Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 26, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » माझा वेंधळेपणा » Archive through November 26, 2007 « Previous Next »

Zakki
Saturday, November 03, 2007 - 2:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरेच्च्या! त्याला वेंधळेपणा म्हणतात? कमाल आहे.

मला तर नुसते खाली वाकले तरी कशासाठी वाकलो होतो हा प्रश्न पडतो. मग हातासरशी जे जे मिळेल ते उचलून घेतो. मग कदाचित् एक मिनिटापूर्वी फाडून फेकलेला कागद पण उचलून घेतो. न जाणो काही कारणाने तोच परत उचलायला वाकलो असलो तर?




Alpana
Sunday, November 04, 2007 - 4:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योगेश मी पटेलनगरमध्ये रहाते.... माझे जुने ऑफिस लाजपतनगरच्या जवळ होते... म्हणजे येता येता मार्केट्मध्ये जाता यायचे.... आमच्या भागात हवे असेल घर तर सांग....शोधुन बघेल ह्या भागात....
छोटा मोठा वेंधळेपणा तर करते अजुनही...पण मीच मायबोलीवर माझे स्टॅंडर्ड सेट केलय ना... त्याच्या जवळ्पास पण नाही पोचत हल्ली मी..........

Mandard
Monday, November 05, 2007 - 3:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योगेश, सुप्रभात मी लाजपतनगरच्या बाजुला कालकाजीत रहातो.

Chyayla
Monday, November 05, 2007 - 6:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योगेश, सुप्रभात मी लाजपतनगरच्या बाजुला कालकाजीत रहातो
योगेश मी पटेलनगरमध्ये रहाते

हा हा.. काय पण मस्त वेंधळेपणा केला यान्नी खरच मजा आली वाचुन.

Mandard
Monday, November 05, 2007 - 8:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला तुम्हाला यात काय वेंधळेपणा वाटला जरा सांगता का

Anaghavn
Tuesday, November 06, 2007 - 11:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी बर्याच दिवसांत काही वेंधळेपणा केल्याचं स्मरत नाही.
पण सगळ्यांचे प्रतिसाद बघुन बरं वाटलं.
अनघा


Chyayla
Tuesday, November 06, 2007 - 11:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंदार, तु आधी दिवे घे बघु.

मी वेंधळेपणाच्या BB वर आलो वेंधळेपणाचे किस्से वाचायला आणि पहातो ते काय ईथे शहाणपणाचे पोस्ट.. असे वाटले तोच वेंधळेपणा असावा


Yogesh_damle
Wednesday, November 07, 2007 - 1:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिवाळी चा वेंधळेपणा- दुकानात जाऊन शुभेच्छापत्र घेतलं, आणि काउंटर वर गप्पा मारता मारता एका दुसर्‍या sample च्या I'm sorry कार्डाशी अदलाबदल झाली. Font चा घोळ कळला म्हणून त्याची love life आणि माझी ' non- वेंधळा' प्रतिमा (फारच थोड्या लोकांपुढे टिकून आहे ती)- दोन्ही बचावल्या! :ड

च्यायला, दिवाळी आलीय, दिव्यांच्या देवाणीघेवाणीमध्येही काळ्जी घे बाबा! :-) दीपदानाचे प्रसंग ओळखून टाळ! :-) फराळ काय म्हणतोय?

अल्पना आणि मंदार, दिवाळीचे काय बेत? एका प्रसिद्ध social networking site वर मी दिल्लीतल्या मराठीजनांच्या दिवाळीभेटीचा बेत मांडतोय. त्या BB वर बी यावा की!!
:-)

Psg
Wednesday, November 07, 2007 - 8:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझाही दिवाळीचा वेंधळेपणा

प्रचंड गर्दीतल्या एका जागी हातगाडीवर रंग, रांगोळी, रांगोळीची पुस्तकं ई सामान विकायला होतं. बायकांची चिकार गर्दी होती, मीही घुसले. तिथल्या माणसाला विचारलं,
"रंग कसे दिले?"
तो काही उत्तरच देईना. मग पुन्हा जोरात विचारलं,
"अहो, सांगा की, रंग कसे दिले?"
त्याने अगदी हळू आवाजात सांगितलं,
"१० रु. ला पाकीट"
"१० रु.??? खूपच सांगताय. मला ५-६ घ्यायचेत.. कितीला देणार?"
पुन्हा माझ्या प्रश्नाला उत्तर नाही! मलाही गडबड होती..
"अहो, सांगा की, कितीला देणार?"
मग मात्र तो म्हणाला, "तुम्ही 'त्यांना' विचारा, ते आहेत दुकानदार.. मी 'यांच्याबरोबर' आलोय", असं म्हणत त्याने माझ्या शेजारी उभ्या असलेल्या बाईकडे निर्देश केला.

म्हणजे!!! तो विक्रेता नव्हताच!!!!! तो बिचारा बायकोबरोबर खरेदीला आला होता आणि माझी मदत करत होता इतकंच.. आणि मी.........

प्रचंड ओशाळवाणी होत मी तिथून सटकले! :-)


Zakasrao
Thursday, November 08, 2007 - 1:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे हे हे पुनम.
मिल्याला असच कोणी काहि विचारले नाही का?? :-)



Anaghavn
Tuesday, November 13, 2007 - 10:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रहो आणि मैत्रिणींनो,
नमस्कार, दिवाळी कशी गेली?माझी दिवाळी एकदम मस्त!
पण अजुनही काही वेंधळेपणा झाल्याचं स्मरत नाहीये.
अनघा


Nkashi
Thursday, November 22, 2007 - 11:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

public फ़ार हुशार झाले वाटत... सगळ्यानी वेंधळेपणा करायचे सोडुन दिले... :-)

माझा ताजा वेंधळेपणा:
नंदिनीने विचारलेल गाण पोस्टायच होत, पण जळ्ळल मेलं machine नेमक दगा दिला
काही केल्या मायबोली पेज ओपन होईना.... मग धड्पडत internet machine वर गेले. कित्ती वेळा ctrl+V करते तरी paste काही होइना. मग tube पेटली माझ्या pc वर ctrl+c करुन इथे ctrl+V करत बसले होते


Anaghavn
Thursday, November 22, 2007 - 12:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

same अस्साच वेंधळेपणा माझ्याकडुन झाला.
माझ्या PC वर मी काम करत होते. काहीतरी कारणाने Boss ने मला शेजारच्या PC वर बसण्याची Request केली.मी Site चा URL type केला. clt C ने. आणि शेजार च्या pc वर जाऊन clt v करत बसले. आणि मग एकटीच हासत बसले.
अनघा


Nandini2911
Friday, November 23, 2007 - 12:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा नव्हे वेंधळेपणा..

.. आरके जबरदस्त नेट सॅव्ही आहे. त्याने स्वत्:चीच इतके डुप्लिकेट प्रोफ़ाईल बनवून ठेवलेत की पासवर्ड आणि प्रोफ़ाईलनेमची कायम गफ़लत असते.. आणि मग पासवर्ड "शोधण्यासाठी" गडबड होते. आम्ही त्याला एकसो एक पासवर्ड सजेस्ट करत असतो. डुपिकेट आय्डी कसे सांभाळायचे हेच त्याला समजत नाही. :-) वर स्वत:लाच वाईट्ट कमेंट देतो आणि नंतर दोन तीन दिवसानी कधीतरी गूगल सर्च करून म्हणतो.."यार देख ये @#$%^ मेरेको क्या बोल रहा है"

परवा तर मला म्हणे तुम्हारा भी पासवर्ड देके रखन तुम्हारे नाम से लॉग ईन हो जाऊगा...
स्वत्:चे पासवर्ड आठवत नाहीत आणि माझे काय डोंबल लक्षात ठेवणार.

त्याला मायबोली चा फ़ेरफ़टका जबरदस्तीने त्या दिवशी मारायला लावला होता.... चिखलात भिजलेल्या पपीसारखा दिसत होता :-)


Chaffa
Friday, November 23, 2007 - 1:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

. आरके जबरदस्त नेट सॅव्ही आहे.
ऑंऽऽऽऽ हे कोण आणखी????]

असो एक नवीन भर पण ह्याला वेंधळेपणा नाही म्हणता यायचा पण दुसरीकडे कुठे लिहू

आता कुणा उच्चकोटीच्या माणसाची व्हीजीट असली की कशी पळापळ असते ते कंपनीत काम करण्यार्‍यांना नवे नाही.
अशीच आमच्याकडे व्हीजीट आहे त्यामुळे 'सगळीकडे बोंबाबोंब' नावाचा प्रकार चालु आहे. सेफ़्टी ऑफ़िसरने कसले कसले बोर्ड बनवुन आणलेत आणि म्हणतो लावा. मग हाताला लागतील ते बोर्ड खपवल्या गेले कधी नव्हे तो पावसात भिजलेल्या सर्वरवर not in use चा ठप्पा लागला.
गडबडीत कोण कुठे कसले बोर्ड लावतोय त्याचा पत्ता नाही.
पाहूणे आले.......... दुपारभर हुंदाडले कंपनीभर आणी संध्याकाळी दिवसभराच्या ऑब्झरवेशनच्या फ़ोटोत पहीलाच फ़ोटो कंटीन मधला कुणीतरी पठ्ठ्याने तिथल्या रिकाम्या सिलेंडरवर बोर्ड लावला होता,
( अंडर मेंटेंनन्स )



Deshi
Friday, November 23, 2007 - 7:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परवा तर मला म्हणे तुम्हारा भी पासवर्ड देके रखन तुम्हारे नाम से लॉग ईन हो जाऊगा>>.>

अच्छा तो ये बात है. तरीच म्हणल सावरियाचा एवढा प्रोमो मायबोलीवर का होत होता? त्याने बहुतेक तुझे लॉगीन वापरले ~~~DDDDD

Zakasrao
Saturday, November 24, 2007 - 11:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफ़्या तुमच्या दैनिक बो./न्बाबोंब मध्ये छापा ते फ़ोटो :-)

त्याने स्वत्:चीच इतके डुप्लिकेट प्रोफ़ाईल बनवून ठेवलेत की पासवर्ड आणि प्रोफ़ाईलनेमची कायम गफ़लत असते..>>>>>>>
हम्म पोराला एवढी अफ़रातफ़रीची सवय आहे हिट्ट होणार पोरग फ़िल्म लाइनीत नक्कीच.
तिकडे तुमच नाण खणखणीत नसल तरी ते वाजवुन दाखवेल त्याचीच चलती असते.
उगाच नाही आपका सुरूर सुपर हिट्ट


. आरके जबरदस्त नेट सॅव्ही आहे.
ऑंऽऽऽऽ हे कोण आणखी????] >>>>>>>>>>>
अरे ये PSPO नही जानता सारख ओरडु का आता तुझ्या नावाने :-)
अरे RK म्हणजे राज कपुर. आणि त्याच भुत नन्दिनीने planchet करुन बोलवाल आणि त्याला नेट च वेड लागल. आणि हे बहुतेक त्या सॅवी नावाच्या पोरीमुळे असेल :-)



Zakki
Saturday, November 24, 2007 - 11:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आरके म्हणजे रेहान कुमार. तो वेडा झाला आहे. म्हणून असे करतो.

Chinya1985
Saturday, November 24, 2007 - 7:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे RK म्हणजे राज कपुर
आरके म्हणजे रेहान कुमार.हाहाहाहा!!!!!!!!!!!चांगला वेंधळेपणा आहे!!!! RK म्हणजे रणबीर कपुर. हृषी कपुरचा मुलगा!!

Nandini2911
Monday, November 26, 2007 - 6:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्कीकाका, रेहान "खान" होताना हो? कुमार केव्हा झाला त्याचा??

आरके म्हणजे रणबीर कपूर.. इतकं मोठं नाव लिहायला टंकाळा येतो.. म्हणून हे नाव.
आणि मी त्याला माझा पासवर्ड दिला नाही. कारण "हाच पासवर्ड का आहे?" असा प्रश्न नक्की येणार (जर्नालिस्ट तो आहे की मी???)


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators