Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
कमालीचा चंगळवाद! ...

Hitguj » My Experience » बहु(जनांकडून)श्रुत » कमालीचा चंगळवाद! « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through February 14, 200820 02-14-08  8:09 pm
Archive through February 15, 200820 02-15-08  7:18 pm
Archive through February 18, 200820 02-18-08  7:27 am
Archive through February 19, 200820 02-19-08  8:55 am
Archive through February 20, 200820 02-21-08  4:45 am
Archive through March 12, 200820 03-12-08  8:22 am

Ladtushar
Wednesday, April 16, 2008 - 5:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तापमानवाढीशी लढायचंय ? मग जीन्स सारखी धुवू नका!

नवी दिल्ली - तुम्हाला अगदी सहजपणे तापमानवाढीचा सामना करायचाय? मग, एक काम करा तुम्ही घालत असलेली जीन्स सारखी सारखी धुवायला टाकू नका...
नाही, नाही, यात काहीही चुकीचे सांगितलेले नाही. संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरणविषयक कार्यक्रमानेच हे आवाहन केले आहे. किमान तीन वेळा वापरल्याशिवाय जीन्स धुवायला टाकू नका, असे या आवाहनात म्हटले आहे. जीन्स धुवायची असेल, तरी ती थंड पाण्यातच भिजवा आणि ती वाळल्यानंतर इस्त्री करण्याच्या भानगडीतही पडू नका, असेही संयुक्त राष्ट्र संघाने म्हटले आहे. नागरिकांनी या आवाहनाचा अवलंब केल्यास ऊर्जेची पाच टक्‍क्‍यांनी बचत होईल, असेही संघाचे म्हणणे आहे.

या कार्यक्रमाच्या प्रचारासाठी ३० सेकंदांचा एक जाहिरातपटही तयार करण्यात आला आहे. तरुणांना जाहिरातपटाकडे आकर्षित करण्यासाठी त्याची मांडणीही वेगळ्या पद्धतीने करण्यात आल्याचे या कार्यक्रमाच्या संज्ञापन विभागाचे प्रमुख रॉबर्ट बिसेट यांनी सांगितले. जीन्ससारखे कपडे जास्त धुतल्यामुळे ऊर्जेचा विनाकारण अपव्यय होतो, असेही बिसेट यांनी म्हटले आहे.
http://www.esakal.com/esakal/04162008/Specialnews1E9D1EAABE.htm

Zakki
Wednesday, April 16, 2008 - 12:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाळल्यानंतर इस्त्री

चांगल्या जीन्स मुद्दाम फाडून फॅशन म्हणून जास्त किमतीला विकायच्या ही कल्पना ज्याच्या सुपीक मेंदूतून आली असेल, त्याला सुद्धा इस्त्री केलेली जीन काढायचे सुचले नाही!

Shendenaxatra
Wednesday, April 16, 2008 - 4:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असे करू या का? सगळ्या लॉंड्र्या सरकारने चालवाव्यात. प्रत्येकाला कपडे धुवायला, इस्त्रिला परमिट घ्यायला भाग पाडावे. ते मिळवायला पर्यावरण विषयी परीक्षा असावी. आणि मग सगळ्या धुण्यावर, इस्त्री करण्यावर कठोर बंधने घालावीत.
घरी हे सगळे प्रकार करायला पूर्ण बंदी!

पुढे, प्रत्येक जण किती पाणी पितो, किती वेळा श्वास घेतो ह्यावरही बंधने घालावीत. नाकाला एक मीटरच बसवा ना. मग जे जास्त उच्छ्वास सोडतील त्यांना जबर दंड! कित्ती मज्जा!

टीप उच्च सरकारी अधिकारी, मंत्री, सोनिया परिवार ह्या जाचक बंधनातून वगळला जावा. कारण ते खूप खूप महत्त्वाचे लोक आहेत.

मग बघा पर्यावरण कसे सुधारते ते!



Tonaga
Wednesday, April 16, 2008 - 4:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता ही सूचना संयुक्त राष्ट्रसंघाकडून करण्यात आलेली आहे. यात सरकारचा काय संबंध? यात अधिकारी, मंत्र्यांचा आणि कहर म्हणजे सोनिया परिवाराचा काय संबंध? पण नाही, विषय कोणताही असेना अगदी स्विट्झरलॅन्डची अर्थव्यवस्था नाहीतर जपानी आदिवासींच्या लंगोट्यांचे डिझाईन हा विषय असो, ही मंडळी काहीतरी करून तो विषय नेहरू, गांधी, सोनिया, राहुल, त्याची न झालेली मुले, मुसलमान, ओबीसी, दलित,केतकर यांच्यापर्यन्त नेऊन भिडविल्याशिवाय यांना चैनच पडत नाही. अरे एवढे मायबोलीकराना गृहीत धरत नका जाऊ....
आता चंगळवादाचा यूनोचा आणि या शेंड्याच्या पोस्टचा कशाला काही मेळ आहे का?


Shendenaxatra
Wednesday, April 16, 2008 - 8:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

टोणग्या, असा शेपटाला फटाक्यांची माळ बांधल्यासारखा पिसाळू नकोस. सोनियाची खेचली म्हणून मिर्च्या झोंबल्या का? उगी उगी. चालायचच. तुझी मालकीण ना ती. असो. बाकी मंत्र्यसंत्र्यांची टिंगल तर जिव्हारी नाही ना लागली? मग जा आता, गोठ्यात जा. मी लालूप्रसादकडून खास कडबा मिळवतो आणि तुला चारतो मग तर खूष?

असो. उपरोध कशाशी खातात हे कळत नसल्यास नेहमीचा कडबा आहेच चघळायला तुम्हाला!


Tonaga
Thursday, April 17, 2008 - 12:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेन्ड्या पोस्टची शैली आवडली पण मजकूर नाही :-). उपहास करायलाही हीच उदाहरणे का आठवावीत बरे? कदाचित रात्रंदिन, जळी काष्ठी, पाषाणी तेच तेच डोक्यात येत राहते? सोनियाची खेचली म्हणून राग यायचे कारण नाही पण मी सोनियाचा विरोधकही नाही. आता यूनेच्या सूचनेची टिंगल करताना 'यूनोच्या अधिकार्‍याना ह्या जाचक बंधनातून वगळला जावा. कारण ते खूप खूप महत्त्वाचे लोक आहेत.मग बघा पर्यावरण कसे सुधारते ते! हा उपहास साजून दिसला नसता का? पण नाही.,उपहासाच्या नावाखाली आपल्याला हवे तेच खपवायचे?

असू द्या असू द्या तुमचे फ्रस्ट्रेशन समजू शकतो मी....


Limbutimbu
Thursday, April 17, 2008 - 12:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

टोणग्या, शेन्ड्या, तुमच चालुद्या, मला फक्त एक सान्गा
मध्यवर्ती निवडणुका वगैरे जवळ येत चाल्ल्याहेत का????????
नाही म्हणल कालच्याच पेपर मधे म्हन्जे आपल त्या केतकराच्या लोकसत्तात पहिल्या पानावर बातमी होती, अन आजच्या का कालच्या केतकराच्या अग्रलेखात पण उल्लेख होता की प्रियान्का की कोण हे ना ती???? ती म्हणे राजीव गान्धीन्च्यावरील खुनी हल्ल्यात दोषी ठरलेल्या नलिनी की कुणाला तरी भेटायला गेली होती!

बातमी, तिची जागा, अन वेळ बघितली अन मनात शन्का आली की इलेक्शन जवळ आल्या की काय!
DDD
baatamii
agralekh

Arc
Tuesday, April 29, 2008 - 5:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

related to This topic
http://www.loksatta.com/daily/20080429/vishesh.htm

Arc
Tuesday, April 29, 2008 - 6:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

and this too.
http://www.loksatta.com/daily/20080429/opead.htm

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators