Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 05, 2008

Hitguj » My Experience » पुरुष जन्मा ही तुझी कहाणी » Archive through February 05, 2008 « Previous Next »

Uday123
Monday, February 04, 2008 - 11:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा सर्व अन्याय पाहील्यावर आता "पुरुष मुक्ती संघटना" ही काळाची जरुरी बनली आहे.

अम्हाला कोणच्याही सहानुभुतिची अवशक्ता नाही आहे, पण बरोबरीने स्वत:चे हक्क हवे आहेत.


Athak
Monday, February 04, 2008 - 1:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्या सावित्रीने मेल्यावर सुद्धा त्याला खेचुन आणला , सुटला होता बिचारा पण ..... जन्मोजन्मी सुटका नाही रे पुरुषा तुझी , जगातली सगळी वडाची झाड नाहीसी होतील पण हा जांच नाही :-)

पुरुष जन्मा ही तुझी कहाणी :-)


Zakki
Monday, February 04, 2008 - 1:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मागे विनोद म्हणून ऐकलेली ही गोष्ट खरी असावी असे मला वाटू लागले आहे.

एकदा एक माणूस रस्त्यावरून गाडी चालवत जात असतो. वाटेत त्याला पोलिसची गाडी उभी दिसते. ती बघून तो एकदम सुसाट वेगाने गाडी चालवायला लागतो. किती तरी वेळ पाठलाग करूनहि त्याला पकडायला पोलिसाला जमत नाही. शेवटी इतर गावच्या पोलिसांची मदत घेऊन कसे बसे त्याला थांबवतात. मग तो पहिला पोलीस येऊन त्या माणसाला विचारतो, 'अरे असा जीवावर उदार होऊन का गाडी चालवतो आहेस?'

त्याने सांगितले, 'आठवतय्, गतवर्षी मला तू असेच काहीतरी कारणाने थांबवलेस, नि त्यानंतर माझी बायको मला सोडून तुझ्या कडे गेली. मला भीति वाटली की आता तू तिला माझ्याकडे परत करणार!'


Mandarnk
Monday, February 04, 2008 - 2:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असाच अजून एक विनोद:

एका माणसाला त्याचा एक मित्र वेड्याचं हॉस्पीटल दाखवत असतो. एक वेडा दाखवून तो म्हणतो, "याची बायको एकाने पळवून नेली, म्हणून याला वेड लागलं!" आणी थोडं पुढे गेल्यावर अजून एक वेडा दाखवून म्हणतो, "आणी ज्यानी त्याची बायको पळवली होती तो हा!!!"


Ashusachin
Monday, February 04, 2008 - 4:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१. अशक्य आशि बड्बड - आई आसो, बाय्को आसो, मावशि आसो, कोन्तिहि बाई सतत बड्बड करुन पुरुशला वेडे का करते?

२. Emotional Blackmail - pratyek weli कधि रडायचे आणि डोळ्यातुन पनि काढायाचे कसे समजते?

३. हट्टिपणा - आसेच झाले पहिजे याला logic का नसते?

४. Comparison - सतत ससु, जाऊ, नणन्द यान्च्याशि
तुलना का?

हलकेच घ्या हं....
पुरुष जन्मा ही तुझी कहाणी :-)


Divya
Monday, February 04, 2008 - 4:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ashusachin सही आहेत comments एकदम.

Ashusachin
Monday, February 04, 2008 - 6:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजुन एक राहीलेच - सतत एकच गोष्ट repeat करणे :-) आणि जुन्या गोष्टी नव्याने उकरुन काढणे, त्या वेळेस तु हे केले नाहीस OR तुला ते जमले नही हे लग्नाला २० वर्शे झालि तरी म्हणून दाखवणे आणि समोर्च्यला guilty फ़ील देणे :-)


Ambar
Tuesday, February 05, 2008 - 9:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आशुसचिन्-अस लग्नाला २० वर्श झाल्यायेवढी प्रगल्भता कशी मिळवलिस रे बाबा?;)

Shrini
Tuesday, February 05, 2008 - 10:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Why do married men die earlier compared to unmarried men ?

Because they want to! :-)

Hkumar
Tuesday, February 05, 2008 - 11:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

घरातील बोलीभाषेला mother tongue असे का म्हणतात?
....कारण, वडिलांना (घरात) बोलायची संधीच मिळत नसते!


Supermom
Tuesday, February 05, 2008 - 11:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

WHY DO MARRIED MEN LIVE LONGER THAN UNMARRIED MEN?
BECAUSE THEY BECOME IMMUNE TO PAIN.


Dhondopant
Tuesday, February 05, 2008 - 11:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समानता या बीबीवर यका दीवसात १३० पोस्ट्स आणि ईथे वीस वगैरे.... पुरुषांचा आत्मसम्मान कीती लयाला गेलेला आहे हेच यावरुन दीसत नाही काय?यावज्जीवजीवीत स्त्रीयांच्या गुलामगिरीची सवय जडलेल्या पुरुषाना स्वातंत्य्र ते काय उमगावे?... स्त्री दीसताच तुमच्या हाताला कंप सुटतो आणि हातात तलवार असो वा विडी किंवा सिगार सिगारेट तो गळुन का पडतो? ही गुलामगिरी आणि भित्रेपणाची परीसीमाच नाही का आणि आम्ही पुरुष ती कधी ओलांडणार?.. " ऐकल का? " कींवा " ए ईकड बघ ना " या व अशासारख्या वाक्यांना हीरीरीने तोंड देवुन " ऐकत नाही जा " असे सांगण्याची धैर्यधुरीणता पुरुषानो तुमच्यात कधी येणार?... रस्त्याने जाणारी जनावरे ज्याप्रमाणे " हैक " म्हणताच बिचारी चालु लागतात त्याचप्रमाणे तुम्ही हे " ऐकल का " कींवा " जरा ईकड बघ ना " या व असल्या आज्ञासुतोवाचक शब्दांचे एव्हढे गुलाम का झाला आहात?.. " मी आज तुझ्यासमोर हे सांगणार की या भाजीत मीठ कमी आहे " हे कधी जमणार तुम्हाला? बायका कशा असतात हे सगळ्याना माहीत असतानाही तुम्ही एक्मेकात ही बोलताना ओशाळ हसुन आपला त्रास लपवता आणि वर स्त्रीमुक्तीवादी आंदोलनाला आपण पुरोगामी आहोत हे दाखवण्यासाठी पाठींबा देता कोण ही हतबलता? घरात एखाद्या वेळेला बायकोने मनासारखी भाजी केली की स्वताला भाग्यवान समजुन मिशीला पीळ घालत " माज्झ्यासारखा सुखी नवरा मीच " असे म्हणुन आपली लाचार अवस्था विसरताना तुम्हाला काहीच कसे वाटत नाही? हे तमाम नवर्‍यानो तुमच्या या लाचार अवस्थेची तुलना कशाशी करावी की लाचार नवरा हेच तुमचे उपमान आणि उपमेय?.. कचर्‍याच्या ढीगावर पडलेले सारमेय ही लाथ मारताच उठते आणि भुंकते आणि तुम्ही मात्र " बर बाई तुझच खर " असे म्हणुन दीवसरात्र गुलामगिरीचे प्रदर्शन करता हे तुम्हाला स्प्रुहणीय आहे की नाही याचा एकवार जरी मनात विचार केला आहे तुम्ही? विचाराचीच गुलामगिरी तुमच्या रक्तात थेंबाथेंबात भिनली आहे आणि लग्नाच्या दुसर्‍या दीवसापासुन तुम्हाला ही सुप्त जाणीव आहे. घरी निवांत बसाव अस वाटत असतानाच हॉटेलात जावे लागते आणि चमचमीत खावे वाटत असतानाच उपवासाचे मिळते याच निषेध तुम्ही कधी करणार?... ही गुलामी कधी संपवणार? माकडे जशी एका फांदीवरुन दुसर्‍या फांदीवर उड्या मारतात त्याप्रमाणे दुकाने पालथी घालणार्‍या लाचार नवर्‍यानो तुमचा धिक्कार असो. आपला कंटाळाही तुम्ही घरात व्यक्त करु शकत नाही हे सांगण्याची तरी तुमच्यात प्रामाणिकता आहे काय?... बाहेर राजकारणावर वारेमाप बेभान चर्चा करताना आपले घरातले स्थान सोयीस्करपणे विसरण्याची कला कीती कसोशीने अवगत केली आहे हे कधी पाहीले आहे का?... या कसोशीबद्दल नवर्‍याना नोबेल पारीतोषीकच द्यावे लागेल असे नाही वाटत तुम्हाला? नवरा हा नेहमीच नव वरा असतो.. म्हणजे वधु ची कशी " बायको " होते तसे नवर्‍याचे काहीच होत नाही.. तो आपला बिचाराच असतो.

Bee
Tuesday, February 05, 2008 - 12:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गम्मत म्हणून हा बीबी उघडला हे अगदी उघड उघड आहे पण जसे कवितेच्या बीबीवर एखाद्याने चांगल्या कवितेचे विडंबन करून त्या कवितेचे गांभिर्या धोक्यात आणणे असे होय तेंव्हा हा बीबी देखील स्त्रि जातिच्या गंभिर प्रश्नाला विनोदी रुप देते आहे.

एकीकडे अनेक बाजुंनी उच्च बोलणारे मायबोलिकर असा बीबी उघडतात तेंव्हा आपण किती दांभिक आहोत ह्याची पुन्हापुन्हा जाणिव होते.


Zakki
Tuesday, February 05, 2008 - 4:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धोंडोपंत, जरा जपून. माझ्यासारख्या वृद्ध माणसाचे रक्त सुद्धा सळसळले. मी आजच पुरेसे पैसे घेऊन या घरातून पळून जाण्याचा विचार करू लागलो आहे.

नाहीतरी अनेक वर्षांपूर्वी इथे येऊन स्वत:च्या स्वकष्टाच्या बळावर एव्हढे मिळविले (माझे काही मित्र (कुठल्या गावचे ते सांगत नाही) म्हणतात, अहो तुम्ही अमेरिकन कॉलेजात शिकला नाहीत, Y2K केले नाहीत, जावा, वेब वगैरे काही न करता, त्यामानाने एव्हढे मिळविले म्हणजे कमाल आहे तुमची)

थोडक्यात माझी बकेट लिस्ट करायला सुरुवात करतो.


Zakki
Tuesday, February 05, 2008 - 4:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपण किती दांभिक आहोत
अहो बी, स्वत:पुरते बोला हो. आम्ही हे पहिल्यापासून असेच! कुणी 'गंभीर' म्हंटले तरी आम्हाला त्याबद्दल काय वाटते ते आम्ही लिहीणार!

धोंडोपंत, आहात ना अजून तिथे? थोडी मदत लागेल असे वाटते.


Ashusachin
Tuesday, February 05, 2008 - 4:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Konitari ithe lihilya prmane
आजकाल कुठलीहि गोष्ट एकदम टोकाला न्यायची पद्धतच झाली आहे! Abhijeet mhanala tase हा बिबि फक्त विनोदी प्रकार आहे म्हणुन मी लिहित आहे. तरी कृपया वाचताना तसेच वाचावे. आणि विनोदी पद्धतीनेच मुद्द्यांचे खंडण केले जावे.

Anagha - Agree! तुम्ही आजारी पडल्यावर gharatil streech तुमच्या कपाळावरुन्डोक्यावरून मायेने हात फिरवते.

धोंडोपन्त/ Bee हलकेच घ्या हं.... :-)

Uday123
Tuesday, February 05, 2008 - 6:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्ही आजारी पडल्यावर तुमच्या कपाळावरुन्डोक्यावरून मायेने हात फिरवते, ती स्त्री च असते की नाही? म्हणजे आई, बायको, बहीण,मुलगी--- तिथे कसा कोणी पुरुष येत नाही म्हणते मी मेलं!!!

---हे एकतर्फ़ी विधान वाटतं... तुम्हीदेखील आजारी पडल्यावर तुमच्या कपाळावरून मायेचा आपुलकीने हात बाबा, पती, भाऊ, मुलगा ई. देखील फ़िरवतात. झालच तर डोक्टर कडे घेऊन जाणे, औषधी आणणे व ते योग्य वेळी घेत आहात याची खात्री करणे हे आम्ही(च ?) करतो.

अशावेळी घरातील नित्य कामाचा (वाढलेला) बोजा, नोकरी, आणी (वरील) सेवा भावी वृत्ती ह्या सर्वान्च्या अग्नी-दिव्यातून जात असताना कुठेही मी काही करतो आहे याचा बोल्-बाला (डांगोरा) नाही.


Manuswini
Tuesday, February 05, 2008 - 6:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो धोंडोपंत. चुकला की हो बीबी तुमचा,

तुम्ही बहुधा 'मनातील भावना' बीबी वर हे लिहू इच्छीत होता पण चूकून इथे लिहिलेले दिसते. :-)


Uday123
Tuesday, February 05, 2008 - 6:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समानता या बीबीवर यका दीवसात १३० पोस्ट्स आणि ईथे वीस वगैरे.... पुरुषांचा आत्मसम्मान कीती लयाला गेलेला आहे हेच यावरुन दीसत नाही काय?

---आत्म-सम्मानची कमी की घरातील मंडळींच्या धाका पोटी लिहायला कचरतात्/ घाबरतात? काही असो पण १३० आणी २० ही संख्या खुप काही बोलून जाते.


Ashusachin
Tuesday, February 05, 2008 - 6:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Uday123
माझ्या अनुभवानुसार आणी निषकर्षानुसार घरातील
स्त्रीला (मुलगी, आई, बायको) जर घरातील पुरुषानी आजारी पडल्यावर त्यान्च्या कपाळावरुन आणी डोक्यावरून मायेने हात फिरवला तर बरे वाटते आणी घरातील पुरुषाला आजारी पडल्यावर मुलगी, आई, बायको ने यान्च्या कपाळावरुन आणी डोक्यावरून मायेने हात फिरवला तर बरे वाटते. कदचित निसर्गानेच असे दोघाना घडवले असावे.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators