Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
मी केलेला 'स्ट्रगल' ...

Hitguj » My Experience » मी केलेला 'स्ट्रगल' « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through February 18, 200820 02-18-08  8:57 am

Ajjuka
Monday, February 18, 2008 - 11:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जीडी,
वा क्या बात है! तुमच्या मित्राचं कौतुक तर आहेच पण त्याच्या बहिणीच्या सासरच्यांचंही कौतुक करावसं वाटतं.

दक्षिणे,
अगं स्वतःबद्दल कोण सांगेल असं?


Zakasrao
Tuesday, February 19, 2008 - 5:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जीडी ग्रेटच रे.
आफ़ताब तुम्ही लिहिलेल देखिल खरच प्रेरणादायी आहे.
माझा सलाम त्याना. :-)


Ranadive_ravi
Thursday, April 03, 2008 - 6:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Which books is better for motivation?

Gajanandesai
Thursday, April 03, 2008 - 3:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रणदिवे साहेब, "एका अस्सल माणसाची कहाणी" हे पुस्तक तुम्ही वाचले नसेल तर जरूर वाचा. ते कुठे मिळेल हे मला सांगता यायचं नाही कारण मला ते असंच कुणीकडून मिळालं. पण त्याचे प्रकाशन आणि इतर माहिती अशी आहे -

मूळ लेखक: बरीस पलेवोय
अनुवाद: अनिल हवालदार
रादुगा प्रकाशन १९८३
(सोविएत संघात मुद्रित)
लोकवाङ्मय गृह प्रा. लि. मुंबई.



मंडळी, प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. आफताफ शेवटचं वाक्य अगदी लक्षात राहण्यासारखं आहे.


Hi_psp
Saturday, April 05, 2008 - 2:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या एका मित्राची कहाणी.
नेताजी निकम (इंजिनीअर) :- शेतातले घर, आजूबाजूला गाई-म्हशी-बकऱ्या, सदोदित शेतकामात गढलेले कुटुंबिय अशा वातावरणातील शेतक-याचा मुलगा असणारा नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील दाभाडीचा नेताजी प्रकाश निकम छेद देत ग्लोबल भरारी घेतो आहे. तो ३३व्या वर्षी 'आयबीएम'सारख्या जगद्विख्यात कंपनीसाठी अमेरिकेत महत्त्वाच्या पदावर पोहोचला आहे.

नेताजी दाभाडीलाच त्याच्या आजी-आजोबांसोबत राहिला. तिथल्याच शाळेत शिकला. त्याचे आजोबा राजाराम निकम हे जुनेजाणते आणि शिकलेले. नावाजलेले कॉम्रेड. त्यांनी नातवातला 'स्पार्क' ओळखला आणि त्याला थेट नाशिकला आणून सोडला. निवृत्त लष्करी जवानांच्या मुलांसाठी असलेल्या वसतिगृहात नेताजीच्या राहण्याची सोय केली आणि रचना हायस्कूलमध्ये नववीच्या वर्गार्त दाखल केला. नेताजीने आजोबांचा विश्वास सार्थ करत दहावी आणि बारावी चांगल्या गुणांनी उत्तीर्र्ण केली. अकरावीला नेताजीने स्वत:च सायन्सकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक्स हा विषयही त्याचा त्यानेच निवडला. धुळ्यातील 'एसएसव्हीपीएस'च्या इंजिनिअरींग कॉलेजमध्ये त्याने प्रवेश घेतला. लष्कराकडून शिष्यवृत्ती मिळत असली आणि कुटुंबियांचा पाठिंबा असला तरी त्यांच्या आथिर्क मर्यादांमुळे शिक्षणाच्या खर्चाच्या चिंतेचं ओझं मनावर असेच. इंजिनिअरिंगच्या फायनल इयरला तर फी भरणेच दुरापास्त झाले. मग नेताजीने स्वत:च मिलिटरी चॅरिटेबल ट्रस्टला पत्र लिहिले. फीसाठीचे पैसे कर्जरुपाने द्या, अशी मागणी त्याने केली. त्याच्या तळमळीला ट्रस्टने दाद देत फीची तजवीज केली.

इंजिनिअरिंग झाल्यावर नेताजीने 'एमबीए'च्या ध्यासाने मुंबई गाठली. तिथे नवी मुंबईत भारती विद्यापीठामध्ये त्याने 'एमबीए'चे शिक्षण सुरू केले. त्यासाठी शैक्षणिक कर्जही त्याने घेतले. परिस्थितीची गरज म्हणून असले तरी 'एमबीए' करताना नोकरी धरणारा तो कॉलेजातला एकमेव विद्याथीर्. शिक्षण घेत असतानाच नेताजीच्या करियरलाही सुरूवात झाली होती. समर प्रोजेक्टसाठी तो 'सिमेन्स'मध्ये दाखल झाला आणि नंतरही तिथेच नोकरीला लागला. तिथे एका प्रॉडक्टचे नॅशनल लाँचिंग करण्याची जबाबदारी त्याने पार पाडली. 'सिमेन्स'मधली नोकरी करतानाच नेताजीने दोन वर्षे ठाणे कॉलेजमध्ये 'एमबीए'च्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम केले.

काळाचा पायरव ओळखत नेताजीने 'सॅप' या सॉफ्टवेअरकडे करियरची दिशा वळवली. त्यासाठी तो टाटा टेक्नॉलॉजीजच्या सेवेत दाखल झाला. अवघ्या सहा महिन्यांत नेताजीची नियुक्ती या कंपनीने 'ब्रिटीश पेट्रोलियम'च्या ऑनसाईट प्रोजेक्टवर शिकागोमध्ये केली. २००४ सालच्या एप्रिलमध्ये अमेरिकेत दाखल झालेल्या नेताजीने या प्रोजेक्टवर एक वर्षभर काम केले. तिथेच त्याला जगातल्या चार सर्वाेत्तमपैकी एका कन्सल्टींग कंपनी असलेल्या 'डेलॉईट अँड टच्'मध्ये संधी मिळाली. या कंपनीतल्या दोन वर्षांच्या अनुभवाच्या जोरावर नेताजी अलिकडेच 'आयबीएम'च्या सेवेत दाखल झाला आहे. तरी नेताजीने आपल्या मातीशी असलेले मुळ तुटू दिलेले नाही. दाभाडीत तो ज्या शाळेत शिकला तिथे त्याने आजोबांच्या नावाने पारितोषिक सुरू केले आहे.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators