Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 10, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » जुने दिवस » Archive through December 10, 2007 « Previous Next »

Divya
Wednesday, December 05, 2007 - 1:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पिल्लु, फ़ारच भयानक अनुभव आहे. तुमची आणि तुमच्या मित्राच्या प्रसंगावधानतेचीपण कमाल आहे. अशावेळेस घाबरले कि काही सुचणार नाही.

Mrdmahesh
Wednesday, December 05, 2007 - 2:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद दक्षिणा, लोपा :-).
अनघा मी औरंगाबादला नातेवाईकांकडे सुट्टीत यायचो.. न्यू उस्मानपुर्‍यात संत एकनाथ थेटर जवळ कोणतं तरी "...लाल नगर" आहे तिथे माझी बहीण रहायची.. जिव्हेश्वर कॉलनी, गारखेडा, पदमपुरा आणि आकाशवाणी क्वार्टर्स मध्ये पण राहिलेलो आहे.. तुम्ही कुठे रहायचा औ'बाद ला? एक काळ असा होता की औ'बाद ला खूप नातेवाईक आणि वडिलांची मित्र मंडळी होती.. आता कोणी नाही.. गेलो तर हॉटेल मध्ये रहावं लागेल अशी परिस्थिती आहे.. असो.. गुलमंडीला लय "प्रेक्षणीय स्थळे" पहायला मिळायची :-).. आताचं माहित नाही..
पिल्लू, अनुभव खत्राच :-)..


Naatyaa
Wednesday, December 05, 2007 - 4:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ती लेन आली की आमच्यातला एक जण हटकून "दूऽऽऽऽध" अशी आरोळी ठोकायचा.. हमखास एक तरी काकू दूधवाला आलाय असं समजून भांडं घेऊन धडपडत बाहेर यायच्या.. (>>>>> phar bhaari.. lol..

sashal.. snh :-)

Amruta
Wednesday, December 05, 2007 - 5:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगदी अगदी दिव्या, आम्ही पण रात्र रात्र जागवली आहे गप्पा मारत आणि हसत :-) सही मजा यायची तेव्हा.

आंब्यावरुन आठवल माझी आज्जी आरे कॉलनी मधे रहात असे मग आम्ही सगळी भावंड उन्हाळ्याच्या सुटीत तिथे जमायचो आमच्यासाठी आमच गाव म्हणजे तेच. तिथे सॉलीड धमाल करायचो आम्ही. तिथेही आम्ब्याची काजुची फ़णसाची झाड आहेत. झाडांवर चढुन पण कैर्‍या काढल्या आहेत. रात्री आम्ही सगळी मुल गच्चीत झोपायचो. चांदण्या बघत झोपायला काय धमाल यायची. पहाटे ५ ला दुधाची गाडी यायची तेव्हाही उठुन काळोखात दुध घ्यायला जायचो. आणि नंतर morning walk रस्त्यांवर गुलमोहराचा सडा पडलेला असायचा.

हल्ली आरे कॉलनी म्हणजे एवढी वहान वाढली आहेत त्या रस्त्यावर आम्ही त्या काळी इतके पायी भटकलोय शक्य नाही आता काहिच :-(


Anaghavn
Thursday, December 06, 2007 - 4:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महेश,ते संत एकनाथ थेटर नव्हे..."रंगमंदिर" आहे.
आणि "जवाहरलाल नगर"--पण जरा दूर आहे ते.
anyway गुलमंडी वरची प्रेक्षणीय स्थळे अजुनही असतात.तशी ती कायमच असतिल----निरनिराळ्या फुलांची मंडई (गुलमंडी) असं ऊगीचच का म्हणतात तिला?
माझं "माहेर" उसमान पुर्यातच्--श्रेयनगर येथे आहे.
औ.बाद ची आठवण काढुन बर वाटलं.
अनघा


Nyati
Thursday, December 06, 2007 - 5:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनेक जागान्शी खुप आठवणी जोडलेल्या आहेत.
काहीही निमित्त पुरायचे सेलेब्रेट करायला..सन्तोष बेकरीजवळ फ़ुटपाथवर बसुन खाल्लेले पटीस
सन्भाजी पार्क मध्ये भेळ एकावेळी एकेक डिश ओर्डर करुन ति सगळे मिळुन सम्पवणे आणि पुन्हा तेच ओर्डर करणे..


Limbutimbu
Thursday, December 06, 2007 - 7:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की, एक आण्याच किरमिर नाण मी बघितलय, वापरलय, दोन आण्याच चौकोनी?????? ते नाही बा कधी बघितल! तुमची काही गफलत नाही ना होत?
रुपयेका १ / ४ हिस्सा अस लिहिलेले चार आने तेव्हा प्रचलीत होते
ताम्भ्याचे गोल एक पैषाचे नाणे, नि नन्तर आलेले एक पैशाचे चौकोनि नाणे चान्गलच लक्षाते!
:-)

Pillu
Thursday, December 06, 2007 - 11:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज जरा हटके

मी काल सांगीतले की आम्हाला घाण सवय लागलेली रोज काही ना कही शिकार करायची आणी त्या शिवाय घरी परतणे अशक्यच. आज मी जे काही लिहिणार आहे याच्यावरुन वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही पण जे मी प्रत्यक्ष अनुभवलेले आहे आणी आजही ही जागा त्याच्या गुणदोषासहीत अस्तित्वात आहे ते नाकारणे किमान मला तरी अशक्यच आहे.

गावाच्या मागे २५३० वर्ष्यांपुर्वी खासगी जंगल होते आता ते नाहीये लागलेल्या ( की लावलेल्या) आगीत ते जंगल आज अस्तित्वात नाही. या ठिकाणी आम्ही आमची गुरे घेउन जात असु ईथे बुवा साहेब नावाच्या एका थोर साधुची ( देवाची ) जागा आहे हे स्थान प्रचंड जाग्रुत आहे. असे म्हणतात की या ठिकाणी कुठलीही स्त्री जाताना तिच्या बांगड्याचा आवाज न करता जाते. मासीक पाळी असताना तर जाणे केवळ अशक्यच. या ईथे कुठलेही झाड कोणीही तोडु शकत नाही. कारण झाड तोडले तर त्या तोडणार्या माणसास आगीमोहोळ्च्या माश्या जिवंत घरी सोडत नाही बहुतेक याच कारणा मुळे असेल कदाचित पण येथे जंगल प्रचंड फोफावले होते अर्थात वाळलेले आणी तेही खाली पड्लेले सरपण याला न्यायला बंदी नव्हती. तर सांगण्याचा मुळ मुद्दा असाअ की एक दिवस गुरे चारत चारत आम्ही या ठिकाणी पोहोचलो निवांत वेळ होती आमच्या ९६ वर्षाचे आजोबा होते आम्ही तिघे शांत पणे पहुडलो होतो.गुरेही रवंथ करत शांत पणे बसुन होती........... आणि मी मित्राजवळ विषय काढला की कारे आज काहि शिकार नाही मिळाली नाही घरी जायची वेळ झाली की.
अरे यार मीळेल आपल्याल शिकार काही तरी. आणी येव्हढ्यात एका विशिष्ठ पक्षांचा गोंगाट ऐकु आला जेंव्हा केंव्हा संकट दिसेल त्या वेळी हे पक्षी गोंगाट करतात आणी विषेशत्: साप दिसला की जास्तच.
याचे खेडेगावातले नाव त्याच्या आवाजा वरुन पडले असेल पण गेंगाण्या म्हणतात.

मी ओरडलो अरे शिकार चल पळ लवकर. मी आणी तो फरशी कुर्‍हाड घेउन आवाजाच्या दिसेने पळत सुटलो बघितले तर एका झाडावर प्रचन्द मोठे सपाचे धुड पक्षंच्या घरट्या कडे चालले होते. ती जागा अशी होती की ते जांभळाचे झाड होते त्याचा खाले एक मोठा कातळ ( ताशिव दगड असवा त्या प्रमाणे ) कातळा खाली जिथे तो संपतो त्या ठिकाणी ओढा पण पाणी नसलेला, ज्या ठिकाणी आम्ही उभे होतो त्या ठिकाणी मात्र झर्‍यातून एक एक टिपका पडुन तयार झालेले आणी फक्त पायाचा तळवा भिजेल येव्हढेच पाणी पण काचे सारखे स्वच्छ
तर आम्ही ओढ्यातील दगडी घेउन सापाला मारण्यास सुरुवात केलि( ईथे एक सांगायचे राहुन गेले की आमच्या गुरांना देखिल मारायची बंदी होती ) एव्हढे नेमबाज आम्ही पण एकही दगड त्या सापाला लागत नव्हता हात दुखु लागले पण आम्ही त्याला खाली पाडायचा निर्धार केला होता ( त्याशिवाय आमची शिकारीची हौस कशी फिटेल ना?) शेवटी एकदाचा एक दगड त्या सापाला लागला आणी नंतर लागतच गेले त्यात माझे २ ३ अस्तील साधारण ३० ते ४० फुट उंची वरुन ते प्रचन्ड धुड खाली कोसळले. ते खाली पडले ते नेमके त्या पाण्याच्या डबक्यात पाणी त्याचा पड्ल्या मुळे जोरात बाहेर फेकले गेले त्या क्षणी आम्ही आमच्या कुर्‍हाडी परजलेल्या होत्या हेतु हा की साप जर अंगावर धावुन आला तर खांडोळी करायला. पण झाले भलतेच तो साप पडल्याक्षणीच अद्रुष्य झाला कुठे गेला हे कळालेच नाही. आणी साप कुठे जाणे शक्यच नव्हते त्याला जाण्या साठी कुठेहि जागा नव्हती. खुप वेळ वाट पाहुन आम्ही कंटाळुन निघुन गेलो हा प्रकार आम्ही त्या आजोबानां सांगीतला त्यांनी आम्हाला खुप शिव्या घातल्या आणी भोगा तुमच्या कर्माची फळ असे म्हणुन मोकळे झाले आम्ही काही घडलेच नाही आणी काही होणारच नाही या खात्रिने घरी आलो. गुरे बांधुन झाल्यावर मी जेवलो. आणी नेहमी प्रमाणे फेर फटका मारायला चावडीकडे निघालो
त्याच वेळी त्या मित्राचा भाउ माझ्या कडे पळत येत होता तु लवकर घरी चल असे म्हणुन जवळ जवळ ओढतच तो मला नेउ लागला. घरी जाउन पहतो तर तो मित्र झोपला होता त्याच्या अंगावर घरात होत्या त्या सर्व रग, गोधडी टाकल्या होतया आणी कमी पडले म्हणुन ७८ माणसे त्याच्या अंगावर झोपली होती हे सर्व घेवुन हि त्याची हुडहुडी थांबत नव्हती त्याचे शेजारी आमच्या गावातील एक व्यक्ती जिच्या अंगात वेताळ बाबांचा संचार येत होता ते होते. त्यानी मला झालेली घटना जणु काही त्यांनीच केली आहे अशी वर्णन करुन सांगीतली आणी वर विचारले की हे खरे आहे का?
मी अवाक झालो याचा ईथे काय संबंध? तरी पण मी हो म्हणालो मेलो असे म्हणुन त्याचे वडिल जोरात ओरडले.मग ते वेताळ बाबा म्हणाले की ऐक यांनी बुवासाहेबांच्या आंगातुन रक्त काढले आहे आणी त्याला रक्त दिल्या शिवाय याची सुटका नाही. बोल नेऊ का याला शेवटी सर्वा जण शरण गेले आणी एका कोंबडीवर प्रश्न सुटला तसे वचन त्याच्या वडिलांकडुन त्यांनी घेतले त्याच वेळेस तो मुलगा खाड्कन ऊठुन बसला आगा काही झालेची नाही या थाटात घरात बघुन म्हणाला काय हे येव्हढी पांघरुने माझ्या आंगावर का घातलीत.मला धारा काढायच्या आहेत हे माहीत नाही का?

तर मंडळी झाले असे होते की हा ही घरी आल्यावर गुरे बांधुन धाराच काढत होता पण एकाएकी तो खाली पडला हे त्याचा वहिनिने पाहीले विचित्र हाव भाव पाहुन मित्राच्या भावाला बोलावुन आणले व घरी नेले थंडी थांबेना असे पाहुन त्यांनी हा प्रकार काही तरी वेगळा आहे हे पाहुन त्यांनी वेताळ बाबांना बोलावुन आणले संचार आल्या नंतर प्रथम त्यानी मला बोलावले आणी म्हाणाले की तुला का सुटका तर तु या गावात पाहुणा आहेस ईथले नियम तुला माहीत नाहीत म्हणुन तुला सुटका पण याला नाही अरे सापाच्या वेषात बुवा साहेबच होते आणी तुमची खोड मोडण्या करीता त्यांनी हे घडवुन आणले.

मी आजही गावात गेलो तर प्रथम या ठिकाणी जातो नमस्कार करुन जे काही काम आहे ते करुन परत येतो..... आणी या प्रसंगा नंतर मी सापच काय पण गावात माशी सुद्धा मारत नाही हे सांगणे न लगे


Ladtushar
Thursday, December 06, 2007 - 11:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सही !! कसली थरार घटना आहे !! कोकणात असे खुप किस्से घडतात, आम्ही लहान पणी रात्रि अगणात जमत असू तेव्हा कोणी तरी असल्या गोष्टी सांगत असे .... अश्या खुप जागा असतात तिथे खुप घनादात जाळी जंगल असते अणि असल्या कथा असतात ते सुरक्षित ठेवान्य साठी.

Mrdmahesh
Thursday, December 06, 2007 - 2:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनघा,
हां बरोबर ते रंगमंदीर आहे.. ते जवाहरलाल नगर माहित आहे मला.. पण हे पन्नालाल नगर का काय आहे.. (मला वाटतं पन्नालाल नगर तर स्टेशन जवळ आहे.. छ्या.. सगळाच घोळ आहे.. जाऊद्या..)..
पिल्लू डेंजर अनुभव :-)
लिंबूभाव मलापण ही नाणी आठवतात.. शाळेजवळच्या वाण्याकडून पेनात शाई भरून घ्यायचो तेव्हा १ पैशाची २ नाणी दिलेली अजूनही आठवतात मला.. अन् ते १ / ४ वालं नाणं तर मी उगीचच आकर्षक वाटलं म्हणून खिशातच ठेऊन घेतलं होतं कितीतरी दिवस.. :-)


Sandu
Thursday, December 06, 2007 - 9:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनघा, तु श्रेयनगर मधिल मनोहर अपार्ट्मेन्ट राहात होतिस ना? तुला एक ठेंगणा पण चुणचुणीत असा भाऊ आहे ना? त्याचे मित्र फ़ार आगाऊ होते

Nilima_v
Thursday, December 06, 2007 - 9:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सांडू
एवढा तु ओळखतोस तर तूच तिच्या भावाचा मित्र नाही कशावरून?
आणि सांडू काय पण नाव आहे?
तूझी आगावूपणाची काही जुनी आठवण आहे का?
हा माझा E-आगावूपणा

Dakshina
Friday, December 07, 2007 - 5:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

(तूझी अगावूपणाची काही जुनी आठवण आहे का?)...... निलिमा...

Anaghavn
Friday, December 07, 2007 - 8:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो, महेश, "पन्नालाल नगर"च्--अगदी बरोबर.पण तिथे कोणाकडे तू येत होतास?तिथले काहीजण ओळखीचे आहेत.माझ्या सासरचे लोकही तिथेच रहायचे.
sandu तु कसं ओळखलस?तू कुठे रहायचास्राहतोस ऑ.बाद ला?
आणि माझ्या भावाला कसं ओळखतोस?
अनघा


Mrdmahesh
Friday, December 07, 2007 - 12:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनघा,
माझी बहीण तिथे भाड्याच्या घरात रहायची. त्या घरमालकांचं नाव मला आता आठवत नाहिये. पण त्यांच्या घराच्या बरोब्बर मागच्या बाजूला गणपती मंदिर आहे. मंदिराची आणि घराची कंपाऊंड वॉल एकच.. या गणपती मंदीराला उजवीकडे ठेवत यू टर्न मारला की एक का दोन घरं सोडून तिचं घर होतं..
या ठिकाणा पासून चालत जाऊन मी स्टेशनच्या जवळ असलेल्या "सत्यम" टॉकीज ला एकाच दिवशी दोन सिनेमे पाहीले होते.... एक खामोष (शबाना आझमी, अमोल पालेकर) आणि दुसरा बॉण्डपट होता... हे टॉकिज बंद पडलं वाटतं..


Nilima_v
Friday, December 07, 2007 - 8:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही दिप्ती, प्रत्यक्षात मी तेवढा आगाऊ नाही.
म्हणुन आंतरजालावर आगाऊपणाची हौस भागवून घेतो.
अनघा तु तूझ्या प्रोफ़ाइल मध्ये एवढी माहिती दिल्यावर तूझी
पोस्ट्स तूला ओळखणारे वाचणार की, त्यात नवल काय?
हा सांडू कोणिही असू शकतो, तुझा नवरा देखिल.


Zakki
Saturday, December 08, 2007 - 8:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुमची काही गफलत नाही ना होत?
छे छे, मुळीच नाही. चौकोनी दोन आण्याचे पिवळे नाणे होते. आता ५० पासून ५६ पर्यंतच ते अस्तित्वात होते. नंतर लगेच नये पैसे आले.म्हणून मग सगळे आणे बंद झाले. नि भोकाच्या दिडक्या पण. पै तर आधीच गेली होती. मी पण बघितली नव्हती. फक्त शाळेत ३ पै चा एक पैसा, चार पैशाचा एक आणा, दोन आण्याची एक चवली, दोन चवल्यांची एक पावली, चार पावल्यांचा एक रुपया असे कोष्टक होते.
शिवाय सोळा छटाक म्हणजे एक शेर, चाळीस शेर म्हणजे एक मण असेहि.



Tanyabedekar
Saturday, December 08, 2007 - 8:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छटाकचे कोष्टक आजही लोकांना कळते. फक्त त्याचे कारण वेगळे आहे. :-)



Dakshina
Monday, December 10, 2007 - 6:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझे बाबा, काका, नेहमी त्यावेळच्या स्वस्ताई चे कौतूक सांगतात. मी लहान असताना ही काही फ़ार स्वस्ताई नव्हती, पण आत्त चे बाजारभाव पहाता त्यावेळी नक्कीच सर्व गोष्टी स्वस्त होत्या. दूध ६ रुपये लिटर, तेल १३ रुपये किलो. टूथब्रश ८ रुपये. रंगपेटी ३ रुपये. (घाबरू नका, सगळे दर नाही देणार इथे ) पण शाळेत ५ पैशाच्या ३ गोळ्या (त्या अशा छोट्या छोट्या, गोल, गुलाबी) ५० आणि ७५ पैशाला भेळ असं सुद्धा आम्ही खायचो. आमच्या शाळेसमोर एक माणूस गाडी लावायचा भेळची. ज्योतिर्लिंग का असंच काहीतरी नाव होतं त्या गाडीचं. ख़ाऊला जस्तीत जास्त २ रुपये द्यायचे बाबा. ते पण खूप वाटंत. ५ म्हणजे तर डोक्यावरून पाणीच. शाळेशेजारी शिवस्वरूप नावाचं स्टेशनरीचं दुकान होतं छोट्या छोट्या गोष्टी तिथूनच विकत घ्यायचो. कधी कधी पैसे नसायचे तर उधार पण घ्यायचो. आणि पैसे देऊ शकत नाही तोपर्यंत दुकानासमोरून मान खाली घालून जायचो, तो विचारेल या भितीने. अर्थात पैसे कधी बुडवले नाहीत त्याचे.

Hkumar
Monday, December 10, 2007 - 7:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या आठवणीत १ पैशाला १ फ़ुगा मिळायचा. ५ पैशात सायकलच्या दोन्ही चाकात हवा भरून मिळायची. नंतर ५ पैशाला एका चाकात झाली तर लोकांना महाग वाटली!

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators