Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 24, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » जुने दिवस » Archive through December 24, 2007 « Previous Next »

Dakshina
Wednesday, December 19, 2007 - 10:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रवी, तुमची पोस्ट खरंच खूप आवडली. थोडक्यात तुम्ही त्यावेळच्या जमान्याचं classy वर्णन केलयंत.

रुतू - मी ९३ पास आऊट आहे. तुला ज्योती - स्वाती बनसोडे माहीती असतीलंच.


Raviupadhye
Wednesday, December 19, 2007 - 11:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thank you Dakshina ji,In the same context if you really want to go down the memory lane -go to
www.snoopy.com and look for "how did we survive"
You will love it

Raviupadhye
Wednesday, December 19, 2007 - 11:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणख़ी गम्मत म्हणजे शाळेतील काही ऊन्च मुले शाळा सम्पल्यावर खाकी पन्ट्च्या वर पायजमा घालून घरी जाय्ची.मी नव्हे बर!!!!!-:-)

Yogesh_damle
Wednesday, December 19, 2007 - 6:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुमच्यापैकी कुणाला उकडलेली-खारवलेली काळपट-लाल बोरं आठवतात का? त्या बोरांइतकाच त्यांच्या रसाने भिजलेला कागदही आवडायचा! ;)

वाह!! हा बीबी वाचतांना माझा कीबोर्ड भिजला!! :-) (एरव्ही बाॅसचे ईमेल्स तोंडचं पाणी पळवतात!)



Zakasrao
Wednesday, December 19, 2007 - 6:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रवि हे असच आमच्या शाळेत होत होत.
पण आमच्या आधीच्या बॅचची मुल अस करत. :-)
आमच्यावेळी त्यालाहि बंदी आणली शाळेने.
मला आठवते शाळेसमोर येणारी एक "बुड्ढी के बाल" नावाची मिठाई. :-)
तो माणुस त्याच्या ढकल गाडीवरच ते तयार करत होता. त्यच एक छोट मशीन होत. हाताने फ़िरवुन मस्त गुलाबी रंगाची मिठाइ बनवत असे तो. :-)


Dineshvs
Thursday, December 20, 2007 - 3:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्या बोराना आम्ही चनिया मनिया म्हणत असु. आणि झकास ते बुढ्ढी के बाल अजुनही मिळतात.
आता बाळाबरोबर तुही खा. खरे तर तो साखरेचा पाकच असतो.
घरी पाक करुन, तो जेवणाच्या काट्यावर घेऊन, पंख्याखाली उंचावरुन सोडलास, तरी तसा प्रकार होईल.
आणि मग त्या नंतर घराची जमिन, आणि भिंती गोडगोड होतील.
पुर्वी एका मोठ्या बांबुला चिंगम लावलेला माणुस दिसत असे. तो त्या चिकट पदार्थाचे, आपल्याला हवे ते आकार करुन देत असे. तो चिंगमचा आद्य प्रकार.


Zakasrao
Thursday, December 20, 2007 - 3:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुर्वी एका मोठ्या बांबुला चिंगम लावलेला माणुस दिसत असे. तो त्या चिकट पदार्थाचे, आपल्याला हवे ते आकार करुन देत असे. तो चिंगमचा आद्य प्रकार>>>>>>>>..
अरे हा मला लिहायचा होता पण मला नक्कि आठवेना ते च्युइन्ग गम होत की दुसर काही म्हणून लिहिल नाही.
तुम्ही सांगितलेला उपाय करुन बघावा बुड्ढीके बालचा पण तुमच्या घरी आल्यावर :-)


Mukund
Thursday, December 20, 2007 - 5:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रवी तुमच्या पोस्टवरुन मलाही ७० च्या दशकातल्या काळाबद्दल लिहावेसे वाटले. मी बालमोहन शाळेमधे होतो तेव्हा. लहानपणापासुन मला क्रिकेटचे अतिशय वेड... त्या संदर्भात दोन आठवणी...

त्या वेळेला माधव गोठोस्कर व स्वरुप किशन हे पंच खुप नावाजलेले होते. मला पतौडी,गावस्कर,विश्वनाथ,वाडेकर,दुराणी अशा खेळाडुंइतकेच त्या पंचांचेही खुप अप्रुप वाटायचे... त्यांचे ते पांढरे शुभ्र कोट व काळी पॅंट व डोक्यावर पनामा टोपी.... प्रत्यक्षात कसोटी सामना बघण्याचे भाग्य १९७९ पर्यंत लाभले नाही जेव्हा मुंबईच्या वानखेडेवर गावस्करची २०५ धावांची अविस्मरणीय खेळी बघायला मिळाली. पण आमची शाळा शिवाजी पार्कच्या बाजुला लागुनच असल्यामुळे काही काही वर्गांच्या खिडकीतुन शिवाजी पार्क जिमखान्याचे क्रिकेट पिच दिसायचे पण सगळे नाही... फक्त एक एंडच दिसायचा.(फ़ार एंड?.... अमोल..:-)) त्या एंडला एक ओव्हर फक्त पंचच दिसायचा व एक ओव्हर बॅट्समन व विकेटकिपर दिसायचा. पण त्या वेळी त्या क्लबमधल्या खेळाडुंबद्दल व पंचांबद्दल मला प्रचंड कौतुक वाटायचे व तेच टेस्ट खेळाडु आहेत असे मला वाटायचे. त्यांना बघायला मी शाळेत ३० मिनिटे आधी जायचो व खिडकीतुन त्यांना बघत बसायचो हे समजुन की तो पंच म्हणजे माधव गोठोस्करच आहे... (पण हेही सांगावेसे वाटते की त्या वेळेला शिवाजी पार्क जिमखान्याच्या टीममधे वाडेकर,पद्माकर शिवलकर,अब्दुल इस्माइल असे अतिरथि महारथी होते.... रविवारी होणार्‍या कांगा लिगच्या मॅचेस बघायला शिवाजी पार्कवर तुफ़ान गर्दी व्हायची..खासकरुन दादर युनियन व शिवाजी पार्कच्या मॅचसाठी... दादर युनिअन मधे विट्ठल पाटील,गावस्कर व वेंगसरकर खेळायचे तर शिवाजी पार्ककडुन संदिप पाटील.. त्या गर्दीमधे मीही असायचो हे सांगायला नकोच.. त्या कांगा लिगच्या मॅचेस पावसाळ्यात व्हायच्या...

दुसरी क्रिकेटबद्दलची जुनी आठवण म्हणजे लहानपणी आमच्या नेबरहुडमधे मी ४-५ वर्षांचा असताना सगळी मोठी मुले मला पकडुन विचारायचे.. ए..ए.. अरे वाडेकर कसा प्लेड करतो सांग ना... मग मीही हुरळुन जाउन.. अगदी लेफ़्टी स्टांस घेउन एक पाय दुमडुन प्लेड करुन दाखवायचो... मग त्यानंतर दुराणी कसा सिक्स मारतो.. मग पुढे जाउन सिक्स मारायची ऍक्शन मी करुन दाखवायचो... मला बरीच वर्षे लागली हे समजायला की ही मोठी मुले माझ्या फिरक्या घेत माझी गंमत करायचे असे विचारुन... पण त्यावेळेला मला असे वाटायचे की मी अगदी हुबेहुब नक्कल करतो म्हणुनच ते मला ऍक्शन घ्यायला सांगत आहेत व मनापासुन मी नक्कल करायचो...:-)

त्याच सुमारास १९७३ का ७४ ला दुरदर्शनवर प्रथमच वेस्ट इंडीज का इंग्लंडबरोबरचा कसोटी सामना दाखवणार हे जाहीर केले. त्या वेळेला आमच्या नेबरहुडमधे फक्त १ का २ जणांकडे टिव्ही आला होता. आम्ही सगळी मुले एका शेणॉय म्हणुन आमचे शेजारी होते त्यांच्याकडे रविवारचा मुव्ही व गुरुवारचे छायागीत बघायला जायचो. हे कसोटी सामन्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे ही बातमी रविवारच्या मुव्हीच्या मधे बातम्यांमधे जाहीर झाले. ते ऐकल्यावर मी आनंदाने टुणकन उडी मारली व शेणॉयंच्या घरातुन ओरडत ओरडतच बाहेर पडलो की टेस्ट मॅच टिव्हीवर दाखवणार... टेस्ट मॅच टिव्हीवर दाखवणार अस सगळ्या नेबरहुडमधे दवंडी पिटवुन आलो.. परत शेणॉयंच्या घरात आलो तर मिस्टर शेणॉय दारातच माझी वाट पाहत होते.. आल्यावर मला विचारले.. आलास सगळ्या जगाला दवंडी पिटवुन? मीही हो.. असे म्हणुन नंतरचा मुव्ही पाहायला बसलो.. त्यांच्या त्या तिरसट प्रश्नाचे प्रयोजन मला त्यावेळी कळलेच नाही... मला वाटले.. इतकी चांगली बातमी मी सगळ्यांना सांगुन आलो तर यांना काय एवढे वाइट वाटले? मला असे वाटलेच नाही की ३०-४० माणसे त्यांच्या घरात टिव्ही बघत आहेत त्याचा शेणॉयंना कधी त्रास होईल...:-)

रवी.. मी पोसायडन ऍड्व्हेंचर हा सिनेमा सायनला अरोरा थिएटरमधे बघीतला होता.. त्या दिवशी मुंबईत पावसाने प्रचंड थैमान घातले होते त्यामुळे तो मुव्ही पाहुन बाहेर आल्यावर त्या तुफ़ानी पावसामुळे त्या मुव्हीचा इफ़ेक्ट अजुनच वाढला.... त्याच सुमारास इरॉसला चर्चगेटला टॉवरींग इन्फ़र्नो मुव्ही लागला होता इरॉसला त्या उंच बिल्डींगची कार्डबोर्डची प्रतिक्रुती होती व ज्वाळा म्हणुन लाल जिलेटीन पेपर त्या इमारतीच्या खिडक्यांतुन वार्‍याने हलत असलेले चित्र अजुनही माझ्या डोळ्यापुढे आहे....


Gajanandesai
Thursday, December 20, 2007 - 12:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, तो बांबूला गुंडाळलेला चुईंगगमवाला अजूनही येतो. :-)

चनिया मनिया... 'चनिया मनिया बोर' नावाचं एक चंद्रकांत मोरे यांचं पुस्तक आहे. लहानपणी ते एकदा बक्षीस म्हणून मला मिळालेलं. ते पुस्तक मला इतकं गूढ, कंटाळवाणं वाटायचं की बास! त्यात लिहिलेलं पाली, मुंग्या, झुरळं, ढेकूण असं काय काय होतं. मला ते पुस्तक अभ्यासाच्या पुस्तकाच्या वर छळायचं. डोक्यातून निघायचं नाही. लेखकाचा खूप राग यायचा. या पुस्तकाला माझ्या आठवणीप्रमाणे दुर्गा भागवतांची प्रस्तावना आहे.


Farend
Friday, December 21, 2007 - 1:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुकुंद :-)

ते 'प्लेड करणे' हे चेंडू तटवण्याला असलेले नाव शिवाजी पार्क परिसरातही होते का? मग ठीक आहे. मला वाटले आमच्या लहानपणी कोणीतरी चुकून तसे म्हणाले आणि आम्ही तेच धरून बसलो. जास्त रिस्क न घेता खेळणे म्हणजे 'प्लेड प्लेड खेळणे' असेही म्हणायचो. तेव्हा 'प्लेड' म्हणजे 'खेळला' हा इंग्लिश अर्थ माहीत नव्हता.

माझ्याही शाळा पुण्यात PYC व डेक्कन परिसरात असल्याने येताना, जाताना व चौथीपर्यंत शाळेतूनही क्रिकेट पाहात बसणे हे नेहमीचे होते. PYC वर मी श्रीकांत, विश्वनाथ वगैरे पाहिले आहेत.


Tiu
Friday, December 21, 2007 - 6:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्या लहानपणी तर कुणी असं हळु खेळत असेल तर त्याला 'अरे काय प्लेडी प्लेड खेळतोय?' म्हणायचे! ;-)

या शिवाय अजुन काही शब्द आठवले...
वनडी, टुडी, व्हाइट बॉल (वाइड)

how's that!(howzzat) हे सगळ्यांनी ऐकलेलं असायचं पण नक्की तो बॉलर काय म्हणतो हे कुणालच न कळाल्यामुळे त्याचे out's that! वगैरे सारखे अपील व्हायचे... :-)


Hkumar
Saturday, December 22, 2007 - 8:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सायकलची जुनी ट्युब कापून त्याचे रबर बॅन्ड्स करायचो व ते कागदी बोळ्याभोवती गुंडाळून त्याचा चेंडू करायचो. बाकी तो चेंडू जोरात लागायचा अंगाला.

Zakasrao
Saturday, December 22, 2007 - 11:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

टिउ सेम पिंच रे.
अगदी आम्ही जस बोलायचो तेच लिहिल आहेस :-)
सायकलच्या रबर ट्युब वरुन आठवल.
लग्गोरी करणे हे एक जिकिरीचे काम होते. :-)
त्यासाठी तो V शेप असलेल झाडाचे छोटा जॉइन्ट मिळवा. मग त्याला ताण येइल असे बंध म्हणुन रब्बर मिळवा मग त्याला मागे दगड थेवण्यासाठी चामड्याचा तुकडा मिळवा. मग ती लग्गोरी तयार करुन नेम लावुन खेळा. लयी मज्जा. :-)
पण बिचारे पक्षी आमच्या सारख्या पोरांच्या मुळे त्याना किती त्रास. त्यावेळी कळत पण नव्हत ना. :-)
असच सगळ्या झाडाझुडपातुन फ़ुलपाखरे पकडण्याचा कार्यक्रम जोरात असायाचा एखाद्या रविवारी. (तरी बर माझे फ़ार शाळा न शिकलेले आई वडील हायजीन कॉनशियस नव्हते. नायतर हे सगळे आनंदाला मुकलो असतो) मग त्याला पकडुन काडेपेटीत ठेवणे. :-)
एक चतुर का काय असच नाव असलेला किटक असतो ज्याला आम्ही हेलिकॉप्टर म्हणत होतो. त्याला पकडुन त्याच्या मागे दोरा (शिवणकामासाठी वापरला जातो तो) बांधणे आणि त्याच एक टोक हातात पकडुन त्याला हवेत सोडणे :-)
काय काय भन्नाट प्रकार होते. :-)
सगळ्यात जास्त तल्लीन व्हायच पतंग उडवताना. :-)
काय मस्त दिवस होते.
माझ्या घराशेजारी एक वाळुचा डेपो होता. तिथे आम्ही बराच वेळ खेळण्यात घालवत होतो.
एकदा आम्ही तो आमिर खान आणि जुहीचा "दौलत की जंग" बघुन तिथे चिन्गामुन्गा बनवला होता. :-)


Dakshina
Monday, December 24, 2007 - 6:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकास, चिंगामुंगा म्हणजे काय?

शिवाजी रोडच्या बँक ऑफ़ बडोदा चे बांधकाम सुरू असताना मी पण दिवसेंदिवस तिकडे पडीक असायची. तिथल्या कामगारांच्या मूलांबरोबर खेळत. पहीले काही दिवस आईला पत्ता लागला नाही, पण जेव्हा तिला कळले की मी तिकडे जाते, तेव्हापासून मला शोधायचे म्हटले की ती पहील्यांदा तिकडेच यायची. एकही दुपार अशी गेली नाही की मी तिथून आईचा मार खात घरी आले नाही. फ़ार मारायची बाई आई....


Sameer_ranade
Monday, December 24, 2007 - 7:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकास हा चतुरंशी खेळ आम्हि पण करायचो. आधी चतुर पकडण्यात खुप वेळ जायच. आणि सुई माहित्ये क तुला. सुया पण खुप पकडायचो. खुप हाल व्हायचे बिचार्‍यांचे, पण आम्हाला मजा यायची.

लहानपणी स्टार-ट्रेक नावाचि एक सिरिअल लागायचि (स्पॅस शटल वर आधारित). त्याच्यात त्यावेळी त्यांच्याकडे मोबाइल फोन होते (मोबाइले हे नाव पण माहित नव्हतं तेव्हा). तेव्हा अम्हि पण २ कड्यापेट्या एकत्र करुन, त्याला रब्बर बॅंड बान्धुन तसा मोबाइल बनवायचो आणि गम्मत म्हणुन एकमेकांशि बोलायचो.


Zakasrao
Monday, December 24, 2007 - 8:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समीर काडेपेटीचा खेळ आम्ही सुद्धा केलाय. :-)
सुई म्हणजे काय नाहे रे माहित?? सांगशील का????
संक्रांत झाली कि तराजु बनवुन (त्याला आम्ही बुडकली म्हणत होतो. मातीचे छोटी छोटी भान्डी ज्यात संक्रातीचा भोग ठेवतात) व्यापारी बनत होतो तर बेंदुर (पोळा) झाला की ती बैल जोडी घेवुन खेळणे असे कार्यक्रम आमचे फ़िक्स होते. :-)
दक्षिणा चिन्गा मुन्गा कळण्यासाठी तुला आमिरचा "दौलत कि जंग" बघावा लागेल.
आदिवासी लोकांच दैवत असत ते जे राक्षसाराख दिसत आणि त्याला म्हणे नरबळी देत असतात पोर्णिमेला :-)
तो ही अचाट पिक्चर आहे बघ. वेळ मिळाला की. :-)


Dakshina
Monday, December 24, 2007 - 8:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या वर्षीची संक्रांत पण आलीच की जवळ. मला आठवतंय, माझी काकू हळदीकूंकू करायची. आणि कोणतं वाण लूटायचं ते आम्हीच ठरवायचो, आणि आम्हीच विकत आणायचो. कंगवे, सोपकेस, कुंकवाचे प्लस्टिकचे करंडे, आणि आम्ही आम्हाला उपयोगी पडतील अशाच गोष्टी शक्यतो आणायचो. त्यातल्या बर्‍याच गोष्टी उरायच्या, मग ककू पण कुठे कुठे हळदीकूंकवाला जायची, तिच्या सगळ्या वस्तू आम्हीच पळवायचो....

आणि आताच्या हळदीकूंकवाला, कायच्या काय वस्तू देतात.... अगदी इथे न लिहीण्याजोग्या सुद्धा...


Sameer_ranade
Monday, December 24, 2007 - 9:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकास सुई म्हणजे चतुराची बायको (फ़िमेल चतुर). :-)
एकदम बारिक असते, सुई सारखी..


Dakshina
Monday, December 24, 2007 - 10:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परवाच, माझी रूममेट मला सांगत होती, की ती लहापणी म्हणे फ़ुलपाखरं पकडायची, आणि खड्डा ख़णून, त्यावर अर्धवट उघडी फ़ळी ठेवायची....
त्या फ़ुलपाखराला खायला काय माहीत आहे का? पारले - जी च बिस्किट आणि फ़ुलपात्रात पाणी...

यांच्या XXX नं दिलं होत कधी... बिचारी, मरायचीच... ऐकून मला फ़ार वाईट वाटलं


Sakhi_d
Monday, December 24, 2007 - 10:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्हीहि ते चतुर पकडायचो आणि त्यांना टाचण्या (म्हणजे सुई female चतुर) खायला घालायचो. आता काहितरीच वाटतय पण तेव्हा मजा यायची. दोने चतुर पकडुन त्यांची मारामारी लावायचो. खरच छान होते दिवस ते.
टाचणीचा फ़ोटो खाली टाकतेय... कसले रंग असायचे... सही...


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators