Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 02, 2008

Hitguj » My Experience » समानता » Archive through March 02, 2008 « Previous Next »

Nandini2911
Friday, February 15, 2008 - 6:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, तू आता चुकीचा अर्थ काढतोयस.. मी ते मुद्दाम लिहिलेले नाही. तसे असते तर मी नंतर सॉरी म्हटले नसते.
माझ्या बर्‍याच टाय्पो होत असतात.. खरंतर मला ते वाक्य प्रिन्सेस चे आहे असे वाटले होते. पण पोस्ट लिहिल्यावर ते तुझं आहे हे समजलं.. मी नाव बदललं पण पुढचं वाक्य बदलायला विसरले.
ही गोष्ट तसी कुणाच्या लक्षात आली नसती पण नंतरच्या "तो" "ती" हा घोळ माझा नव्हे.. तो मागाहून झालेला आहे.
तुझ्या कविताबद्दल मी तिथेच लिहिले आहे. इथे तसला खोडसाळपणा करायची मला गरज नाही.. किंबहुना तसली माझी सवय नाही.. मी जे काही असेल ते तोंडावर बोलते. नंतर थोडी जी गंमत करायचा प्रतत्न केला तो बहुतेक तुला आवडला नाही. तरीपण माझ्यातर्फ़े परत एकदा जाईर माफ़ी..


चर्चा परत समानतेवर चालू दे..
माणसा... जुन्या काळी पुरुष लोक पण बायकोचे नाव न घेता मंडळी वगैरे म्हणत. काळ बदलला तेव्हा पुरुष बायकोला नावाने हाक मारायला लगले. (आता बायका पण नावाने हाक मारतात... तंतोतंत मुलासरखे वागायचे आहे ना.. )


Dineshvs
Friday, February 15, 2008 - 7:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा बीबी पण भरकटतोय.

आर्चने जो विषय मांडला होता, तो सामाजिक आणि शैक्षणिक वगैरे क्षेत्रात, स्त्रीला मिळणार्‍या दुय्यम वागणुकीसाठी. माझ्या पहिल्याच पोस्टमधे त्या मुद्द्यांपैकी शिव्या, व्यसनं हे मुद्दे गैरलागू आहेत असे लिहिले होते. ( शिव्या आणि व्यसनं हि स्त्रीने केली काय किंवा पुरुषाने केली काय, कधीच समर्थनीय ठरत नाहीत. )

माझ्या पहिल्या पोस्टमधे मी स्त्रीला दुय्यम स्थान मिळण्याला काय कारण झाले ते लिहिले होते आणि मग ज्या विधीचा उल्लेख केला होता, ते या बाबीत मानवाचे ( माझ्या मते ) किती अधःपतन झाले, ते दाखवण्यासाठी. त्यात कुठलाही सवंग हेतु नव्हता.

आता मात्र हा बीबी परत नेहमीच्या थट्टेच्या सुरातच चाललाय. बाहेरुर्न दमुन आल्यावर चहा पाणी कुणी द्यायचे हा त्या कुटुंबाचा प्रश्न आहे. आमच्या ह्याना चहा सुद्धा करता येत नाही, असे सांगण्यात जर त्या स्त्रीला भूषण वाटत असेल तर वाटो, पण हिच अपेक्षा त्याने सर्वच स्त्रीयांकडून ठेवणे गैर आहे, हा मुद्दा पुढे यायला हवा होता.

अकबर जोधावरती खरेच छान चर्चा होतेय, त्या बाबतीत माझे ज्ञान तोकडे असल्याने, मला तिथे लिहिता येत नाही.

अजुनही इथे, नेमकी कुठे असमानता आहे, त्याची कारणे काय, ती कशी टाळता येतील, याबद्दल लिहु या.

मला आणखी एक मुद्दा मांडावासा वाटतोय तो विधवा आणि विधुर याना मिळणार्‍या वेगळ्या सामाजिक वागणुकीचा. खरे तर विधुर माणसाला काहि वेगळी वा दुय्यम वागणुक मिळतच नाही. पण आजच्या जमान्यातही विधवेला आणि परित्यक्ता स्त्रीला विखारी वागणुकीला सामोरे जावे लागते.

या बाबतीत माझ्या मावस आजीचे उदाहरण पुरेसे बोलके आहे. ( ते एकाचवेळी करुण आणि धाडसाचेही आहे )

माझी मावस आजी दिसायला खुपच सुंदर होती. तिला आपल्या मुलासाठी बघायला जो माणुस आला होता, त्यानेच तिच्याशी लग्न केले, अंतरपाट दुर झाल्यावरच तिला हे सत्य कळले.
वयातील बर्‍याच फरकामुळे ते लवकर वारले, पण त्या पुर्वी तिला तीन मुले झाली होती. पुण्यात त्या काळी म्हणजे ७० वर्षांपुर्वी, विधवेने जगणे मुष्कील होते. रस्त्यावरुन चालताना लोक अंगावर थुंकत, घाण टाकत. माझ्या आजीने ते टाळण्यासाठी, शेवटपर्यंत सधवा असण्याचे नाटक केले. तिने कधीही कुंकु पुसले नाही कि रंगीत साड्या नेसणे टाळले नाही.

तिने मुलानाही उत्तरमरित्या शिकवले, घडवले. आजही मला तिचा अभिमान वाटतो. पण दुर्दैवानी ती आधी जाती, तर काकाना कुठलीच समस्या आली नसती, उलट त्या तीन मुलाना संभाळण्यासाठी त्यानी परत लग्न केले असते.



Anaghavn
Friday, February 15, 2008 - 9:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापरे!!! दिनेश मला वाचुन खुप धक्का बसला... आपल्या मुलासाठी बघायला म्हणुन गेले आणि नन्तर स्वत: लग्न केले..म्हणजे sorrry ते तुझे आजोबा होते--पण मला ही मानसिकता "युधिष्ठीरा" सारखी वाटते-- भावाची बायको म्हणुन घेऊन आला--पण मनातला मोह त्याला टाळता आला नाही---कुंतीने आपले शब्द मागे घेऊनही त्याने स्वत:चा स्वार्थ साधलाच-- i m sorry पण मला तो "धर्मराज" वगैरे वाटत नाही. अतिशय स्वार्थी अप्पलपोटा आणि डरपोक होता युधिष्ठीर. (अर्थात हे माझं मत,इतरांची वेगळी मते असु शकतात)

Sanghamitra
Friday, February 15, 2008 - 9:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>> मला नाही वाटंत, हे कुणाच्या बापाला जमेल असं
राज्या कित्ती ते कन्फ्युजन? :-)
आता बायकांनाच जमतं म्हटल्यावर कुणाच्या बापाला कसं जमेल? हां आईला मात्र जमू शकेल.
शेवटी पुरुष म्हटलं की स्वतः चिखलात पडून केळीवरून घसरणार्‍याला हसणार. :-)
आणि यशस्वी कलाकार खरंच आलेत बर्का. बीबीला व्यवस्थित वळण लागले आहे भरकटायचे. :-)


Rajya
Friday, February 15, 2008 - 9:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेवटी पुरुष म्हटलं की स्वतः चिखलात पडून केळीवरून घसरणार्‍याला हसणार.

काय करणार? आम्हाला सवयच आहे दुखात सुख शोधायची :-)

टी पी बास झाला, चला समानतेवर बोला बघु :-)


Dineshvs
Saturday, February 16, 2008 - 3:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनघा, त्या आजोबाना मी फक्त फोटोतच बघितलं. मावशी मात्र ( हो आम्ही त्याना मावशीच म्हणायचो ) शेवटपर्यंत आम्हाला प्रिय होत्या.

त्या मावशी म्हणजे लक्ष्मीबाई आचरेकर. थोर गायक पंडितराव नगरकर यांच्या सासुबाई, आणि अर्थातच जुन्या काळच्या अभिनेत्री अलका आचरेकर च्या मातोश्री.

त्या काळी विधवा बाईला परत माहेरी जाण्याशिवाय गत्यंतर नसे. मावशीना ते शक्य नव्हते. शिवाय अश्या माहेरी गेलेल्या, म्हणजेच माघारी आलेल्या बाईचे हाल तर कुत्रा खात नसे.

पण या बाबतीत एक चांगला मुद्दा म्हणजे प्रखर राष्ट्रनिष्ठा बाळगणार्‍या सातारा कोल्हापुर भागात मात्र, लढाईत कामी आलेल्या जवानाच्या पत्नीला, कधीही अशी वाईट वागणुक मिळत नाही.


Maanus
Monday, February 25, 2008 - 10:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मावळा ह्या व्यक्तीने समानते विषयी पुर्वी काही लिहीले होते, ते ईथे वाचायला मिळेल.

दुवा

Bhidesm
Wednesday, February 27, 2008 - 2:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आधीच्या काही Posts मध्ये स्त्री ही घरातील व तिच्या कार्यालयातील कामेही करते, असे उल्लेख आहेत. पण बर्‍याच प्रमाणात हे चित्र बदलत आहे. शहरातील बरेचसे नोकरी करणारे पुरुषही घरातील कामे करतात.
सुमारे २० २२ वर्षांपूर्वी माझ्या ओळखीच्या एका कुटुंबात वडील घर सांभाळायचे व आई नोकरी करायची हेही पाहिले आहे. त्या दोघांनी तेव्हा हा निर्णय घेणे याला समानता म्हणता येईल.
तुला स्वयंपाक करता येतो का
? हे वाक्य मलातरी आक्षेपार्ह वाटत नाही. मला स्वतःला चांगला स्वयंपाक करता येत नाही त्यामुळे मी हाच प्रश्न माझ्या Room Partners ना विचारला होता. त्याऐवजी मी भांडी घासणे, घर आवरणे करत असे.

Asmaani
Saturday, March 01, 2008 - 9:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, ह्या bb वर कुठेतरी तुम्ही , "बायकांचे एकमेकींशी पटत नाही. पुरुषांचे मात्र एकमेकांशी फारच उत्तम पटते," अशा अर्थाचे लिखाण वाचनात आले. तुमच्या माहितीसाठी सांगते. बायकोचे वडील घरी आले की तोंड सुजवून बसणारे बरेच पुरुष माहिती आहेत मला. (सासू-सून ह्या नात्याच्या context मधे हे वाक्य वाचावे). मित्र मित्र एकत्र रहात असतांना " मी आणलेला बटाटा तू का वापरलास" असे म्हणून एकमेकांशी कडाक्याने भांडलेले पुरुष मला माहिती आहेत. पुरुषांचा एवढा गळ्यात गळा असतो तर मग सम्पत्ती साठी सख्खे भाऊ एकमेकांचा गळा का कापतात?
माझे ह्या bb वरचे अजून एक निरिक्षण. इथे काही मुली specially नंदिनी, बरेचदा "आयला" सारखे शब्द वापरत आहेत. असे शब्द वापरून आपण आपल्याच जातीचा अपमान करतोय हे त्यांना समजतंय का? pls असे शब्द वापरु नका.


Giriraj
Saturday, March 01, 2008 - 10:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुरुषांचा एवढा गळ्यात गळा असतो तर मग सम्पत्ती साठी सख्खे भाऊ एकमेकांचा गळा का कापतात?
>>>> बायकांमुळे! :-)

Asmaani
Saturday, March 01, 2008 - 10:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तर मग गिरि, सास्वासुनांची भांडणं सुद्धा पुरुषामुळेच होतात. कशी? तर एकीला मुलगा ताब्यात रहायला हवा असतो तर दुसरीला नवरा!

Giriraj
Saturday, March 01, 2008 - 10:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्याला कुणी 'ताब्यात घ्यावे' असे वाटतच नसते.उलट या ताब्यात ठेवाठेवीच्या राजकारणाचा मनःस्ताप सहन करत जगावे लागते... कोणतीही बाजू घ्या,रडारड ऐकावीच लागते.. वरून त्याचे बायकोवर कसे प्रेम नाही किंवा मग आईची माया कशी वाया घालवली हे असतेच...

मुळात जे आपलेच आहे ते ताब्यात ठेवण्याचा अट्टाहास माझ्या डोक्याबाहेरचा आहे! :-)


Abhi_
Saturday, March 01, 2008 - 11:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चला गिर्‍या संसारात चांगलाच रुळला म्हणायचं ~D

Athak
Saturday, March 01, 2008 - 11:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिरी :-)
अरे वा 'पुरुष जन्मा .... इकडे सुरु झाले तर :-)


Giriraj
Saturday, March 01, 2008 - 11:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही हो शेटजी.. हे 'स्त्री जन्मा ..' बद्दलचेच आहे :-)

गंधार,पुरुषांचे सुख बघवले नही की त्याचे लग्न लावून समानता आणली जाते!


Ajjuka
Saturday, March 01, 2008 - 11:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>गंधार,पुरुषांचे सुख बघवले नही की त्याचे लग्न लावून समानता आणली जाते!<<

साफ चूक...
स्त्रियांना सुखी होण्याचा अधिकार नाही म्हणून तर त्यांना लग्नात अडकवले जाते.. :-)


Zakki
Saturday, March 01, 2008 - 12:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दुर्दैवाने त्यात बर्‍याच स्त्रिया पण सामिल असतात. आई, आजी, काकू, मामी, आत्या, शेजारणी इ. त्यामानाने पुरुषांना इतरांच्या मुलींच्या लग्नाची 'काळजी' वाटत नाही असा अनुभव आहे.

Ajjuka
Sunday, March 02, 2008 - 2:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>दुर्दैवाने त्यात बर्‍याच स्त्रिया पण सामिल असतात. आई, आजी, काकू, मामी, आत्या, शेजारणी इ.<<
बरोबरेय.. आपल्याला नाही मिळालं मुलीलाही मिळता कामा नये! :-)

Deepanjali
Sunday, March 02, 2008 - 4:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्याला कुणी 'ताब्यात घ्यावे' असे वाटतच नसते.उलट या ताब्यात ठेवाठेवीच्या राजकारणाचा मनःस्ताप सहन करत जगावे लागते... कोणतीही बाजू घ्या,रडारड ऐकावीच लागते.. वरून त्याचे बायकोवर कसे प्रेम नाही किंवा मग आईची माया कशी वाया घालवली हे असतेच...

मुळात जे आपलेच आहे ते ताब्यात ठेवण्याचा अट्टाहास माझ्या डोक्याबाहेरचा आहे!
<<<<<<मुळात कितीही चांगली , आपली असली तरी ' ताब्यात ' ठेवावाशी एखादी व्यक्ती म्हणजे वस्तू आहे कि मौल्यवान diamond jewelry जी अपल्या ताब्यातून निसटली कि हरवेल अशी भीती वाटावी ... हेच माझ्या डोक्या बाहेरचं आहे !
नको तेवढं एखाद्या relation मधे possessive होणं आणि मुख्य म्हणजे नको तेवढं महत्त्व देउन एखाद्याला डोक्यावर चढवणं हे जी लोक करतात त्यांनाच रडारड , भांडा भांडी अशा फ़ालतु गोष्टींना वेळ मिळतो !
लग्न झालं कि नवरा म्हणाजे सर्वस्व असं शिकवणार्‍या / शिकून घेणार्‍या बायका अजुनही आहेत हे पाहून सगळ्यत जास्त नवल वाटते !



Giriraj
Sunday, March 02, 2008 - 6:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

DJ ,अश्याच बायका खूप जास्त आहेत. म्हाणूनच मी उपस्थि त केलेला मुद्दा हा स्त्रियांना 'कश्या दुय्यम आहेत' वगैरे दाखवण्याचा किंवा हेटाळणीच्या स्वरातला नाहीये. समानतेच्या बाबतीत आधी स्त्रियांनी स्वतला आणि पर्यायाने दुसर्‍या स्त्रीला कमी लेखू नये. स्त्रियांना आधी स्वतशीच लाढायचे आहे. सासरा आणि जावई हे नातं सासू सून नात्याईतके बदनाम खचितच नाही. त्या नात्यात जे मतभेद असतिल ते मनुष्यस्वभावाचे नमुने म्हणून असतात. पण सासू-सून या नात्याईतकं बदनाम नात्म क्वचितच कोणतं असेल. हे कुणा एका व्यक्तिबद्दल नाहीये.. हे खूपच सर्वसामान्य निरीक्षण आहे. मी फ़ार लहानपणापासून माझ्या आजूबाजूच्या वातावरणात स्त्रीवर स्त्रीनेच केलेला अन्याय पहात आलोय. चांगल्या शिकलेल्या मुलीही या अन्ययाला बळी पडलेल्या पाहिल्या आहेत. कधी तो सासूने सुनेवर केलेला पाहिलाय तर कधी सुनेने सासूवर! इतरही प्रकारे पाहीलाय, पण या मूलभूत नात्यात तो जास्त घडतो!

जरा अतिशयोक्तिचं वाटेल पण बर्‍याच स्त्रिया स्वतच्याच मुलीवर असा अन्याय करत असतात. मुलीला अगदी लहानपणापासूनच तथाकथित 'वळण' लावण्याची जबाबदारी आई स्वतवर घेते आणि त्या प्रकारात अजून एक शोषित तर कधी (बंडखोर मुलगी असेल तर) शोषक निर्माण होते.




चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators