Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 04, 2008

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » जुने दिवस » Archive through January 04, 2008 « Previous Next »

Sonalisl
Friday, December 28, 2007 - 6:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मलाही माहित नव्हते पुण्यात असं करतात ते. छान उपक्रम आहे.
माझ्या गावाला (ता. इंदापुर ) नवरात्रात असं करतात. देवीच्या मुर्तीची स्थापना करण्यापुर्वी तुळजापुर वरुन अशाच रितीने ज्योत आणली जाते. माझ्या चुलत भावाच्या मित्रांनी तर एकदा याचं विडीवो रेकाॅर्डींग करुन ठेवलं आहे.


Saee
Monday, December 31, 2007 - 5:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, हा सगळा 'हरीप्रिया एक्सप्रेस'चा महिमा बरं!

btw हा 'कोल्हापूर कौतुक bb ' नाही त्यामुळे वाचणार्‍याही सगळ्यांनी जुन्या दिवसांबद्दल लिहावे:-)


Sameer_ranade
Tuesday, January 01, 2008 - 5:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्यांना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! :-)..

Zakasrao
Wednesday, January 02, 2008 - 4:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सई आणि दक्षिणा छान लिहिलत. :-)
फ़ोटो छान आहे शिवाजी पुतळ्याचा.
मी लग्नानंतर अंबाबाईला जावुन घरी येताना गाडीत असलेल्या सगळ्या सासरच्या मंडळीना सांगा पाहु घोड्याच तोंड कुठे होत?? असा प्रश्न विचारुन चांगलच गोंधळुन टाकल होत :-)
अभिजित तु लिहिलेला उपक्रम ज्योत आणण्याचा कोल्हापुराअत सर्रास सगळ्याच मंडळात चालतो.
३१ डिसेंबरला रंकाळ्यावर जावुन भेळ खावुन आलो. तिकडे सगळ्याच भेळेच्या गाड्यांवर राजाभाउ अस लिहिलय :-)


Dakshina
Wednesday, January 02, 2008 - 10:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोल्हापूरच्या कॉलेजात असतानाची गम्मत आठवतेय एक, आमचा ५ जणांचा ग्रूप होता. अम्ही ४ मुली आणि २ मुलं. पण आमचा हजेरी क्र. वेगवेगळा असल्याने, प्रॅक्टीकल पण वेगवेगळं असायचं मग ते संपेपर्यंत आम्ही एकमेकांसाठी थांबत असू. एका मैत्रिणीचं प्रॅक्टीकल लांबल, आणि नेमकं त्यावेळी आमच्य ग्रूप मधल्या एका मुलाचे आईबाबा आम्हाला त्यांच्या वास्तूशांतीचं आमंत्रण देण्यासाठी आले होते, त्यामूळे आम्ही तिला शिपायाकडून निरोप पाठवला आणि बाहेरच्या रसवंतीगृहात बोलवलं ती बिचारी प्रॅक्टीकल करून आधीच वैतागली होती, आणि भुकेजलेली पण. ती जे तिथं आली टणटणत.. आणि म्हणाली, कोण हा शहाणा, मूर्ख रस देणारा......? चैतन्य चे बाबा हळूच उठले आणि म्हणाले की "मी".... पूजानं तिकडून जो पळ काढला, त्याचं नाव तेच...

Dakshina
Wednesday, January 02, 2008 - 10:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तसे खरंतर पूण्यातले सुरवातीचे दिवस पण खूप छान होते. मी नविन पूण्यात आले तेव्हा मला अजिबात करमायचं नाही. पण तेव्हापर्यंतच्या माझ्या सर्व पूणेभेटीत मी लक्ष्मी रोडला बर्‍याच वेळेला गेले होते, त्यामूळे तो रस्ता तसा मनावर ठसला होता. आणि नेमकं मी आले तेव्हा आम्ही टिळक रोडला रहात होतो, मला कायम ते दोन्ही रस्ते एकसारखेच दिसायचे. त्यामूळे कुठूनही कुठेही गेलं तरी मला असंच वाटायचं की मी लक्ष्मी रस्त्यावर आलेय.

स.प. मध्ये असताना मला कोल्हापूरच्या कॉलेजची खूप आठवण यायची, शिवाय सगळे लोक नविन होते, त्यामूळे खूप मनापासून आणि घट्ट अशी मैत्री झालीच नाही कुणाशी.... कोल्हापूरचं कॉलेज इतकं निसर्गरम्य नव्हतं, पण स.प. अतिशय सूंदर होतं.... त्यामूळे वर्गातल्या मुलींच्या बरोबर आम्ही एका कॉमन रस्त्यावर बसायचो तास चूकवून. त्याला कॉलेजातले लोक Begger's Street म्हणत.

जेव्हा मी पहील्यांदा सिंहगडाला गेले, तेव्हा सिंहगडाचा बस स्टॉप हा, सारसबागेत होता, सिंहगड रोडला जाणार्‍या almost सर्व बसेस तिकडेच लागायच्या, बस पायथ्यापर्यंतच जायची. तेव्हा, मझ्या आठवणीप्रमाणे, विठ्ठलवाडीत सुद्धा, तूरळक वस्ती होती. बसमधून जाताना प्रचंड थंडी वाजत होती, आणि पी.एम.टी मधे चक्क बसायला जागा मिळाली होती.
खूप झाडी होती, भरपूर सावली आणि स्वच्छ हवा....


Savyasachi
Thursday, January 03, 2008 - 1:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>खूप झाडी होती, भरपूर सावली आणि स्वच्छ हवा....
गहिवरून आल्याने पुढच लिहवल नाही वाटत :-)

Mpt
Thursday, January 03, 2008 - 2:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोल्हापुरला २६ january ला किन्वा शिवजयन्तिला कोळेकर टिकटी ईथे एक रिक्शा driver शिवाय कुम्पणाच्या (स्तम्भाच्या) आत सतत वर्तुळात फिरत ठेवायचे. मला लहानपणि प्रश्न पडायचा की रिक्शा कुम्पणाच्या आत नेली कशी आणी आपोआप कशि चालते? अजुनही हि प्रथा आहे का माहित नाहि

Psg
Thursday, January 03, 2008 - 7:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

LOL सव्या.. खरंच 'दाटून कंठ येतो' ते पुणं आठवलं की.. वाडे, अंगण, रस्त्यावरची तुरळक गर्दी, शांत आयुष्य..

टिळकरोडनी, सारसबागेवरून पुढे गेलं की माझी शाळा होती, तरी मला सायकलवरून शाळेत जायची परवानगी देताना आई-वडिलांना ट्रॅफ़िकची कधी भिती नाही वाटली.

आणि आता घरासमोरचा रस्ता क्रॉस करायचा तरी जीव मुठीत धरायला लागतो.. माझ्या मुलाला मी रस्त्यावरून एकटा सोडायचा विचारही नाही करू शकत :-(

ह्म्म! गेले ते दिवस :-)


Manjud
Thursday, January 03, 2008 - 11:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा, काय की गणित कळलं नाही मला......
आमचा ५ जणांचा ग्रूप होता. अम्ही ४ मुली आणि २ मुलं.

दिवे घे गं बाई......


Anaghavn
Friday, January 04, 2008 - 4:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

औ.बाद ला असतानाच्या माझ्या वेगवेगळ्या ठिकाणांच्या आठवणी आहेत. माझ्या चौथी पर्यंत आम्ही औरंगपुर्यात सरस्वति कॉलनीत रहायचो. आमच्या घराला खुप मोठा टेरेस होता.(घरमालकांची क्रुपा).
तिथे सगळ्या मैत्रिणी जमुन लंगडी,दगड का माती,विषाम्रुत,पकडापकडी,भुलाबाई---असे कितितरी खेळ खेळायचो. खुप निरागस दिवस होते ते.
एकदा मी माझ्या मैत्रिणींचा भतुकली चा खेळ आवडला म्हणुन लपवुन ठेवला.त्यानंतर आईने जे काही केलं माझं--- खरं तर मला बराच वेळ कळतच नव्हतं की मी त्यांचा खेळ घेऊन टाकला मला आवडल म्हणुन... तर काय झालं? पण आई ने मला "त्याला चोरी असं म्हणतात" आणि बरच काहि समजाऊन सांगुन माझा चांगला ब्रेन वॉश केला.पण ते संस्कार जे झाले ते झालेच, आता चुकुनही दुसर्याच्या वस्तुला न विचारता हात लावावा वाटत नाही.


Dakshina
Friday, January 04, 2008 - 8:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंजू, टायपोग्राफ़िक... मिस्टेक... झाली... आणि तसंही माझं गणित मूळातच कच्चं आहे. (दिवे घेतले).

Itgirl
Friday, January 04, 2008 - 8:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग दक्षिणा, लिही ना अजून, छानच लिहितेस :-)

Ajjuka
Friday, January 04, 2008 - 9:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सायकल चालवायला शिकणे हा एक अत्यंत निकडीचा उद्योग असायचा सुट्टीत. तुम्ही ५ वीत असाल आणि तरी सायकल येत नसेल तर तुमच्यासारखे ढ तुम्हीच आणि म्हणूनच सायकल शिकायची निकड अजून मोठी. पण दुर्दैवाने घरच्यांना ती निकड माझ्या ६वी पर्यंत वाटली नाही. मग मी सत्याग्रहच पुकारला तेव्हा सायकल शिकणे सुरू झाले. सुरू झाले म्हणजे १ दिवस झाले की पुढचा महिनाभर अंधार.. बाबांना किंवा काकाला वेळ मिळेपर्यंत.
आमच्या शुक्रवार पेठेतल्या (अकरा मारूतीची गल्ली) घराजवळ सरस्वती मंदीर (हळूच काळा उंदीर पण ऐकू आले का?) चे ग्राउंड होते. त्यल दगडी भिंत असायची. आणि दर वेळेला त्या दगडी भिंतिची डागडुजी केली की त्यात एक भगदाडही बांधून ठेवायचे. ग्राउंडवर आम्ही कधीही जाऊ शकायचो. मंडईच्या कॉर्नरवरच्या रतन सायकल मार्ट मधून तासाच्या भाड्यावर सायकल घ्यायची आणि सरस्वती मंदीरच्या ग्राउंडवर फिरवायची. सुरूवातीला कधी बाबा तर कधी काका बरोबर असायचे. मागे सीटला धरून पळत पळत. आधी नुसतं हॉपिंग मग हळूच कधीतरी सीटवर बसून बॅलन्स जमायला लागला. हे जमलं म्हणजे काय आलीच की सायकल. मग अर्थातच घरापर्यंत येऊन आईला खालूनच हाका. मला सायकल यायला लागली. तू बघ गॅलरीतून. आई तिकडे गॅलरीमधे उभी. बाबा खाली बिल्डिंगच्या दारात. मी गल्लीच्या कोपर्‍यावरून स्टार्ट घेतला. झोकात सीटवर बसले आणि वरती आईकडे बघत बघत पुढे चालवू लागले. इकडे बाबांचा आवाज आला समोर बघ म्हणून आणि तोवर समोर म्हणजे आकाश झाले होते. आईकडे बघण्याच्या नादात समोर पार्क करून ठेवलेल्या स्कूटरला धडकून मी रस्त्यावर आडवारले होते. मस्त खरचटलं होतं. पण आता लागलं म्हणलं तर आपली चूक आपल्या पदरात घातली जाणार एवढे माहित होते त्यामुळे कपडे झटकून 'कुठे काय कुठे काय!' अश्या आविर्भावात उठले आणि खालीच बसले. पाय मस्त मुरगळला होता. मग मी कशितरी घरी, सायकलचं हॅंडल वाकडं. ते सरळ करून तिचा मुक्कम तिच्या घरी, रतन सायकल मार्ट मधे. मग एकिकडे पायाला रक्तचंदनाचा लेप आणि कानाला 'समोर बघून चालवायची सायकल! कुठे वर बघत होतीस?' इत्यादी इत्यादी!
मग अजून १ वर्ष सायकल शिकणं लांबणीवर. शेवटी वर्षभराने काकानेच फतवा काढला त्यामुळे आईचाही नाएलाज झाला.
श्या यार... तेव्हाचे आईचे आधी कौतुकभरले आणि मग काळजीचे डोळे अजून दिसतायत!!


Zakasrao
Friday, January 04, 2008 - 9:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'कुठे काय कुठे काय!' अश्या आविर्भावात उठले>>>>>>>>...
अगदी अगदी :-)
दक्षिणा गणितात कच्ची?? :-)
आणि मंजु हिशेबात पक्कि :-)


Ankyno1
Friday, January 04, 2008 - 9:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका

मस्त लिहिलं आहेस... मजा आली
मजा अशासाठी.... की तुझा सायकल किस्सा ऐकून मझ्याही लहानपणच्या सायकल शिकण्याच्या आठवणी ताज्या झाल्या....

मी ही त्याच अकरा मारूती गल्लीमधे रहात असल्यामुळे मझ्या सायकल शिकण्याचा श्रीगणेशा ही रतन सायकल मार्ट पासून झाला होता... आणि तू उल्लेख केलेल्या सरस्वती मंदीर च्या ग्राऊन्ड वरच मीही सायकल शिकलोय.
जरा नीट सायकल चालवता यायला लागल्यावर सुट्टीच्या दिवशी संध्याकाळचा टाईमपास म्हणजे सायकल फिरवणे. असाच एकदा ५वी मधे असताना मी सायकल फिरवत होतो. दोन्-एक वर्ष सायकल चालवत असल्यानी
confidence solid होता... समोरून मझाच एक मित्र त्याच्या आजीबरोबर चालत चालला होता... त्याला ४थीत असूनही सायकल चालवता यायची नाही... असा धतिन्ग करायचा golden chance मी का सोडू... मझ्या सायकल कसरतीन्ना सुरवात झाली. पहिल्यान्दा मी पुधचे चाक उचलून सायकल ची wheely केली. मग एकदम speed घेतला. त्याच्यासमोर जाउन, मागचा ब्रेक मारून सायकल चं चाक skid करायचा माझा plan होता. पण कसचं काय... जिथे ब्रेक मारला तिथे होती वाळू.... सायकल skid झाली... पण जरा जास्तीच.... control च गेला. आणि डावा गुढगा फुटला.
मित्राशी न बोलता तडक घरी गेलो... हातपाय धुतले आणि कोणाच्या नकळत गुढग्यावर
BAND-AID लाऊन टाकली...
पण असल्या गोष्टी लपत नाहीत.
आई ला बहेरून येताना तो मित्र आणि त्याची आज्जी भेटले आणि तिथेच आमचा पराक्रम मातोश्रीन्च्या कानावर पडला.... (आई ची बोलणी सगळ्यन्नीच खाल्ली असतात... त्यामुळे ती इथे देत नाही... समजून घ्या...)

;-)

Ajjuka
Friday, January 04, 2008 - 11:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अकरा मारूतीच्या गल्लीत कुठे रहायचास तू? मी प्रमोदबन मधे रहायचे. पण आम्ही ते घर सोडूनही आता २० वर्ष होतील फेब मधे.

Manjud
Friday, January 04, 2008 - 12:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकोबा, मी हिशोबात नुसतीच पक्की नही तर रोखठोक आहे. आधी कॅशियर म्हणून काम करत होते ना....आणि दक्षिणाचं गणित मूळात कच्चं असलं तरी खोडात पक्कं असणारच त्याशिवाय का ती इंजिनियर झाली. काय गं दक्षिणा????


Mandarnk
Friday, January 04, 2008 - 3:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आहाहा... रतन सायकल मार्ट, सरस्वती मंदीर... इतक्या वर्षांनी ही नावं वाचून काय बरं वाटलं!
मी पण तिकडेच राहायचो, डीके केमिस्ट च्या गल्लीत!


Farend
Saturday, January 05, 2008 - 12:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अकरा मारूती? मधे आमच्या येथील GTG मधे 'खुन्या मुरलीधरा'चा उल्लेख केला तर अ-पुणेकरांना आश्चर्य वाटले त्या नावाचे. पुण्यातील या अशा (पुलंच्या भाषेत 'लडिवाळ') नावांच्या देवळांचा इतिहास, त्यामागची कथा वगैरे कोठे उपलब्ध आहे का? नसेल तर किमान मायबोलीवर तरी एक बीबी उघडून जाणकारांनी त्यात माहिती टाकली पाहिजे.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators