Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 27, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » मला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिराती » Archive through November 27, 2007 « Previous Next »

Marathi_manoos
Friday, June 01, 2007 - 10:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

One of the ads I hate is Rajanigandha Paan masaale "ab hamari baari hai" whr this chap takes over a company by Goras

Marathi_manoos
Sunday, June 03, 2007 - 3:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद फाजील . ह्या पुढे मराठीत लिवायचा यत्न करीन

Aashu29
Thursday, October 11, 2007 - 8:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ती अन्नपुर्णा मिठाचि ad आठवतेय का? एक चुटकि ममता!!
मुलगा पिझा खायचा हट्ट करतो तर आई त्याला घरीच पिझा बनवुन देते,
मल त्या आजिबाइचा डायलॉग जाम आवडतो, मुथ्थु, नमक मिरचि सब ठिक हैना?
त्यावर तो म्हणतो, wonderfull!! आणि मुलगा , आई, सगळे खुश!

Vegayan
Friday, October 12, 2007 - 4:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बर्याच वर्शान्पुर्वी १ कोकाकोला चि add यायची, अशि दिवाली ची पहाट असते अनि ५,६ मुलान्चा group friend चया घरी जातो .. ते तयार केलेल envoirnment जबर्दस्त होत...

Dineshvs
Friday, October 12, 2007 - 7:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सध्या दोन प्लायवुडच्या जाहिराती छान आहेत.
एकात प्लाय वाहुन नेणारा, रस्त्यात खोदकाम बघुन ती प्लाय आडवी टाकतो, तर लगेच त्या वरुन एक मुसलमान माणुस व त्याच्या तीन बायका, तीन हवाई सुंदर्‍या, एक लग्नाची वरात, दुधवाला भैया असे बरेचजण जातात. शेवटी पाऊस पडायला लागतो म्हणुन ते माणुस ती प्लाय उचलायला जातो, तर खाली क्रिकेट खेळणारी तीन मुले, पावसापासून वाचण्यासाठी उभी असतात. तो माणुस बाजुला जाऊन बसतो. इथे अनेक मॉडेल्स्चे चेहरे दिसत नसल्याने, सगळे लक्ष प्रॉडक्टवरच राहते.

दुसरी प्लायची जाहिरात आहे त्यात अनेकवर्षे चाललेला एक खटला, दोन वकिलांचे युक्तिवाद आणि ऑर्डर ऑर्डर म्हणत जजने मारलेला हातोडा दाखवतात. शेवटी सगळे जख्ख म्हातारे झाले तरी प्लाय मात्र टिकुन असते.


Vinaydesai
Friday, October 12, 2007 - 4:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला Nationwide च्या जाहीराती खूप आवडतात...

सध्या चालू असलेली 'मुलाला अ आ इ शिकवणारी' मस्त आहे..

त्यापूर्वी उपवर मुलींचे फोटो बघणार्‍या माणसाची जाहीरात होती..

भारतात याच दाखवतात की नाही माहीत नाही....


Disha013
Friday, October 12, 2007 - 4:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मलाही आवडतात nationwide च्या जाहिराती, आणि माझ्या लेकीलाही!


newyork life च्या जाहिरातितील गाणीही छान आहेत.


Dineshvs
Saturday, October 13, 2007 - 4:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अलिकडच्या जाहिरातीतला लक्षणीय बदल म्हणजे, सचिन, राहुलच्या जाहिराती खुपच कमी झाल्या आहेत.

हॅपीडेंटची जाहिरात मस्त आहे. त्या गोळ्या खाऊन, एका संस्थानात दाताचा उजेड पाडणारे कसरतपटु, बघायला फार छान वाटते.
तसेच मागे झालेल्या एका अपघातामूळे, जाहिरातीतले स्टन्ट्स व्यावसायिक लोकानी केले आहेत, त्याचे अनुकरण करु नये, अशी सुचना असते.

मोबाईल्सच्या वेगवेगळ्या जाहिरातींचा मात्र अतिरेक झालाय. तरी बरं अजुन नारळ फ़ोडु शकणारे, कपडे धुणारे वैगरे मोबाईल्स आलेले नाहीत.


Badamraja
Saturday, October 13, 2007 - 7:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वोडाफोन ची जाहीरात फारच छान वाटते.
अवश्य बघा.


Dakshina
Monday, October 15, 2007 - 12:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजुनी एक चहाची जाहीरात पण मस्त आहे. एक उमेदवार मत मागायला येतो, आणि मतदार त्याला प्रश्नं विचारतो की तुला अनुभव किती आहे... वगैरे वगैरे....
आणि मग एक वाक्यं येतं की हर दिन सिर्फ़ उठो नही..... जागो.....
चांगली आहे जाहीरात.


Zakasrao
Tuesday, October 16, 2007 - 4:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा सेम पिंच :-)
फ़ेविकॉलच्या जाहिराती पण मस्त आहेत.


Dineshvs
Tuesday, October 16, 2007 - 3:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा, मी आज त्याच जाहिरातीवर लिहिणार होतो. ती जाहिरात टाटा टी ची आहे.
अशी जाहिरात केवळ टाटाच देऊ शकतात. अंबानी नाही.
झकास ते पळणारं पोरगं फ़ेव्हीकॉल मधलं, मस्तच आहे ती जाहिरात.


Dineshvs
Wednesday, October 17, 2007 - 12:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सध्या माधुरीच्या आगामी सिनेमाची एक जाहिरात झळकतेय. आजा नाचले असे काहिसे नाव आहे.
माधुरीच्या कथ्थकमधल्या काहि स्टेप्स दाखवल्या आहेत.
उफ़. अजुनही धक धक करायला लावते ती. बाकि काही नसले तरी तिची नृत्ये असतील, तरी सिनेमा बघण्यासारखा असेल तो.


Rashmee
Wednesday, October 17, 2007 - 8:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला स्प्राईट च्या सगळ्या जाहिराती अत्यन्त आवडतात...त्यान्ची एक लिसा रे वाली तर अप्रतीम होती...ज्यात ती बाथ टब मधे स्नान करून बाहेर येते आणी म्हणते - मेरी खूबसुरती का राज़ है स्प्राईट आणी मागून आवाज येतो...लोगो को पैसा दो तो कुछ भी बोल डालते है...स्प्राईट बुझाये प्यास बाकी सब बकवास.

Sayuri
Saturday, October 20, 2007 - 6:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दूरदर्शनवरच्या जुन्या जाहिराती...विक्सची तर मला फार आवडायची
http://www.youtube.com/watch?v=tITnrXn8lsI&mode=related&search=
आणि हि 'दाग ढूंढते रह जाओगे'ची :-)
http://www.youtube.com/watch?v=KFGd58FTTZE&mode=related&search=
ललिताजी...
http://www.youtube.com/watch?v=CN_plnOolf8&mode=related&search=


T_pritam
Wednesday, November 07, 2007 - 8:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१) लिसान्सी साबणाची जाहिरात
.... तो मुलगा खुप वेळ आंघोळ करत असतो आणि पाणी बंद होतं आणि मग आवाज येतो... "राहुल, मैने कहा था ना, पानी चला जायेगSSSS"

२) निरमा वॉशिंग पावडर
पुर्वी खुप वेळा लागायची... छान असायची. आजकाल माहित नाही

३) वुडवर्ड ग्राईप वॉटर
ही एक जबरदस्त जाहिरात होती. ४ पिढ्या दाखवलेल्या बहुतेक त्यात. सुलभा देशपांडे होत्या त्यात.

बाकी इतर चांगल्या जाहिराती पण होत्या... पण या अजुन कुणीच इथे लिहिल्या नव्हत्या...


Hkumar
Wednesday, November 07, 2007 - 10:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बर्‍याच वर्षांपूर्वी हिरो होंडा ची ' fill it, shut it, forget it... H.Honda 80 km / L ही जा. अप्रतीम होती. तिला बहुधा बक्षीस मिळाले असावे असे वाटते.

Sonalisl
Sunday, November 25, 2007 - 2:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी लहान होते तेव्हा दुरदर्शनवर नेहमीच परिवार नियोजनाची ad लागायची... ''जरासी सावधानी, जिंदगीभर आसानी.." तेव्हा तर कळत पण नव्हतं... तरी ते गाणं मात्र तोंडात बसलं होतं. आम्ही सगळे सुरात अन मोठ्याने ते गाणं गायचो... :-)

Dakshina
Tuesday, November 27, 2007 - 1:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

A.C.C. सिमेंटची जाहीरात पण खूप छान आहे. छोटी छोटी मुलं आपला पॉकेटमनी घेऊन दुकानात जातात,
त्यातून सिमेंटच एक पोतं विकत घेतात. आणि त्याची एक छोटी पायरी बनवतात. कारण अजोबांना
वर चढता यावं म्हणून. फ़ार सुंदर जाहीरात आहे. मनाला अगदी भिडते.


Mrdmahesh
Tuesday, November 27, 2007 - 3:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा,
त्या हॅपीडेंटच्या जाहिरातीमुळे त्याचा खप इतका वाढला की त्या जाहिरातीचे प्रसारण काही काळापुरते बंद करावे लागले होते... सकाळ मध्ये अशा जाहिरातींचे रसभरीत वर्णन असते...


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators