Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 28, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » जुने दिवस » Archive through December 28, 2007 « Previous Next »

Sakhi_d
Monday, December 24, 2007 - 10:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

image/bmp
Taachani.bmp (37.3 k)


Saee
Thursday, December 27, 2007 - 8:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमचं घर कोल्हापूरला अगदी शिवाजी रोडलाच होतं. त्या घराची चौथ्या मजल्यावरची गॅलरी थेट रस्त्याकडेलाच होती. बाबा आणि आम्ही शाळेतून आल्यावर संध्याकाळी वार्‍याला वरती बसायचो खालची वहातुक बघत. बाबा निरनिराळे तारे दाखवायचे. फारच सुंदर दिवस होते ते. एकदा दक्षिणा बाबांच्या मांडीवर बसली होती आणि तिला काय वाटलं कोण जाणे, तिनं बाबांचा चष्मा काढला आणि गजातून हात घालून सरळ खाली रस्त्यावर टाकला! तिकडून KMT येत होती ती गेली त्या चष्म्यावरुन. बाबांना काही कळायच्या आत सगळं झालं.. बाबा चिडले होते का वगैरे तपशील आठवत नाही आता, पण बहुतेक नसतीलच चिडले. कारण घरातलं काचसामानही आमच्या हातून फुटलं तरी ते ओरडायचे नाहीत, उलट त्यामुळे नवीन घेता येईल म्हणायचे. नाहीतर आयुष्यभर त्याच कपातून चहादूध पिण्यात काय मजा? विविध आकारांच्या बरण्या, भांडी, पाण्याचे जग, प्रयोगशाळेत असतात तसे बीकर्सपण विकत आणायचे ते घरी वापरायला:-) आईपेक्षा त्यांनाच जास्त हौस स्वैपाकघरातल्या वस्तूंची! त्यांना अजुनही क्रोकरीची प्रचंड आवड आहे. एकदाच ते चिडलेले नेमकं आठवतं ते म्हणजे दक्षिणाने ज्ञानेश्वरांच्या फोटोला मिशा काढून ठेवल्या होत्या तेव्हा!! बाबा जाम चिडलेले!! एरवी ते फक्त दुपारच्या वेळी त्यांना डुलकी लागली असेल आणि आम्ही आवाज केला तरच चिडायचे. कारण ती डुलकी फक्त शनिवार - रविवारी दुपारी फारतर 15-20 मिनिटांची असे.

वरती दक्षिणाने लिहिलेल्या जलाराम ट्रान्स्पोर्टच्या जाहिरातवाल्या बसला आम्ही जलाराम असंच म्हणायचो. शाळेचे दिवस संपल्यानंतर जेव्हा जलाराम दिसे किंवा तिच्यात बसून कुठेतरी जायचो तेव्हा खुप आनंद व्हायचा. आजही मला कोल्हापूरच्या बसेसच जास्त आवडतात. त्याला काहीच ठोस असं कारण नाही तरी!

शिवाजी रोडच्या चौकात महाराजांच्या पुतळ्याच्या गोलातही बाबा आम्हाला संध्याकाळी घेऊन बसायचे. कोपर्‍यावरच्या युनायटेड वेस्टर्न बॅंकेच्या बाहेरचं खुप मोठ्या विस्ताराचं झाड, आपल्या चोहीकडून धावणारी खुप वहानं, पुतळ्याखालच्या स्वच्छ दगडी पायर्‍या आणि आवार, एवढ्या गदारोळात असूनही रेलिंगच्या आतमध्ये बसल्यामुळे जाणवणारी बिनधास्त सुरक्षितता आणि हातात हमखास असलेला समोरच्या 'प्रकाश'च्या गाडीवरचा खमंग गरम आणि भलामोठा बटाटेवडा! खरोखरी बहारदार दिवस होते ते... केवळ अवर्णनीयच.

कोणी काही म्हणो, पण कोल्हापूरसारखा बटाटेवडा मी इतरत्र कुठेही खाल्लेला नाही! कुणी कितीही प्रसिध्द असो त्यासाठी. याचं कारण म्हणजे वड्याचं वरचं डाळीच्या पिठाचं आवरणच वेगळं असतं. जाड असतं पण कुरकुरीत आणि चविष्ट. मी तर कित्येकदा आतलं सारण सोडून नुसतं तेच खाते अजुनही. पण सारणही चवीष्ट असतंच. आणि आकार? उगाच टिचभर वगैरे नाही, विना पाव दोन वडे खाल्ले तर पोट गच्चच होतं.

आमचे बाबा फावल्या वेळात मदनमोहन लोहियांकडे (त्यांना सगळे लोहियाशेटजी म्हणत) कामासाठी जात. सोबत आम्हाला पण नेत. बर्‍याचदा त्यांची गाडी बाबांना न्यायला आणायला येत असे. मर्सिडीज!! उंची गाडीत अशी पहिल्यांदा मी त्यातच बसले. काय मस्त वाटायचं त्यातून जायला. आणि गांधीनगर लांब असल्यामुळे खुप वेळ जात रहायचो. त्यांचा बंगला, भोवतालची बाग, त्यांच्याकडची क्रोकरी आणि चहाचा सरंजामही आठवतो मला. खानदानी श्रीमंती मी पहिल्यांदा तिथे पाहिली आणि किंचीत अनुभवलीही.

अजुन खुप काही आठवेल. रंकाळा आणि कैरी घातलेल्या भेळी, राजाभाऊंची राजकमल भेळेची गाडी उभी असे ती राजाराम हायस्कूलबाहेरची आता नसलेली चौपाटी, आत्याबरोबर केलेल्या करवीर नगर वाचन मंदिराच्या आणि अंबाई टॅंकच्या फेर्‍या, महाद्वार रोड, तृषाशांतीचं दुध कोल्ड्रिंक, शिवाजी पुतळ्यासमोरच्या जाधवांचं कॉकटेल, विद्यापीठचा चाट कॉर्नर, भेंडे गल्लीतल्या एम्पायरमधलं ऍक्वेरियम, शाळेच्या आठवणी, बाबा आणि आम्ही एकाच शाळेत असल्याचे फायदे आणि तोटे, मैत्रिणींचे नमुने, शेजारीपाजारी, स. म. आणि कॉमर्स कॉलेज, तिथलं ग्लॅमर आणि तिथल्या निवडणुका, कपिलतीर्थ आणि शिवाजी मार्केटमधली भाजी मंडई, टेंबलाईची यात्रा आणि धमाल, शहरापेक्षा स्वस्त म्हणुन गांधीनगरला जाऊन केलेली कापडखरेदी, अंबाबाईच्या देवळातल्या संध्याकाळी, नवरात्रातले देवळातले कार्यक्रम... बाबा आम्हाला सु. ग. शेवडेंच्या प्रवचनांना घेऊन जायचे आणि आम्ही पण आवडीने जायचो कारण ते फारच रंजक बोलत. अगदी शब्दश: आबालवृध्द ऐकायला बसलेले असत.

बाप रे! मनात एकदम लाटांवर लाटा यायला लागल्या. अर्थात या काही स्थानावर आधारीत आठवणी नाहीत, अशा तर्‍हेच्या पुण्यातल्या आणि इतर ठिकाणच्याही आठवणी आहेतच.. पण आज खुपच लिहलं...

काळाच्या ओघात पुसट होण्यापूर्वीच प्रत्येकाने या सगळ्याची आपल्या स्वत:साठीच कुठेतरी नोंद करायला हवी मात्र. दक्षिणामुळे सगळ्यांचीच ही प्रक्रिया सुरू झाली... प्रत्येकाकडे आपला आपला खजिना असणारच आणि तो जपायला हवा... जुन्या दिवसांना उजाळा देण्याची आठवण केल्याबद्दल दक्षिणाचे आभार मानायलाच हवेत!




Dakshina
Thursday, December 27, 2007 - 9:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सई, तुझी पोस्ट खूप आवडली... आणि मलाही बर्‍याच गोष्टी आठवल्या... अर्थात तू त्या जास्त चांगल्या पद्धतीने लिहू शकशील. खरंच मस्त लिहीलयस...

Sameer_ranade
Thursday, December 27, 2007 - 9:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hi सई,

तुझी पोस्ट छान आहे. खुप आवडली मला.
पुढच्या पोस्ट्ची वाट बघतो..


Dakshina
Thursday, December 27, 2007 - 9:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सई एक गोष्ट आठवली... मटण मार्केटची..
अमच्या घराच्या मागेच मटण मार्केट होतं.. आम्ही दोन चार लहान मुलं निव्वळ कुतूहल म्हणून तिकडे कधी कधी चक्कर मारायला जायचो..
माझी एक बलमैत्रिण होती, तिचं नाव वंदना होतं, पण मी तिला वंदी, वंदी म्हणून हाका मारायचे. आम्ही मटण मार्केट मध्ये जाऊन आलो तर मी कधी घरी सांगायची नाही. मार बसेल म्हणून. आणि जर कधी भांडण झालं तर, वंदी मला धमक्या द्यायची, की घरी सांगेन मटण बघायला गेलेलीस म्हणून..


Abhijeet25
Thursday, December 27, 2007 - 6:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बिबि वाचायला सुरुवात केली आणि अतिशय आवडता विषय सापडला.

आता मध्यंतरी पुण्याला जायचा योग आला आणि शिवाजी नगर ला गेलो होतो तर कळाले कि आता राहुल थिएटर चे सुध्धा मल्टिप्लेक्स केले. इतके वाईट वाटले.

किती चित्रपट पाहिले असतिल त्या राहुल ला याचि गिनती नाहि. राहुल पासुन जवळच ती वेधशाळेची गल्लि आहे. तिथे नाष्ट्याला हवे असनारे सगळे पदार्थ मिळायचे.

आम्हि राहुल ला कधिहि स्टाॅलचेच तिकिट काढायचो. तिथे बसुन तिथे होत असलेल्या काॅमेंटस ऐकत पिक्चर बघायची खरि मजा.
चित्रपट कोनताहि असो आणि कोनिहि हिरोईन असो तिच्या एन्ट्रिला शिट्ट्या पडणार म्हणजे पडनारच.

अजुनहि जेंव्हा ई स्क्वेअर ला वगैरे जातो तेंव्हा हिरोईन च्या एन्ट्रीला शिट्ट्या ऐकल्या नाहि कि अगदिच कसे तरि वाटते


Dakshina
Friday, December 28, 2007 - 5:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सईच्या पोस्ट मध्ये शिवाजी पुतळ्याचा उल्लेख आला त्यावरून आठवलं. कोल्हापूरला शिवाजी महाराजांचं खूप प्रस्थं आहे. आणि आमच्या घराजवळचा महारस्जांचा पुतळा उभा आणि तडफ़दार होता... तसा पुतळा मी कधीच, आणि कुठेच पाहीला नाही. (खालच्या पोस्ट मध्ये फोटो देत आहे.)

कोल्हापूरची शिवजयंती म्हणजे उत्सवच असायचा. मुर्ती आणि आजूबाजूचा जो छोटा गोल भाग होता, तो काळ्या दगडाचा होता. शिवजयंती जवळ आली की त्या सर्व भागाची विशेष स्वच्छता होत असे. त्यामूळे ते काळे दगड अणखी उठून दिसत. शिवाय त्या पुतळ्याला जे कूंपण होतं त्याला ही काळा ऑइल पेंट लावत. इथे पूण्यात फ़क्त त्यांच्या गाण्याची कॅसेट लावतात आणि फोटोला हार घालतात. पण कोल्हापूरला तसं नाही. तिथे लोक ढोल, तशा वाजवायची प्रॉपर प्रॅक्टीस करत. आणि मुली रस्त्यात दांडपट्टा खेळत. पांढरे नेहरू शर्ट, डोक्याला भगवी फ़ित, गुलाल.... झांज - पताका... नुसतं पहाणार्‍याला सुद्धा सामिल व्हावंसं वाटेल. लोक लेझीम अगदी धूंद होऊन खेळत.

शिवजयंतीचं किती वर्णन करू? कोल्हापूरला कोणता साधा सण सुद्धा अगदी उत्सवासारखा साजरा करतात. गणेशोत्सवाचं तर काही विचारायचं नाही. कोल्हापूरचा २१ फ़ूटी गणपती आमच्याच घराजवळ होता, त्यामूळे महीनाभर.. महीनाभर का? त्याही आधीपासून तिथे स्पॉन्सरर्स च्या नावांचा मंडप पडायचा. आणि आतमधे ती मुर्ती बनवली जायची. आम्ही रोज संध्याकाळी मुर्तीची प्रोग्रेस पहायला जायचो. मला आठवतंय मी खूप लहान असताना, शिवाजी पुतळ्याच्या गणपतीचं उदघाटन करायला मा. श्री. निळू फ़ुले आले होते. आणि स्टेज मोडलं होतं आम्हाला तेव्हा खूप बरं वाटलं होतं, कारण ते चित्रपटात व्हीलनचं काम करत, आणि वास्तवात पण ते तसेच असतील अशी आम्हा लहान मुलांची धारणा होती..


Dakshina
Friday, December 28, 2007 - 5:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



Saee
Friday, December 28, 2007 - 7:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा, हे सगळं अजुनही चालू आहे, फक्त तू तिथे नाहीस त्यामुळे सगळिकडे भूतकाळ वापरलायस!!:-)

btw आम्ही महाराजांच्या घोड्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे असा प्रश्न विचारून खुप जणांना गोंधळात टाकायचो:-) महाराज उभे आहेत, घोडा नाहीच तिथे:-)


Madya
Friday, December 28, 2007 - 9:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गावाच्या आठवणी, लै भारि


Abhijeet25
Friday, December 28, 2007 - 10:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा ताई,
पुण्यात शिवजयंती ला फक्त गाणी लावतात आणि फोटो ला हार घालतात असे नाही.

मी ज्या ठिकाणी राहतो. तिथुन दर शिवजयंती च्या आदल्या रात्रि ९०-१०० मुले ट्रक टेम्पो बुक करुन जवळच्या एखाद्या गडावर जातात म्हणजे राजगड, रायगड वगैरे. नंतर मग तिथे जी ज्योत पेटवलेली असते त्यावरुन मशाल पेटवुन ती पुण्यापर्यंत आणतात. आणि हो हि ज्योत गाडिवर घेतली जात नाहि. म्हणजे पुर्ण वेळ ती हातात घेउन कोनी न कोनी पळत असते. प्रत्येक जन स्वत:च्या क्षमते प्रमाने पळतो. मागे ट्रक माधे ढोल ताशे वाजत असतात त्यामुळे पळायला अजुनच उत्साह येतो. आमच्या येथिल भरपुर मडंळं हा उपक्रम करतात.

या वेळेस त्यांना सांगतो पन्हाळ्या वरुन ज्योत आणा. म्हणजे तेथिल लोकांना पण हा उपक्रम कळेल. :-)


Dakshina
Friday, December 28, 2007 - 11:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिजित, तुम्ही सांगितलेला उपक्रम छानंच आहे. पण तो इथे पूण्यातली मंडळं करतात हे मला माहीती नव्हतं. मी जी काही मंडळं पाहीली त्यावरून लिहीलं होतं. असो.. माझा काही पूण्याला कमी लेखण्याचा इरादा नव्हता.... कारण मी पूण्यातही खूप छान दिवस घालवले, जे जुन्यात धरू शकते.


Itgirl
Friday, December 28, 2007 - 11:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सई, दक्षिणा, किती छान लिहिल आहेत तुम्ही दोघींनी :-) आवडल :-)

Dakshina
Friday, December 28, 2007 - 12:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माहीती तंत्रज्ञान मुलगी.... धन्यवाद...

Gsumit
Friday, December 28, 2007 - 1:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिजीत, सहीच... तुझी पोस्ट वाचुन मला सुद्धा (तरुण तडफदार) मावळा व्हावसं वाटतयं... :-)

Dineshvs
Friday, December 28, 2007 - 1:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोल्हापुरला माझे जाणे लहानपणी आणि अलिकडेही नियमित होते.
कोल्हापुरात शिरताना म्हणजे ज्योतिबापासुन जो रस्ता आहे, त्यावरची वडाच्या झाडांची कमान तशीच आहे. सायकलला दोन्ही बाजुने दुधाच्या बरण्या लावुन जाणारे तसेच आहेत आणि त्या रस्त्यावर एस्टीच्या ड्रायव्हरसकट, सगळेच उल्हासित होतात, तेही अजुन तसेच आहे.
मी अगदी भल्या पहाटे कोल्हापुरमधे पोहोचत असे, त्यावेळीही म्हशीचे दुध काढुन देणारे, जागोजाग दिसतात, पुर्वीसारखेच.
कोल्हापुरात शिवाजी महाराज आणि शाहु महाराजांबरोबरच, इंदिरा गांधीही खुप लोकप्रिय होत्या. हिरवी नऊवारी साडी नेसलेल्या इंदिरा गांधींचे पोस्टर जागोजाग दिसत असे.
घरोघरी शिवाजी महाराजांचा आणि इंदिरा गांधींचा फ़्रेम केलेला फोटो, हमखास दिसत असे.

पण अंबाबाईच्या देवळातली गर्दी नको तितकी वाढली आहे. माझ्या आठवणीत दगडु बाळा भोसलेचे पेढे, अनिवार्य होते, पण आता तिरुपतीप्रमाणे लाडुचे प्रस्थ वाढलेय.
तिरुपतीकडुन येणारी साडी, पुर्वीही कौतुकाचा विषय होती. पण आता त्या परिसरात तिरुपतीचा प्रभाव जास्त जाणवतो. देवळातली तिरुपतीची मुर्ती जरा जास्तच ठळक केलीय. अंबाबाईचे दर्शन घेतल्याशिवाय तिरुपतीची यात्रा पुर्ण होत नाही, असा प्रवाद वाढत चाललाय.
आणि हो लाडाचे अंबाबाई हे नाव सोडुन, तिला महालक्ष्मी म्हणण्याकडेही कल वाढतोय.


Abhijeet25
Friday, December 28, 2007 - 2:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षीणाताई
अहो मी असे कुठे म्हणालो कि तुम्ही पुण्याला कमी लेखत आहात. मी फक्त माझे जुने दिवस आणि तो स्तुत्य उपक्रम या बद्दल महिती देत होतो.

काय मजा यायची रात्रभर ढोल ताशांच्या गजरात ती मशाल देउन पळायला. त्या मशालीला घातलेल्या गरम गरम तेलाचे थेंब हातावर पडत असले तरि काहि वाटायचे नाहि.

असो तर ह्या मुळे मुख्य उद्देश साध्य व्हायचा तो म्हणजे मुलांना व्यायामची गोडि लावायचा. आम्हि सगळे मशाल घेउन जास्त वेळ पळता यावे म्हणुन शिवजयंतीच्या आधि एक दोन महिन्यांपासुन पळायला जायचो.


Arch
Friday, December 28, 2007 - 3:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिजीत, फ़ारच स्तुत्य उपक्रम हं. पुणेरी लोकांकडून सगळ्यांनी उचलावा असा.

Sunidhee
Friday, December 28, 2007 - 4:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा!! मला माहितीच नव्हते कधी, पुण्यात असे करतात. काय छान माहित करून दिलेस अभिजीत. वाचूनच इतके छान वाटले ना!! शिवाजीराजांची जीवनगाथाच अशी आहे की काय सांगावे, नुसते नाव मनात आले तरी रक्त सळसळायला लागते..
दक्षिणा छान लिहिलेस गं.

वरती सई चे पोस्ट वाचले हे लिहिल्यावर. तु पण मस्त लिहिलेस गं. अरेच्या तुम्ही दोघी बहिणी की काय??


Abhijeet25
Friday, December 28, 2007 - 6:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माफ करा पण, पुण्यात सगळी कडे हा उपक्रम होतो कि नाहि माहित नाहि, म्हणुन मी माझ्या पोस्ट मधे मुद्दाम लिहिले की मी राहतो तिथे हे चालते.

आणि हो आमच्या मडंळा तर्फे पोवाडे स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा सुध्धा आयोजित करायचो बजेट नुसार. संघाच्या कार्यकर्त्यांना दोनदा विचारले कि तुम्ही तलवारबाजीचे प्रात्यक्षिक देउ शकाल का? पण त्यांना जमले नाहि. ( मागच्या भारतभेटीतली ऐकिव माहिती.)

या वर्षी शरिरसैष्ठव किंवा कुस्ती आयोजित करावा अस विचार आहे. येताय का कोणी? ( एक हास्यमुद्रा)

आता या उपक्रमांवर जास्त लिहित नाहि, नाहितर तुम्हि म्हणाल कि हा बिबि आमच्या मंडळाचे चांगले उपक्रम असा नसुन जुने दिवस असा आहे.
बरेच विषयांतर झाले.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators