Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 14, 2008

Hitguj » My Experience » समानता » Archive through February 14, 2008 « Previous Next »

Ramani
Thursday, February 14, 2008 - 4:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोनाली, मलाही हेच म्हणायचे आहे, की तडजोड किंवा वाद, ह्या दोन्हीपैकी एक हे स्त्रीलाच करावे लगते. आणि ज्या गोष्टींबद्दल हे असते, त्या जनरली घरातल्या आधीच्या बायकांसाठी मटर करणार्‍या असतात. म्हणुन वाद त्यंच्यातच होतात.

समजा एखाद्य घरी सासरे स्वयंपाक करत असते, आणि नन्तर ती जबाबदारी सुनेवर आली, तर त्यान्च्यात वाद झाले असते. मुळात प्रश्न स्त्रीया एक्मेकींशी वाद घालतात हा नसुन, त्यांच्यावरच वाद घालण्याची वेळ येते हा आहे.


Bee
Thursday, February 14, 2008 - 4:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिन्सेस, स्त्रिला समानतेच्या आधी सुविधा, पण त्या आधी तिला शिक्षण द्या.

स्त्रियांनी पुरुषांशी तुलना करू नये. कारण ती केली की बंधन आलीच. मर्यादा आल्याच. एक स्त्रि म्हणून आपण आपली शक्ती ओळखून काय करू शकतो हे जर ओळखले तर पुरुष प्राणी मधे येणारच नाही. सरळ आपली हक्काची वाट निवडायची नि त्या वाटेवर खंबीरपणे चालायचे. पुरुष स्त्रियांशी तुलना करत नाहीत म्हणून त्यांना त्यांचे अस्तित्त्व लाभले आहे. तुम्ही मुली हल्ली तंतोतंत मुलांसारखे वागतात. त्यामुळे तुम्ही होती नव्हती ओळख देखील विसरत चालला आहात.


Princess
Thursday, February 14, 2008 - 4:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगदी बरोबर बोललात बी. अगदी हेच म्हणायचे होते मला. सगळ्या स्त्रियांना शिक्षण देणे कितपत शक्य आहे ते सांगु नाही शकत पण निदान जीवनावश्यक सुविधांपासुन तरी वंचित तिने राहु नये असे वाटते मला.

तुम्ही मुली हल्ली तंतोतंत मुलांसारखे वागतात...
लाखात एक गोष्ट. ते दारु पितात मग मीही पिऊन पाहणार, सिगरेट पितात, मलाही बघावे लागेल, यात स्त्रीने स्वत:चाच घात करुन घेतलाय. काही मर्यादा निसर्गानेच घालुन दिल्यायेत त्या पाळण्याखेरीज स्त्रीला पर्याय नाही. नवनिर्माणाची अत्युच्च शक्ति बाळगणार्‍या स्त्रीला जबाबदादारीनेच वागावे लागेल.


Anaghavn
Thursday, February 14, 2008 - 5:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

( bee लग्ना नन्तर पाच वर्षांनी तरी अधिकार मिळतोच ना?)
मी तुमच्या या वाक्याशी सहमत नाही.
मला अस वाटतं की या बाबतीत कोणाला दोष देत बसण्या पेक्षा-- आहे त्या परिस्थितीचा विचार करावा--म्हणजे--सासुला वाटतय का की अजुनही माझ्याच मनाप्रमाणे घर चालावं? बरं. मग सुनेचा काय विचार आहे? तिलाही हौस आहे का--स्वत:च्या मना प्रमाणे घरात कामं करण्याची..घर सजवण्याची?---बरं--सासु धडधाकट आहे का? (बहुतेक तरी ९०% --जर सासुला स्वत:च्या मनाप्रमाणे वागायच असतं तेव्हा ती धडधाकट असते--९०% हं)

समजा सासु धडधाकट आहे, तर वेगवेगळं राहू आणि अडीअडचणीला,, आनंदाच्या प्रसंगी काही निमित्ताने--किंवा सहजच एकत्र येउयात्--मनापासुन आनंदाने.
नसेल सासु धडधाकट तर दोघींना थोडी थोडी तडजोड करावी लागणार. सासुला समजाउन सांगण अवघड आहे, पण सून तिच्या पुरतं समजाउन घेऊन तडजोड करु शकते--समोरच्यावर आपण जबरदस्ती करु शकत नाही.
असो.
बघु कोण कोण काय काय प्रतिक्रिया देतेय.


Princess
Thursday, February 14, 2008 - 5:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुलींनो आधी आपणच नक्की ठरवायला हवं की आपल्याला नक्की काय हवय "स्त्री पुरुष समानता की सासू सुन समानता?" :-) :-) :-)



Bee
Thursday, February 14, 2008 - 5:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सासू फ़क्त अत्याचार करते, सून बिचारी गरिब हे समीकरण नेहमीच सत्य नसते. कितीतरी मुल बायकोच्या आहारी जातात. वेगळे होतात. आईवडीलांना विसरतात. घराचे दोन वेगळे तुकडे करतात. तेंव्हा सुना गप्प असतात. तिला तेंव्हा असे नाही वाटत की आपण ह्या कुटुंबाचे परत एकत्रीकरण करू. उलट ती आहे त्या परिस्थितीचा गैरफ़ायदा घेतात.

तर कित्येकदा, घरातील सर्वच जण सुनेला राबवितात, तिला तिचा मान देत नाहीत. अशावेळीच तिने आपल्या हक्कासाठी लढावं.. जर सर्व कुशलमंगल असेल तर वेगळेपणाचा अट्टाहास का? थोडीफ़ार कुरबुर घराघरात असते.


Ramani
Thursday, February 14, 2008 - 5:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम, सासु सुन असमानता ही, स्त्री पुरुष असामानतेच को-प्रॉडक्ट आहे.

Bee
Thursday, February 14, 2008 - 6:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सासू सूनेचे वाद सुरू करायला घरात पुरुष नसतो. तो घरी आल्यावर ते वाद मिटवितो. वर तुम्ही असे विधान करता की तेही पुरुषांमुळेच. हे माते अवनी तू दुभंगून पुरुषांना आता पोटात घे :-)

Ramani
Thursday, February 14, 2008 - 6:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, काल रात्रीपासुन समजावुन थकले, की हे कसे असमानतेचे कोप्रॉडक्ट आहे, तरिही तुम्ही परत तेच विचारता? कमाल आहे. ~D~D

Bee
Thursday, February 14, 2008 - 6:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जा जावून झोप आता मग :-) मी घेतली बुवा छान ६ तासांची झोप.

Dhanashri
Thursday, February 14, 2008 - 6:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुळात वर्षानुवर्षे लहानपणापासुन मुलांच्या मनात हे 'भरले' जाते कि तु फ़क्त
घराबाहेरची कामे करायची.
आमच्या याना पाणी सुद्धा स्वत.ऽ घ्यायल नको असे अभिमानाने अणि कौतुकाने सांगणार.या अनेक स्त्रीया मि बघितल्या आहेत आणि वाद घातल्यावर वाईट हि ज़ालेलि आहे.

जोपर्यंत हे उदात्तिकरण सुरु आहे तोपर्यन्त तरि हे असेच रहाणार.


Manjud
Thursday, February 14, 2008 - 6:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुरुष सासू सूनेतले वाद मिटवतो??????????????

Ramani
Thursday, February 14, 2008 - 6:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झोप घेउन नव्या दमाने आले आहे भांडायला. हळु हळु पुणेकर होतच चालले आहे.

Rajya
Thursday, February 14, 2008 - 9:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्या याना पाणी सुद्धा स्वत.ऽ घ्यायल नको असे अभिमानाने अणि कौतुकाने सांगणार
मग, नवर्‍याला पाणी कोण शेजारी आणुन देणार का?
कीती साधी गोष्ट आहे बघा, ज्यावेळी नवरा बाहेरुन येतो त्यावेळी तो अस्वच्छ असतो (धुळीने, घामाने म्हणतोय मी) मग असाच तो कीचन मध्ये जाऊ शकतो का?
आता असे म्हणु नका की हातपाय धुवुन पाणी घे म्हणुन, कारण बाहेरुन आल्यावर पाणी ही पहीली गरज असते :-)

ज्या स्त्रिया घरीच असतात त्यांच्याबद्दल बोलतोय मी :-)


Manjud
Thursday, February 14, 2008 - 9:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ज्या स्त्रिया घरीच असतात त्यांच्याबद्दल बोलतोय मी

घरच्या स्त्रिया बाहेरून भाजी, वाणसामान वगैरे घेऊन येतात, दमून भागून तेव्हा तंगड्या पसरून टिव्हीसमोर लोळणारे पुरुष देतात का त्यांना पाणि आणुन........ की त्याच घेतात आपल्या हाताने पाणि हात पाय धूवून???


Nandini2911
Thursday, February 14, 2008 - 10:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काहीतरी लिहायचं म्हणून आले होते. १३ फ़ेब ची archives वाचता वाचता विसरूनच गेले. आठवलं की लिहिते.. :-) :-)
जोक्स अपार्ट..
मला वाटतं हा अख्खा बीबी माझ्या दुसर्‍या बीबीवरचा एका वाक्यावरून सुरू झाला होता. "स्वयंपाक करता येतो का?" या प्रश्नाचा मला राग येतो असं मी लिहिलं होतं तेव्हापासून.. ती चर्चा बरीच सुसंगत चालली होती.
त्यानंतार यामधे दिनेशदानी त्या विधीचा उल्लेख का टाकला मला समजले नाही.. त्यानंतर नेहमीचे यश्स्वी कलाकार आले आणि.... जाऊ दे...

तर आता चर्चा बरीच रांगेत आलेली आहे.
बी, मुली तंतोतं मुलासारखं वागतात असं तु म्हणाली आहेस. आणि पुढे दारू सिगारेट्स ही उदाहरणे दिली आहेत.. सर्वच मुलं दारू पितात का? सर्वच मुलं सिगरेट ओढतात??? मुली स्वत्:ची होती नव्हती ती ओळख विसरत चालल्या आहेत म्हणजे नक्की काय???

माझ्या मते समानता मनात असावी लागते. तुमच्या आणि समोरच्याच्या पण. बाकीच्या सर्व बाबी व्यक्तिगणिक कुटुंबागणिक बदलतात.. त्याचं असं generalization करून हाती काहीच लागणार नाही...


Rajya
Thursday, February 14, 2008 - 10:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोळणारे पुरुष देतात का त्यांना पाणि आणुन........

हो हो, मागितले तर नक्कीच देतात

Itgirl
Thursday, February 14, 2008 - 10:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मागावे लागते का रे राज्या?? तुम्हांला मात्र, बाहेरून आल्या आल्या न मागताच बायकोने आणून द्यायचे नाही का?? हं....

Bee
Thursday, February 14, 2008 - 10:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदीनी, ओळख विसरणे ह्या करिता लिहिले की जर स्त्रि ही पुरुष समान झाली तर तिच्यात पुरुषाहून वेगळे असे काय राहील. अर्थात देह हा राहणारच निराळा पण जिथे कुठे समानता येत आहे तिथे पुरुषांची नक्कल होत आहे. स्त्रियांमधे काही चांगले नसते का? पण आपल्यातील जे चांगले आहे त्याच्या त्याग करून कुणाची तरी नक्कल करणे म्हणजे आपली ओळख विसरणेच नव्हे का? ह्या अर्थी ते पोष्ट लिहिले होते.

Nandini2911
Thursday, February 14, 2008 - 1:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला एक कळत नाही... समानता म्हणजे पुरुषाची नक्कल का??
स्त्री पुरुष समान होण्याची मागणी करतच नाहिये. जिथे कुठे खरोखर "असमान" वागणूक आहे ती तिथे मिळू नये.. यामधे अनेक गोष्टी आहेत, ज्या समाजाबरोबर, व्यक्तिबरोबर, कुटुंबाबरोबर बदलतात.

हुंडा ही समस्या काही समाजात खूप आहे. काही समाजामधे घुंघट अथवा बुरखा. विधवा अथवा परित्यक्ता स्त्रियाचे भोग पूर्ण वेगळे. तीन चार वर्षाची मुलगी आई वडील विकून टाकतात. एखाद्या स्त्रीला तिच्याच घरातल्या स्वयंपाक घरात प्रवेश दिला जात नाही (बाजूला बसणे)

कित्येक घरातून कौटुंबिक हिंसाचार होत असतो.. कित्येक बायका आज पण नवर्‍याचा मार खातात. कित्येक मुली आजही भावाच्या शिक्षणासाठी स्वत्: घरी राहतात. आजही १५ व्या १६ व्या वर्षी मुलीची लग्न होतात.
झोपडपट्टीत कितेक बायका दारू पितात. वेडी ओढतात. आणि कुठल्याही पुरुषाची बरोबरी करायला ते हे सर्व करत नाहीत...

आणि इथे चर्चा चालू आहे... कपडे का मुलासारखे घातले.. दारू सिगरेट का मुलासरखी प्यायली?

आपण बघतो तितकंच जग नसतं.. त्यापलीकडे पण लोकाना त्रास असतो. व्यथा असतात. चर्चा जर समानतेवर करायचीच असेल तर त्याबद्दल करा....




चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators