Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 17, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » नाव आणि प्रतिमा » Archive through October 17, 2007 « Previous Next »

Zakki
Wednesday, April 25, 2007 - 5:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तो हूडपणा नसून सत्यवचन आहे.

ही अक्कल आणि भाषा कुणापेक्षा कमी

त्यापेक्षा कुणापेक्षा जास्त आहे असे विचारा. म्हणजे कदाचित् रिकामी यादी तयार होईल!

Disha013
Wednesday, April 25, 2007 - 7:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हर BB का एक दिन आता है जब विषयांतर होता है! :-)

Runi
Wednesday, April 25, 2007 - 8:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिशा परत एकदा मुळ विषयाकडे जातोय हा बी बी
माझ्या नावावरुन तुम्हाला काय वाटत? >>>>
Monakshi तुझा आयडी कसा वाचला जातो (मोन कशी, मोनाक शी, मो नक्षी ) त्यावर ते आहे. मी तो 'मोना कशी' असा वाचला त्यामुळे 'मोना अशी'
मला एकदम मोना डार्लिंग आणि अजित डोळ्यासमोर आले. मोना ये लो सोना हा डायलॉग आठवला. बाकी मला मोनिका हे नाव हेलनच्या पिया तु अब तो आजा मधल्या 'मोनिका ओ माय डार्लिंग' संदर्भात लक्षात राहिल्याने सगळ्या मोना,मोनिका नावाच्या मुली माझ्या मते नेहमी एकदम फटाकड्या असतात.


Farend
Thursday, April 26, 2007 - 7:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला असे वाटते की I च्या शेजारी O असल्याने चुकून नावात ते अक्षर पडले मायबोली चा id लिहिताना आणि नंतर बदलता आले नाही :-)

Farend
Thursday, April 26, 2007 - 7:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि बी, 'खट' पणा किंवा विक्षिप्तपणा सुद्धा भौगोलिक आधारावर ठरवला जातो ना (तो तिकडे एक बीबी बरेच दिवस जोरात वाहतो आहे त्याबद्दल), मग सभ्यपणा सुद्धा तसाच धरला तर काय झाले? :-)

Pinguji
Thursday, April 26, 2007 - 6:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बिंब्----प्रतिबिंबांवरपण लिहा की राव......
भरपुर सापडतील मायबोलीवर!


Suvikask
Sunday, October 14, 2007 - 3:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे हे काय?? सगळ्यांच्या प्रतिमा झाल्या का डागाळुन???

शोधा शोधा... म्हणजे सापडेल.. कुणीतरी...


Chyayla
Monday, October 15, 2007 - 6:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सूविकासक, तुझ्या सुचनेला मान देउन, माझ्या मनात आलेल्या काही आयडी बद्दलच्या प्रतिमा.

सध्या MB वर शैल जा चा "आयती गर्ल" या आयडीचे अल्पावधीतच प्रचंड प्रमाणात पोस्ट दिसत आहेत. तीचा संचारही सर्वत्र आढळुन येतो. हीच्या कमेंटस जोरदार असतात. ती कदाचित एखाद्या आयटी कंपनीत Testing चे काम करत असावी.

दुसरा आयडी सागरचा, प्रश्न पडतो याच्या "माणुस" पणा बद्दल कुण्या शहाण्यानी शंका घेतली होती कुणास ठाउक.? सागर सारख धीर गम्भीर नाव असुनही पोस्टांचा नुसता खळखळाट दिसतोय. काही म्हणा पण वाचण्यासारखे असतात.

" Farend " ही महान व्यक्ति फ़ारच लांब म्हणजे अगदी डोंगराच्या पार शेवटी रहात असावी म्हणुन असा आयडी घेतला असावा.



Itgirl
Monday, October 15, 2007 - 7:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

.."आयती गर्ल"...
छे!! ती मी नव्हेच!! :-)
समीर, ते aayaTI = आयटी अस लिही :-)

.. एखाद्या आयटी कंपनीत Testing चे काम करत असावी ....
नाही :-)

...प्रचंड प्रमाणात पोस्ट दिसत आहेत. तीचा संचारही सर्वत्र आढळुन येतो....
तुझ्झीच नजर लागली हो, आज दिवसभरात कुठ्ठे संचार नाही करता आला मायबोलीवर :-(, म्हणून आता रात्री
दिवे घेशीलच :-)








Zakasrao
Tuesday, October 16, 2007 - 4:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज दिवसभरात कुठ्ठे संचार नाही करता आला मायबोलीवर , म्हणून आता रात्री >>>>>>.
भटकी आत्मा झाली आहे


Maanus
Tuesday, October 16, 2007 - 4:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आयती गर्ल

बापरे हा काय BB आहे... कधी लक्ष नाही गेले इकडे.
माझ्या पोस्ट वाचण्यासारख्या असतात (!).... :-) एकदम मुठभर मास चढल आंगावर :-)


Itgirl
Tuesday, October 16, 2007 - 6:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्या, असला फ़ालतूपणा करण्याआधी, मला पेढे पाठवायच बघ आधी, नायातर झकुल्याला राग येईल तुझा :-)
माणसा तुम्हारी ये जुर्रत??
:-)


Chyayla
Tuesday, October 16, 2007 - 9:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकास, सावध रहा कुठे काही बाही संचारत असत. भटकी आत्मा पासुन बाप्या माणसांच्या जातीने अशा वेळेस सावध राहिलेले बरे.

आयटी गर्ल माझ्याच प्रोफेशनची दीसतेय, तु पण Unix Admin आहेस का? मी पण रात्रीच संचार करतोय MB वर.


Itgirl
Tuesday, October 16, 2007 - 10:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आईशपथ, थंडी हवा का झोका :-) Unix नाही रे, पण शिकायचे आहे :-)

Princess
Wednesday, October 17, 2007 - 4:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरे झाले हा बीबी पुन्हा जिवीत झाला ते... आज मी लिहिते माझ्या ओळखीच्या आणि अनोळखी मायबोलीकरांबद्दल

माझ्या खुप्प आवडत्या आयडी पासुन सुरु करुया
निनावी :-): नावावरुन तरी ही व्यक्ति मला खुप रहस्यमय वगैरे वाटली होती. आयडी वरुनच मला ती खुप प्रतिभावान असेल असेही वाटले होते आणि तिच्या कविता वाचल्यावर ते खरे ठरले.
मृण्मयी हे नाव मला पुन्हा पुन्हा गोनीदांच्या कथानायिकेची आठवण करुन देते. नावावरुन खुप सुंदर आणि लाजाळु, अबोल अशी मुलगी येते डोळ्यासमोर.
लोपामुद्रा: डोळ्यासमोर एक शलिन, जुन्या काळातली स्त्री उभी राहते ना हे नाव वाचुन... हे नाव वाचले तेव्हा लगेच कोण आहे हे जाणून घेण्याचे उत्सुकता निर्माण झाली होती.
अज्जुका तुझ्या नावाचा अर्थ सांग ग नक्की... तुझे नाव वाचल्यावर मला एक मोठी बहिण, कुटुंबाची काळजी घेणारी, थोड्या जुन्या विचारसरणीची व्यक्ति आली होती डोळ्यासमोर.
झक्की :-):या नावाचा अर्थ मला मुळीच माहिती नव्हता. नाव वाचुन तरी मला एकदम टपोरी मुलगा उभा राहिला होता डोळ्यासमोर. पण झक्की हे मुलगा नसुन काका आहेत हे कळल्यावर प्रतिमा जरा उजळली मनात :-). मला झक्कीकाकांचे पोस्ट्स वाचायला मात्र खुप आवडते.
झक्कींचे नाव आले आणि हुडचे नाही... हीहीही... घोड्यावरुन जंगलात दौडत जाणारा एक युवक आला होता डोळ्यासमोर... कसे आहेत प्रत्यक्षात कुणास ठाऊक... हुडका बरे त्याना...
आयटीगर्ल्: नव्या युगाची नवी मुलगी वाटते. प्रोफ़ेशन वर प्रेम करणारी. कामाची आवड असणारी, उशिरा पर्यंत ऑफिसमध्य थांबुन काम करणारी :-)
च्यायला: हे नाव वाचुनच एक वाईट मुलगा आला होता डोळ्यासमोर. पानटपरी उभा राहुन येणार्‍या जाणार्‍या मुलींची छेड काढणारा. नंतर गैरसमज दुर झाला :-)
झकास्: आहा! हे नाव घेणारा व्यक्ति नक्कीच रसिक असावा, हसणारा आणि हसवणारा असावा असे वाटले होते. नंतर ते खरेही झाले.

उद्या उरलेल्या लोकांबद्दल :-) पण आधी मी हे जे काय लिहिलय ते बरोबर आहे का, ते सांगा बरे.



Chyayla
Wednesday, October 17, 2007 - 6:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला: हे नाव वाचुनच एक वाईट मुलगा आला होता डोळ्यासमोर. पानटपरी उभा राहुन येणार्‍या जाणार्‍या मुलींची छेड काढणारा. नंतर गैरसमज दुर झाला

हुश्श्शSSS... बरे झाले देवा गैरसमज दूSSSर झाला. कदाचित माझे "देव म्हणजे काय" या BB वरचे पोस्ट वाचलेले दिसतात.

तशी मुलींची छेड कधीच काढली नाही, कारण छेड काढण्यापेक्षा मैत्री करण्यावर जास्त विश्वास आहे... भुवया काय उंचावताय.. खरे सांगतो आहे अगदी सूपारीच्या खांडाचही व्यसन नाही हो.. पान वैगेरे दूरच राहिले. फारच सज्जन, निर्व्यसनी आहे हो (आता हे वेगळ सांगायची गरज आहे का?)

तरी या BB वर बर्याच मायबोलीकरांची छेड काढली हे मान्य.. खरे तर मी हा आयडी जेव्हा सर्वप्रथम ईब्लिसपणाच्या BB वर भेट दिली तेव्हा तिथे पोस्टायच म्हणुन घेतला होता. बाकी V&C वर काहीन्ना माझ्या बाबतित अजुनही गैरसमज आहे. पण तीथे तीच तर मज्जा आहे.

अच्छा, आणि प्रिन्सेस म्हणजे तीच ना तु "घोडा आSSला घोडा आSSला" असे आनंदानी ओरडत उड्या मारणारी.. बघ मी माझ्याबद्दल सांगितले, आता येउ द्या बाकिच्यांचे.


Chyayla
Wednesday, October 17, 2007 - 6:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपामुद्राच्या बाबतित बरोबर प्रतिमा सांगितली मला तर ते प्राचिन काळातील संस्कृत नाटकातील पात्र वाटतय.. तुम्हाला आठवतय आमच्या काळी 'मृच्छ कटिकम' मधे वसंतसेना, चारुदत्त वैगेरे.. आजकाल अशी मुलांची नाव ठेवली तर काय मज्जा येइल?

Itgirl
Wednesday, October 17, 2007 - 7:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थॅंक्स ग प्रिन्सेस :-) सांग जरा माझ्या बॉसला :-) नाय तर नको, आहे तेवढे काम ओसंडून वाहते आहे, आणखी द्यायचा
शिक जरा समीर, प्रिन्सेसकडून माणसे कशी ओळखावीत ते :-)

.....तशी मुलींची छेड कधीच काढली नाही,.....
तशी म्हणजे??
मग कशी??


Zakasrao
Wednesday, October 17, 2007 - 8:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिन्सेस ने मला बरोबर ओळखले. :-)
आयटीगर्ल बाबत काहितरी गैरसम्ज आहे बर
ती काम करते की फ़क्त टिपी असा प्रश्न पडावा एवढ्या पोस्ट असतात तिच्या. :-)
सम्या प्रिन्सेसला विसरलस?????? घोडावालीच रे ती. शिक्षा देइल हा परत विसरण्याची चुक केलास तर. :-)


Itgirl
Wednesday, October 17, 2007 - 8:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

..ती काम करते...

झक्या, मी स्मार्ट वर्क करते तुला झेपत नाय वाट्ट ते :-) साप भी मरता हैं और लाठी भी नहीं तुटती


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators