Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 11, 2007

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट - अचाट आणि अतर्क्य » अचाट सीन आणि अतर्क्य लॉजिक » Archive through December 11, 2007 « Previous Next »

Monakshi
Wednesday, November 21, 2007 - 7:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्ही त्या पिक्चरला "हम साठ सत्तर है" असं म्हणायचो. च्यायला, केवढी माणसं होती त्यात.

Rashmee
Wednesday, November 28, 2007 - 12:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला अमर अकबर एन्थोनी पहिल्यान्दा पाहिल तेव्हा पसून पडलेलं एक कोडं म्हण्जे ते तिघं रूप बदलून व्हिलन च्या अड्ड्यावर जातात, आणि तिथे मस्त पैकी गाणं म्हण्तात "एक जगह जब जमा हो तीनो, अमर अकबर एन्थोनी" आणि तरी व्हिलन्स त्याना ते कोण आहेत हे का ओळ्खू शकत नाही?



Amruta
Wednesday, November 28, 2007 - 3:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग अस कस... कधीतरी त्या मठ्ठ डोक्यांच्या व्हिलनस ना कळत का हिरो वा हिरोइन रुप बद्लुन आलेले. ह्यात तर नाव सांगतात तरी कळत नाही.

Dakshina
Tuesday, December 04, 2007 - 6:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हीच, दिसत असून न समजण्याची गत 'लागा चुनरी मे दाग' ची. कालच लागला होता केबलवर. राणी मुखर्जीचं काम तसं बरंय. तरीपण माझ्या मते high level esccort बनण्यासाठी सुद्धा आजकाल खूप स्ट्रगल करावं लागत असेल. कोंकणा मुंबईत येते, आणि राणि आवरून (अचाट मेपक आणि अचाट कपडे घालून) ते पण बेरात्री बाहेर जाते तरी तिला कळत नाही? की आपली बहीण कुठे जाते ते? बेअक्कल!
मला तर ती ऑफ़िसला जाताना पण जरा आवरून गेली असती तर संशय आला असता...


Asmaani
Tuesday, December 04, 2007 - 10:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चित्रपट: क्रिश.
ह्या पिक्चरमधे पहिला ह्रितिक (क्रिश चे वडिल ) क्रिश च्या जन्माच्या वेळी मरतो असे दृश्य आहे. आणि त्याच वेळी असेही declair केलेय की मृत्यूपूर्वी तो (क्रिश चे वडील ) सलग २ वर्ष फ़ॉरिनला होता. .... can somebody explain? ( सर्व सामान्य मुलांसाठी pregnancy चा कालावधी ९ महिन्यांचा असतो. क्रिशला तो superhero असल्याने २ वर्षे लागली असावीत का?...... एक अति भाबडा प्रश्न!


Zakasrao
Tuesday, December 04, 2007 - 11:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अचाट डायलॉग ऐकला एक.
चित्रपट लावारिस.
राखि अमजद खानला त्याच्या बड्डेच्या विशेश देते. आनि म्हणते पुढच्या बड्डेला आपण आता तिघ असणार.
त्यावर अमजद उवाच ये हमारे बीचमे तिसरा कौन?
राखीच उत्तर हमारे प्यार कि निशाणी वै वै :-)
अमजदभायच उत्तर हमने तुम्हे चाहा तुअमने हमे चाहा इसमे ये बच्चा कहासे बीचमे आया
त्यावरच राखीच उत्तर स्वताच ऐका


Farend
Thursday, December 06, 2007 - 2:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकास सांगून टाक, कारण लावारिस कधी बघू सांगता येत नाही.

तोपर्यंत
हा पाहा विनोद खन्ना आणि राखी चा 'यल्ला यल्ला' डान्स :-) हा व्हिडीओ पाच मिनिटांचा असला तरी साधारण २.३० व्या मिनिटाला ती जगप्रसिद्ध action आहे. स्टोरी माहीत नसेल तर हे असे नाचतायत म्हणूनच अमिताभ रागावलाय असे वाटेल :-) आणि राखी ची हेअर स्टाईल त्या Star Wars मधल्या प्रिन्सेस लिया सारखी वाटते.

Manuswini
Thursday, December 06, 2007 - 3:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय अचाट स्टेप आहे ती यहाल्ला ची. :-)

मतीमंद मुले नाचताहेत असे वाटेल.


Deepanjali
Thursday, December 06, 2007 - 3:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि महेन्द्र कपुर च्या आवाजात ते याल्ला यल्ला कसले funny वाटते ना ?

Zakasrao
Thursday, December 06, 2007 - 11:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमोल
अख्खा डान्सच अचाट आहे की
लहान मुल पण छान करतील ह्यापेक्षा.
अरे यार तो डायलॉग माझ्या लक्षात होता आता काय आहे ते नीट आठवत नाहिये :-(
पण सुरवात सच्चे चाहनेवालोका असा काहितरी आहे बघ.
हा सिन त्या फ़िल्म मधल राखिवर चित्रित झालेल "मेरे अंगणेमे" ह्या गाण्यानंतर लग्गीच आहे बघ.
सापडेल नेट वर तो डायलॉग लिहि इथे


Dineshvs
Thursday, December 06, 2007 - 4:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे गाणे असे चित्रित झालेय हे माहितच नव्हते. त्या काळी ऑर्केष्ट्रा मधे हे गाणे आवर्जुन म्हणत असत. मला वाटते लता आणि आशा दोघींचे आवाज आहेत.
झकास, अरे तो डायलॉग खासच असणार. त्यामुळेच तर तो लावारिस ठरतो ना.

याच दरम्यान भुवया विचित्र रितीने कोरायची फ़ॅशन आली होती. अगदी कपाळात घुसतील इतक्या अर्धवर्तुळाकार भुवया कोरलेल्या असत. राखी, रेखा, झीनत, नितु, बिंदु, हेमा, सुलक्षणा सगळ्यानीच तश्या कोरल्या होत्या. डोळ्यांचा हेवी मेकप, आणि त्या भुवया. भयाण दिसत या बाया, त्यावेळी.


Bhagya
Friday, December 07, 2007 - 12:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा..... अगदी. परवाच रेखाचा खून भरी मांग बघितला.
आणि डोळ्यांत खुपले ते ती model बनते त्यानंतरचे तिचे कपडे आणि तो गाढा मेकप.


Divya
Friday, December 07, 2007 - 12:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://www.youtube.com/watch?v=1XC_DDZPAP8 हे एक गाण असच funny . सायराबानो धुण्याचे पिळे खळबळावे तशी गदागदा अंग हलवत डान्स काय करते, ते अय्या तर फ़ारच funny . फ़ोटो काय काढते, झाडावर काय चढते.


Dineshvs
Friday, December 07, 2007 - 3:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाग्य, त्यावेळी रेखाला, आपण किती ग्लॅमरस दिसु शकतो तेच दाखवायचे होते. आणि त्याकाळी सौंदर्याच्या कल्पना तश्याच होत्या. त्यातली सोनु वालिया, खरे तर मिस इंडिया होती बहुतेक. पण तिला बहुतेक मुद्दाम कमी सुंदर दाखवलेय.
माझ्या माहितीप्रमाणे हा सिनेमा रिटर्न टु एडन वर आधारित होता आणि याच कथेवर मराठीत दीपस्तंभ नावाचे नाटक आले होते.
त्यात अमिता खोपकर होती. नाटकात गिरिश ओक, तिचे डोके फ़ायरप्लेस मधे दाबुन धरतो. मग तिचा भयानक मेकपचा एक प्रवेश होता, आणि मग ती परत नॉर्मल होते.


Farend
Friday, December 07, 2007 - 3:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिव्या, सही. आधी मला वाटले हे गाणे ही ते तीन मोठे पायर्‍यांचे उतार असलेल्या वृंदावन गार्डन मधे चित्रीत झाले आहे की काय, पण हे दुसरीकडे दिसते :-)

त्या 'खून भरी मांग' मधे सोनू वालिया ही आहे ना? ती म्हणे जुदो का कराटे काहीतरी शिकलेली आहे. तरीही चित्रपटात तिच्या फाईट पेक्षा रेखाची (त्यातल्या त्यात) खरी वाटते :-)


Deepanjali
Friday, December 07, 2007 - 5:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इजाजत सोडला तर रेखा तिच्या 2 nd Ing मधे बहुतेक सगळ्याच movies मधे महा भयंकर दिसते !
खून भरी मांग मधे तर वाईट मेक अप चा उच्चांक गाठला होता .
आणि इतकी डबा figure असलेली बाई model होउ च कशी शकते ?
त्या काळात सुध्दा निदान models तरी slim च असायच्या .
रेखाचा bronze make up कधी कधी अगदी cheap दिसतो आणि गरज नसताना ती डोळे अजुन मोठे दिसावे म्हणून पांढरे cream liner लावते , शिवाय घार्‍या lences पण !
फ़ारच बटबटीत दिसते .
Latest ओम शांति ओम आणि परिणीता मधे तर रेखा अक्षर्श : धूड दिसते .


Dakshina
Friday, December 07, 2007 - 6:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिपांजली... हा हा धूड...

Ramani
Friday, December 07, 2007 - 7:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोक्स, पुनमने शोधलेल्या त्या ड्रॅक्युल्याच्या नाचावरचा हा गोड नाच पण पहा.
http://www.youtube.com/watch?v=s6R-ExU6kxU&feature=related

Dineshvs
Friday, December 07, 2007 - 9:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

DJ शहनाज हुसेनला काय नाव ठेवले आहे ?

Dakshina
Tuesday, December 11, 2007 - 10:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जॉनी गद्दार पाहीला, आत्यंतिक अचाट चित्रपट आहे. हिरो इतक्या लोकांना मारतो, तरी पोलिसांना कळत नाही?
शोध कसा काय घेत नाहीत? हिरो सरेआम खुल्ले मू हिंडतो?

इतका खतरनाक शार्दूल, त्याला कधीच कळत नाही, की त्याची बायको, आपल्याच गँग मधल्या पोट्ट्याबरोबर फ़िरते म्हणून?
वर एकदा हिरोच्या घरी तो बायकोची पर्स पण ओळखत नाही.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators