Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 19, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » जुने दिवस » Archive through December 19, 2007 « Previous Next »

Anaghavn
Wednesday, December 12, 2007 - 5:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओ sandu brothers तुम्ही सांगितलं नाहीत अजून तुम्ही मला आणि माझ्या भावाला कसं ओळखता ते?
लहानपणी मी आणि माझी मैत्रीण ५० पै. ची बोरं घेऊन खायचो खुप.
त्या दुधाच्या गोल्या औ.बाद ला पण मिळायच्या.गटागट,झालच तर बोरकुट,मस्ताना कुल्फी---मज्जा यायची.
पण हे सगळं आई पासून चोरून हा!!
अनघा


Swa_26
Wednesday, December 12, 2007 - 5:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्किकाका..... अहो, दादरला प्लाझा आहे अजुनही!!

Manjud
Wednesday, December 12, 2007 - 6:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दादरचं प्लाझा आणि त्याच्यासमोरचं तृप्ती रिनोव्हेट करून अजूनही उत्तमपणे चालू अहेत.

Aashu29
Wednesday, December 12, 2007 - 9:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा लहानपणचा अत्यंत आवड्ता खाउ म्हणजे ती ओली बडिशेप आणि आवळासुपारीची पुडी!! वाव, अगदि वर्गात पण खायचे बर्याचदा!

Nkashi
Wednesday, December 12, 2007 - 10:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आशु, आधीच माफ़ी मागते...
आमच्याकडे आवळ्याच्या सुपारीला कावळ्याची shit म्हणायचे त्यामुळे atleast शाळेत असताना तरी मी ती खात नव्हते.


Dakshina
Thursday, December 13, 2007 - 7:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आशू, कसऽऽऽली आठवण करून दिलीस. कोल्हापूरला पण अंबाबाईच्या देवळात आवळे, आवळ्याची ओली सुपारी, सुकी सुपारी, नुसत्या चिंचा, त्यांचे मिठ लावलेले गोळे, खारवलेले, किंवा तिखट भुरभुरलेले आवळे पण मिळायचे..... लिहीताना पण तोंडाला नुसतं पाणी सुटलंय. आम्ही असला सगळा मालमसाला शाळेला जातानच 'पिक' करायचो. आणि नावडत्या तासाला चघळत बसायचं. पलिकडे, मागे पास करायचं. ज्या मुली, देवळाच्या बाजूला रहात नसत, त्या आम्हाला आणायला सांगत, मग तर आमच्या पण "श्टॉक "मध्ये भर पडायची, कारण आणल्याबद्दल आम्हाला पण थोडंथोडं मिळायचं.

Dineshvs
Thursday, December 13, 2007 - 12:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा, नेरली विसरलीस ? ती हमखास मिळायची जागा फ़क्त तीच आहे.

Swati_rajesh
Thursday, December 13, 2007 - 1:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

season madhe karavand anni jambhale suddha.

Sandu
Thursday, December 13, 2007 - 8:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनघा, मि येथे खोट्या नावाने वावरतो. माझा नाव गाव पत्ता मी तुला सांगु शकत नाही. मी येथे काही लोकांवर करडी नजर थेऊन आहे.

Rutu_hirwaa
Friday, December 14, 2007 - 10:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा दक्षिणा कसली भारी आठवण काढलीयेस अग...यम्मी
अग आमची शाळा तर अंबाबाईच्या देवळाला खेटूनच होती..
मधल्या सुट्टीत त्या देवळात पळून जायचे आणि त्या रामाच्या पारावर पाय सोडून बसायचे चिंचा चघळत..

आणि हो दिनेशदा
नेरली विसरणे शक्य नाहीये..

झालंच तर.. कधीमधी बाबा शाळेतून घरी न्यायला आले तर मस्का मारून राजाभाऊची भेळ खायची. .. तिखट करायला सांगून नंतर खाताना वाहणारं नाक पुसत पुसत :-)


Hkumar
Saturday, December 15, 2007 - 7:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला पूर्वीचे नाटकाचे तिकीट दर अजून आठवतात. रू. ७,६, ५, ४ व ३! आता त्या रकमेत मध्यंतराचा चहा आला तरी पुष्कळ!

Hkumar
Saturday, December 15, 2007 - 7:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि सिनेमाच्या बाबतीत बाल्कनी व ड्रेस सर्कल मध्ये फक्त १ रू. चा फरक असायचा. तो एक रू. वाचवण्यात काय मजा वाटायची.

Anaghavn
Monday, December 17, 2007 - 9:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरं बरं.
आपल्याला काय!


Anaghavn
Monday, December 17, 2007 - 9:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वरील वाक्यं sandu brothers ला उद्देशुन होते.
अनघा


Dakshina
Monday, December 17, 2007 - 9:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऋतू, विद्यापीठ का? मी पद्माराजे

Rutu_hirwaa
Tuesday, December 18, 2007 - 6:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो दक्षिणा
मी १९९६ ची पास आऊट ग.. तू?

ह्म्म्म.. आमच्याजवळ ते आईस्फ़्रूट पण कसलं मिळायचं माहितेय..फक्त ५० पैशाला असायचं आणि तितके पण त्या वेळी नसायचे जवळ.. :-( बाकी हा बीबी मस्त उघडलायेस.. क्लास :-)


Sameer_ranade
Tuesday, December 18, 2007 - 7:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमची शाळ्ला आमच्या सोसायटिच्या गते बाहेरच होती. त्यामुळे बोर, चिन्चा, आवळे वाले यायचे नहित. पण शाळेपासुन ५ मिनिटावर एक जोशी बन्धु नावाच वाण्याच दुकान आहे. अजुनहि ते दुकान आहे. पण त्यावेळी आम्हि ६-७ जण त्याच्या दुकानात जायचो. दुकान ५ X २५ च असेल.त्यामुळे तस कहि गोष्टी ढापायला चांगला चान्स होता. २-३ नोकर असायचे पण सगळे आत मधे, धान्य अनि तेल वगैरे द्यायला. आम्ही ३-४ जण लाइनीत उभे रहायचो, बाकिचे बहेर कँच पकडायल. आणि पहिला कोण उभा राहनर ते थर्वाय्चो. तो मुलगा त्या मलकाल विचरायच एखद्या गोष्टिकडे हात दाखवुन, जोशि बन्धु त्याचा भाव कय? त्या मलकाचि मान वळली रे वळली कि अमच्या हातत जी खायचि वस्तु येइल ति पसार करायला सुरवात. अश्या बर्याच गोष्ती आम्हि ढापायचो. तेव्हा ढापुन खण्यत पण काहि वेगळीच मजा होति. आणि जे हताल मिलेल ते घ्यायचो. चिवढ्याचि पकिटं, पेढे, बाँल, बिस्किट्तं, बर्याच खयच्या वस्तु बाहेरच ठेवलेल्या असायच्या. एखाद-दुसरी वस्तु पैसे देउन घ्ययचो पण संशय यायला नको म्हणुन. हे असं साधारण वर्षभर चालल, करन आम्हि मधे मधेच जयचो. आणि वर्ष भरानंतर त्याच्या लक्शत आलं के ह्या मुलांचच हे काम आहे. मग आम्ही दुकानत शिरलो रे शिरलो कि ए सोन्या सुविद्याची मुलं आली रे, की सोन्या बाहेर. :-)

Sush
Tuesday, December 18, 2007 - 8:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिवढ्याचि पकिटं, पेढे, बाँल, बिस्किट्तं, बर्याच खयच्या वस्तु बाहेरच ठेवलेल्या असायच्या.........

खायचा बॉल???


Dakshina
Tuesday, December 18, 2007 - 11:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाचणार्‍याने शक्यतो, लिहिणार्‍याच्या भावना समजून घ्याव्यात.


Raviupadhye
Wednesday, December 19, 2007 - 10:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही १९७२ च्या आस पास ची गोश्ट आहे.मी साधारण पन्धरा वर्स बेन्गलोर ला काढ्ली.त्या काळात लिडो ला इन्ग्रजी सिनेमे यायचे. ऐन्शी पैसे स्टाल.दहा पैसे खारे दाणे आणि--------- दहा पैसे विल्स ची एक सिगरेट्-- चार आण्यात मसला दोसा मिळायचा. good bye mr chips,sound of music,guns of navaronne,poseidon adventure,dr zhivago अशी क्लासिक्स पाहून उत्तम इन्ग्लिश सिनेमाची रुची वाढ्ली.गम्मत म्हणजे त्याच काळात अनेक अआन्ग्लो इन्डिअन मित्र होते,त्यामुळे पऑप बीट्ल्स नील डायमन्ड,एन्गल्बेर्ट सारख्या रोमन्टिक गायकान्ची आवड लागली.साथोसाथ आनन्द मध्ये अमिताभ अन राजेश ख़न्ना गाजण्यास सुरुवात झाली होती.क्लास खूप बन्क करायचो.;सकाळी पेपर टाकणे,शिकवण्या करणे हे उद्योग करून ज़ोन वेन चे सिनेमे पहायचो I don't know if this makes sense to many

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators