Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 19, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » My Crushes » Archive through October 19, 2007 « Previous Next »

Ekahotianamika
Thursday, September 06, 2007 - 12:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता ऑफिस मध्ये बसुन खरे तर असले उद्योग करु नयेत. पण क्या करे ये दिल है कि मानता नहीं. म्हणुण माझा क्रश लिहायला घेतला. ख़रं तर याला क्रश म्हणता नाही येणार बहुतेक. कारण चांगल ५ वर्ष चालल होत हे सगळं.
मी जेव्हा त्याचा फोटो बघितला खरं तर हे सगळ तेव्हाच सुरु झालं. तो ४ वर्षांचा होता तेव्हाचा होता तो फोटो. आणि मगं माझी मैत्रिण अल्बमची पाने उलटत होती आणि मला प्रत्येक फोटोत मोठा होणारा तो अधिक अधिक भावत होता.
तो हि पुण्यातच होता आणि माझ्या मैत्रिणिच सख्खा लहान भाऊ होता(ती माझ्यापेख़्शा ५ वर्षांनी मोठी होती.) तो आमच्या हॉस्टेलवर तीला भेटायला खुपदा यायचा आणि मी मगं लपुन त्याला बघत असायचे.
नंतर मग आम्ही दोघेहि घनिष्ट मित्र बनलो. त्याला मी एकदा नाही हजारदा प्रपोज केले आणि त्याचे नेहमी एकच उत्तर 'मला आत्ता काही माहित नाही'. मला माहित होते कि मी त्याला आवडते. पण मला हे हि माहित होते कि त्याच्या बहिणीला मी नको होते वहिनी म्हणुनं.

मी त्याच्या आई-वडीलांना थोडीशी हिंट पण दिलि. आणि माझ्या आई-वडीलांना तर सर्वकाहि सरळ सरळ सांगितले. पण ह्या पठ्याची काही हिंम्मत नव्हती बहिणी समोर तोंड उघडायची. पण मी त्याला स्वता:पेक्षा जास्त ओळखत होते. म्हणुन मी कधीच माघार घेतली नाही.

माझे त्याच्यावर प्रेम आहे हे त्या वेळी जगजाहीरही झाले होते
मी त्याच्या साथी वाट्टेल ते करायला तयार होते. पण ह्या पठ्याने कधी साधा माझा हाथही धरला नाही. पण त्याचाही माझ्यावर जीव होता हे मात्र अगदि १००% खरे!

शेवटी एक दिवस म्हणला मी उद्या आई-वडीलांनी पसंत केलेली मुलगी बघायला जात आहे.
आणि मी तरीहि म्हंटले आज रात्री विचार कर एकदा माझ्या बद्दल!
वाटले तर नको जाऊस उद्या, आपण तुझ्या घरच्यांना पटवु.

पण "वहि होता हैं जो मंजुरे खुदा होता हैं!"
खुदाला काही माझे त्याचे होणे मंजुर नसावे.
ईति आमचे पहिले आणि शेवटचे प्रेम समाप्त!

आणि कृपया तो योग्य नव्हता वगैरे नका म्हणू. मला सहन होणार नाही. मला जे झाले या बद्दल काही दुख: नाही. मला माझ्या प्रितीबद्दल अथांग अभिमान आहे.


Maanus
Thursday, September 06, 2007 - 1:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि कृपया तो योग्य नव्हता वगैरे नका म्हणू. मला सहन होणार नाही. :-)

Aktta
Thursday, September 06, 2007 - 1:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

--मला माझ्या प्रितीबद्दल अथांग अभिमान आहे.
अख्ख पोष्ट चार वेळा वाचल पन ही प्रिती कोन ते कळल नाही.... :-)
पहीलच पोष्ट येवढ मोठ.... सही आहे....
एकटा....


Aashu29
Thursday, September 06, 2007 - 3:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जाउदे ग अनामिका, प्रपोज करायचि हिम्मत नाहि, तू केलेस तर accept करायचि तयारी नाहि, मग कशासाठी करायचा खटाटोप? वाईट वाटले असेल तर sorry हां!!

Ana_meera
Friday, September 07, 2007 - 5:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जाऊ दे ग अनामिका. अशीच माझी एक मैत्रिण होती तिचा ज्याच्यावर जीव जडला होता त्याचेही बहुतेक तिच्यावर प्रेम होते, पण दोघांनाही कधी हिंमत झालीच नाही!!! काय करणार.

पण मजा म्हणजे आज दोघेही खरोखरच सुखी आहेत. तिच्या काळजात एक कसक कदाचित असेल्नसेल.


Ekahotianamika
Friday, September 07, 2007 - 10:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुमच्या सर्वांच्या प्रतिक्रियां बद्दल धन्यवाद!
त्याच्या बद्दल मला आजही ईतका आदर आहे याचे एकच कारण आहे.
त्याने कधिही माझ्या भावना दुखावल्या नाहीत. उलट नेहमी माझ्या प्रेमाचा आदर केला आणि मला खुप समजुन घेतले.

मी सुध्दा आज सुखी आहे माझ्या नवर्‍याबरोबर.
आणि तो त्याच्या बायकोबरोबर. माझ्या आयुष्यातील एक सुखद आणि अत्यंत सुंदर वळण आहे ते.

जपुन ठेवले होते माझ्या मनाच्या शिंपल्यामध्ये, पण तुमच्या सगळ्यांचे पोस्ट वाचुन हळुच तो शिंपला उघडायची ईच्छा झाली.



Chinya1985
Saturday, September 08, 2007 - 8:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चांगलय,चांगलय अनामिका. आमच्या एका मित्राचि पण अशिच थोडि गत आहे पण तो मात्र त्या मुलीबद्दल खुप राग मानुन आहे. तुझी पोस्ट त्याला पण पाठवलि आहे वाचायला.

Dhichkyawnn
Wednesday, October 03, 2007 - 12:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"मला जे झाले या बद्दल काही दुख: नाही"

५ वर्ष त्याच्यासाथी घालवीली आणी दुख नाही ???

Aaftaab
Thursday, October 04, 2007 - 6:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनमिका, जेव्हा मुलाचे मुलीवर प्रेम असूनही तो त्याचा गैर फ़ायदा घेत नाही आणि तिच्या proposal ला नकार देतो, तेव्हा तो भित्रा नसतो, त्याला genuinely असे वाटत असावे की तुला त्याच्यापेक्षा कुणीतरी चांगला जोडीदार नक्की भेटेल. यालाच नि:स्सीम प्रेम म्हणायचे.
स्वानुभव आहे..


Rashmee
Thursday, October 18, 2007 - 3:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी जखम उघडी होणार आहे हे लिहिताना...पण तरी माझ्या पहिल्या innocent crush आणी त्याच्या tragic crash बद्दल लिहिते आहे.

मी १२ ला असताना माझ्या शाळेत एक नवीन मुलाने आणी त्याच्या जुळ्या बहिणीने admission घेतली होती. आणी मला माहित नाही का तो मुलगा खूपच आवडला. तो त्याच्या बहिणीशी बोलायला आमच्या वर्गात आला की मला वाटयचं तो माझ्या साठीच आलाय. आणी उगीचच माझ्या heart beats वाढायच्या. पण त्याच्या शी बोलायची किंव्हा friendship करायची कधी हिम्मतच झाली नाही. आणी मी त्याच्याशी बोलता यावं म्हणून त्याच्या अत्यंत मक्क्ख बहिणीशी मैत्री पण केली. तरी कधी औप्चारीक hello hi पूढे मजल गेली नाही. शिवाय मी biology stream ची आणी तो commerce चा...त्या मुळे अभ्यासाचं काही बोलायचा पण scope न्हवता. शाळेचे दिवस संपले आणी मी पूढ्च्या शिक्षणा साठी दूसर्या गावी गेले. त्या मुळे होता न्हवता तो ही सम्पर्क तुटला.

पूढे माझं शिक्षण संपलं आणी लग्न ही झालं. एकदा ५ वर्षानी माहेरी गेले असताना मार्केट मधे सहज त्याच्याशी भेट झाली...परत heart beats अगदी तूफ़ान मेल सारख्या दौडु लागल्या आणी मला परत काही बोलायला सुचत न्हवतं...आणी त्याच्या एका वाक्याने माझी बोलती कायमची बन्द करून टाकली. तो मला hello hi वगैरे करून त्याच्या ३ वर्षाच्या मुलीला म्हणटला " रश्मी बुआ ( म्हणजे आत्या) को नमस्ते करो."

त्या धक्यातून अजून सावरले नाहिये.

प्रेम भंग होणं वगैरे समजु शकतो आपण..त्यावर किशोर चे दर्द भरे नग्मे ऐकून थोडं रुमानी पण होऊ शकतो...किंव्हा बेदर्द ज़माना...मेरी मजबूरियां वगैरे म्हणून थंड निश्वास ही सोडु शकतो...पण असा पोपट झाला की काय करतात ??

Athak
Thursday, October 18, 2007 - 3:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण असा पोपट झाला की काय करतात ??
राखी चे दुकान शोधतात :-)


Rashmee
Thursday, October 18, 2007 - 3:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

athak...

asa kunachya vyathevar hastaat kaay re? :-(

Bsk
Thursday, October 18, 2007 - 4:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

its ok rashmee.. काही क्रशेस चा निकाल असाच लागतो. मनाल लावुन घेउ नकोस. दुसरा म्हणजे, क्रश हे तात्पुरतेच असतात,आणि असावेत.. अन्लेस त्याच पुढे काही रुपांतर होत नाही. तुम्ही दोघं फ़ारसे बोललाही नव्हता, त्यामुळे विसरून जा, आणि मजेत आयुश्य जग!

Tiu
Thursday, October 18, 2007 - 4:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जाउ द्या हो!!!

आम्ही तर आतापर्यंत अश्या किती मुलामुलींचे मामा झालो आहोत हे मोजणं पण सोडुन दिलंय...


Aktta
Thursday, October 18, 2007 - 4:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नक्की दुख काय आहे.....
पोपट झाल्याच की बूआ झाल्याच...:-)
एकटा.....


Rashmee
Thursday, October 18, 2007 - 8:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो एकटा..मी मैना आहे हा माझा भ्रम असताना त्याने माझा पोपट केला ह्याचं दुखः आहे हो. :-(

Savyasachi
Friday, October 19, 2007 - 1:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो रश्मी, जाऊद्या हो, तोता मैना की कहानी, तो पुरानी, पुरानी हो गयी :-)

Ana_meera
Friday, October 19, 2007 - 6:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग रश्मी असे एकतर्फी प्रेम तारूण्यसुलभ आहे.. प्रेम त्या वयात करावेसे वाटणे, कुणावर तरी जडणे अगदी स्वाभाविक आहे... जरूरी नाही की उभयपक्षी ते वाटेल... प्रत्येकाने १६-२० दरम्यान प्रेम केलेलं अस्तच.. अन ते वय प्रेम सफल होण्याचे नसते.. माझे सुध्दा १० असताना गायनक्लासच्या बाईंच्या मुलावर एकतर्फी अबोल प्रेम होते... नंतर विसरले मी त्याला... भावना अस्तात त्या त्या वयात.. आहे काय न नाय काय.. :-)

Zakasrao
Friday, October 19, 2007 - 6:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आयला क्रश बाबत लिहायच ठरवल तर लैच मोठी लिस्ट होइल की राव. बघु एक एक आठवेल तस लिहिन बर.


Akhi
Friday, October 19, 2007 - 1:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हम्म्म्म!!! सगळे च पोस्ट मस्त!!! काही विनोदी तर कहि हळवे.... माझ्या पण बरर्याच आठवनी जाग्या झाल्या. काही शाळेतल्या तर काही college मधल्या काही माझ्या आणी काही मैत्रिनींच्या

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators