Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
नातेवाईक की तर्‍हेवाईक? ...

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » नातेवाईक की तर्‍हेवाईक? « Previous Next »

Hkumar
Saturday, January 26, 2008 - 5:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'नातेवाईक' हा शब्द उcचारल्यावर बर्‍याच जणांच्या कपाळावर आठ्या पडू शकतात. प्रवासात एका बाईंनी मला 'सोयरा' व 'नातेवाईक' मधील फरक सांगीतला होता. सोय जाणतो तो सोयरा याउलट नातेवाईक हे बहुधा तर्‍हेवाईकच असतात!
नातेवाईकांची allergy व्हायचे कारण बहुधा 'अति परिचयात अवज्ञा...' हे असावे.
तर मंडळी, चला लिहूयात का आपापल्या नातेवाईकांचे तर्‍हेवाईक किस्से?
प्रशासक, शीर्षक मराठीत कराल?


Yogesh_damle
Saturday, January 26, 2008 - 12:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'काळ्यांच्या वपुंचं' (देवा, माफ़ कर!) वाक्य आहे...

"गरजेच्या वेळी फुंकरीऐवजी फूत्कार मारणारे लोक म्हणजे नातेवाईक"

-- माझ्या मामेबहिणीची मुलं माझ्याच्य वयाची आहेत. त्यामुळे मी technically मामा जरी ठरत असलो, तरी आमचं मेतकूट अगदी सख्ख्या भावंडांसारखं आहे. उलट चुलतभावाशी कधी wavelength म्हणावी तशी जुळली नाही. Animosity तर औषधालाही नाहीये- मात्र 'एकमेकांसाठी आतडं तुटण्या'सारखंही काही नाही.

माझ्या ओळखीच्या एका कुटुंबात तर दोन सख्खे भाऊ कित्येक वर्षांत एकमेकांशी बोलले नाहीयेत. त्यांच्यात कटुता नसली तरी भावंडांचं ममत्वही नाहीय.


Supermom
Saturday, January 26, 2008 - 1:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नातेवाईकांपेक्षा मित्रमंडळीच जास्त प्रेम करतात आणि निस्वार्थी भावानं वागतात असं मला तरी नेहमीच वाटत आलंय. म्हणतात ना, 'friends are the family you can choose...'
नातेवाईकांमधे दुरावे, रुसवेफ़ुगवे असण्याची बरीच कारणं असतात. काही प्रमुख कारणं खालीलप्रमाणे
१. आर्थिक परिस्थितीतील तफ़ावत.

२.एका कुटुंबाचं खूप चांगलं होणं नि एकाला काहीनाकाही अडचणी येणं.

वरील दोन्ही मधे हेवा, मत्सर ही मुख्य कारणं.

३.मी तुझं खूप केलंय तेव्हा आता तू माझंच ऐकलं पाहिजेस.

४.मालमत्तेची वाटणी समाधानकारक न होणं.

अर्थात याला काही सुखद अपवादही असतात.


Maanus
Sunday, January 27, 2008 - 12:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

no offense to anyone, but a man should not disclose his family disputes with anyone else. at least not on public forums like this.

Raviupadhye
Sunday, January 27, 2008 - 6:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नातेवाईकांमध्ये आई वडील आले का?
दुसरी एक बाब ही की नातेवाईक हा एवढा वैयक्तिक मामला आहे कि त्याचे "universalizated traits of" - "नातेवाईक s " करणे कितपत योग्य आहे? तसेच चिखल फेकी पलिकडे काय साध्य होणर आहे?
मानुस ने म्हणल्याप्रमाणे कौटुम्बिक बाबी घरातच राहिल्या तर बर्या नाही का?


Tanyabedekar
Sunday, January 27, 2008 - 10:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या मते मित्र हे आपण ठरवतो निवडतो. नातेवाइक हे आपल्याला जन्माबरोबर येतात. आता त्यांचे आणि आपले जुळावे, मैत्री व्हावी ही सक्ति का? जसे एखाद्या भावाबरोबर, बहिणीबरोबर छान सूर जुळतात तसेच एखाद्या बरोबर नाही जुळत. एखाद्या बरोबर फाटते तेव्हा बरेचदा खाजगी बाबतीत अति शिरणे हे कारण असते (आपल्या इथे अगदी आई-वडील पण मुलांच्या खाजगी जिवनात अति ढवळाढवळ करतात आणि मुले आई-वडीलांच्या).

Hkumar
Sunday, January 27, 2008 - 11:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकदा रस्त्यात एक मित्र खूप दिवसांनी भेटला. मी गप्पा मारायच्या मूडमध्ये. तर तो घड्याळाकडे बघत म्हणाला,'' हे बघ, आता पावणे अकरा झालेत आणि मला ११ ला माझ्या चुलत भावाच्या लग्नास जायचे आहे. मला पळालेच पाहिजे कारण चुलत घराण्यांचे संबंध कसे असतात ते तुला माहितीच असेल!'' आणि तो खरंच पळाला.
सुज्ञांस अधिक सांगणे न लगे!


Raviupadhye
Sunday, January 27, 2008 - 11:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

HKumar आलेल्या पोस्टांच्या चर्चेत भाग घ्यावा ही विनन्ति,"हा माझा मार्ग एकला"??????-:-)

Savyasachi
Sunday, January 27, 2008 - 7:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>माझ्या मते मित्र हे आपण ठरवतो निवडतो. नातेवाइक हे आपल्याला जन्माबरोबर येतात. आता त्यांचे आणि आपले जुळावे, मैत्री व्हावी ही सक्ति का?

मित्रा, व्याख्या अगदी बरोबर. पण सक्ती चालवून घ्यायची की नाही हे आपल्यावर असते रे.
किंबहूना, सक्ती वाटू लागली त्याक्षणीच नाते संपले.
मित्र निवडू शकतो आणि त्यांची सक्ती वाटत नाही कारण ते तोडू शकतो कधिही याची मनात जाणीव असते. नातेवाईकांना तोडू शकत नाही. पण तरीही मित्राला जशी वेळीअवेळी मदत करतो तसेच तो कितीही नावडता असला तरी नातेवाईकाला संभाळून घेतले पाहीजे. कित्येकदा असे पहातो की मित्रासाठी काहिही करेल पण नातेवाईकासाठी जराही नाही कारण तो आवडत नाही. यात कसला आहे चांगूलपणा? आत्या आपल्यासाठी नातेवाईकात मोडते पण बाबांची सख्खी बहीण असते ती. आपले तिच्याशी पटत नसले तरी बाबांचा प्रेम असेल तर आपलेही निदान अडीनडीला उपयोगी पडण्याएवढे प्रेम असावे. मग भले ती, तिची मुल तुमच्या संकटात धाऊन येत नसतील. (एक उदाहरण म्हणून आत्या.)


Manjud
Monday, January 28, 2008 - 5:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुमचे जसे नातेवईक असतात तसे तुम्ही सुद्धा कोणाचे तरी नातेवाईक असताच की..... तुमच्या सुद्धा काही सवयी / स्वभाव त्याला तर्‍हेवाईकपणाचे नमुने म्हणून मांडता येतील त्यामूळे नातेवाईक म्हणायचं की सोयरा हे ज्याचे त्याने ठरवावे......

Bee
Monday, January 28, 2008 - 7:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तर्‍हेवाईक म्हणजे नक्की काय म्हणायचे इथे तुम्हाला..

स्वानुभव असा की मित्र, दोस्त, शेजारी, अनोळखी ही लोकच नातेवाईकांपेक्षा अधिक प्रेमळ, एकोप्यानी जगणारी, हवी तेंव्हा मदत करणारी पाहिलीत. नातेवाईक फ़क्त नावालाच उरलीत..


Trish
Monday, January 28, 2008 - 12:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्र किती चांगले असले तरी ते काही वेळाने स्वताच्या आयुष्यात हरवून जातात, नातेवईक (मावस-चुलत भावंडे आणि सगे सोयारे) कसे ही असले तरी आयुष्यभर साथ सोडत नाहीत जर आपण चांगले वगालो तर आणि घरोबा टिकून ठेवला तर, आयुष्यभर टिकून राहनारे मित्र फारच कमी अगदी दुर्मिलच. तर्‍हेवाईक असले तरी शेवटी चार आसू आणि चार खांदे कोण देतील कुणास ठावुक!

Vinaydesai
Monday, January 28, 2008 - 2:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'मित्र हे तुम्ही निवडलेले नातेवाईक असतात...'Zakki
Monday, January 28, 2008 - 3:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण त्यांना नातेवाईक म्हंटले तर तेहि तर्‍हेवाईक होतील ना!

तसेहि काही मित्र आधीच तर्‍हेवाईक आहेत.


Manuswini
Monday, January 28, 2008 - 6:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्कीकाका, कुठल्या तर्‍हेवाईक 'मित्रा'बद्दल बोलता आहात तुम्ही. :-)

खरे तर ह्या टोपिक वर बोलणे नी लिहिणे पण त्रासच आहे.
उगीच फुकटची चर्चा असे माझे मत आहे.

दुनियेत काय हजार लोक भेटतात अनेक 'रूपात'. काही चांगले,काही वाईट. फक्त त्यातले 'नातेवाईक' आहेत म्हणून दुख होते नी उगीच बोंबाबोंब. नातेवाईकांपेक्षाही हळुवार जपलेल्या मैत्रीने सुद्धा दुख होतेच मग काय करणार.

why cant we accept it this way and keep expectations low from people, it is less heartning in my opinion. over the time for whatsoever reasons/experiences(from friends/relatives), i have slowly accepted it
Anaghavn
Tuesday, January 29, 2008 - 5:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनु पटलं, नातेवाईक आहेत त्यामुळे जास्त बोंबाबोंब होते. त्या शब्दा मागेच खुप अपेक्षांचं वलय आहे. आपण जर या वलया पासुन दूर रहु शकतो तर निदान आपण कोणाकडुन अपेक्षा ठेवणार नाही आणि त्या अपेक्षा भंगा पासुन दूर पाहु शकूत.

Hkumar
Monday, February 04, 2008 - 5:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या विषयावर १०० वर्षांपूर्वी आॅस्कर वाईल्ड यांनी लिहीलेली २ वाक्ये मननीय आहेत्:
१) God gives us relatives, thank God we can choose our friends.
२) नातेवाईक हा एक कंटाळवाणा प्रकार आहे. कसं जगावं व केंव्हा मरावे याची त्यांना कल्पनाच नसते!
( माझ्या नातेवाईकांनो, माफ़ करा, मी असे म्हणत नाहीये, आॅ. म्हणालेत!)
क्रमशः


Hkumar
Monday, February 04, 2008 - 5:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वरच्या पोस्टमधील दुसरे वाक्य हे धक्कातंत्र प्रकारातील आहे. तरीही आॅस्कर यांच्या या दोन्ही वाक्यांमध्ये या विषयाचा सार आल्याने याबरोबरच या बीबीचा समारोप करायला हरकत नाही.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७


 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators