Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
वास्तव

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » वास्तव « Previous Next »

Abhijeet25
Wednesday, January 30, 2008 - 3:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरेच दिवस लिहिन म्हणत होतो. पण बी ने बघ्यांची भुमिका चा बिबि चालु केला आणि मग नाहि रहावले.


मी काॅलेज ला असतानाची गोष्ट.
माझ मित्र परिवार भरपुर मोठा आहे ( बाबांच्या भाषेत गरजे पेक्षा जास्त त्या मुळेच माझे फार नुकसान झाले)
या मित्र परिवारात चळीतल्या मुलांपासुन ते यामाहा, मोबाईल ( २००० सालि) तत्सम गोष्टी जवळ बाळगणारे मित्र पण शामिल.

माझ्या एका जवळच्या मित्राची बहिण नवर्‍याशी कशावरुन तरी बिनसल्यामुळे माहेरी येउन राहिली होति. जवळ जवळ एक दिड वर्षे ती माहेरीच होति. आजुबाजुला सगळ्यांना हि गोष्ट माहित झालि होति कि ती घरी का आहे ते.

तर ताई एकदा दळण टाकायला गिरणीवर गेली होती आणि नाक्यावर तीन चार यु.पी. वाले बसले होते जे तिथे बेकरी चालवायचे. त्यातल्या दोघानी तिच्याकडे बघत काहि शेरे मारले आणि त्यातला एक जण म्हणाला चल मी तुझ्याशी लग्न करतो तुला नवर्‍याने टाकले म्हणुन काय झाले.!”
हि गोष्ट आम्हाला ( मित्राकडुन मला) पाच सहा दिवसांनी कळाली जेंव्हा ती गिरणी मधे जायला टाळाटाळ करु लगली तेंव्हा. मग आम्ही तीन चार जे जवळचे मित्र होतो ते सगळे त्यांना सभ्य भषेत समजावायला गेलो. त्यांना जरा दम वगैरे देउन आलो कि असे परत होता कामा नये वगैरे. पण त्यांना वाटले हि काय पोरं सोरं आपल्याला दम भरतायत आपणच यांना धडा शिकवुयात, म्हणुन त्यांनी आम्हाला मारायला चिंचवड मधुन त्यांचे मित्रा, भाउबंद बोलाविले. ही गोष्ट आम्हाला बरोबर बाहेरुन कळाली कि आज रात्री चिंचवड वरुन आपल्याला मारायाला मुले येणार आहेत. आमच्यातले दोघे जाम घाबरले त्यांना वाटले उगाच हा उद्योग केला. पण माझे आणि पप्प्याचे रक्त अजुनच खवळलं. आम्ही झाडुन सगळे मित्र गोळा केले म्हणलं आजच यांची खोड मोडायाची. ज़्या मिळेल त्या गोष्टी एकत्र केल्या ( राॅड, स्टंप, पाईप, बॅट वगैरे) आणि सगळे त्या बेकरित घुसलो. तिथे भरपुर जण होते. आम्हि आत गेल्या गेल्या जे तिथे नवीन होते त्यांना सांगीतले कि तुम्हि मधे पडु नका. आमचा लफडा यांच्याशी आहे. तरीही ते मधे पडलेच आणी त्यांनी या प्रकरणाशी त्यांचा काही संबंध नसताना उगाचच मार खाल्ला. जे हाताला लागेल ते तोडुन मोडुन टाकले, त्यांच्या बुलेट, बेकरी, बेकरिच्या मागचे घर, त्या घरातील सगळे फर्निचर वगैरे सगळे तोडुन टाकले. त्या रुम मधे आठ जण होते त्यातील तीन जणांनी तर इतका मार खालला कि विचारता सोय नाहि. दोघेजन चार दिवस आय.सी.यु मधे होते.
मला वाटले नव्हते कि एवढे काहि होइल पण दोन चार तास मुलांच्या अंगात भिनलेल्या दारुने भलताच परिणाम दाखवला.

आम्हि नंतर तिथुन सगळे गायब झालो. नुकसान फार झाले होते. पोलीस तक्रार झाली. दुसर्‍या दिवशी पेपर मधे बातमी आली, सकाळ मधे. अमुक अमुक विभागात दंगल म्हणुन. पोलीस सगळे आमच्या मागावर आम्हाला कल्पनाच नव्हती प्रकरण एवढे वाढेल म्हणुन. मग आम्हि सगळे घरातुन फरार. सगळ्यांच्या घरच्यांना कल्पना आलीच होती एव्हाना. काय करायचे कोणालाच कळत नव्हते. त्यात आमच्यातले दोघे जण पोलिसांच्या हातात सापडले. पोलिसांनी त्याना इतके फोडुन काढले कि विचारता सोय नाहि. पण त्यांनी इतके होउन बाकिच्या कोणाची नावे नाहि सांगीतली नशीब. असेच चार दिवस गेले. आम्हि सगळे माझ्या एका मित्राच्या रुम वर. मनात पोलीसांची दहशत तर इतकि बसली होति की जर कुठे जायचे असेल तर कोणीहि एकटे जायचे नाहि सगळे एकत्र. ज़र एखादे वळण असेल तर एक जण आधी पुढे जाउन लपुन छपुन बघायच कि पोलिसांची गाडी वगैरे दिसती आहे का. नसेल तर मग बाकिच्यांना इशारा करायचा.

ते चार दिवस इतके वाइट काढले कि सांगायची सोय नाहि. घरि संपर्क नाहि. मोबाइल नाहि, घरी फोन केला तर टॅप केला असेल का हि भिती.
मग पाच सहा दिवसांनि आमच्या सगळ्यांच्या पालकांनी, मंडळाच्या जेष्ठ कार्यकर्त्यांनी नगरसेवक, आमदार यांना मधे पाडुन प्रकरण शांत केले. पोलीसांनी मुलांच्या अंगाला हात लावायचा नाहि हे मान्य करायला २० हजार घेतले. सगळं काहि शांत झाल्यावर सगळे घरी आले. बाबा मला काहि बोलले नाहि पण दाद्याने माझी चांगलीच खरडपट्टि काढलि. मी दाद्याचि, चुलत्यांची खुप बोलणी खाल्लि.

पोलीसांनी तर एफ. आय. आर. लिहिली होती ती आता मागे घेता येत नव्हती. आम्हि सगळे एक क्षणात विद्यार्थी, मंडळाचे तरुन सळसळते कार्यकर्ते. घरो घरी आम्हि मंडळात राबवत असलेल्या उपक्रमांचे गोडवे होते. सगळे एका क्षणात बदलले होते. आम्हि सगळे आता पोलिस रेकाॅर्ड असलेले गुन्हेगार झालो. कुठेही जाताना सगळ्या नजरा याच कि हेच ते, हेच ते गुन्हेगार, झुंडशाहि करणारे, हेच ते गुंड शिक्षणापेक्षा हुल्लडबाजीत जास्त रस असणारे, सगळि कडे आमची प्रतिमाच बदलली.

या सगळ्याचे परिणाम फार भोगले. नाव तर बदनाम झालेच. काॅलनी मधल्या मैत्रिनी, शेजारी पाजारी फक्त ओळख देउन लांबुनच जाउ लागले. अंतर ठेउन वागु लागले.
मला काॅलेज संपल्या संपल्या मुंबईला नोकरी लागली. मी तिथुन बाहेर पडलो
नावावर एक पोलीस केस असल्यामुळे पासपोर्ट काढता येईना. अंगात धाडस असुन बाहेर जायची संधी मिळेना. मधे एकदा केस कोर्टात लागली. हजेरि द्यायला जायचे होते नाहितर वाॅरंट निघाला असता. मॅनेजर सुट्टी द्यायला तयार नव्हता. मग त्याला सगळे खरे खरे सांगीतले. मग सुट्टि दिली त्याने, आणि वर म्हणाला एच. आर. मधे कळु देऊ नकोस नोकरी जाईल. केस अजुनहि चालु आहेच तारखा पडत आहेत. मी धडपड करुन मुंबई च्या पत्त्यावरुन पासपोर्ट काढुन परदेशी आलो. पण अजुनहि टांगती तलवार डोक्यावर आहेच. कधिहि काहिहि होउ शकते. मित्र दर वेळेस डमी उमेदवार कोर्टात उभा करतात. केस पैसे देउन मिटवायचे प्रयत्न पण चालु आहेतच. समोरचे जास्तीत जास्त पैसे उकळायला बघत आहेत. कारण दोन जण भारताबाहेर नोकरी करतात त्यांना माहित आहे.

मी खरेच चुकलो का मी तिथे नव्हते जायला पाहिजे का भाउ म्हणतो तसे कशाला दुसर्‍यांच्या भानगडित पडा शेवटी नुकसान कोणाचे झाले नाव कोणाचे खराब झाले भोगतोय कोण दुसर्‍यांच्या नादापायि आपल्या करियरचे नुकसान कशाला करायचे कुठे एवढे काहि झाले होते, चार शब्द बोलाले होते न ते फक्त कोणि तिच्या अंगाला तर हात नव्हता लावला ना शब्द काय अंगाला चिकटतात का वगैरे वगैरे

खुप ऐकावे लागले मला या सगळ्यामुळे

पण

हिच भानगड आपल्या बाबतीत झाली तर? मग काय कराल? एकट्याने त्या चार जणांना जाउन दम द्यायचि हिम्मत आहे? का मग मुग गिळुन गप्प बसायचे? तु त्या रस्त्याने जाउ नकोस, कोणीही काहीहि बोलले तरि तु गप खाली मान घालुन चाल, त्यांच्याकडे दुर्लक्ष कर, हे सगळे आपल्या मुलि, सुना यांना सांगायाचे, त्यांची चुक नाहि हे माहित असुन सुध्धा?
सुरुवात बोलण्यानेच होते? तसा तर कुणाचा स्पर्श सुध्ध अंगाला चिकटत नाहि! मग तो पण माफ़ करायचा का
?


आम्हा मुलांचे जे झाले ते झाले पण आमचा हेतू सुध्धा साध्य झाला. या गोष्टिला ७ वर्षे झाली पण आज पर्यंत आमच्या एरियातल्या पोरींकडे कोणीहि वाकड्या नजरेने बघत नाही. दोनचार वेळातर मला माझ्या दुसरीकडे रहणार्‍या मित्रांकडुन कळाले कि कोणी जर ईथे राहणार्‍या मुलींकडे बघीतले तर बाकिची मुले त्यांना सांगतात कि त्या मुलीच्या नादी नको राहु ती अमुक अमुक एरिया मधे राहते.

जरा तुम्हि पण एखाद्याला गुन्हेगार, किंवा वाईट मुलगा असा शेरा मारताना थोडा विचार करा. सगळेच वाईट नसतात कधी कधी परिस्थिति वाइट असते. आम्हाला वेळिच घरच्यांनी त्यातुन बाहेर कढले म्हणुन आम्हि स्थिरावलो. नाहि तर आम्हीपण टिपीकल गुन्हेगार झालो असतो कदाचीत वास्तव्” मधल्या रघु सारखे


Yashwant
Thursday, January 31, 2008 - 10:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभी, अरे तु केलेस तेच बरोबर आहे. माझ्या बहिनीला एकाने कॉलेज मध्ये छेडले होते. तीने घरात न सान्गता फ़क्त मलाच सान्गितले होते. त्या मुलाचाच मोठा भाउ तिथल्या पोलीस स्टेशन ला पीएसाय होता. मी कॉलेज मध्ये एकटाच जावुन त्याला भिडलो होतो. ते चार जन होते. नुसत्या समज देन्यावर भागले. पन मी मारायची आणि मार खायची पन तयारी करुन गेलो होतो. नन्तर १ २ दिवस बहिनी बरोबर कॉलेज ला पन गेलो. मीत्रान्ना सान्गितले असते तर ते आले असते पन मी न सान्गताच गेलो. तरी पन एका मित्राला हे समजले होते. त्याने माझ्या नकळत फ़ील्डीन्ग लावुन ठेवली होती. कदाचित मोठी मारामारी झाली असती तर सगल्यान्नाच त्रास झाला असत. सुदैवानी तसे काही झाले नाही.

Nandini2911
Thursday, January 31, 2008 - 11:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा अभिजीत, दाद द्यायला पाहिजे तुमच्यासारख्या मुलाची.
गुन्हेगार तो नसतो जो गुन्हा करतो, पण जो जाणून बुजून गुन्हा करतो तो मात्र नक्कीच असतो. खरंतर बाहेरून तडजोड करून केस मितवता आली असती. त्या भय्या लोकाना पैसे दिले असते तर तेव्हाच मामला सुटला असता.


Abhijeet25
Thursday, January 31, 2008 - 12:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी,
आम्हाल केस नाहि मिटवता आली कारण ते केस मिटवायला तयार नाहि. तु पत्रकार आहेस तुला माहित असेलच कदाचीत, पुण्यात दोनच मुख्य टोळ्या आहेत गुंडांच्या. त्यातल्या दुसर्‍या टोळीचा पुर्ण पाठींबा आहे त्या भैय्या लोकांना. आमच्या वेळेस हा किस्सा फार राजकीय वळणाचा झाला होता. हि भांडणं पुढे फार वाढु शकली असती. पण आमच्या "डोक्यावर" हात असल्याने नाहि वाढली. एका आमदारने मध्यस्थी केली हे मी लिहिलेच आहे. पण त्यांनी केस मागे घ्यायला नकार दिला. ती केस त्या वेळेस मिटवली गेली नाहि कारण आमच्या मधे एक नगरसेवकाचा पुतण्या होता. बाकिचे राजकारण येथे लिहित नाहि.

यशवंत मी पण असाच एक किस्सा केला होता. ती माझी मानलेली बहिण होती. तिचा भाउ त्यावेळेस दहवीत होता. म्हणुन मग मी ती जबाबदारी खांद्यावर घेतली होती.
पण नंतर ते प्रकरण लगेच निवळले कारण तिथे गेल्यावर मला माझेच दोन शाळेतले मित्र भेटले. आता मी असा म्हणजे माझे मित्र कसे ते कळालेच असे तुम्हाला, एका दिवसात सगळं निस्तरलं परत जावं सुध्धा लागलं नाहि. चार वर्षे ती त्या काॅलेज ला होती परत एकदाही तक्रार आली नाहि.
( पुढे तिने माझ्या मित्राशीच प्रेम विवाह केला.:-))


Nandini2911
Thursday, January 31, 2008 - 1:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

यावरून मला माझ्या कॉलेजमधे झालेली राखीच्या दिवशी अशीच छेडण्यावरून झालेली मारामारी आठवली. पोलिस आल्यावर सर्वजण पळालेले. मी गेटवर होते. हवालदारने मलाच येऊन विचारलं कुठल्या साईडने पळाले.?
मी बरोब्बर विरूद्ध दिशेला बोट दाखवलं... :-)

परिणामी, तो राखीचा दिवस असल्याने मला चांगले तेरा चौदा गुंड भाऊ मिळाले. काश वो दिन valentines day होता.


Priyab
Thursday, January 31, 2008 - 3:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks Abhijeet तुमच्या post ने आज मला जरा हिम्मत दिली. मी मारामारि वगेरे काहि करणार नाहिये.. पण काल झालेला एक साधा अन्याय manager ला सांगायला घाबरत होते. तुमचे post बघितले न लगेच विचार केला एवढि साधी गोष्ट सुद्धा सांगायला घाबरते आहे मी? manager काही खावुन तर नाहि टाकणार असा विचार केला आणि जावुन manager ला सांगुन टाकले सगळे

Abhijeet25
Thursday, January 31, 2008 - 3:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिया ( ताई, मावशी ),
मला माझ्या बाबांनी एक वाक्य शिकवलेले आहे. प्रत्येक गोष्टिची किंमत असते.

मान सन्मान, आदर, सुरक्षितता, आत्मसन्मान प्रत्येक गोष्टिसाठी आपल्याला किंमत मोजावी लागणारच. आज काल लोक, गुंड ईतके माजलेत कारण आपल्या पैकी कोणाचीच हि किंमत मोजायची तयारी नसते.

अपुर्व धन्यवाद


Apurv
Thursday, January 31, 2008 - 4:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सेल्फ़ रीस्पेक्ट - आत्मसन्मान म्हणायचे का?

Divya
Thursday, January 31, 2008 - 4:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभीजीत, यशवन्त तुमचे पोस्ट वाचले...
मला अस वाटत कि मारामारी करण्याने प्र्श्न सुटत नाहीत तर चिघळतात बर्याचदा...
थोड थंड डोक्याने विचार करुन मार्ग काढता येतात अशावेळेला कारण या सगळ्याचे पुढे मुलीवर, बाईवर पण विपरीत परिणाम होउ शकतो.
असच मार खाल्लेल्या मुलाने मला acid तोंडावर फ़ेकेन म्हणुन धमकी दिली होती. काही केल नाही हि गोष्ट वेगळी पण मी किती घाबरुन राहीले होते त्या दिवसात.
जो आधीच माथेफ़िरु असतो त्याला मारुन प्रश्न सुटण्या ऐवजी जास्त चिघळु शकतो म्हणुन शान्तपणे घेणे आणि दुर्लक्ष करणे बेस्ट वे आहे.


Abhijeet25
Thursday, January 31, 2008 - 5:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिव्या ( ताई/ मावशी)

प्रश्ना चिघळू शकतो मान्य आहे. पण आपण बहुतेक ठिकाणी प्रतिकार करत नाही म्हणून यांचे फावते. मुलीशी कधी काय होवु शकते हे कोणीच सांगू शकत नाहि. पण तिच्या भावाने, किंवा कोणीतरी नातेवाईकाने याचा प्रतिकार केला तर हे बंद होईलच.

माझ्या बहिणीशी असे काहितरी झाले तर मी माझे आयुष्य उध्वस्त झाले तरी चालेल पण मी त्या मुलाला पोलीसांच्या ताब्यात न देता रस्त्यावर उभा जाळेन, ईथे लिहायचे म्हणुन लिहित नाहि. गरज पडली तर खरेच करुन दाखवेन. असे दोन चार किस्से झाले म्हणजे पुढच्या वेळेस समोरचा गुन्हा करताना थर थर कापल्याशीवाय राहणार नाहि. हजारदा विचार करेल.

तुमच्या भावना दुखवायचा विचार नाही. मला जे वाटते ते लिहिले. चुकुन जरी तुमच्या किंवा कोणाच्या भावना यातुन दुखावणार असतील तर आधीच माफी मागतो.


Divya
Thursday, January 31, 2008 - 5:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभीजीत, माझ्या भावाने किंवा कोणीही असा अविचार केलेला सुद्धा मला आवडणार नाही. आयुष्य खुप मोठ आहे, बर्याच चांगल्या गोष्टी करायला असतात. या लोकांना धडा शिकवण्यात आपली energy कशाला घालवायची.

आपण खरच शांतपणे घेतल कि समोरचाही एक दिवस शांत होतोच.
गांधीगीरी झिंदाबाद.


Abhijeet25
Thursday, January 31, 2008 - 6:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी बाकि कोणत्याही ठिकाणी सहनशीलता दाखवु शकतो पण या बाबतीत नाही.
माझीही प्रत्येक ठिकाणी गांधीगीरी असते. पण या बाबतीत नाहिच.

आणी तुम्ही म्हणल्या प्रमाणे आयुष्य बरेच मोठे आहे. बर्‍याच चांगल्या गोष्टि करायच्या असतात. माझ्या मते हे सर्वात चांगले काम आहे. तो विचार आणी तो माझ्या बहिनीचा अपमान सोबत घेउन जगन्यापेक्षा मेलेले काय वाईट???????


Chinnu
Thursday, January 31, 2008 - 6:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिजीत छान वाटलं वाचून. कुणी 'जागरूक' आहे आयाबायांच्या सुरक्षितेसाठी, ही जाणिव 'सुखद' आहे. देव तुमचे भले करो. तुमच्या परिस्थिथीतून मार्ग काढायला यश मिळो.
दिव्याचे म्हणणे पण बरोबर वाटते. दोनही गोष्टींचा समन्वय साधता आले तर छानच.


Peshawa
Friday, February 01, 2008 - 2:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रत्येक गोष्टिची किंमत असते. >>
एक्दम खरे बोललास. प्रत्येकाला ती किंमत परवडत नाही. त्यातून दुसर्या माणसासाठी इतकी किंमत द्यायला कोणि तयार होत नाही. स्वत्:c पर्यंत आले की तो प्रष्ण अस्तित्वाचा होतो मग कुठलिही किंमत द्यायला लोक मागे पुढे पहात नाहीत. बघे बघे म्हणुन हिणवणे आणि बघे आहोत असे वाटुन वाईट वाटने ह्याला फ़ारसा अर्थ नाही. कोणती लढाई लढायची हे सम्जायला हवे... आणि वेळ आली तर लढण्याची ताकत असेल इतके मत्र कटाक्षाने पहायला हवे

Anaghavn
Friday, February 01, 2008 - 6:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिजीत, सहमत. आणि दिव्याला सुध्धा.
मी पण गांधीजींची अनुयायी आहे--पण बंडखोर!!!!
गांधीगिरी आणि दादागिरी--या पैकी कुठला मार्ग कुठे आणि कधी वापरायचा हे मी माझ्या विचाराने ठरवेन. जर चुकलं तर तेही मान्य करुन पुढच्या वेळेस चुक सुधारेन. (मला वाटतं आपल्या पैकी बर्याच जणांना हेच म्हणायच असतं)
समन्वय तर साधायलाच हवा असतो. त्या क्षणी विचार केला की मी नेमकं कुठे थांबायला हवं किंवा कुठे धडा शिकवायला हवा, तर मग हा समन्वय साधला जाऊ शकेल अस वाटतं.


Abhijeet25
Friday, February 01, 2008 - 7:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गांधीगिरी म्हणजे तरी काय नेमकं? शांततेने लढा देणे. पण आपण लढा द्यायचंच विसरुन गेलोय. आपण सगळ्या गोष्टिंकडे दुर्लक्ष करतोय. गांधीगिरी करायला फार ताकद आणी सहनशीलता लागते. जी माझ्यात नाही. आणी शिवाय आपल्या लोकांची कातडी गेंड्याची आहे तुम्ही गांधीगिरी करत बसाल पण हे कधी सुधारणार नाहित.

आम्ही सुध्धा त्या भैय्या लोकांना आधी सभ्य भाषेत समजावलेच होते ना! ईथे पर्यंत गांधीगिरी ठिक आहे. पण समोरचे जर लाठ्या काठ्या घेउन येणार असतील आणी आमचे हात पाय तोडणार असतील तर ते पण चूक त्यांची असताना तर मात्र शांत बसु नये अशा मताचा मी आहे.

गांधीगिरी करुन फक्त एखाद्या मध्यमवर्गिय माणसाच्या मताचे परिवर्तन होइल पण ह्या लोकांचे कधी नाही. तुम्ही जितके शांत बसाल तितके हे लोक माजतील आणी तुमचं जगणं अवघड करतील. प्रतिकार कधि ना कधी करायलाच लागनार आहे. तो कुठल्या बाबतीत करायचा, कधी करायचा, किती करायचा हे ज्याने त्याने ठरवावे.


Anaghavn
Friday, February 01, 2008 - 8:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिजीत brevo .. गांधीगिरी करायला ताकद आणि सहन्शीलता लागते हे खरंच, पण तु जे करुन दाखवलस त्यालाही खुप हिंमत असायला लागते. तु ती दखवलीस, आणि त्याचा त्रास होउनही तुझ्या बोलण्यात कुठेही "झक मारली" असा सूर नाहीये--यालाही खुप हिंमत लागते कारण लोक बोलत असतिलच की काय मिळाल तुला? नसता ताप आला डोक्याला-- आज सकाळ पर्यंत मी असं म्हणत होते, की जर मला एखाद्या मुलाने त्रास दिला तर मी त्याला फक्त एकदाच सांगेन, नन्तर ऐकल नाही तर कानाखाली आवाज काढेन. तसं मी करेनच, पण माझ्यासमोर जर तू वर्णन केलेली मुल आली तर? त्यावेळेस मला त्या परिस्थितीचा विचार करुन दुर्लक्श्य करणच भाग आहे. कारण जर मी एकाच्या कानाखाली आवाज काढला तर पुढचा परिणाम भयानकही असु शकतो-- जो मला नकोय. मग जाउ दे ना, गेले "गा. च्या गा.त." आपण तिथून बाहेर सुरक्षित पडण महत्वाचं. भारतीय समुदायाला डोकं नसतं हे सिध्ध झालं आहेच पण ७०८० जणाचा समुदाय एकाच वेळी आपली नितीमत्ता हरवू शकतो आणि एकाच वेळी "वासनेने" बरबटुन दोन तरुणींवर झेप घेऊ शकतो!!!!! हे नवीन वर्षाच्या सुरवातीलाच सिध्ध झालं आहे.
भयाकन असलं तरी सत्य आहे, त्यांच्यापैकी एकालाही अस वाटत नाही, की कोणत्या तोंडाने मी माझ्या आईबहिणीबायको समोर जाणार आहे? काय सांगणार त्यांना? त्यांच्यात एकही "अभिजीत" असु शकत नाही--बहिणीला वाचवण्याची हिंमत ठेवणारा.


Ladtushar
Friday, February 01, 2008 - 8:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गांधीगिरी म्हणजे मार खाणे नव्हे! तर वाईट प्रवृति चा प्रतिकार करणे आपली सर्व शक्ति लावून. मारामारी करण्या पेक्षा याला जास्त हिम्मत लागते. थोड़ा विचार केला असता तर कदाचित तुम्हाला सरळ मार्ग सापडला असता. कदाचित अजूनही सापडू शकेल. गुन्हे गाराने गुन्हा केला म्हणुन आपण त्याचा प्रतिकार करण्या पेक्षा उलट गुन्हा करून प्रकरण चिघळू शकते, आणि तुमच्या बाबतीत तेच घडले आहे! "Get Well Soon Mamu" या अनुभवातुन आपण नक्कीच या पुढे योग्य मार्ग निवडाल!
सदिच्छा.

Bee
Friday, February 01, 2008 - 8:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिजीत, हे पोष्ट तू मी उघडलेल्या बीबीवरच लिहायचे असते.

वाईट वाटले वाचून की तुझ्यावर इतका मोठा प्रसंग ओढवला त्याचे. माझ्यामते तडकाफ़डकी अशी भुमिका घेतल्यापेक्षा आधी एक दोन वेळा शांतपणाने परिस्थितीशी मुकाबला करावा. नाहीच त्यातून काही निष्पन्न झाले तर कायद्याचा आधार घ्यावा पण आपणहून कायदा हातात घेऊ नये. आपल्यावर कायदा ओढवू देऊ नये. तुझ्यासोबत इतर ६ जणांचे किती नुकसान झाले. वर तुमच्या कुटुंबाचे त्यात किती हाल झाले ह्याचा विचार करवत नाही.

आता ह्यातून हळुवार बाहेर पड. परदेशात आहेस म्हणतो तेंव्हा जरा सतर्क रहा. हे केस प्रकरण शक्य तेवढ्या लवकर मिटवून टाक.


Sush
Friday, February 01, 2008 - 9:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिजीत,
हिम्मत आहे खरि तुमच्यात. great त्या बहिणिला अभिमान वाटला असेल.
पण अनघा म्हणते ते हि खरं आहे. प्रत्येकाला हे शक्य नाहि होत.


Ashusachin
Friday, February 01, 2008 - 5:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Abhijeet,
Sarva pratham tuze abhinandan! Tuzya madhe guts aahet je manlech pahijet. Aani far kami lok aastat je welela ubhe rahayche daring dakhavtat.
Mi Bee/Ladtushar/Anagha shi suddha sahmat aahe. Tu je keles te tuzya age madhe aani swabhava nusar barobarch aahe pan tyat thanda pane wichar karun kruti kelis tar tula je have te pan sadhya hoil. Jase jase tuze way wadhel tasa tu mature hoshilch. Mi pan kahi mhatara nahi :-) pan aata nidan mi thoda wichar tari karto. Ekata aastana kahi watat nahi re pan nantar responsibilities aastat. Tuzya mage jar bayko/mule aastil tar tu pan wichar karshil future madhe aase kahi kartana. He matra khare ki Lok sudharat nahit. Kahi lokanchi pravruttich aashi aaste ki " kon kay karnar aahe?" mala xyz che backing aahe.

Aata tuzya case madhe Bhayya na eka group cha support hota. Mag madhe Amdar padla. Tyat ajun eka Nagarsevakacha konitari relative hota. Aani tuzya post pramane tyala Political angle hota. Mhanje tuch wichar kar, shevati rajkiya takad jar mage aasel tar lok kahihi karayla mage pudhe bagahat nahit.
Mag rajkiya pudhari aasha goshtincha fayda ghetat. Tyanna aase barech Abhijit pahije aastat jyanchya madhe guts aastat aani je lok pudhe jaun konalahi na ghabarta situation handle karu shaktat. Tuzyasarkha Abhijit pudhe nokari la lagto, bakiche kadachit tasech corner war basun ched chad karat rahatat. Tuzya case madhe aaj tuzi family/ friends tya political leader chya favor chya pressure khali thode far tari aale aastilch na? Udya jar tyach mansachya party chya eka gunda ne tuzya friend chi ched kadhli tar
tu tyala ghari ajun marnar ka? Aani te kelywar tyache parinam tuzya aju baju chya lokanni kase bhogayche aani ka bhogayche?

Tevna aapan mulat aasha rajkiya pravrutti la virodh kela pahije. Aaj pratyek city madhe, galli madhe, pethe madhe gangs aahet. Konachya jeeva var tya aahet yacha vichar zala pahije. Aani lok jar ekatra aale tar te howoo shakel. Abhijit - Tu he karu shaktos. Tuzya madhe ti dhadadi aani leadership qualities aahet. Lok tula saath detil. Tuzya baki chya post pan mi wachlya.
Tya baddal parat lihinch.

Tanyabedekar
Friday, February 01, 2008 - 7:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आशुसचिन, अहो इथे देवनागरी मध्ये (म्हणजे मराठी मध्ये) लिहिणे एव्हडे सोपे असताना तुम्ही असे भयानक का लिहिता? तुमची काही ही पहिली पोस्ट नाहिये. प्रयत्न तर करा निदान.

Ashusachin
Friday, February 01, 2008 - 7:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Tanyabedekar
प्रयत्न केले चालु :-)

Abhijeet25
Friday, February 01, 2008 - 8:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


माफ करा पण मला नाहि पटले तुमचे म्हणने, मनापासुन सांगतोय. अहो या असल्या गोष्टित कसली आलीये गांधीगिरी? मी आज पर्यंत बाकी कोणत्याही लफड्या मधे पडलो नाही. पण अशा बाबतीत कसे शांत बसायचे? कधी ना कधी हात उचलायलाच लागणार आहे.
त्यावेळेस त्यांनी घाणेरड्या कमेंट्स केल्या कशावरुन नंतर त्यांची तिचा हात धरण्यापर्यंत मजल गेली नसती? नुसता ते एक दोन वाक्य बोलले तर आम्ही त्यांना होत्याचे नव्हते केले. उद्या ते कोणत्याही मुलीला काहि बोलताना हजारदा विचार करतील

आणी मला कधीही या गोष्टिचा पश्चाताप नाही झाला कि मी असे नव्हते करायला पाहिजे. मी फक्त काय काय घडले या तपशिल लिहिला होता.
बाकिच्या सहा मुलांचे काय ते माहित नाही. पण माझ्या वर अशा बाबतीत कितीही केसेस लागल्या तरी बेहत्तर पण मी अशा लोकांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. मी असे किस्से ऐकलेतरी तळपायाची आग मस्तकाला जाते.
आणी आम्ही त्या रात्री हालचाल केली नसती तर दुसर्‍या दिवशी त्यांच्या ऐवजी आम्ही ईस्पितळात असतो. आम्हाला विचार करायला वेळ मिळाला नाहि. जरा अवधी मिळाला असता तर मी दुसरी काही तरी हालचाल केली असती. पण आमच्याकडे एका रात्रीपेक्षा कमी वेळ होता. मला एक तर पळुन जायला लागले असते नाहितर त्यांचे बापलोक कोण हे शोधत बसावे लागले असते. पण याच्यामुळे त्यांचे अजुनच फावले असते कोणी आमचे काहि वाकडे करु शकत नाही हे त्यांच्या मनात रुजले असते. त्यांना त्यावेळेस कळाले ना कि आपल्या डोक्यावर जरी हात असला तरी चार सनकी टाळकी भेटली तर आपला जीवही जाउ शकतो.
आमचे, आमच्या घरच्यांचे हाल झाले मान्य आहे पण स्त्रियांचा सन्मान ठेवायचा असेल तर एवढी किंमत मोजावी लागणारच ना!

आणी कायद्याचा धाक काय सांगावा!!!!!!
पोलीस म्हणजे फक्त कठपुतली आहेत. कायदा फक्त गरीब लोकांसाठी आहे या देशात.

आशुसचिन,
मी माझ्या राजकिय ओळखींचा वापर केला हे खरे आहेच पण तो काहि काही चुकिचे करण्यासाठी किंवा कमजोर लोकांवर अन्याय करण्यासाठी नाही वापरला ना!

काट्यानेच काटा निघतो.

तुम्ही लिहिलेले खरे आहेच. मी फक्त ईथे लोकांनी मला चांगले म्हणावे म्हणुन, किंवा कोणाची सहानुभुती मिळावी म्हणुन लिहित नाही आहे. म्हणुन सगळे खरे लिहितो.
या बिबि चे नाव वास्तव ठेवले कारण जे वास्तव या चित्रपटा मधे दाखवीले आहे ते खरे च घडले आहे. आमच्यातले तीन जण आता त्या आमदारासाठीच काम करतात. त्यात या प्रकरणाचा संबंध असेल नसेल, पण आमच्या सारखी मुलेच या लोकांचे भांडवल असतात. आता ती मुले त्यांची वसुली, काही अडलेली प्रकरणे "मिटवणे", निवडनुकीमधे मुले पुरविणे, असली कामे करतात आणी त्या बदल्यात त्यांना सरकारी बागेचे मेनटेनंस, रस्त्याची बांधकामे अशी कंत्राटे मिळतात. मी त्यांना समजावुन समजावुन कंटळलो कि हे लोक तुम्हाला वापरत आहेत पण ते आता मागे फिरु शकत नाहि. वर मलाच म्हणतात जे तुला जमलं ते आम्हाला जमले नाहि. बाकिचे सगळे वहावत गेले.

आता तुमच्या प्रश्नाचे उत्तर कि जर पुढे मागे जर माझ्याच पार्टिच्या कोणी जर कोणाची छेड काढली तर? जर ती मुलगी/ तिचा भाउ माझ्याकडे आले तर मी नक्किच मध्यस्थि करुन प्रकरण मिटवुन टाकेन आणी तरी जर त्रास चालु राहिला तर मला बाकिचे खुप प्रकार माहित आहेतच प्रकरणे मिटवायचे!

आणी मी काही धडाडी बाज, नेतृत्व गुण वगैरे असलेला मुलगा नाही. शांतपणे आयुष्या जगणारा एक सर्वसाधारण पांढरपेशी मनुष्य आहे. समोरुन गेलो किंवा शेजारी उभा असलो तर कोणी दखल सुध्धा घेणार नाहि असा. पण माणसाला सगळ्या वाटांची माहिती असावी. न जाणो कधी गरज पडेल!

त्याच बरोबर समर्थांच्या
ओळी पण लक्षात ठेवल्यात. ठगाशी असावे ठग.

मी यात कुठे स्वता:चे समर्थन कातोय असे समजु नका कृपया. याच्यावर सुध्ध मला तुमचे सर्वांचे विचार वाचायला आवडतीलच


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators