Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
आठवणीतील स्वर आणि ग़ंध ...

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » आठवणीतील स्वर आणि ग़ंध « Previous Next »

Tanya
Friday, December 21, 2007 - 10:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कित्येकदा, एखादी tune , गाणं ऐकल की जुने क्षण आठवतात.

त्याचप्रमाणे एखादा typical वास,सुवास,सुगंध त्याक्षणी कुठल्याकुठे घेऊन जातो.

चंदनाच्या उदबत्तीचा वास आला की मामाचा गणपती आठवतो, गणपतीत मामाकडे दरवेळी बेंगलॉर मधुन खास मागवलेली चंदन उदबत्ती दरवळत असते.

निशिगंधाच्या फुलांचा वास मला शिर्डीच्या साईबाबांच्या देवळाबाहेरच्या विक्रेत्याकडे असलेल्या हारांकडे नेतात.

गणराज रंगी ऐकल की चवथीत असताना शाळेच्या गदरींगमध्ये केलेला नाच आठवतो.

QSQT तील 'पापा कहते है' कधीही ऐकल तर माझा दहावीचा सुट्टीतला क्लास आठवतो. आमच्या क्लासच्यावेळेला वाटेवरचा पानवाला नेमक हे गाण लावायचा.

असे कित्येक क्षण खुप आठवणींशी निगडीत आहेत.

आणि तुमचे???
Ladtushar
Friday, December 21, 2007 - 10:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान कल्पना आहे !
मला "माणुसकीच्या शत्रुऊसंगे युद्ध आमुचे सरू, जिंकू किंवा मरू..." हे गाने ऐकले की अगदी लहान पणिचे १५ ऑगस्ट आणी २६ जानेवारी चे दिवस आठवतात.

आणी उदबत्तीचा वास आला की लहान पणी देवा समोर बसून मंहटलेली शुभम करोति आठवते

तसेच गोंडयाच्या फुलाचा सूगंध आठवला की दसरा अणि दीवाली आठवते.

खुप आहेत...

धन्यवाद तान्या.

Sayuri
Friday, December 21, 2007 - 5:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

True! माझ्या पण अश्या खूप आठवणी आहेत..मागे लिहिलं होतं मी त्यावर... ते इथे वाचायला मिळेल
http://manasokta.blogspot.com/2007/07/blog-post_12.html

Aashu29
Sunday, December 23, 2007 - 1:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला कोर्‍या प्लस्टिकचा वास आला की माझ्या शाळेतले पावसातले दिवस आठवतात, रेनकोट घालुन तोच वास यायचा नं कायम!

Dakshina
Monday, December 24, 2007 - 5:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रिन सुप्रिम धूण्याच्या साबणाचा वास आला की मला माझे NCC च्या कॅम्प्स चे दिवस आठवतात. कारण त्यावेळी भरलेल्या बॅगेतच तो घातलेला असायचा, आणि कम्प मध्ये जाऊन बॅग उघडली की, सर्व कपड्यांना त्याचाच वास यायचा.

धूपचा वास पण असाच, मी कोल्हापूरला असताना, दर गुरूवारी माझे बाबा संध्याकाळी अख्ख्या घरात धूप घालायचे, आणि त्यादिवशी रात्री खास प्रसाद पण आणायचे. कुठेही धूपाचा वास आल, की मला गुरूवार संध्याकाळ, ती पण कोल्हापूरचीच.

कोल्हापूरच्या आमच्या घराच्या खाली एक फ़ुलवाल्याचं दुकान होतं, त्याच्याकडे हारात घालतात ती पिवळी शेवंतीची फ़ुलं असायची, अगदी ढिग्गाने.... मला सवय होती, येता जाता एक फ़ूल चुरडून मी त्याचा वास घ्यायची, आता सुद्धा कधी तसलं पिवळं फ़ूल दिसलं की मी अजूनही तस्साच वास घेते.
Zakasrao
Monday, December 24, 2007 - 6:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संध्याकाळी आईने देवासमोर अगरबत्ती लावलेली असायची.
आम्ही खेळुन घरी येवुन (नाइलाजाने ) दप्तर उघडून घरचा पाठ पुरा करण्याच्या मागे. (नायतर मार शाळेत)
त्याच वेळी तो अगरबत्तीचा वास आणि आई बनवत असलेल्या जेवणाचा वास. त्यात पण वेगवेगळे प्रकार हा.
म्हणजे जर डाळीची आमटी असेल तर वेगळा,वांग्याची भाजी असेल तर वेगळा,चपात्या भाजत असेल तर वेगळाच. त्यातच अगरबत्तेचा वास मिक्स होत होता.
अजुनही मला तसला अगरबत्तीचा वास आला की ती संध्याकाळ आणि ते सगळे वास आठवतात. :-)
आणि पोटातली भुक खवळते. :-)
(कोण रे ते खादाड खादाड म्हणतय
)

Dakshina
Monday, December 24, 2007 - 11:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकास, पद्माराजेत, माझा वर्ग दोन वर्षं स्टाफ़ रूम शेजारी होता, दुपारी शिक्षकांच्या चहाच्या वेळी काय घमघमाट सुटायचा म्हणून सांगू... आवरणं महामुश्किल व्ह्ययचं. आपल्याला, एकदातरी तो चहा मिळावा अशी मला नेहमी इच्छा व्हायची. पण तो कधीच मिळाला नाही. न्यू. हायकूल मधला चहा असंख्य वेळेला प्यायलेले आहे. पण त्याला अमच्या शाळेतल्या चहाची मज्जा नव्हती...

तुझं स्वयपाकचं वर्णन ऐकून माझ्याही तोंडाला पाणी सुटलं. आमच कोल्हापूरचं घर उंचावर (४था मजला) होतं, त्यामूळे तर आजूबाजूने बरेच घमघमाट यायचे, विशेष करून लसूणाची फ़ोडणी. बकरी ईद ला तर अख्खी प्रोसिजर अगदी कापण्यापासून ते शिजण्यापर्यंत.. त्याचा वास वर्षानुवर्ष विसरले नाहीए....


Maitreyee
Wednesday, December 26, 2007 - 4:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अशी बरीच समीकरणं आहेत माझ्यासाठी. उदा जाईच्या फ़ुलांचा वास आला की मला गणेशोत्सव, जोषात म्हटलेल्या आरत्या, उत्सवातले विविध गुणदर्शन कार्यक्रम, त्या आधीची नटणे नटवणे इ इ तयारी, यात जाईचे गजरे हवेतच, मग कार्यक्रमाच्या आधी थोडा पाऊस, माईक ची कुईकुई, आपला कार्यक्रम झाला की कौतुके ऐकत प्रेक्षकात येऊन बसणे, मग उशीरा गावात गणपती बघायला ग्रुप ने जाणे, दुसर्‍या दिवशी भेळेचा श्रमपरिहार असं आणि असंच बरंच काय काय आठवतं :-)
तसं मोगर्‍याचा वास आला की गरम सोसाट्याचा वारा, शेवरीचा उडणारा कापूस, रसना सरबत, कच्च्या कैर्‍या, अन परीक्षेची धडधड हे एक समीकरण आहे!
हे दोन्ही आठवून नॉस्टेल्जिक व्हायला झालं :-)


Gajanandesai
Thursday, December 27, 2007 - 6:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मोगर्‍याचा सुंगध आला की मला मी चार-पाच वर्षाचा असताना झालेले माझ्या एका आतेभावाचे लग्न आठवते. कारण त्यात सगळ्या करवल्यांनी केसात मोगर्‍याच्या वेण्या घातल्या होत्या आणि सार्‍या मंडपात त्याचा घमघमाट पसरला होता.

कैर्‍या आठवल्या की मलाही वार्षिक परीक्षा आठवते. एकदम कोवळ्या चिंचा दिसल्या की तुळशीची लग्नं आठवतात.


Lajo
Thursday, December 27, 2007 - 6:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सत्र्णे ऊड्डाणे... मारुतीची आरती म्हंटली/ ऐकली की मला लहानपणी जायचे त्या दादरच्या (शिवाजी पार्कच्या )समर्‍थ व्यायाम मंदीराच्या दर शनीवारच्या आरतीची आठवण होते आणि त्याबरोबर नंतर मिळणार्या खोबर आणि पेढ्याच्या मिश्र खिरापतीची...

स्वर आणि गंध या बरोबर आठवणीतल्या चवी पण add करायला पाहिजेत


Rutu_hirwaa
Thursday, December 27, 2007 - 1:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लाजो- अनुमोदन!
माझी सुद्धा एक आठवण आहे..
लहानपणी माझ्या घराच्या शेजारी ताराराणी नावाची एक शाळा होती म्हणजे अजूनही आहे.
माझी आजी मला शाळेत सोडण्याचे कष्टप्रद(?) काम आनन्दाने करत असे..मी पहिले सहा महिने आजीला माझ्यासोबत शाळेत बसवून ठेवल्याचे ती सान्गते :-)

तर घरापासून जवळच होती ती शाळा..
पण शाळेचा रस्ता माझ्या लक्षात येईल आणि मी रडेन म्हणून आजी नेहेमी वेगवेगळ्या मार्गानी मला शाळेत न्यायची..

त्या शाळेत अशोकाची खूप झाडं होती आणि त्यान्चा एक विशिष्ट सुगन्ध यायचा..मला कसलीतरी भिती वाटायला लागायची आणि समजायला लागायचा की चाल्लो आपण शाळेकडे...फ़सवलय आजीनी चक्क आपल्याला.. :-(

अजुन ही ताराराणी च्या समोरून जाताना 'तो' वास आला की उगाचच घाबरायला होतं :-)


Mrdmahesh
Thursday, December 27, 2007 - 2:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आकाशवाणी च्या औरंगाबाद - परभणी केंद्रावर रोज दुपारी १२:३० ते १:०० मराठी भावगीतांचा कार्यक्रम असायचा आणि त्याचवेळी आमची शाळा सुटायची.. शाळा जवळच असल्यामुळे आम्ही पायीच घरी जायचो.. जाताना सगळ्या कॉलनी भर आम्हाला ही गाणी ऐकायला मिळायची.. अजूनही काही मराठी भावगीतं लागली की मला माझी शाळा सुटलीये असंच वाटतं.. "त्या फुलांच्या गंधकोषी.." हे गाणं लागलं की हमखास तसं वाटतं...
आणि १२ वी ला (नांदेडला) असताना अनूप जलोटाची भजनं शेजारच्या अंबामाता मंदिरात सकाळी लावली जायची.. तो काळ परिक्षांचा होता.. एक एक पेपर जस जसा होत होता तस तसं टेन्शन कमी होत होतं.. त्यात ही भजनं मनाला आणखीनच आनंद द्यायची.. अजूनही ती भजनं लागली की मला आपलं उगीचच आपलं एक टेन्शन कमी झालंय असं वाटायला लागतं आणि ती भजनं मी समरसून ऐकतो..


Yogesh_damle
Friday, December 28, 2007 - 3:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा!! सुंदर अनुभव आहेत रे एकेकांचे!! :-)

१) मला उन्हात तापलेल्या गादीचा खरपूस वास आला की उन्हाळ्यात गच्चीत झोपणं आठवतं- आणि शेजार्‍याच्या लेकाचं गादी ओली करणं सुद्धा!

२) तापलेलं लोखंड, गारगोटीतून येणारा जळका वास मला रेल्वेच्या ब्रेक्स ची आठवण करून देतात- तिथून आठवण येते सचखंड एक्स्प्रेस मधल्या Pantry मधल्या cutlets ची.

३) जय साबणाच्या मोगर्‍याचा वास आणि तेव्हांचं त्याचं चकचकीत गुलाबी रॅपर.....
४) किओ कार्पिन चा वास्-
५) क्लिनिक प्लस चा जुना वास-
६) Halo म्हणून एक शॅम्पू यायचा, त्याच्या egg variant चा वास.
७) ओडोमाॅसचा जुना वास (मला त्याची चव पण खूप आवडते!!) :-)
८) मिल्टन वाॅटरबाॅटल्स ना एक विशिष्ट वास यायचा. तो वास आला की मला हटकून तहान लागते.
खोडरबराच्या वासाने भूक लागते! :-)

९) चंदनाने बरबटलेल्या सहाणेचा वास आठवतो...
कापूर घोळलेल्या तीर्थाची चव आठवते

१०) कण्हेरीचा वास मला insecure करतो....
११) घंटीफूल्-उर्फ्-बुचाच्या फुलांच्या वासामुळे जायफळ आठवतं...
१२) मला लहानपणी आजोबा त्यांच्या सुरकुतलेल्या हातावरून कायमचूर्ण खाऊ घालायचे- त्या हाताचा स्पर्ष आठवतो,
१३) पारिजात आठवतो, बोटांनी त्याचा केशरी दांडा चुरलेला आठवतो लहानपण आठवतं-ते आणि पारिजात मात्र आता जवळपासही नाही! :-)


Sonalisl
Friday, December 28, 2007 - 7:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरच...एखाद्या विशिष्ठ वासाशी एखाद्या व्यक्तीच्या किंवा जागेच्या किंवा बालपणीच्या दिवसांच्या आठवणी जुळलेल्या असतात. मग तो वास आला कि ते दिवस आठवतात अन मनाला प्रसन्न करुन (कधी दुखवुन) जातात.

लहानपणी आमच्या अंगनात बुचाचे झाड होते. पावसाळ्यानंतर त्याच्या फ़ुलांचा सडा पडायचा... तो वास मला खुप आवडतो. कर्वे रोड वर, गरवारे काॅलेज जवळ ते झाड आहे. तीथुन घरी येताना मी रोज फुलं वेचुन आणायचे.
अजुनही नव्या पुस्तकांचा अन रेनकोटचा वास घेतला कि शाळेच्या नवीन वर्षाची आठवण येते.
फ़टाक्यांचा वास मला आवडतो. दिवाळीतले तसे आवडण्यासारखे बरेच वास असतात. जसे..फ़राळ बनवताना येनारा खमंग वास, उटण्याचा वास, सुवासिक तेलाचा पण फ़टाक्यांचा वास आला कि फ़क्त दिवाळी आठवते.
खायच्या पानाचा वास आला कि आजोबा आठवतात. आमच्य घरात फ़क्त तेच पान खात. त्यांचा एक पितळेचा डब्बा होता. ते बाहेर फ़िरायला गेले कि आम्ही तो खेळायला घ्यायचो अन ते येताना दिसले कि ठेउन द्यायचो.
जळत्या लाकडचा (सरपनाचा), शेणाचा वास मामाच्या गावाला घेऊन जातो. तेव्हा ते बंबात पाणी तापवनं, चुलीवर स्वयंपाक करणं सगळं आठवतं. आता घरात गॅस, शेगडी आली तरी अजुनही मामीने चुल ठेवली आहे. आम्ही गेलो कि हमखास त्यावर कोंबडीचं कालवण केलं जातं. पुण्यात एकदा गाईला घास द्यायला गोठा शोधुन गेलो होतो, तेव्हा शेणाचा वास नकोसा झाला होता. पण लहानपणी आम्ही मामाकडे असताना शेण शोधुन आणुन आमची खेळण्याची जागा सारवली होती. :-)
Sonalisl
Friday, December 28, 2007 - 7:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान आहे हा बीबी. धन्यावाद Tanya :-)

Supermom
Saturday, December 29, 2007 - 12:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहाहा, कित्ती आठवणी जाग्या झाल्या म्हणून सांगू.
खसच्या अत्तराचा वास आला की लहानपणी आई आवर्जून करायची ते चैत्रगौरीचं हळदीकुंकू आठवतं. ती वाटल्या डाळीला दिलेली खमंग फ़ोडणी, ते जरीच्या साड्यांना येणारे वेगवेगळ्या अत्तराचे वास,सोबत नुसत्या दुधाच्या, जायफ़ळ घातलेल्या कॉफ़ीचा वास..


Rutu_hirwaa
Sunday, December 30, 2007 - 9:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योगेश..

सुरेख तरल आणि अगदी आठवणींचं झाड हलवून लिहिल्यासारखं वाटलं बघ तुझी पोस्ट वाचून..:-)

विशेषत:
"पारिजात आठवतो, बोटांनी त्याचा केशरी दांडा चुरलेला आठवतो लहानपण आठवतं-ते आणि पारिजात मात्र आता जवळपासही नाही! "

हे तर अगदी अगदी जुळतं कारण पारिजातक माझ्यासुद्धा आवडीचा प्रांत..

माझी शाळा अम्बाबाईच्या देवळाला लागूनच होती कोल्हापुरात..तिथला सनई चौघडा बरोबर आमच्या सहाव्या तासाला वाजायचा.. अजूनही देवळाच्या रस्त्याला लागल की ही आठवण येते आणि मन पुन्हा त्या सहाव्या तासामध्ये रेंगाळतं..:-)Avikumar
Tuesday, January 22, 2008 - 1:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मोगर्याचा सुगंध मला नेहमी बालपणीच्या परिक्शेच्या कालावधीत घेउन जातो. आई मला नेहमी प्रत्येक पेपरला जाण्याआधी एक फुल द्यायची. :-)

Raviupadhye
Wednesday, January 23, 2008 - 10:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नवी कोरी रेशमी साडी परिधान करून सत्यनारायणाच्या पूजेस बसलेली अर्धान्गिनी त्या साडीचा वेगळाच सुगन्ध असतो,तिला बासनातील अत्तराचा दरवळ असतो,त्यासोबत गुरुजीन्च्या मन्त्रान्चा गजर आणि मग प्रसादाचा दरवळ.

Satishbv
Wednesday, January 23, 2008 - 12:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी शाळेत जाताना लोकल ट्रेन मध्ये एक फेरीवाला 'पंचवटी अगरबत्ती' विकायला यायचा. जवळपास पाच वर्षे तो सुवास अनुभवला होता. त्यानंतर तब्बल १८ वर्षा नंतर काल एका टक्सी मध्ये तो ओळखीचा सुगंध पुन्हा आला. चौकशी केल्यावर ड्राइव्हरने पाकीट दाखवीले ती 'पंचवटी अगरबत्ती' होती.

Runi
Wednesday, January 23, 2008 - 9:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला कुठेही मोगर्‍याचा वास खुप भरभरुन आला की सारसबागेचे मुख्य गेट आठवते. तिथे नेहमी गजरे विकणारे असतात.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७


 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators