Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Daycare and/or Preschool

Hitguj » My Experience » Daycare and/or Preschool « Previous Next »

Sas
Monday, January 21, 2008 - 6:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Preschool and Extended Daycare मध्ये 'Homework Assistance Teacher' म्हणुन job लागुन आता १० दिवस झाले, ह्या १० दिवसात Preschool and Extended Daycare बाबत मला आलेले अनुभव इथे लिहित आहे, (माझा Job जरी दुपारी २:४५ ते ५:४५ असला तरी, मी हे दहा दिवस काही तास अगोदरच कामावर गेले as I wanted to know more about working of Preschool & Daycare)

सकाळी ६:३० ला उघडणार्‍या Daycare मध्ये ७:३० पासुन बाल-गोपाल-गोपीका येवु लागतात व कुणी काहीतास, कुणी 1/2 Day, कुणी दिवस भर (upto 6 or 6:30 Pm) तिथे, असतात.

सकाळी लवकर येणार्‍या लहानग्यांची झोप ही पुर्ण झालेली नसते पण पालकांना 'नोकरी' ला जायच असत त्यामुळे, लहान लहान जिवांना आपली झोपमोड कराविच लागते, मग Daycare मध्ये Schedule प्रमाने अमुक वेळेला Snack तमुक वेळेला Calender Time, Play Time, Lunch Time, Wash Hand Time.... सार कराव लागत. Daycare थोडच घर असत की शिस्ती सोबतच, जिथे मोकळेपणा, थोडासा मनमानी पणा, लडिवाळपणा, हट्ट हे सार असत-चालत.

ठरलेल्या वेळेवर लहनग्यांना Snack, Lunch मिळत त्यात Daycare च्या Menu Schedule प्रमाणे जे असेल ते बनवुन Serve केल जात मग पोट भरुन खा वा नका खाऊ ही काळजी कोणाची? भरवायला 'आई' नसते, मुल खात असतांना त्यावर आईची प्रेमळ नजर नसते, 'अजुन थोड खा बाळा' हा जिव्हाळ्याचा आग्रह नसतो.

खाण्यापुर्वी मुलाने हात धुतले की नाही ह्या बाबत चा कटाक्षपणा घरी असतो, Daycare मध्ये Wash Hands Time असला तरी, खाण्याच येई पर्यंत हात खराब होतात, मुल हात धुवुन येतात रांगेत इतर मुलांना हात लावतात, कधी खाली बसतात Carpet ला हात लावतात, कधी बुटांना हात लावतात,.....

पाणी पीण्याच प्रमाणही ह्या मुलांच फारच कमी असत. In my organization morning Snacks and Lunch नंतर Milk or Water देतात, Milk पिल्यावर मुल पाणी पित नाही. Afternoon Snacks सोबत Juice देतात मग तेव्हाही पाणी नाही. काही पालक Water Bag देतात पण 'पाणी पी' सांगणार कोण असत?

Play TIme मुलांचा आवडता Time, विशेषता जेव्हा बाहेर Play Ground मध्ये नेतात तेव्हा.

Song, Countings, Numbers, Colors.... activities मध्ये ही मुल रमतात पण हे सार ३-४ तासाच काम.

Nap च्या २-अडिच तासात काही मुल झोपतात, काही ईकडे तिकडे बघत रहातात, काहिंचा बंडपणा सुरुच असतो, काही 'कंटाळात' असतात.

एकंदरित निदान किंडर-गार्डन age पर्यंत ३-४ तास काय ते मुलांना बाहेर Daycare/Preschool मध्ये ठेवण योग्य वाट्त त्याहुन जास्त वेळ नाही.

आईचा सहवास, मुलांची मानसिकता, घडण ह्या साठी खुप गरजेचा वटतो. रोज एकदा तरी मन भरुन येत माझ, Scheduled Routine मध्ये गुंतलेले हे निरागस जिव पाहुन.

Daycare/Preschool यांच Schedule मुलांसाठी काय गरजेच, चांगल आणी मुलांच्या आवडी हे लक्षात ठेवुन आखलेल असल तरी त्यात मुलाला काय करायचय ते नसत त्याने काय करायच असत ते असत.

(Please Note: These are all my Opinions based on my experience in Preschool and Daycare where I am working.)

(Sorry! for any Spelling or Grammatical mistake/s :-))


Sas
Monday, January 21, 2008 - 7:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

1st Day in Daycare

1st day in Daycare, is very hard for child, specially for ages 2-3, जर प्रथमच तुम्ही तुमच्या लाडक्या-लाडकीला Daycare मध्ये enroll करत असाल तर निदान पहीले काही दिवस (३-४) दिवस पालकांनी मुलांना घेण्यास लवकर याव, जमत असल्यास सुरवातिला १/२ दिवस वा काही तासच मुलाला Daycare मध्ये ठेवाव, मुल Daycare मध्ये रुळल की मग काही problme नसतो सहसा, पण एखाद्या वेळी बरेच महिन्यांन पासुन Daycare मध्ये येणारी मुल (even big kids of age 5-7) ही पालक Daycare मध्ये सोडुन जातात तेव्हा खुप रडतात.

आमच्या Organization मध्ये मागच्या आठवड्यात एक नविन मुलगा age 2-3 enroll झाला, हा लहान मुलगा पहिले ४ दिवस सकाळी आल्यापासुन ९:३०-१०:०० ते संध्याकाळी आई घ्यायला येईपर्यंत (५:३०-६:०० पर्यंत) रडत होता, पहिल्या दिवशी तर रडता रडता त्यला ओकारी झाली.

Daycare मध्ये त्याला Teacher ने जवळ घेतल, खेळणी, गाण, खाऊ सार सार करुन पाहील पण काहीच उपयोग नाही. खातांना, पाणी पितांना हि त्याच रडण सुरु होत, सार्‍या classes च्या Teachers नी प्रयत्न केले पण काहीच उपयोग नाही , (त्याच्या आईला ही फोन केले, but she could not come early from job)

संध्याकाळी जेव्हा त्याची आई त्याला घ्यायला आली तेव्हा काय तो शांत झाला.

शुक्रवारी तो शांत होता, पण आता परत दोन दिवस (Weekend)घरी राहिल्याने कदाचित आज परत तो Daycare मध्ये रडत असावा. (Daycare/Preschool मध्ये रुळलेल्या मुलांनाही Monday ला Daycare/Preschool routine मध्ये adjust व्हायला काही वेळा problem होतो.

सुरवातिला काही दिवस जमत असल्यास पालकांनी:-

1. Lunch Break मध्ये मुलांना भेटण्यास याव.

2. १-२ तास आपल्या पाल्या सोबत Daycare मध्ये रहाव, त्याची/तीची Teachers शी, इतर बाल-गोपालांशी ओळख़ करुन द्यावी, पाल्याला Daycare बद्द्ल माहीती करुन द्यावी (Teachers हे करतातच पण, it takes bit time, पालक पालक असतात :-)

जमल्यास आईच्या/बाबाच्या Office जवळच्या Daycare मध्येच छकुला-छकुलीला enroll कराव, म्हणजे कधि कधि Lunch Break मध्ये मुलाला भेण्यास जात येत.(बरेच पालक अस करतात, पण काही पालक कमी Fee वाल Daycare Prefer करतात.:-()

My personal suggestion for parents is, once in a while or in 10-15 days give 'Sudden Visit' to Daycare/Preschool of your kid and see how he/she is doing there, how other things are going on in Daycare/Preschool.

In USA due to strict Laws nothing wrong or improper happens with your Kid in Ddaycare or Preschool but, 'How your Kid is doing???' is essential for you to know for that sudden visit to DC/PS is really a good idea :-)Antara
Monday, January 21, 2008 - 8:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुरवातिला काही दिवस जमत असल्यास पालकांनी:-

1. Lunch Break मध्ये मुलांना भेटण्यास याव.

2. १-२ तास आपल्या पाल्या सोबत Daycare मध्ये रहाव>>>>>>> Sas ,मुलांना school/daycare ची सवय होणे आणि एकंदर पटकन रुळावे म्हणून हे वरचे तुम्ही जे लिहिलेय ते मुळीच करू नये असे schools च सुचवतात. good bye hugs करून चटकन जावे नाहीतर मुले उलट जास्त रडतात, रुळायला जास्त वेळ घेतात.
बाकी तुम्हाला काही positive दिसलेच नाही का या स्कूल मधे? तुम्ही डे केअर मधे काम करत असलात तरी मला असे वाटते की अजून तुम्हाला नीटशी माहिती झाली नसावी. तुम्ही काम करता ते स्कूल कसे आहे हे मला माहित नाही पण तिथे तुम्हाला काही +ve दिसले नाही याचे आश्चर्य वाटले. एखाद्या तुरुंगासरखे वरचे वर्णन वाटले!माझ्या मुलाला तर खूप आवडायचे त्याची प्रिस्कूल.उलट घरच्यापेक्षा तिथे चान मित्र मंडळ मिळते, गाणी, खेळ सगळ्या activities असतात. Calender Time, Play Time, Lunch Time, Wash Hand Time.... ? हे जे तुम्ही म्हणता ते उलट njoy करतात अन शिस्त पण शिकतात. शाळा आवडली की रमतात मुले मग. अर्थात स्कूल, तिथली व्यवस्था नीट आहे का ते मात्र बघावच.


Sas
Monday, January 21, 2008 - 8:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hi Antara

Though my organization is Preschool and Extended Daycare but I m working as 'Afterschool' Homework Assistance Teacher so not into Daycare, मला Daycare बद्द्ल जे वाटल ते मी Share केल/करतेय. अजुन पुढच लिखाण Type करत आहे, will post it soon :-)

शाळा आवडलीकी रमतात मुल हे खर आहे पण, मी वर लिहिल्या प्रमाणे ...Play Time मुलांचा आवडता Time, विशेषता जेव्हा बाहेर Play Ground मध्ये नेतात तेव्हा. ...Song, Countings, Numbers, Colors.... activities मध्ये ही मुल रमतात पण हे सार ३-४ तासाच काम. दिवस भर काही ह्या Activities होत नाहीत.

मला ही DC मध्ये मुल खुश असतात, इथे त्यांना Friends मिळातात, शिस्त लागते अस वाटायच आणी अजुनही वाटत and it is true but only for few hrs. not for entire day (8 hrs)

बर्‍याच पालकांना DC/PS च्या ह्या Positive गोष्टी माहित असतात, तेव्हा आधी त्याच परत repeat न करता मी नाण्याच्या दुसर्‍या बाजुन सुरवात केली as I though this is what I should share 1st :-)

(DC/PS बद्द्ल कुणाला घाबरविण्याचा वै. माझा हेतु अजिबात नाही, मी एका 'मैत्रिणी' प्रमाणे हे share करतेय)

Sas
Monday, January 21, 2008 - 9:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुरवातिला काही दिवस जमत असल्यास पालकांनी:-

1. Lunch Break मध्ये मुलांना भेटण्यास याव.
2. १-२ तास आपल्या पाल्या सोबत Daycare मध्ये रहाव

हे मी एक-दोन पालकांच बघुनच सुचवलय, पालक मुलाला घ्यायला येतात तेव्हा जर १-२ तास मुलासोबत तिथे राहिले तर मुलाला रुळण्यास खुप मदत होते. एक अमेरिकन आई, मुलिला घ्यायला येते व रोज निदान १/२-१ तास DC मध्ये असते, मुलिला आज इथे काय केल, कोणते Friends बनविले सार विचारते, इतर मुलांशी, Teachers शी बोलते व मुलिला 'tell your teacher wht u told me at home' अस सांगते ज्याने मुलगी Treacher शी पटकन mix झाली.अजुन एक पंजाबी आई मुलाला घ्यायला येते तेव्हा काही वेळ DC मध्ये थांबते. तस इतरही बरेच पालक आले की लगेच न निघता काही वेळ DC त थांबतात.

मुल खुप रडल्याने त्याला धाप लागु शकते, घसा बसतो, उलटी होवु शकते अश्यावेळी Lunch Break मध्ये येवुन मुलाला पालक भेटले तर मुलाला पालक कुठे गेले, ही भिति न रहाता, मला घ्यायला आई/बाबा येणार ही खात्री पटते.

----
आमच्या DC मध्ये एक मुलगी (शाळेतुन) Lunch Time च्या वेळेस येते,पण ती कधिच Lunch खात नाही, रोजच टेबलवर "I dont want anything" म्हणते, पण तिच्या पुढे Plate ठेवली जाते व निदान चमचा भर काहीतरी तिला वाढण्यात येत, as it is Licensing Rule.(Child on table with plate and some food)

As per DC Licensing Rules तुम्हाला , तुमच्या पाल्याला सुचना देण्यात येतात, काही Formalities करण्यात येतात.

Good bye hug करुन जा हे जरी सांगतात तरी 'कीही' पाल्यांसाठी Lunch Break मध्ये पालक (जमत असल्यास) आले तर ते चांगल ठरु शकत as every child has diffrent mind set

(Lunch Break is of Parents, NOT DC Lunch Break for Kids)
Vinaydesai
Tuesday, January 22, 2008 - 3:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्यक्ती तितक्या प्रकृती हेच खरं....

DC मध्ये जाताना पहिल्या दिवसापासून हसत हसत जाणार्‍या मुलांपासून, दोन वर्षं जाऊनही रोज पहिला अर्धा तास रडणारा मुलगा ही मला माहीत आहे. आणि वर अभिमानाने 'मी रोज रडतो' असंही सांगतो. हा मुलगा अतिशय हुशार आहे, शाळेतल्या सगळ्या Activity, enjoy करतो, Teacher खूश असते, पण पहिला अर्धा तास रोज... रडतो... :-)Chinnu
Wednesday, January 23, 2008 - 1:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सास, माझं निरिक्षण म्हणजे DC मधील मुलं इतर मुलांच्या वाईट सवयी लवकर उचलतात. त्याला काही इलाज आहे का?
पालकांनी थोडा वेळ घालवून मुलाला आश्वासन द्यावे हे बरोबरच आहे. पण तसा वेळ घालवूनही मुलं फ़ारशी बदलत नाही असे मला वाटते. तसाही पालकांकडे वेळ नसतोच हल्ली.


Shonoo
Wednesday, January 23, 2008 - 1:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिनू

माझंही ऐकीव मत तसंच होतं. पण आताशा असं वाटतं की आपल्या मुलांच्या काही वाईट सवयी ध्यानात आल्या की पालक अगोदर ती सवय कुठून शिकली असेल असा विचार करतात. या करता डे केअरलाचा जायला पाहिजे असं नाही. इतर कुठल्याही interaction मधे मुलं काही ना काही शिकत असतातच. इतरांचं बघून शिकलेले चांगले गुण तितकेसे लक्षात रहात नाहीत. पण वाईट गुण मात्र बरेच बोचत रहातात अन त्यांची चर्चा पण होते. डे केअर मधून मुलं जे जे शिकतात त्यात चांगल्या अन वाईट सवयी दोन्ही असणारच! डे केअर मधे न जाणार्‍या मुलांना सुद्धा काही ना काही वाईट ( त्यांच्या पालकांच्या दृष्टीने नसतील कदाचित ) सवयी असणारच.

आपल्या मुलांच्या वागणूकीबद्दल पालक जागरूक असतील तर वाईट सवयींचा बंदोबस्त करायचा प्रयत्न असतो. नाहीतर डे केअर वर, इतर मुलांवर ( जावेची, नणंदेची, नवर्‍याच्या नावडत्या मित्रांची मुलं) दोष ढकलणे हा सोप्पा उपाय आहेच!


Chinnu
Wednesday, January 23, 2008 - 5:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोनू, :-) मी दोष ढकलण्याबद्दल विचारत नाहिये गं, काही इलाज आहे का असं विचारत होते. सास म्हणते तसं पालकांनी थोडा वेळ देणे हा एक चांगला उपाय आहे.

Sas
Wednesday, January 23, 2008 - 9:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिनु

मी ही नेमक ह्याच गोष्टीचा विचार करत होते, मला वाट्त पालकांनी काही वेळा, काही बबतित जरा 'कडक'रहायला हव, काल 3-4 age class मधला एक मुलगा, इतर मुलांच्या अंगावर 'थुंकत' होता (हे त्याने Daycare/PS मध्ये शिकलेल नाही, पण त्याच बघुन इतर काही मुल शिकत होती), त्याच्या आईला Teacher ने सांगितल्यावर ती मुलाला रगवली वै. नाही पण "If he will cotiunue doing this then I will cancel his B'day party in School n Temple" अस त्याच्या समोर Teacher ला म्हणाली, मुलगा लगेच No ओरडला, मग आईने त्याला अस करणार नाही ना हे त्याच्या कडुन कबलवुन घेतल.

ह्या प्रकारच्या Strategyies, work कराव्याय, पण काही वेळा मुलांना नुसत अस बोलुन काम होत नाही, खरोखरच पालकांनी, Teacher नि ते करायला हव.

----------

मी Kingergarten-5th grade च्या मुलांना Homework Help करते, मला Job च्या १ल्या दिवशीच मला एका 2-Grd मध्यल्या मुलिबद्द्ल Director ने सांगितल 'She is trouble'. ह्या मुलिच्या सवयी: Homework करायला सुरवात केलि रे केली कि हिला झोप येते, तिच्या साठी प्रश्न, वाक्य Teacher ने वाचावी अशी तिची इच्छा असते, Guessing करुन ती Right or Wrong, Correct or Misspelled etc प्रश्नांची उत्तर लिहिते (वाक्य, Spelling न वाचता), या बरोबरच इकडे बघ तिकडे बघ, गप्पा मार हे ही तिच सुरु असत, मला तिला एक गोष्ट निदान ४-५ वेळा सांगावी लागते (बोलु नको, वाच, लिही...) व नंतरही सारखी repeat करावी लागते, तिच्या अती slow speed मुळे तिचा homework, complete होत नाही.

गेले दहा दिवस मी हे सार सहन केल I assist 8-10 kid at time त्यात हे असे १-२ नमुने असल की झाल.

काल मला Director ने ह्या मुलांना वाटायला Candy दिली, मी candy लगेच न वाटता,"I will give it to those who will finish their HW and who will behave," हे सांगितल, त्यामुळे वर्गात जरा शांतता होती :-), पण ह्या मुलिने मात्र तिला Candy हवी होती तरी आपले प्रकार सुरुच ठेवले, तिची आई आल्यावर मी तिला सांगितल व Candy दिली नाही. (आपण घरी जावु तेव्हा आपल्याला Candy मिळेलच असा तिचा भ्रम होता) तिच्या आईला मी "I will give it to her when she will finish HW properly" सांगितल, आई काय बोलणार (आई, आत आली तेव्हा ही मी मुलिला "Why are u taking so long time dont u want to play...." बोलत होते, आणी ही सोडुन बाकी सारी मुल खेळात होती). दुसरीतली हि मुलगी तिच्या कडे CELL Phone आहे.(Why she will not behave extra 'Smart' if her parents making her Smart)

पालकांच मुलां पुढे आचरण ही खुप महत्वाच असत, मुल पालकांच अनुकरण करतात व पालकांपासुनही काही वाईट सवयी त्यांना मिळातात.

दुसर्‍या एका मुलिला इतर मुला, मुलिंना "पप्पी" करण्याची काहीवेळा Hug करण्याची सवय आहे, ती Kinder. मध्ये आहे. मुलांना तिच अस करण आवडत नाही पन 4th, 5th Grd च्या मुलांना (Boys) तस काही गोष्टींच कुतुहल असत अश्यात मुलगीच जर काही करत असेल तर काय (They can try kissing, we never know)

ही मुलगी इतर मुलिंना Pencile ने 'Girl-Boy Wedding खेळु म्हणते, लग्न वै. लावण्या पर्यंत आणी इथल्या tradition प्रमाणे Kiss your .. पर्यंत ठिक आहे पण त्या पुढच माहीत असण हयाचा Source mostly पालक, घर. (She is in Kindergarten)


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७


 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators