Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 30, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » माझ्या मित्रांच्या मला आवडणार् 0dया / नावडणार् 0dया सवई » Archive through November 30, 2007 « Previous Next »

Chinnu
Wednesday, November 28, 2007 - 7:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जादू, मला कुणालाही नावं ठेवायला आवडत नाही. वरील बाईचा मला येतो तसा अनुभव इथुन तिथुन सर्वांना येतच असणार. शंकाच नाही. (पहा अमृताने पण सेम अनुभव लिहिला आहे.)
पुजा कशी करायची, काय प्रथा पाळायच्या किंवा अगदी प्रसादाला काय करायचं (करायचं की नाही!) हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. तरी उगाच कुणाला धार्मिक अथवा प्रांतीय बाब काढून नावं ठेवायची लोकांची सवय चांगली नाही असे मला वाटते. साशल तुमचेही अभिनंदन. तुमच्यासारखा चांगला विचार करणार्‍या व्यक्ती खरोखरच दुर्मिळ आहेत. मला तरी क्वचितच भेटल्या!
पुन्हा एकदा सांगावसं वाटतं ते म्हणजे मायबोली आणि मायबोलीकर! परदेशात एव्हढ्या आपुलकीने संवाद साधणारे, विचारपूस करणारे मायबोलीकर इथे आहेत ही माझ्यासाठी तरी खूप आनंदाची गोष्ट आहे. हो वेळ आली तेव्हा मायबोलीकर तेही मराठीच धावून आलेले आहेत!


Jadoo
Wednesday, November 28, 2007 - 9:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Chinnu तुमच्या स्वतच्या बोलण्यातच contradiction आहे..तुम्हि म्हणता मला कोणाला नावे ठेवायल आवडत नाहि आणि धार्मिक अथवा प्रांतिय बाब काढुन नावे ठेवायचि सवय चांगलि नाहि असे म्हणता तर मग तुम्हि तुमचे सगळे post फक्त माझी मैत्रिण माझि शेजारि असे म्हणुन का लिहित नाहि??. तुमच्या post मधे तर तुम्हि प्रांतिय उल्लेख करत आहात नीट वाचाल तर लक्षात येइल...मग ते मराठी असो वा तेलुगु वा पंजाबी

Chinnu
Wednesday, November 28, 2007 - 9:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरोबर. मी ही वाईट सवय उचलून लिहुन पाहिले, हे तुमच्या लक्षात आलेले दिसत नाही. इतर बीबी वर देखील असे प्रांतीय, परभाषिक उल्लेख किती जागी आहेत याची गणती नाही. तुम्ही किंवा सशल तिथे लिहायला गेला नाहीत याची खंत वाटली.*
टिप: वरील डोक्यात जाणारी व्यक्ती खरोखरच अस्तित्वात आहे. मला स्वत:ला प्रांतीय अथवा वैयक्तिक उल्लेख करून नावं ठेवायला आवडत नाही हेही तितकेच खरे आहे. संपूर्ण मायबोलीवर माझ्या आजच्या पोष्ट सोडून एकही अशी पोस्ट आढळणार नाही. पण लोकांच्या अश्या वाईट सवयीचा आणि कोत्या मनोवृत्तीचा मी नेहमीच प्रतिकार करत राहीन*


Jadoo
Wednesday, November 28, 2007 - 9:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ohhhh good try Chinnu :-)

Chinnu
Wednesday, November 28, 2007 - 9:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

.... .... धन्यवाद जादू :-)

Sashal
Wednesday, November 28, 2007 - 9:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्नू, तुझं mods ना उद्देशून या प्रकाराबद्दल लिहीलेलं post मी बघितलं होतं .. पण आज तूलाही तेच करताना बघून आश्चर्य वाटलं आणि खंतही वाटली ..

'eye for an eye' ने कोणाचं भलं होणार आहे?


Chinnu
Wednesday, November 28, 2007 - 10:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सशल हे eye for an eye साठी नाही आहे. यातून चांगलं घडावं अशी माफक अपेक्षा आहे. माझ्यामुळे कुणाला त्रास होईल अश्या गोष्टी शक्यतो मी करत नाही. असे कुणाला वाटत असल्यास मी दिलगीर आहे. पण तरी या वाईट प्रकारांना आळा बसत नाही हे दुर्दैव. अजून काय?

Tiu
Wednesday, November 28, 2007 - 10:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मलाही हे काही पटत नाही! इथे काही लोक वारंवार इतर प्रांतियांबद्दल अतिशय cheap comments करतांना बघितले आहेत मी. ह्याच वर नाही इतर कुठल्याही वर सुद्धा कधीही विनाकारण इतर भाषिकांवर विशेषत: तेलुगु लोकांबद्दल बरच सभ्यतेची पातळी सोडुन लिहिलं गेलंय...
तरीही या प्रकरणी इतर कुणी ( including mods) आक्षेप घेतलेला दिसला नाही याचं वाईट वाटलं.
तुम्हाला एखाद्या अमराठी व्यक्तिचा वाईट अनुभव आला असेल तर ह्याचा अर्थ असा नाही कि सरसकट सगळ्यांना एकाच तराजुत तोलावं.
आणी इथे सगळे मराठी लोक आहेत तर बोला अमराठी लोकांबद्दल काहीही हि सुद्धा व्रुत्ती बरी नव्हे!



Manuswini
Wednesday, November 28, 2007 - 11:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वरती कोणी कश्या हेतूने लिहीले ही नक्की कप्ल्पना नाही पण उगाच त्याने / तीने 'ह्याच' प्रांतीय Discrimination ने'च' लिहीले असे पिल्लु सोडून उगाच विषयाला फाटा फोडणे,वाद सुरु करणे नी बाजूला होणे असा प्रकार आहे. आणि ही सवय सुद्धा वाईटच आहे जसे geenralization करणे प्रकार वाईट किंवा स्वतच्या ability प्रमाणे लिहिलेल्या गोष्टीचे intepretation करून उगाच मुद्दा वळवणे तसेच ते.

माझे असे मत आहे की,जसे मी आधीच वरती लिहीले की कोणाच्या सवयी ह्या where he grew up and how he grew up, it all depends on it, and basically his overall approach in anything. BUT, yes "Big" but it also depends to certain extent his 'few personal traits" on where you are "from". I mean your nativity.

तसे बघायला गेल्यास प्रत्येक प्रांताच्या सवयी, attitude हा वेगळा असतोच नाही का? मग ती पैसे खर्च करण्याची,रहाणीमानाची असो किंवा दिखाऊपणाची अथवा काहीही.
I have personally grown up with all mixed people in India and seen such "minute" difference in certain traits. may be good or bad(depends on individual perception) .

पण म्हणून त्याचे वर्गीकरण( Discrimination ) करा असे नाही, किंवा त्याना नावे ठेवा हा अर्थ नाही, Please note this (नाहीतर लगेच कोणीतरी वात्रटपणे येवून remark करेल मग असे आहे का म्हणणे).

समजा कोणी मराठी $20/per day spend करत असेल तर तो खर्चीक म्हणून कोणाला वाटेल तर कोणाला कंजुष सुद्धा पण मग तो मराठी म्हणून कंजुष म्हणण्यापेक्षा किंवा मद्रासी म्हणून अर्थ लावण्यापेक्षा जर खरोखर प्रांतीय level वर compare केले तर खरेच काही सुक्ष्म traits दिसतात ज्या "त्याच प्रांतीय influence " मुळे असु शकतात / असतात( in my observation ).
एखादे उदाहरण द्यायचे झाले तर,तामीळ लोक बर्‍यापैकी साधे रहातात. (मला तरी असे आढळले),(हे एक उदाहरण आहे तेव्हा कोणी आणखी वाद सुरु नका करू तामीळांना वाईट म्हटले असा).
माणुस socialize होतो,फिरतो नव्या गोष्टी accomodate करतो तेव्हा मग अश्या सवईत सुद्धा फरक (बरा / वाईट) दिसतो.
पण ती व्यक्ती वाईट ठरत नाही ना. कोणाचेही generalize करणे वाईटच पण समजा एखादा किस्सा सांगताना geenrally असे mention होते अरे ती माझी गुज्जु मैत्रीण,अरे ती माझी पंजू मैत्रीण मग त्याचे dissection कशाला करा नी बोंब मारा की Discrimination चालले आहे.

lastly हे सगळी post लिहिण्याचा खटाटोप का? कारण मला तरी इथे असे कोणी Discrimination हेतुने लिहीले असे वाटले नाही. एक किस्सा सांगताना उल्लेख झाला असे दिसले(मला तरी). पण खरेच कोणी Discrimination म्हणून लिहीले तर थोडे चुकीचे आहे. :-)


Kedarjoshi
Wednesday, November 28, 2007 - 11:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे चिन्नु सुटलीस एकदम. त्या बाईला चांगला धडा शिकव एकदा. BTW लोकहो मराठी लोकांना घाटी हे नाव आहे. ठिरामे नाही. अन हे नाव पण मराठी लोकांनीच एकमेकानां ठेवल्या मुळे मिळालेले आहे

Chinnu
Wednesday, November 28, 2007 - 11:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तिउ धन्यवाद. केदार, अरे ते प्रकरण काहीही करायच्या पलिकडले आहे! बर्‍याच लोकांन्नी तिला भन्नाट विशेषणे लागू केली आहेत. ती खरं तर सुसंस्कृत आणि उचभ्रू कुटुंबातील आहे. काही वर्षांपुर्वी मुंबईत असतांना तिचे कुटुंबीय माझे सहकर्मचारी होते! त्यामुळे मला तिला काही सांगायला पण संकोच वाटतो.

Jadoo
Wednesday, November 28, 2007 - 11:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Kedarjoshi घाटी म्हणजे घाटातील लोक असे माझा नवरा मला म्हणतो :-)

Manuswini
Wednesday, November 28, 2007 - 11:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणखी एक असे एकलेय, एखाद्याने स्वतचे दुर्गुण पण एकायची नी accept करायची सवय ठेवावी, उगाच कशाला कोणाला कोण उगीच झोडपेल? आणि जरा विनोद म्हणून वृती ठेवली तर काय वाईट.

आता नै का आपल्या’ कोब्रानी accept नाही का केलेय की ते कंजुष असतात म्हणून मग कीती त्यांचा मनाचा मोठेपणा. .
त्यांच्या कंजुषपणावरचे जोक कोण लिहीतात 'मराठीच' ना नी फीदीफीदी हसतात कोण मराठीच ना.

आणि तिथे पुणेकरांनी नाही का त्यांच्या चांगल्या, वाईट पाट्या लावण्याची सवय, तिरसट बोलण्याची सवय accept केलीय नी इथे एक अक्खा BB खर्चीला 'पुणेरी नमुने' म्हणून(कशाला मेला तो खर्च) त्यावर. ( people,take it easy!just kidding! )


Gajanandesai
Thursday, November 29, 2007 - 8:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या एका मित्राला नखं कापायचा कंटाळा.(!) दोन्ही हाताच्या बोटांची नखं पघळ वाढलेली असतात. जेवल्यावर नखं साफ करत बसतो. (काहीजण दात कोरत बसतात तसे.)

Amruta
Thursday, November 29, 2007 - 5:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मन:स्विनीला मझे पुर्ण अनुमोदन :-)

Divya
Thursday, November 29, 2007 - 6:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझपण मनुस्विनीला पुर्ण अनुमोदन. specially कोकणस्थ आणि पुणेकरांच्या बाबतीत.

Dakshina
Friday, November 30, 2007 - 5:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गजानन... ई ऽऽऽऽ ई किळस वाटली.... जेवल्यावर हे असलं पहायचं म्हणजे... दिव्यच... बाप रे...

माझी रूममेट पण अशा सवयींचा ख़जिनाच आहे. ती पण जेवण झालं की (म्हणजे कोणत्याही मोकळ्या वेळात) कान कोरत बसते. त्यासाठी पेनाचे झाकण, नेलकटरची मागची बाजू, सुरीचे टोक, टूथपिक, पेन्सिल अशा एक ना अनेक प्रकारच्या वस्तू वापरते. बघेल तेव्हा कानात काही ना काही वस्तू घालूनच बसलेली असते.


Yogesh_damle
Friday, November 30, 2007 - 5:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या वर्गमैत्रिणीची रूममेट होती. तिला सदा उवा झालेल्या असत. भसाभसा डोकं खाजवायची आणि मग तेच हात लोकांच्या डब्ब्यात घालायची. Yucks!

Devsakhi
Friday, November 30, 2007 - 6:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी गेल्या दोन महिन्यापासुन आणि आयुष्यात पहिल्यान्दाच घराबाहेर एका रूममेट बरोबर राहत आहे. ती दक्षिण भारतीय असून कायम खुप मोठ्या आवाजात बोलते. मी तिला गमतीने म्हणते " तुला फोनवर बोलायची गरज काय? नुसतीच बोल. आवाज पोचेल भारतात :-)

Ajjuka
Friday, November 30, 2007 - 8:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी रूममेट (कुठली होती ते सांगणार नाही. कारण ती कोब्रा किंवा पुणेकर नव्हती. ह्या दोन entities बद्दल काहीही बोललेलं चालतं बाकी कुणाबद्दल काही बोलायचं नसतं. म्हणजे कोब्रा आणि पुणेकर सोडून बाकीचे मराठी, गुज्जु, पंजु, गुलटी, मल्लू असं.. त्यांच्या भावना फार म्हणजे फारच नाजूक असतात ना!)
तर माझी एक रूममेट होती ती स्वतःला पंतप्रधांच्या वरताण बिझी असल्याचं दाखवायची. आम्ही तिघी रहायचो. आणि अनेक weekends एकत्र मजा करणे, एकमेकींच्या मित्रमैत्रिणींशी छान जमणे असं सगळं असायचं. आमच्यात एक गाडीवाली होती. ती आधी salaman wants to have desi food! वाली होती ना तीच. ती गाडी बदलणार होती त्यामुळे आधीच्या जुन्या गाडीतून last चक्कर म्हणून आम्ही तिघींनी २० मिन वर असलेल्या एका हॉटेलमधे डिनरसाठी जायचे ठरवले. नवीन गाडीची treat असणार होती. शुक्रवार होता त्यामुळे दुसर्‍या दिवशीची घाई नव्हती. गेलो. कुठल्याही हॉटेलमधे जागा मिळेना आणि पार्किंगलाही जागा मिळेना. इकडे पंतप्रधानीणीची भुणभुण सुरू झाली. 'मेरा आधा घंटा वेस्ट हो गया!' इत्यादी. तिच्या कटकटीला कंटाळून आम्ही takeout घेऊन घरी येऊन खायचे ठरवले आणि त्याप्रमाणे गाडी वळवली आणि काय सांगू महाराजा!! गाडीने दगा दिला. बंद पडली. तिथे अजून १०-१५ मिनिटे गेली. PM बाईंचं मनातल्या मनात तांडव, आणि काय हे मूर्ख लोक माझा वेळ खातायत असे चेहरे करणं सुरू झालं. गाडीवालीने काही फोन फिरवले आणि क्रेन व अजून एक मैत्रिण आली. त्या मैत्रिणीने आम्हाला घरी सोडले. क्रेन आली गाडी घेऊन.
गाडीवाली अर्थातच upset होती. डिनरचा प्लॅन बोंबलला होता. मी PM ला विचारले की खिचडी बनाती हू, खायेगी ना!!
"इतना टाइम वेस्ट गया. now dont bother me! "
मी खांदे उडवले. गाडीवाली मैत्रिणीला आणि क्रेनवाल्याला वाटेला लावून घरात प्रवेशकर्ती झाली आणि पी एम ने तिच्यावर तोफ डागली...
" I am here in US to study. this is my last semester. Please dont involve me in your plans. I dont have time to waste like you guys. My subject is really hard, not easy like you guys. " इत्यादी इत्यादी..
मी काही बोलायला जाणार इतक्यात गाडीवालीने जो काही धिंगाणा सुरू केला. मी आपले एका कोपर्‍यात बसून युद्ध बघत होते.

हीच पंतप्रधान कधीही घरात फोन वाजला की जीवाच्या आकांताने धावायची आणि फोने घ्यायची. कधी इतर कुणी चुकून आधी घेतलाच तरी स्वतःच्या रूममधला फोने उचलून विचारायची 'मेरा नही है ना?' जसं काही हिला देतच नव्हतो आम्ही हिचा फोन. आणि जरा जास्त वेळ फोन चालू असेल तर मधे मधेच फोन उचलून "कितनी देर?" असम विचारायची. एकदा असम तिनी माझा आणि संदीप्चा फोन चालू असताना केलं. आणि फोन ठेवायलाच तयार नव्हती. मी माझा फोन बंद केला. नंतर एकदा तिचा फोन १० मिनिटापेक्षा जास्त चालू आहे असं बघून ती जे करायची तेच मी केलं. मग आली भांडायला तेव्हा घातले तिचे दात तिच्या घशात.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators