान गातात. आमची कॉलर ताठ.

मग त्याने विचारले ' आशा भोसलेची बहिण पण गाते ना रे (तो लता मंगेशकर बद्दल बोलत होता). मी विचार केला त्याची आणखी ताणूया. मी म्हणालो ' हो रे गातात त्या कधी कधी. आशा भोसलेंनी चान्स दिला की गातात बिचार्या.'

मग आम्हालाच त्याची दया आली आणि आम्ही त्याला लता मंगेशकर बद्दल अधीक माहीती दिली. तो ही मग हसला.

हा किस्सा विनोद म्हणून आम्ही आमच्या कम्पनीत एक तामीळ माणूस होता त्याला सांगीतला. पण तो हसलाच नाही (आम्ही चिंतेत पडलो)

शेवटी तो म्हणाला ' म्हणजे आशा भोसले आणि लता मंगेशकर बहीणी-बहीणी आहेत'

आता हसायची पाळी आमची होती. आमच्यात सगळ्यात जास्त हसला तो एक बहारीनी ईंजीनीर.


Ankyno1
Saturday, January 12, 2008 - 12:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नुकतंच driving licence मिळाल्यामुळे गावभर M 80 उडवत होतो ते FE चे दिवस होते....

क्लास ला जताना संध्याकाळी टिळक स्मारक च्या चौकात पोलीस मामा नी आडवलं
"लायसन बगू..."
दाखवलं
"प्यूशी"
"काय?"
"पोलूशन"
"
Oh.. P.U.C....हे बघा"
"गाडी चे पेपर?"
"घ्या..." (
M 80 ला असलेल्या side box चा फायदा)
"हे काये.... झेरोक्स नय चालत... दंड भर १००"
"ओ मामा क्लास ला चाल्लोय... १०० नाहीत."
"नाहीत?... तिच्यायला... किती आहेत? पाकीट बघू..."
"३० आहेत"
"असं कर... २० दे... १० असूदेत... पम्चर झाली गाडी तर...."
"घ्या..."
"ए... वेडा का..."
"काय झालं?"
"असं समोर देतो का... मी काय सगळ्यांसमोर पैसे खाउ का...."
"मग काय करू...."
"असं कर... तो समोर पानवाला आहे ना... त्याला दे... २ नोटा..."
मी पलीकडे गेलो...
पोलीसमामा ट्रफिक कडे लक्ष देण्यात गुंग...
मी पानवाल्याला म्हणालो...
"२ पान दे रे... बनारसी... एकदम मस्त... मामा नी मागितलंय खात्यावर लिही"
"काहीही काय..."
"अरे तूच विचार...
(ओरडून) ओ.. २ ना?"
"हो... २"
"पानवाला... ठीक ए... हे घे"
मी पोलीसाकडे येउन..
"घ्या.. मस्त पान खा... जतो..."
"ठीक ए.... जा"

पोलीस पान खाईपर्यंत मी गाडीवरनं छू....


Chaffa
Sunday, January 13, 2008 - 4:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता एक नवी उचापत:
दोनचार दिवसापुर्वी नव्या प्रोजेक्टसाठी खोदकाम करत असताना तिथे एक भलाथोरला साप निघाला. एकच पळापळ! पण शेवटी आर्ध्यातासाच्या मेहनतीनंतर एकदाचा सापडला तो. तस बर्‍यापैकी अलगद सापडला तो प्राणी पण त्यामुळे आमच्यातल्या एका बंगाली सहकार्‍याच्या डोक्यात भलताच किडा वळवळला मला म्हणतो " आपको कोई मंतर जरुर आता है नही तो शाला वो ईतना बडा शाप आपने पकडा कैशे? "
मग मला पण त्याची फ़िरकी घ्यायची लहर आली म्हणालो " अबे शेण ( सेन नाव ना त्याचे!) तेरेको सिखना है क्या ? " "सब मटन मछली खाना छोडना पडेगा चलेगा क्या?"
" छोड देगा लेकीन शिखायेगा ना ?"
"जरुर,और अंडाभी नही खानेका"
" आजसेही छोड दिया, चलो!"
"ऐसे नही! आमावसकी रातको आना पडेगा नदीके पास."

आता हा बहाद्दर संपुर्ण शाकाहरी होवुन बसलाय! पुढच्या आमावस्येची वाट पहात.


Anaghavn
Monday, January 14, 2008 - 4:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ankyno , सही मामाला "मामा" बनवलास. असल्या लोकांना (पैसे खणार्या) "बनवलं" की मज्जा येते. नंतर च imagin करुन खुप हसू आलं.


Manishalimaye
Monday, January 14, 2008 - 5:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ankyno , पण हा किस्सा तर मला कुठल्या तरी चित्रपटात पाहील्याच नक्कीच स्मरतय पण त्याचं नाव आत्ता आठवत नाहीये...

आठवलं की लगेच सांगते....तोपर्यन्त कोणाला आठवलं तर नक्की सांगा.


Ankyno1
Monday, January 14, 2008 - 5:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा माझा स्वत: चा अनुभव आहे....

मी अजून कुठलाही सिनेमा दिग्दर्शित केला नाही... पण जेंव्हा करीन तेंव्हा नक्की वापरीन....
नाव ही तेंव्हाच सांगीन....

Manishalimaye
Monday, January 14, 2008 - 5:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असुही शकेल नाकारत नाही...पण खरच असेच एक दृश्य कोणत्या तरी चित्रपटात आहे हे नक्की..

Dhani
Saturday, January 19, 2008 - 7:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

to scene Shararat movie madhe aahe. Abhishek Bachchan cha movie

Dakshina
Wednesday, January 23, 2008 - 1:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा लेटेश्ट इब्लिसपणा... आमच्या हापिसात एक मुलगी आहे, (आणि ती मला अज्जिबात आवडत नाही)
आज मी वॉश रूम मध्ये गेले तर ती, क्लिनर च्या जागी बसली होती. मी आनंदाने विचारलं... आया तुमने प्रोफ़ाईल चेंज करदिया? लेकीन उसके जैसा साफ़सफ़ाई तुम कर सकती हो ना..?


Chyayla
Thursday, January 31, 2008 - 2:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा पण आताचा इब्लिसपणा..

तो माझा चांगला मित्र आणी ती माझी जवळची मैत्रिण तो आणी तीनी जीवनभर साथ निभाने का वादा केला.. मग पार्टीला दोघांचाही एकदम खासम खास मित्र एक साक्षिदार म्हणुन मला घाई घाई ने थाई रेस्टॉरेंट मधे बोलावले.

तो आणी ती मधे अचानक वाद सुरु झाला की मी लहान दिसते आणी तो म्हणायचा की मी लहान दिसतो झाल मग एकामेकाच वय १०,१२ वर्शानी कमी करुन मी अमुक वर्शाचीच दिसते अजुन असे ठामपणे म्हणुन मोकळे.. कुणी कुणाचे ऐकेना हळु हळु गमतीकडुन गम्भीरतेकडे प्रकरण यायला लागले. शेवटी मग शांतपणे मिस्किल हसत मजेने खाणारा मी त्याना माझ सुख बघवले नाही आणी मोर्चा माझ्याकडे वळला.. तु जर माझा सच्चा मीत्र असशील तर खर्र खर्र मी लहान आहे अशी धमकीवजा विचारणा. दोघेही मला सारखेच कुणालाही नाराज करणे परवरडणारे नव्हते.

मग खुप विचार करुन हिशोब मांडण्याचा आव आणुन निर्णय दिला की तुम्ही ज्या हिशोबानी विचार करताय ना त्या हिशोबानी तर मी अजुन जन्मालाच आलो नाही मग मी कसे सांगु शकेन? झाल समोरुन फ़स्स आवाज आले आणी वातावरण परत एकदा धमाल.


Anaghavn
Friday, February 01, 2008 - 6:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला, सही!!! मजा आली वाचुन.

Sheshhnag
Saturday, February 02, 2008 - 12:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Chyayala, h. h. p. v.
Great answer!

Runi
Saturday, February 02, 2008 - 11:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समीर good timing and sense of humor.

Chyayla
Sunday, February 03, 2008 - 9:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्स अनघावन, शेषनाग, रुनी ईकडे खुप दिवसानी भटकलो पण तुम्हाला परत मायबोलीवर पाहुन खुप आनंद झाला आणी आपले बाकी इल्ल्यापंती मंडळ आहेच की त्याना कसा विसरेन मी. वरचे सगळे किस्से वाचुन खुपच मजा आली.

Chyayla
Thursday, February 21, 2008 - 11:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

gtalk वरचे एक संभाषण..

काही लक्षात येत आहे का बघा?
हा ईल्ल्यापंती मंडळाने बनवलेला दुसरा मायबोली बकरा (बकरी)



<me: Namskar
11:44 PM Swati: namaskaar
me: ????
Swati: kay zala?
me: konata font aahe ha?
11:45 PM Swati: tula pan disat nahiyet ka ??
me: kahi kalat nahiye??
11:47 PM I think some problem
11:49 PM T#%T!NG !@ ERROR#6578
11:50 PM Swati: aata ithe error msg distoy mala

12:04 AM me: !lpfc1:0752:FPe:Device disappeared, nodev timeout Data: x270012 x0 x0 x1E
!lpfc3:0752:FPe:Device disappeared, nodev timeout Data: x280017 x0 x0 x1E
LLT:10035: timer not called for 114 ticks
LLT:10035: timer not called for 110 ticks



me: """",,,,,,,,,:::::

12:15 AM Swati: kahich nahi disat aahe aata

8 minutes

12:24 AM me: tuza mail milala, ekada computer reboot karun bagh
Swati: ok>


याची सुरुवात झकास ने केली होती.. स्वातीशी चॅट करताना तो म्हणाला की मला काही दिसत नाही नुसते डब्बे डब्बे दिसत आहेत.

मग समीरला कॉम्पुटर बद्दल चांगली माहिती आहे तो तुला हा प्रॉब्लेम दूर करायला मदत करेल...
मग काय त्यानंतर मी ही त्याला शामिल झालो व अजुनच ताणले. बिचारी स्वाती ईतकी परेशान झाली की बस.

सांगितल्याप्रमाणे तीने स्वता:चा लॅपटॉप ही Reboot करुन पाहिला खुप डोक्याला ताण देउन, वेळ जाउनही अडचण काही दूर झाली नव्हती. ती अडचण शेवटी नंदिनी आल्यावर लक्षात आली, पुढे याबद्दलही लिहिलच.

टीप्: कुणाला असाच gtalk वर प्रॉब्लेम असेल तर ईल्ल्यापंती मंडळाला सम्पर्क साधा.










Chaffa
Saturday, February 23, 2008 - 5:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायलाऽऽ म्हणजे एक प्रयत्न फ़सला तर दुसरा केलातच तर! धन्य हो!

Chyayla
Saturday, February 23, 2008 - 8:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफ़्या, प्रयत्न फ़सला का म्हणतोस रे? हव तर स्वाती_सव्वीस ला विचार. अरे फ़सलेले प्रयोगही मी प्रामाणिक पणे कबुल केले रे. आणी हो याला साक्षिदार आहेत की जसे तुझ्यावेळेस मुद्दाम ठेवले होते ना तसेच.. झकास, नंदिनी, स्वाती सांगा रे याला... अरे मंडळाचा कारभार असा सगळ्यांच्या सोबतीनेच चालतो यार

बरे तुझ्या ईब्लीस प्रोजेक्ट मधला शेणला शिखवणे झाले की नाही


Swa_26
Thursday, February 28, 2008 - 8:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

याची सुरुवात झकास ने केली होती.. स्वातीशी चॅट करताना तो म्हणाला की मला काही दिसत नाही नुसते डब्बे डब्बे दिसत आहेत.

मग समीरला कॉम्पुटर बद्दल चांगली माहिती आहे तो तुला हा प्रॉब्लेम दूर करायला मदत करेल...
मग काय त्यानंतर मी ही त्याला शामिल झालो व अजुनच ताणले. बिचारी स्वाती ईतकी परेशान झाली की बस.

सांगितल्याप्रमाणे तीने स्वता:चा लॅपटॉप ही Reboot करुन पाहिला खुप डोक्याला ताण देउन, वेळ जाउनही अडचण काही दूर झाली नव्हती. >>>>>>>>>>>

पुढचा किसा असा आहे.....

समीरने मला एक फाईल पाठवतो म्हणुन सांगितले. तेवढ्यात लंच ब्रेक झाला. त्यादरम्यान मला आपल्या नंदिनी बाईंचा फोन आला, तुझ्या Gtalk ला काय झालय हे विचारायला.
मी आपला तिला प्रॉब्लेम सांगितल नि ति समीरची फाईल आली कि मग सांगते असे म्हटले..... पण जेव्हा नंदिनी ह्या सार्‍यात आली तेव्हा माझी ट्युब पेटली नि म्हणुन मी सहज नंदुला मेसेज टाकला नि तो तिला मिळाला!! (मी ती फाईल रन न करता!! :-))
नि मग सगळे लक्षात आले! कि ही या इब्लिस मंडळींची कमाल आहे! :-)


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators