Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 28, 2008

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट - अचाट आणि अतर्क्य » अचाट सीन आणि अतर्क्य लॉजिक » Archive through February 28, 2008 « Previous Next »

Zakki
Monday, February 25, 2008 - 8:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फरदीन खान कड्यावरुन पडलेला असताना जी सेलेना जेटलीची मैत्रिण मुलगी त्याला पहिल्यांदा वाचवण्यासाठी स्कर्ट काढायला लागते (पोरींच्या स्कर्ट आणी प्यांटींची बांधून दोरी करुन हिरोला कड्यावर ओढून काढणे अशी कल्पना) तिचा स्कर्ट किती चिमुकला आहे!

च्च, च्च.

अहो तुम्हाला हिंदी चित्रपट समजत नाहीत. त्या पॅंटी नि स्कर्ट काढण्यामागे कुणाला वाचवण्याचा हेतू नसतोच मुळी. केवळ काहीत्तरी कारणाने, बायकांना (नि हल्ली पुरुषांना पण ) कपडे काढायला लावणे हाच उद्देश असतो. म्हणजे मग असले काहीतरी बघायला मिळणार म्हणून लोक चित्रपटाला पैसे देऊन गर्दी करतात.

ज्यांना चित्रपटातले काही कळते, तेच लोक फक्त चित्रपट पहायला गेले, तर दिवाळे निघेल बॉलीवूडचे!


Sonalisl
Monday, February 25, 2008 - 10:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनुराधा, झक्की.....
विजार म्हणायचे आहे का तुम्हाला? मग तसं मराठीतुन लिहाना. पॅन्ट चं अनेकवचन पॅंटी करु नका. कोणाचा चुकुन गैरसमज होईल.... हा हा हा


Nandini2911
Tuesday, February 26, 2008 - 3:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपल्यापैकी किती लोक बायकोच्या प्रियकराला शोधायला इटलीला जातात?
>>>>
प्रत्यक्ष पिक्चर हंगेरीला शूट करून तेच इटली म्हणून दाखवलय. :-)
आणि दुसरी एक गंमत म्हणजे कुठलाही युरोपिअन देश स्वित्झर्लंडच असतो...


Zakki
Tuesday, February 26, 2008 - 1:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sonalisl,

मानले तुम्हाला, चुकलो.

त्या वेगळ्या अर्थाने 'पॅंटी' सुद्धा काढताना दाखवतील! त्यात जो काय अर्थ असतो तो एव्हढा स्पष्ट करून सांगावा लागतो, कारण अभिनय कौशल्य कमी पडते.


Sonalisl
Wednesday, February 27, 2008 - 7:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला 'तुम्ही' म्हणु नका. मी लहान आहे तुमच्यापेक्शा.
विजार हा शब्द मी सर्वात पहिले अंकलिपीच्या पुत्सकात पाहिला, वाचला आणि शिकले. त्यानंतर कुठे ऐकला सुद्धा नाही. अंकलिपीच्या पुत्सकातुन तो कढला तर आताच्या मुलांना कळणार पण नाही विजार म्हणजे काय ते. आपल्या बोली भाषेत कितीतरी ईंग्रजी शब्द सर्रास बोल्ले जातात ना!


Ameyadeshpande
Wednesday, February 27, 2008 - 7:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अस्कायकर्ताय....गावकडं गेलात तर सगळी पुरूष मंडळी घरी विजार किंवा लेंगा घालून बसतात की हो. इंग्रजी शब्द फ़क्त पुण्या-मुंबईकडं माहीत बघा.

Sanghamitra
Thursday, February 28, 2008 - 5:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>> अस्कायकर्ताय
आधी मला वाटलं रशियन भाषेतली शिवी आहे.

Ankyno1
Thursday, February 28, 2008 - 5:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हेरा-फेरी चित्रपटातला राजू हा गरीब आहे....
त्याच्या बनियन ला भली थोरली भोकं आहेत.....
त्याच्याकडे खोली चं भाडं द्यायला पैसे नाहीत...
त्याला काहीही काम्-धंदा नाही....

तरीही त्याच्या पायात 'नाईके' च्या चपला आहेत....
कसं परवडतं?


(असूदे... त्याची एकूणात वृत्ती पाहून आपण समजून घ्यायचं.... त्यानी कुठल्यातरी मंदिराच्या बाहेरून उचलल्या आहेत...)


Sanghamitra
Thursday, February 28, 2008 - 6:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो ऍंकी नं. वन. आता काय खरं नाही तुमचं. तरी बरं इथं लिहीलंत तिकडे चि. क. वा. बीबीवर लिहीलं असतंत तर क्रूर म्हणून घ्यावं लागलं असतं. सांभाळून हो.

Ankyno1
Thursday, February 28, 2008 - 7:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा हा हा हा....

संघमित्रा,

त्या एका पोस्ट मुळे माझ्यावर 'हल्ला बोल' करायला अनेक जण टपून बसले असणारेत आता....
पण माझी आहे तयारी.... (मंगल पांडे, दिल दिया है, डुप्लीकेट, बुलंदी, ढोल.... असे अनेक सिनेमे थिएटर मधे पाहून माझी सहनशक्ती वाढली आहे.... ही ही ही ही...)


Ajjuka
Thursday, February 28, 2008 - 7:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अंकुर,
तुम्हाला जन्म चांगल्या घरात मिळाला आणि फाटका बनियन घालावा लागला नाही त्यामुळे तुम्ही अशी गरिबांची क्रूर थट्टा उडवता हे योग्य नाही. गरिबाने काय नायकी चे बूट घालूच नयेत की काय? शेवटी ते तयार करणारे गरीबच तर असतात ना.
:-)


Mi_anu
Thursday, February 28, 2008 - 8:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाइके ची बोट फुटून एकदा चांगले चांगले नाइकी चे जोडे मुंबई समुद्रकिनार्‍यावर वाहत आले होते म्हणे. त्यातलेच घातले असतील..
त्या सात फेरे मालिकेत सलोनीचे आई बाबा आणी सासरचे खलनायिकांच्या कृपेने क्रमाक्रमाने गरिब होत असतात. गरीब झाले तरी ग्रासिम चे सूट,चकाचक बूट, ड्रायक्लीन लागतील अशा जाळीच्या भारी साड्या आणि दागिने मात्र तसेच्या तसे. सात फेरे बद्दल खरेतर मी समानता बा. फ. वर लिहायला हवे. त्यात स्त्रियांना खुप वाव आहे. प्रत्येक खलनायिका स्त्रीच आहे.


Tanyabedekar
Thursday, February 28, 2008 - 9:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>> अस्कायकर्ताय
आधी मला वाटलं रशियन भाषेतली शिवी आहे. >>>>>
हेहेहेहे.. जबरीच संघमित्रा..

पण अमेय म्हणाल्याप्रमाणे लेंगा आणि विजार हे अगदी कॉमन शब्द आहेत गावाकडे. पण मी अजुनही कुणाच्या तोंडुन बोली भाषेत न ऐकलेला पण अंकल्पीत असलेला शब्द म्हणजे एडका.. कुठे असतो हा एडका??


Ashwini_k
Thursday, February 28, 2008 - 9:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तन्या, ए ए रे एडक्यातला म्हणताना समोर मेंढ्याचे चित्र असायचे. त्यामुळे एडका म्हणजे मेंढा असेल.

Sonalisl
Thursday, February 28, 2008 - 6:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो मेंढाच असेल, मलाही तसंच वाट्ट.
Dodge गाडीवरचं ते एडक्यासारखं चित्र बघुन त्या गाडीला 'एडक्याची गाडी' कधी बोलायला लागले तेच कळलं नाही.

>>>>> अस्कायकर्ताय
आधी मला वाटलं रशियन भाषेतली शिवी आहे.>> :-):-)

माझा गावाशी कधी संबंधच आला नाही असं नाही, लेंगा हा शब्द माहीत आहे पण विजार खर्रच न्हाय आय्क्ला :-)



Manuswini
Thursday, February 28, 2008 - 7:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आई ग, अचाट नी अतर्क्य serials मध्ये 'सात फेरे' नंबर वन आहे.

आजकाल भरपूर वेळ असल्याने रात्री जेवण करताना ह्या अचाट serial चे भाग आत बाहेर येता जाता पाहीले त्यांचा सारांश.

serial मध्ये आळून पाळून 'हे असे' होते,

मेमरी जाणे / येणे पाहीजे तेव्हा(आमच्या मेडीकल research मध्ये पण अनोखी जादू म्हणून खपवली जाणार नाही),
उठ्सुट कोण ना कोणतरी कोणाच्या तरी कृपेने गरीब वा श्रीमंत होणे,
कोणातरी दुसर्‍याचा नवरा पळवणे कट,
मध्येच मुलगा पैदा होणे,
घराबाहेर पडले तरी हातात एकच बॅग(मला रोजचे travelling साठी पण बळेच दोन मोठ्या सूटकेस होतात),
कीतीतरी महीने गरोदर असलेली सलोनी( मनुष्यप्राण्यात नऊच महीने गरोदर रहातात ना हा प्रश्ण पडेल कोणाला),


सावळा गोंधळ..........




Ajjuka
Thursday, February 28, 2008 - 7:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे तर काहीच नाही.. ती कसम से नावाची सिरीयल आहे ना त्यात ती बानी आणि मग ती पिया या किती महिने गरोदर होत्या याचं मोजमाप केलंय का?
तेही एकाच माणसाकडून...
आधी त्या पियाशी त्याने कार्यभाग उरकला. मग बानी पण गरोदर झाली मग त्यांच्यात म्हणजे बानी आणि तो माणूस यांच्यात वितुष्ट आले त्यामुळे बानीने त्याला वाचवायला आपला जीव धोक्यात घातला मग त्यामुळे तिचे miscarriage झाले आणि मग त्या जय ला आपली चूक कळून आली मग त्यांना मूल होत नव्हते. मग काही प्रयत्नांनी त्या बानीला परत दिवस गेले. एवढा वेळ ती पिया गरोदरच होती.
आणि बहुतेक मग दोघी एकदमच प्रसूत झाल्या.. एकतर ती पिया अमानवी आहे त्यामुळे तिचे गरोदर असणे हे ३ ४ वर्षांचे असावे किंवा बानी अमानवी आहे त्यामुळे तिचे गरोदरपण ३ ४ दिवसांचे असावे.


Farend
Thursday, February 28, 2008 - 8:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्या महान सिरीयल्स उसगावात आहेत का बघायला पाहिजे. चित्रपट म्हणजे किस झाड की पत्ती यापुढे असे दिसते.

Maitreyee
Thursday, February 28, 2008 - 8:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़रेन्डा अरे उसगावात पण दिसतात की या स्रियल्स:-) मधे PP वर रोज चर्चा चालायची त्यावर, आपले रॉबिनहुड फ़ार मोठे फ़ॅन त्या सिरियल्स चे :-O

Tiu
Thursday, February 28, 2008 - 8:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

serial मध्ये आळून पाळून 'हे असे' होते,
>>>
तुम्हाला आलटुन पालटुन असं म्हणायचय का?

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators