Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 08, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » माझा वेंधळेपणा » Archive through December 08, 2007 « Previous Next »

Dineshvs
Monday, November 26, 2007 - 7:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

RK म्हणजे Raj Kapoor, Ranadhir Kappor आणि Rishi Kapoor पण
झालच तर Rajiv Kapoor सुद्धा ( आठवतोय का तो ? )




Nandini2911
Monday, November 26, 2007 - 7:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा, रणबीर सोडल्यास मी कुणासोबत काम करत असेल का?
राजीव कपूरला मी भेटलेय म्हणून माझा लक्षात आहे. बाकीच्याचं माहीत नाही


Zakki
Monday, November 26, 2007 - 4:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता तो कुमार होता का खान होता हे कसे आठवणार? जिना उतरून खाली पोचेस्पर्यंत खाली का आलो हे विसरतो मी. कधी काळी वाचलेल्या रेहाअचे नाव खान का कुमार हे कसे लक्षात रहाणार?

जरी खान असला तरी RK म्हणजे रेहान खान होउ शकतो. तर मला वाटले तोच असेल. वेडा झालाय् ना! नि ती सारा भटकते आहे दुसर्‍या कुणाबरोबर तरी चैनीत, मजेत!

असल्या या बायका!

हटकेश्वर, हटकेश्वर!!


Badamraja
Tuesday, November 27, 2007 - 9:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा वेंधळेपणा माझ्या मित्राच्या बहीनीने केला होता.
तीने चक्क तेल तापलाय की नाही ते बघन्यासाठी त्याच्या मधे बोट घालुन बघीतल... तेव्हा ती सातवी मधे असेल
ती जेव्हा पण समोर येते तेव्हा मला तीच ते फ़ोड आलेल बोट आठवत.


Devsakhi
Friday, November 30, 2007 - 6:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परिक्षेला जाताना पेपर एक आणि अभ्यास दुसरयाच विषयाचा कोणि केला आहे का?


:-) मी केला आहे पराक्रम :-) तेहि मेडिकल
collegemadhye first year la :-)

(he First marathi kase lihayche ??)

Mrdmahesh
Friday, November 30, 2007 - 6:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फर्स्ट pharsT .. बघ जमतंय का?

Tiu
Friday, November 30, 2007 - 9:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परिक्षेला जाताना पेपर एक आणि अभ्यास दुसरयाच विषयाचा कोणि केला आहे का?
>>>
मी केलाय! आठवीत असतांना... history च्या पेपरला geography चा अभ्यास करुन गेलेलो...४० पैकी ७ मार्क्स मिळाले होते! रिझल्ट लागल्यावर अक्ख्या क्लासमधे उभं करुन विचारलं होतं. कुणालाच नव्हते इतके कमी मार्क्स!

पण चांगली गोष्ट अशी की भुगोलाच्या पेपरला I was the topper कारण सगळ्यांपेक्षा एक दिवस जास्ती मिळालेला अभ्यासाला! :-)


Ajjuka
Friday, December 07, 2007 - 4:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आत्ता मी ताजा ताजा वेंधळेपणा करून आलेय.
माझा मित्र जो सॅन होजे ला असतो तो सध्या भारतात सुट्टीसाठी आलाय. आम्ही काही जण त्याला तात्या म्हणतो ( SVSyaa, आपलाच तात्या बरंका हा!). त्याचा भारतातला सेल नंबर मी माझ्या सेल वर टाकला होता. आणि सेव्ह करताना तात्या असं लिहिलं होतं एवढं मला आठवत होतं.
आज त्याला फोन करायला म्हणून मी नंबर शोधला. तात्या असा आणि फोन केला. "काय तात्या! काय म्हणताय?" इत्यादी जोरात बोलले. त्या माणसाचा आवाज ऐकून मला आवाज वेगळा वाटला. थोडी शंका आली पण प्रत्यक्षात ३ वर्षात भेट नव्हती त्यामुळे असेल असं मी समजले. उद्या मी पुण्याला जाणार आणि नेमका तो मुंबईला येणार. इत्यादी बोलणं झालं. मी त्याला 'इथे किती दिवस आहेस?' हे ही विचारले. तेव्हा तो म्हणाला ९ तारखेपर्यंत मग कोल्हापूरला जाणार. या वेळेला माझा संशय अजून बळावला आणि मी काहीतरी थातुरमातुर बोलून फोन बंद केला.
मग प्रसाद(मित्राचं खरं नाव!) मधे पाह्यलं. प्रसाद नावाचे बरेच आहेत माझ्या फोन मधे त्यामुळे तात्या असं सेव्ह केलं होतं हेही आठवत होतं. तर नंबर सापडला प्रसाद तात्या असा सेव्ह केलेला.
आता मला धरतीमाता पोटात घेईल तर बरे असं झालं.
बर नुसतं तात्या म्हणून ज्याचा नंबर सेव्ह केला होता तो माणूस कोण होता हे काही केल्या अजूनही आठवत नाहीये. मी त्याला " Extremely sorry! असा असा गोंधळ झाला. आपण कोण ते सांगाल का प्लीज?" असे दोन मेसेजेस पाठवले. no reply!
आता मी मित्र समजून, ए जा म्हणत नक्की कुणाशी बोलले हा संभ्रम माझं डोकं खातोय!!
अशी झाली गंमत!!


Lopamudraa
Friday, December 07, 2007 - 5:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा वेंधळेपणा माझा नाही माझ्या वडीलंचा आहे.
आम्हि अजुनही सुट्टेत सगळे जमलो की मामा काका मावश्या सगळे ही घटना काढुन पपांना पिडतात.
झाले काय सुट्टी लागली की आम्ही दोघी बहिणी आणि आई मामाच्या गावाला पळाअयचो पप्पना सुट्टे नसल्यामुळे ते घरीच. दर सुट्ट्टीत आईने एक आजीबाई स्वयंपाकाला लावल्या होत्या त्या काष्टे पातळ नेसायच्या. एके दिवशी पप्पांना आम्ही तिकडे मामाकडे काही फ़ंकशन साठी लगेच निघा म्हणुन बोलावले. पपांना लगेच संध्याकाळी निघाय्चे होते. त्यांना स्वयंपाकाच्या आजींना कसा निरोप द्यावा कळत नव्हते. अचानक रस्त्यात आमच्या शळेच्या headmaster जोशी बाई दिसल्या त्याही काष्टी पातळ नेसायच्या. त्या आपल्या रस्त्यात पपांशी बोलायला थांबल्या. "कस काय सर?" विचारले पण तरी पपांच्या लक्षत आले नाही. ते आपले त्यांना स्वयंपाकाच्या आजी समजले. आणि म्हणाले.." आज स्वयंपाकाला येउ नका मी गावला निघालोय आणि आठ दहा दिवस येणार नाहिये"
आणि जेव्हा बॅग घेउन पपा घराबहेर पडत होते तेव्हा आजी घरी स्व्यंपाकाला हजर.. तेव्हा पप्पांच्या डोक्यात प्रकाश पडला.. :-)


Divya
Friday, December 07, 2007 - 5:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा, काय हसु आल ग. .
आज्जुका असा गोंधळ माझ्या बाबतीत बर्याचदा झालाय म्हणजे ओळखिच्यांनाच फ़ोन असायचा पण नंबर एकाचा आणि मी नाव घेउन बोलतिये दुसर्याचे.
माझ्या एका मैत्रीणीच्या बाबतीत घडलेला किस्सा. तिचा आणि तिच्या आईचा आवाज अगदि सेम. तिच्या मित्राची ( boyfriend ) त्यामुळे फ़जिती झाली होती. आवाजातला फ़रक कळलाच नाही, हा बडबड करत सुटला थोड्यावेळाने त्याची बराच वेळ फ़िरकी घेतल्यावर काकु म्हणाल्या ती आली आता तु तिच्याशी बोल, काय पोपट झाला होता.


Gsumit
Friday, December 07, 2007 - 6:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका

दिव्या, माझा असा गोंधळ दर वेळेस होतो जेव्हा मी माझ्या मावसबहिणींना फ़ोन करतो तेव्हा... त्या दोघींचा आवाज इतका सारखा आहे की समजतच नाही कोण बोलतय ते... आणी हे त्यांच्या पण लक्शात आलय, त्या माझी मुद्दाम फिरकी घेतात दर वेळेस मी ही बोलतेय मी ती बोलतेय करत... :-(


Tanyabedekar
Friday, December 07, 2007 - 7:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा वेंधळेपणा मी नाही पण माझ्या गर्लफ्रेंडने (तत्कालीन) केला होता.

मी घरी आलो होतो सुट्टीसाठी. दिवसभरात तिला एकदाही कॉल केला नव्हता. जुन्या मित्रांबरोबर उंडारत फिरत होतो. बाईसाहेबांनी रात्री साडे-दहा अकरा वाजता फोन केला. नेमका त्या दिवशी बाबा फोन जवळ वाचत बसले होते. माझा आणि बाबांचा आवाज फोनवर एकसारखा येतो. अगदी आईला पण ओळखता येत नाही.

पुढील संभाषण खालील प्रमाणे:

ट्रिंग ट्रिंग.. पितश्रींनी फोन उचलला.
पि: हॅलो
ग: कहा थे दिनभर? एक कॉल नही कर सकते थे? तुम एक दिन मे ही इतना बिगड जाते हो? इधर तो हर घंटे फोन करोगे. पता है मेरा सिमर के साथ झगडा हुआ. कितनी परेशान होती हुं मै रूममेट की वजह से. और तुम. इर्रिस्पॉन्सिबल. वापिस आकर फिर आना मेरे पास तब बताउंगी. ब्ला ब्ला ब्ला..........
पि: आपको शंतनूसे बात करनी है क्या? मै बुलाता हुं.. १ मिनीट..
तिकडून फोन कट केल्याचा आवाज... ट्यां....

दुसर्‍या दिवशी बाबा जेवताना मला म्हणाले, निदान तुझ्या मैत्रिणीला सांग की शिव्या द्यायच्या आधी कोण आहे त्याची खातरजमा करत जा.


Tanyabedekar
Friday, December 07, 2007 - 8:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कॉलेज मध्ये असताना बाईसाहेबांना घेवून कुठल्यातरी देवळात भल्या पहाटे (म्हणजे सकाळी ८ वाजता) जायचे होते. मी पावणे आठला गर्ल्स हॉस्टेलच्या बाहेर येउन थांबतो असे सांगितले.

रात्री नित्यनेमाने तुडुंब मदीराप्राशन करुन ७-८ जण माझ्या रूममध्ये (एका माणसासाठीची रूम) आडवे तिडवे पहुडले होते. सकळी साडे आठ-पावणे नऊला माझा मोबाईल दणाणला. ४-५ रिंग वाजल्यावर मी उचलला.
तिकडुन शिव्यांचा भडिमार सुरु झाला. माझ्या बाजुने संभाषण असे होते:
नही तो... सुनो तो.. नही.. लेकीन.. सुनो.. मगर मै.. प्लीज.. हां नही हां नही.. आता हुं.. बस पाच मिनीट.. बस.. रुको.. ट्यांSSSSSSSSSSS... फोन कट..

मी आजुबाजुला बघितले. सगळी जनता अजुनही झोपेत होती. हुश्श.. मी विचार केला.. बरे झाले कुणी ऐकले नाही.. आणि पसार्‍यामध्ये कपडे शोधायला उठणार एव्हड्यात.. सगळे सातच्या सात जण उठुन जोरजोरात हसायला लागले.. साले, माझा फोन चालु असताना सगळे उठले होते पण चुपचाप बसले होते.

रात्री रूमवर परतलो तर एक प्रिन्ट आउट दारावर चिकटवला होता. "मगर मै.. नही तो.. पाच मिनीट"

(मला वाटते मी खाल्लेल्या शिव्या असा एक बीबी मला उघडता येइल :-) )


Lopamudraa
Friday, December 07, 2007 - 8:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"मगर मै.. नही तो.. पाच मिनीट" >>>
एव्हढ्या शिव्या शांतपणे खाणारा boyfriend मिळाल्यावर मग तर मुली खुप खुष असतील तुझ्यावर.. :-)

Nilima_v
Friday, December 07, 2007 - 8:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

/cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=644&post=1031489#POST1031489


मी त्याला " Extremely sorry! असा असा गोंधळ झाला. आपण कोण ते सांगाल का प्लीज?" असे दोन मेसेजेस पाठवले. no reply!


हा मेसेज तरि बरोबर प्रसादला पाठविलास ना?
नाहीतर हा तिसर प्रसाद निघायचा.

Tanyabedekar
Friday, December 07, 2007 - 9:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही ग बाई लोपा.. कुठल्या डोंबलाच्या खुष.. दोन नशीबानं खुष झाल्या होत्या.. पण बहुतेक त्यांना शांतपणे शिव्या खाणारा नवरा नको होता :-(

Zakki
Friday, December 07, 2007 - 9:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नुसत्या आवाजावरून असले गोंधळ होणे साहाजिकच आहे. पण मी नि माझा फक्त दोन वर्षाने मोठा असलेला भाऊ अगदी एकमेकांसारखे दिसत होतो. माझा मोठा भाऊ मिलिटरीत असल्याने नागपूरला क्वचितच येत असे. पण त्याचे मित्र बरेचदा मला गच्चीत बघून एकदम शिव्या घालायला सुरुवात करायचे, 'साल्या, केंव्हा आलास, कळवायचे नाहीस का? तुझ्या भावाला परवा विचारले होते तर तो म्हणाला होता तू इतक्यात येणार नाहीस, नि आता आलास. काय आम्हाला दारू पाजायची नाही म्हणून का?' वगैरे वगैरे.

आमच्या काळी मोठ्या लोकांशी नम्रपणे बोलण्याची पद्धत होती, म्हणून मी शांतपणे माझे नाव सांगत असे, नि ते लोक जात.

या उलट कधी माझा भाऊ रस्त्याने जात असला तर माझे मित्र त्याला मी समजून, एकदम 'साल्या, अभ्यास करतो सांगून इकडे तिकडे भटकतोस, सरळ सांग ना आमच्याबरोबर यायचे नाही'

आता माझा भाऊ मिलिटरीतलाच. तो त्यांची गचांडी धरून सांगायचा, पुन: माझ्या भावाला शिव्या देऊ नकोस!'.

खरी गंमत तर त्याचे लग्न ठरले नि मी एकदा त्याच्या सासरी काहीतरी निरोप द्यायला गेलो तेंव्हा बाहेर सायकल लावताना, त्यांच्या घरात उडालेला गोंधळ आठवून अजूनहि, मला नि वहिनीला हसायला येते.


Ajjuka
Saturday, December 08, 2007 - 5:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निलिमा,
नाही प्रसादला कशाला पाठवू तो मेसेज. त्या पहिल्या तात्याला पाठवला. नुसत्या तात्याला.


Anaghavn
Saturday, December 08, 2007 - 8:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे आलं की मस्त वाटतं.एकदम हलकं फुलकं वाटतं.
नन्दिनी, मज्जाच...कदाचित तो (नुसता तात्या) घाबरला असेल.म्हणुनच त्याने तुझ्या sms ला उत्तर दिले नसेल.
तनय,तुझे वडिल फक्त इतकंच बोलुन गप्प बसले?की न लिहिण्यासारखं पण काही?
मित्रा,एकदम पटलं. agreed .पण जाऊ दे,त्या मुलींच्या नशीबात शिव्या देणे नसेल,तर ऐकुन घेणे असेल.म्हणूनच याला सोडण्याची चुक करून बसल्या.
नीले--कार्टे------तिकडे "जुन्या दिवसात" येऊन मला घाबरवतेस होय?भेटच एकदा---------(हसण्यारया माणसाचा चेहरा)
अनघा


Manjud
Saturday, December 08, 2007 - 9:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी की अज्जुका गं?

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators