Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 28, 2008

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » माझा वेंधळेपणा » Archive through January 28, 2008 « Previous Next »

Yogesh_damle
Thursday, January 17, 2008 - 2:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वरचा वेंधळा क्रमांक ३४१२ battery ला मराठी प्रतिशब्द शोधत होता- विद्युतघट...

घ्या!! :-)

[विशेष सू.:- ह्यांचा सीरियल नंबर निव्वळ एक अतिशयोक्ती आहे. पहिल्या पोस्टपासून मोजू नका!! :-) ]


Avikumar
Tuesday, January 22, 2008 - 1:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कालचा मोठा वेंधळेपणा... बस मधुन उतरलो आणि पाकीट गायब. साडे तीन हजार रुपये अक्कल खाती. डेबीट आणि क्रेडिट कार्ड ब्लोकींगसाठि फोनाफोनी. पान कार्ड, ड्रायव्हींग कार्ड गायब. उसगावला जायला फक्त १० दिवस राहीले आणि हा गोंधळ..........

Abhijeet25
Tuesday, January 22, 2008 - 4:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा माझ्या लहानपणीचा वेंधळेपणा. मी उस तोडता तोडता कोयता माझ्याच हातावर मारुन घेतला होता. डाव्या हाताचा अंगठ्याचे नख अर्धे तुटले होते.....

Zakasrao
Wednesday, January 23, 2008 - 5:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दामले मास्तर :-)
खरतर हा वेंधळेपणा खुप जुना आहे.
मी शाळेत होतो साधारण ६ वीला असेन तेव्हाचा. बस म्हणजे सिटिबस आणि बाकीच्या सगळ्या यश्ट्या असाच माझ्या मनात पक्का समज होता.
तर आम्ही एका गावी जात होतो. आणि आमची ST एका थांब्यावर थांबली. मग तिकडे एक तरुण मुलगा आणि तरुणी उभे होते. त्याने मला येवुन विचारले काय रे ही बस कुठे जाते?
मी त्याला तोर्‍यात आणि मनातल्या मनात त्याला येडच आहे त्याला ST आणि बस मधला फ़रक कळत नाही वाटत अस म्हणुन तोर्‍यात उत्तर दिल ही ST आहे बस नाही.


Manjud
Wednesday, January 23, 2008 - 9:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा वेंधळेपणा:
छोले करण्यासाठी काल रात्री काबूली चणे भिजत घातले आणि आज सकाळी डबा झाकणासहीत कूकरमधे ठेवून चांगल्या ७ - ८ शिट्या काढल्या. प्रेशर गेल्यावर डबा उघडून बघते तर काय, आतमध्ये गूळाच्या पोळ्यांचा लगदा..... काबूली चण्यांचा डबा समजून गूळपोळ्यांचा डबाच कूकरमधे ठेवला होता.

आणि हा इब्लिसपणा:
मग तो सगळा लगदा मिक्सरमधे घालून दूध घालून छान एकजीव केला आणि उकळला. काय स्वादिष्ट खीर झाली माहीत्ये त्याची.... खरंच टेस्टी झाली होती.


Sanghamitra
Wednesday, January 23, 2008 - 11:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्हणजे गूळपोळ्यांवरच संक्रात आली तर. सही आहे.
असा मी एकदा शाळेत जाताना नेहमीच्या डब्याऐवजी सारखा दिसणरा तुपाचा डबा नेला होता.


Dakshina
Wednesday, January 23, 2008 - 1:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंजू...
आम्हाला बोलवायचंस की खायला... पोस्ट वाचून तोंडाला पाणी सुटलं एकदम आणि भूक लागली


Abhijeet25
Thursday, January 24, 2008 - 8:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या या वेंधळेपणाची किम्मत मी आणी माझ्या कंपनीने चांगलीच मोजली आहे.

मी नवीन नवीन मुंबईत आलो तेंव्हाची गोष्ट. त्या आधी मी कधीही गिज़र वापरला नव्हता. मी मुंबईत पहिल्यांदा जिथे राहिलो मुलुंडला तिथे स्टोरेज टाईप चा गिजर होत. म्हणजे नळ बंद करायाचा मग टाकितले पाणी गरम झाल्यावर तो लाल लाईट बंद झाल्यावर नळ चालु केला कि गरम पाणी. नंतर मग कंपनीच घर मिळाले. दोन रुम पार्टनर होते. तिथे रहायला आलो शनिवारी. मग दुसर्‍या दिवशी सकाळी छान उशीर उठलो. रुम पार्टनर कुठे तरी बाहेर गेले होते. मग म्हणलं चला कपडे भिजवावे गरम पाण्यात. नेहमीप्रमाणे नळ बंद केला गिजर चालु केला. बाहेर आलो. नंतर थोड्यावेळाने म्हणलं चला पाणी तापले असेल म्हणुन आत गेलो तर आत गिज़र मधुन वाफा बाहेर येत होत्या आणी काहितरी विचित्र आवाज येत होता. काय झाले असेल असा विचार करत मी त्या गिजरच्या जवळ जाउन मान वर करुन पाहु लागलो आणी तितक्यात तो गिजर फुटला मला समोरचे काहिच दिसेना. उजवा डोळा तर उगडतच नव्हता. कसा बसा बाथरुमच्या बाहेर आलो. तो गिजर फ्लो टाईपचा होत. नळ चालु ठेवुन तो वापरायचा असतो.
मी बाहेर कुठे मेन स्विच आहे तो बंद करावा म्हणुन बाहेर आलो तर बाहेर भरपुर गर्दि. माझ्या बाथरुमच्या खिडकीच्या काचा फुटुन बाहेर सडा पडलेला. लोक मला विचारायला लागले काय झाले? मला सांगतापण येईना नक्कि काय झाले ते. कोणी तरि सिक्युरिटी वाल्यांना बोलायला धावले. गरम पाणी माझ्या अंगावर उडाल्यामुळे सगळे अंग लाल झाले होते. मी विचारायला लागलो कोणाकडे मोबाईल आहे का? कोणी तरि मला मोबाईल आणुन दिला. मला अशा प्रसंगी मदत करु शकेल असे तिथे कोणीच नव्हते मी तिथे एकदम नवीन होतो. तरि हिम्मत करुन एक मित्र जो तिथे घरच्यांसोबत रहायचा त्याला फोन केला. तो आंघोळीला गेला होता. फोन त्याच्या बाबांनी उचलला. मी त्यांना कसे बसे सांगितले काय झाले ते. ते धावत पळत आले. मी तो पर्यंत डोळे पाण्याने धु, भाजलेल्या अंगावर गार पाणी टाक असले उद्योग करत होतो. माझी अवस्था बघुन त्यांनि मला दवाखान्यात न्यायचे ठरविले. तो पर्यंत मित्र पण आला होत. त्यांनि रिक्शा बोलावुन आणली. मला रिक्शात टाकुन दवाखान्यात नेले. माझ्या उजव्या डोळ्यातली त्वचा भाजली आहे आहे असे डाॅक्टर नी सांगीतले. आणी माझा डोळा पट्टि आणी कापुस लावुन बांधुन टाकला. मग मित्राचे बाबा मला त्यांच्या घरि घेउन गेले. मी दोन दिवस त्यांच्याच घरि. त्या मित्राच्या आइने मी त्यांचा मुलगा असल्या सारखे सगळे केले. माझी फार काळजी घेतली.

दोन दिवसांनि ती पट्टी काढुन टाकल्यावर मग मी कुठे घरि आलो. मी कंपनीत फार ईश्शु केला. कि तुम्हि तो ग्य्जर कसा वापरायचा याच्या सुचना का लिहिल्या नाहित? ग्य्जर अस फुटलाच कसा त्याला सेफ्टि व्हाल्व्ह का नव्हता? कंपनी ने मला सगळा खर्च आणि माझी चार दिवसांची पगारि रजा मंजुर केली.

रजेवरुन परत आलो तर प्रत्येक रुम मधे गिजर कसा वापरायचा याच्या सुचना लावल्या होत्या. बिच्चारे एच. आर वाले.कित्ति त्रास माझ्यामुळे.


Sunidhee
Thursday, January 24, 2008 - 11:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाप रे!! नशीबाने वाचलास की.. डोळा ठीक झाला ना?

Abhijeet25
Friday, January 25, 2008 - 8:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो. अगदी व्यवस्थित आहे.

Yogesh_damle
Friday, January 25, 2008 - 9:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापरे!! अभिजीत!! एकवेळ तुझा लहानपणचा कोयत्याचा अपघात परवडला रे!! : O

हा माझा कालचा वेंधळेपणा...

एका इंटर्व्ह्यूवरून दुसर्‍या इंटरव्ह्यूला पळायचं होतं. ज्याची मुलाखत घ्यायची होती, त्याचा नंबर आॅफ़िसात वरिष्ठांकडून घेतला- नंबर लिहून घेतांना काहीतरी गडबड आहे हे जाणवत होतं.

नंबर निरखून पाहिलं तर तो माझाच होता!! :-)


Ajjuka
Friday, January 25, 2008 - 12:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

please find the attachement....... अशी मेल घाईघाईत पाठवून द्यायची, attachement करायला विसरून हा वेंधळेपणा करता का तुम्ही लोक?
आणि मग दुसरी मेल attachement जोडून. सॉरी म्हणत...
मी साधारण ५०% attachement मेल्स अश्याच पाठवते.


Dakshina
Friday, January 25, 2008 - 12:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका, अगदी, अगदी....
मी पण बर्‍याच वेळेला असं करते.


Zakki
Friday, January 25, 2008 - 5:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंबर निरखून पाहिलं तर तो माझाच होता!!
मग लगेच सांगून टाकायचे, मी मुलाखत घेतली, याला एम. डी. करून टाका!

Abhijeet25
Saturday, January 26, 2008 - 12:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एका कोणा अनोळख्या मुलीचा वेंधळेपणा.
मी मुलुंडला आर माॅल मधे गेलो होतो पिक्चर बघायला. मधे एका मित्राला निसर्गाची हाक आलि म्हणुन जेन्टस टाॅयलेट मधे गेलो. मित्र आत गेला आणि मी तिथे दरवाजासमोर एक आरसा होता त्याच्या समोर अंगावरचं नविन लेदरचे जॅकेट कसे दिसतय ते वेगवेगळ्या पोज घेउन बघत होतो. तेवढ्यात मागुन एक मुलगी आली.मी जाम टरकलो. मी घाबरुन मागे वळालो. चुकुन आम्हि लेडिज टाॅयलेट मधे आलो का बघायला. पण ते जेन्टस च होत. ती बिचारी मुलगी लगेच ओशळावाणे हसत हसत साॅरी म्हणुन निघुन गेली.

माझा मित्र आल्यावर त्याला सगळं सांगीतलं तर तो म्हणतो "चल ना यार हम भी एक बार उधर जाके साॅरी बोलके आते है"


Hkumar
Sunday, January 27, 2008 - 5:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परदेशात काही ठिकाणी toilets वर फक्त वेगळी चित्रे असतात व स्त्री-पुरूष असे काहीच लिहीलेले नसते. ते ओळखायची सवय करावी लागते. फाकलेले पाय (पुरूष) व जोडलेले पाय (स्त्री)!

Tanyabedekar
Sunday, January 27, 2008 - 10:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जपानमध्ये स्त्री पुरुष चित्रे पण नसतात बर्‍याच ठिकाणी, ते कांजी मध्ये लिहिलेले असते (जॅपनीज चित्र-लिपी). आमच्या कंपनीचे बरेच जण चुकुन लेडीज टॉयलेट मध्ये शिरत त्यामुळे क्लायंट ऑफिसमध्ये. नंतर तिथे प्रिंट आउट काढुन सरळ इंग्लिशमध्ये मेन आणि वूमेन असे चिकटवले.

Mi_anu
Monday, January 28, 2008 - 3:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जर्मनीत असताना एकदा तीन सहकार्‍यांबरोबर म्युझियम्मध्ये गेले होते. अर्थात त्यातला एक आधी एकदा त्या म्युझियमला आला असल्याने त्याला कुठून कुठे जायचे सर्व माहिती होते. एका ठिकाणी त्याच्या मागोमग जायला लागले तर बाकी दोघे मागून ओरडले. तो 'हेरेन'(पुरुष) लिहीलेल्या प्रसाधनगृहात चालला होता! चित्रे पण नव्हती हो दारांवर. फक्त हेरेन आणि दामेन हे शब्द.
इथे हडपसर च्या क्रोमा मध्ये तळमजल्यावर बायका आणि पुरुषांसाठी एकच प्रसाधन गृहाचा दरवाजा आहे आणि आत दोन वेगवेगळि स्वच्छतागृहांची दारे.मला आत दरवाज्याजवळ उभे पाहून २-३ पुरुष भयंकर ओशाळून 'सॉरी' म्हणून पुढे निघून गेले..


Urfa
Monday, January 28, 2008 - 2:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिजीत राग येणार नसेल तर एक सांगते याला वेंधळेपणा नाही निष्काळजीपणा म्हणतात तुमचं नशीब चांगल म्हणुन वाचलात.

आता हा माझा वेंधळेपणा आगदी मंजुडी स्टाईल
'कुणी' लिहायच्या आत माझा लिहून टाकते.
गेल्या शुक्रवारी संकष्टीला उकडीचे मोदक करत होते. नेहमी ते करताना आई असते ( म्हणजे माझ्या सासुबाई) नेमक्या मामेसासुला पहायला आई मुंबईत गेली.
मोदक छान वळले आणि नेमके पुढे काय करायचे तेच विसरुन गेले. शेवटी जसे आठवत गेले तसे करत गेले. म्हणजे पाणि उकळत ठेवले आणि त्याला चांगली उकळी आल्यावर एक एक मोदक त्यात सोडला...............................................
झालेल्या पदार्थाचे काहीच करता येत नाही म्हणुन बाप्पांना साखरभाताचा नैवेद्य दाखवला अन काय.


Abhijeet25
Monday, January 28, 2008 - 4:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो उर्फा यात राग कसला. आमच्या आख्ख्या घरा दाराचे या वर एक मत आहे कि मी अतिशय आळशी, निष्काळजी, गहाळ वगैरे वगैरे आहे.

मला माहित नव्हतंच तो गिजर कसा वापरायचा ते. काय होउ शकले असते ते मला चांगलेच माहित आहे. पण आता काय उपयोग. पण तिथे चांगलाच धडा शिकलो. रुम मधे कोणीहि नवीन आलं कि त्याला आधी विचारतो कि बाबा तुला हा गिजर वापरता येतो का?

आणी मी कुठेही नवीन ठिकाणी गेलो कि पहिला तिथल्या गोष्टि कशा वापरायच्या ते विचारतो. उगाच काहितरी व्हायला नको.

लोक विचार करतात कि कुठुन आला हा अडाणी. ईतके सुध्धा माहित नाहि. म्हणतात तर म्हणो बापडे. त्यांना काय माहित कोणी ओळखीचे नसलेल्या ठिकाणी अपघात झाल्यावर काय अवस्था होते ते.!!!!!


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators