Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 07, 2008

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट - अचाट आणि अतर्क्य » अचाट सीन आणि अतर्क्य लॉजिक » Archive through January 07, 2008 « Previous Next »

Dineshvs
Friday, December 14, 2007 - 1:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तो वाघाचा सीन इथे नोंदवला गेला होता. वाघाच्या तोंडी, आती रहना माँजी, असा डायलॉगपण घातला होता, ( सिनेमात नाही, इथे )
या निरुपा रॉयचे मूळ नाव कोकिला ( बेन ) मेहता. त्याकाळात कुणी सिनेमा नट्याना घर देत नसत, म्हणुन तिने खरे नाव लपवले. आणि ती ज्या घरात रहात असे, त्या घरावर निरुपा रॉय असे नाव होते, म्हणुन तिला हे नाव पडले.
पण एकेकाळी सगळ्याच सिनेमात ती असायची, ऐतिहासिक पण आणि पौराणिक पण.
रझिया सुलतान, राणी रुपमति सगळ्याच तिने साकारल्या होत्या.



Kedar123
Saturday, December 15, 2007 - 8:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्यात हेमा च्या आसपास जर काळा कुत्रा दिसत असेल तर तो नास्तीकच.

कोण बर तो धर्मेन्द्राला कूत्रा म्हणतय? सगळे कूत्रे संम्पावर जातील.

कुत्ते मै तेरा खून (गटागट) पी जाउंगा. बाकी बचेगा वो बाटली मे भर्के लेके जाउंगा. शाम को कोक्टेल के लीये काम आयेगा.


Kedar123
Saturday, December 15, 2007 - 9:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक विनोदी सिनेमा पाहीलेला आठवतोय गदर एक प्रेमकथा (सनी भाव देवळ)

क्लायमक्स चा शीन्-

सनी भाव आगगाडी चालवतायत वरुन हेलीकॉप्टरी उडतायत पाकी फौजांची. गोळ्यांचा भडीमार चाललाय सनी भाऊंवर. एकही गोळी त्यांना लागायची हिम्मत करत करत नाही. चूकून एक लागते ती साइड हीरो ला ( साईड हीरो म्हन्जी हीरो च्या साईड ला उभा असतो तो साईड हीरो)

मग सनीभाऊ चमत्कार करतात हळूच चाकू का तलवार काहीस फेकून मारतात हेलीकॉप्टर वाल्याला. लागतो त्याला तो चाकू (न लागून काय करेल बापड गाठ ढाई कीलो हातवाल्याशी हाय म्हटल)



Aashu29
Saturday, December 15, 2007 - 9:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुत्ते मै तेरा खून (गटागट) पी जाउंगा. बाकी बचेगा वो बाटली मे भर्के लेके जाउंगा. शाम को कोक्टेल के लीये काम आयेगा.
>>>>>>>>>>>>hihi kaay bhannat lihilayas!!

Ankyno1
Wednesday, December 19, 2007 - 7:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रियदर्शन च्या चुप चुप के मधे

करीना पाच सात पोरा पोरीन्च्या समोर सिन्थेसाइजर वाजवत असते आणि पोरं नाचत असतात...

शाहीद त्याच ट्युन वर गायला लागतो (शीघ्र कवी)
त्याचा आवाज ऐकून करीना आणि नेहा धुपिया कोण गातय हे शोधायला निघतात....

निष्कर्श...
१. करीना आणि नेहा सोडून घरातील इतर सर्व लोक हे ठार बहिरे आहेत... आणि म्हणूनच त्यान्ना शाहीद चं गाणं ऐकू येत नाही
२. बाकी लोक मुडद्याप्रमाणे झोपतात... (चोरन्ना सुसंधी)
३. लहान मुलान्ना रात्री बेरात्री नाचायला परवानगी आहे पण खोलीबाहेर बघायलाही मनाई


Zakasrao
Wednesday, December 19, 2007 - 11:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदारा कॉकटेल
सिनेमा नागीन. नाग मरतोय. त्याला गोळी लागली आहे. तो सीन पाहताना आलेला माझ्या मनातील विचार. :-)
खरतर त्या सोनी वाल्यावर केस केली पाहिजेल.
म्हणे पहिला डिजिटल कॅमेरा त्यानी बनवला. आणि आता नाइट मोड कॅमेर्‍यात त्यानीच आणलाय. ज्यात पुर्न अंधारात Infrared rays वापरुन ब्लॅक व्हाइट फ़ोटो येतात.
खरतर आपल्या भारतातील टेक्नॉलॉजी फ़ार पुढे आहे.
बघा नागिन सिनेमा.
त्या नागाच्या डोळ्यात नुसताच कॅमेरा नाहिये. तर डिजिटल कॅमेरा विथ हाय झूम. कारण त्याला लांबवर असलेल्या माणसे नीट दिसतात. शिवाय पुर्ण दिसत नाहीत तर त्यांचे फ़क्त चेहरे. म्हणजेच पोट्रेट मोड.
बर पुर्ण अंधार्‍या रात्री सुद्धा कलर दिसत सगळ. ग्रेट. (नायतर सोनी वाले. अजुन ब्लॅक व्हाइट वरच आहेत)
आणि हो त्यापेक्षाही जास्त महत्वाच म्हणजे त्याकाळी तो आपल्या डोळ्यायुक्त कॅमेर्‍याने काढलेले फ़ोटॉ blue tooth वापरुन त्या नागिणीच्या डोळ्यात पाठवतो्आये का नै कमाल. :-)


Psg
Wednesday, December 19, 2007 - 11:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हीही गूडवन झकास.. आपण कसले कायच्याकाय पुढारलेले आहोत नै?

Zakasrao
Wednesday, December 19, 2007 - 4:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो ना पुनम. :-)
आता एखाद्या वेळी तो रुद्राक्ष लागेल तो पाहिन मी आणि लिहिन इथे.
आज हिम्मत होता सनी भाउचा चुकला की :-(


Nandini2911
Thursday, December 20, 2007 - 10:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://kapoorekta.blogspot.com/search/label/ekta%20kapoor%20discovery%20from%20gujrat%20prachi%20desai%20Aks%20Bani
इतका अचाट ब्लॉग आहे हा..

Farend
Friday, December 21, 2007 - 1:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सही आहे. मध्यंतरी गुलमोहर वर कोणीतरी अशीच एक " fake " सिरीयल लिहीली होती ना? जाम सापडत नाही. कोणाला लिंक माहीत आहे का?

Farend
Friday, December 21, 2007 - 2:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बहुधा ती लिंक
ही आहे, या लिंकवर धमाल वर्णने आहेत अशा सिरीयल्स ची. आणि त्याच्या पुढच्या महिन्यातही.

Nilima_v
Friday, December 21, 2007 - 6:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्या सिनेमा चे नाव मला आठवत नाही, पण shot लक्शात आहे. ह्यात मिथुनची बहीण आणि आई घराच्या खालती उभे राहून बोलत असतात.
तेवढ्यात मिथुन गच्चीवरुन उडी मारतो. (हा shot ३ दा in 3 angles) . आई, बहीण दचकतात यावर याचे उत्तर "यु ही मजाक कर रहा था".
८०'ज मधला सिनेमा आहे. कोणाला आठवतो का?


Lopamudraa
Friday, December 21, 2007 - 6:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तर डिजिटल कॅमेरा विथ हाय झूम. कारण त्याला लांबवर असलेल्या माणसे नीट दिसतात. शिवाय पुर्ण दिसत >>>>. jhakaass

Shraddhak
Monday, December 24, 2007 - 6:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शुक्रवारी घरी राहावं लागलं काम असल्यामुळे. टीव्ही लावला आणि अपेक्षाभंग झाला नाही.
मॅडम एक्स, मां तुझे सलाम असले सिनेमे सुरु होते.
मॅडम एक्स अचाट नि अतर्क्य चा कळस म्हणता येईल असा....
रेखाचा डबलरोल. एक दुष्ट आणि एक सज्जन रेखा.
त्यात ती दुष्ट रेखा सारखी काहीतरी शेरोशायरी करून शेवटी,
" हम है मौत की वो एक्सप्रेस
दुनिया जिसे कहती है मॅडम एक्स "
असलं पालुपद म्हणत असते.
अन व्हिलन रंगवण्याच्या नादात ती उगीचच घोगर्‍या आवाजात बोलत असते, तेही एक त्रासदायक. ( गले की खराश के लिये कुछ लेती क्यूं नही? असं कुणीच विचारत का नाही तिला?:-P) हिरो जो कुणी आहे तो तद्दन ठोकळा. त्याचं नावही मला माहीत नव्हतं ( सिनेमाचा एवढा दांडगा अभ्यास असताना!) म्हणजे तो किती पडेल आहे ते कळावे. अख्खा सिनेमाच अचाट नि अतर्क्य.

मां तुझे सलाम.... सनी देवलचा सिनेमा म्हणजे अचाट नि अतर्क्य ची लयलूटच. त्यामध्ये तब्बू हीदेखील आर्मी ऑफिसर दाखवलीये पण त्या ' ओय रांझणा ' गाण्यात मात्र एकदम रिव्हिलिंग कपडे घालून नाच.... सैनिकी प्रशिक्षणात हेही अंतर्भूत असतं की काय?

त्यात तो अरबाज खान ' अलबक्ष ' नावाचा कुणी माजी दहशतवादी दाखवलाय. मग तो नंतर सुधारतो आणि देश के लिये लढतो असं काहीतरी आहे वाटतं. तर आशीर्वाद घ्यायला तो हिंदू घरात जाऊन टिळा लावून व आरती ओवाळून घेऊनच काम सुरू करतो.

असो. मॅडम एक्स नक्की पहा लोक्स... अगदी सीडी मिळवून बघा.
:-)

Farend
Monday, December 24, 2007 - 8:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला तो मॉ तुझे सलाम पाहायचा चान्स आला होता, पण वाटले सनी च्या चढत्या क्रमाने होणार्‍या फाइटिंग पेक्षा वेगळे काही नसेल (मध्यंतरी कोणीतरी लिहिले होते की आधी घायल वगैरे मधे सनी एक दोघांना मारायचा, नंतर ५-१० लोकांना, आणि गदर वगैरे पर्यंत नुसते ओरडून ४०-५० लोकांना पळवतो :-) ). पण आता सोडला नाही पाहिजे.

Asami
Monday, December 24, 2007 - 4:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Madam X मधे मोहसीन खान आहे मला वाटते. श्र तुझा db update कर :-)

Prachee
Thursday, December 27, 2007 - 7:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

@ श्रध्दा,
मला तर हे Army वर आधारित Serials, movies बघावेसेच वाटत नाही. माझा नवरा Army त असल्याने मला काहीही फ़ालतुपणा दाखवला की खुप राग येतो. उदा. left right left ही serial त्यात तर अगदि कळस केला आहे. त्यांच्यावर Case करायला पाहिजे असे म्हणतो आम्ही.


Dakshina
Monday, January 07, 2008 - 6:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल झी सिनेमावर 'स्त्री - शक्ती च्या नावाखाली 'प्रेमग्रंथ' हा सिनेमा दाखवला... त्यात माधुरी दिक्षित आणि ओमपुरी जवळच्या ओसाड रस्त्यावरून स्वतःच्या गावाला चालत जात असतात... रस्त्यात गुंडांची गाडी त्यांना अडवते आणि ते गुंड रस्ता विचारण्याच्या बहाण्याने, त्यांना गाडीत बसण्यासाठी सांगतात. ओमपुरी नाही म्हणतो... पण ही इतकी मोठी घोडी (मधूरी दिक्षित) बॅबॅ चलो ना गाडी में चलते है... म्हणत... त्याच्या आगोदर फ़्रंट सीट वर जाऊन बसते सुद्धा... मग ते नेतात की पळवून हिला...
असं कधी कुणी करतं का? पिक्चर मधे कहीही दाखवतात...


Kedar123
Monday, January 07, 2008 - 12:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मागे एकदा जॉय मूखर्जी चा 'लव इन टोकियो' (नाव चूकले असेल तर क्षमस्व) पहायचा योग आला.

त्यामध्ये जॉय मूखर्जी आपल्या हीरवीणीला शोधायला टोकीयो ला जातो (खर तर पूतण्याला शोधायला जातो. पण ते केवळ निमीत्तमात. नाहीतर सिनेमाच नाव 'नेफ्यू इन टोकीयो' नसत का?)

कार्ट (म्हणजे जॉय मूखर्जी नाय पूतण्या) आगाऊ असत. पहील्याच भेटीत ते काकाच्या कानफटीत मारत.

आता तूम्ही म्हणाल ह्यात आर्तक्य अचाट काय ?

तर जॉय मूखर्जी चा 'कानफटीत खाण्याचा' अभिनय. कारण त्याचा कानफटी खाण्या अगोदरचा चेहेरा आणि कानफटीत मारल्या नंतर चा चेहेरा सारखाच असतो शेम टू शेम (म्हंजी तूम्ही काय दिल नाही. आम्ही काय घेतल नाही असा)


Supermom
Monday, January 07, 2008 - 10:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार...
तसेही सगळ्या हिन्दी सिनेमातले कार्टे किंवा कार्ट्या तद्दन आगाऊ असतात. म्हणजे कायम पुढील डायलॉग्स मारत असतात.
१.'भैया, भैया, तुम मेली तिचल को भाभी कब बनाओगे..? मग हिरोईनचे लाजून लाल होणे, हातात चेहरा लपवणे वगैरे...

२.पापा, अब मम्मी तो मल गयी है ना? फ़िल तुम मौसी को क्यु नही मम्मी बनाते? मौसी मौसी, तुम बनोगी न मेली मम्मी?...



चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators