Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 05, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » मी केलेला इब्लीसपणा » Archive through October 05, 2007 « Previous Next »

Tiu
Monday, August 20, 2007 - 6:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफ़ा... अरे जबरी आहेस तु!

GM ला प्रसाद... मग नंतर GM भेटला कि नाही?


Runi
Tuesday, August 21, 2007 - 12:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्य धन्य तो चाफ्फा ज्याने सगळ्यांना दुध पाजले.
च्यायला बर्‍याच दिवसांनी तुझे या बी बी वर दर्शन झाले.


Sheshhnag
Tuesday, August 21, 2007 - 2:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गाईंसारखी बायको हवी तर तुम्ही पण बैलोबा असायाला हवे .....

वा! च्यायला, क्या बात है!!

मी बैलोबा आहे की नाही, हे मला माहीत नाही आणि ती उघडपणे सांगत नाही (तिचे माझ्याबद्दल खाजगीतले मत काय आहे, हे कधी कधी चुकून उघडकीस येते. तो भाग वेगळा) पण ती नक्कीच गाय नाही.


Zakasrao
Wednesday, August 22, 2007 - 3:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफ़ा,शेषनाग,च्यायला
सहीच किस्से.
च्या. तुझ लग्न झाल की येइल हो तुला अनुभव :-)
btw चाफ़्या GM ला खरतर ५ वाट्या एकावेळी द्यायला हव्यात रे. तो तर ५ फ़डीचा नाग
अरे हो नागावरुन आठवल शेषनाग तुमची पुजा झाली का पंचमीला :-)
राग मानु नका हो.


Sheshhnag
Wednesday, August 22, 2007 - 11:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पंचमी म्हणा किंवा कोणताही सण घ्या... आम्हा कुटुंब कलत्र असणार्‍य पुरुषांना काय कौतुक!
आमची पूजा रोजच बांधते....
बायको!


Ana_meera
Wednesday, August 22, 2007 - 11:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफा तुम्हाला prize द्यायला हवं मायबोलीकरांकडून!

खूपच इब्लिस? खरा आहे ना किस्सा? नाहीतर कोणी भोळा copy करायचा?


Chaffa
Wednesday, August 22, 2007 - 2:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ana-meera बिनधास्त करा copy पण आता पुढच्या नागपंचमीला.
आणि श्रावण महीन्यात बर्‍याच नव्या गोष्टी करता येतात.
आता कालच आमच्याईथे स्मोक डिटेक्टरची ट्रायल चालली होती त्यासाठी उदबत्या पेटवल्या होत्या आणि त्यांचा धुर त्या स्मो. डि. पर्यंत पोहोचवण्यासाठी त्या ईकडेतिकडे हलवाव्या लागत होत्या सहज गंमत वाटली म्हणुन मी आरती म्हणायला सुरुवात केली. माझे जोडीदार जरा चमकले पण नंतर त्यांनीही टाळ्या वाजवायला सुरुवात केली. म्हणता म्हणता तिकडे फ़िरकणारे सगळेजण आरतीत सहभागी.
दुसरा अचरटपणा म्हणजे मी अलीकडेच फ़्रेंचकट दाढी ठेवली होती आणि कुणी विचारलेच तर श्रावण पाळतोय म्हणुन मोकळा व्हायचो,


Sheshhnag
Thursday, August 23, 2007 - 8:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफा.... हा हा हा हा

आता मात्र कमाल झाली हं.


Ana_meera
Thursday, August 23, 2007 - 12:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

non-marathi लोक श्रध्देने पितील हो दुध!

पण तुमच्या दाढीविषयी १ बाळ्बोध शंका कुणीच घेतली नाही? की हि maintain केलेली दाढी आहे, श्रावणातली आपोआप वाढणारी नव्हे म्हणून?

मगजने मारेच दिसतात सगळे


Chaffa
Thursday, August 23, 2007 - 1:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ana_ meera जी मुळात मी दाढी ठेवत नाही एक आपल सहज म्हंटल बघुया ठेउन फ़्रेन्च्-कट आणि योगायोगाने श्रावण चालु झाला होता (त्याचा माझ्या दाढीशी काही संबंध नाही) पण अचानक जर असे उत्तर दिले तर समोरचा थोडावेळ गोंधळतोच तोपर्यंत तिथे थांबतय कोण?

Ultima
Monday, August 27, 2007 - 7:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफ़्फ़्या : धन्य आहेस रे !!

Hkumar
Tuesday, September 04, 2007 - 5:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शाळेत असताना आम्ही वर्गात नीळ आणि लिंबू एकत्र करून लपवून ठेवायचो. खूप घाण वास सुटतो. नावडत्या तासांना असले उद्योग बरे!

Sonal_sach
Tuesday, September 04, 2007 - 12:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी हॉस्टेल मध्ये राहत होते तेव्हाचा हा माझा आगाऊपणा. आमच्या हॉस्टेलमध्ये एक हळुबाई होती स्वाती नावाची. ती ईतकी हळुबाई होती की कासवाच्या शर्यतीमध्ये सश्याच्या जागेवर असती तर न झोपता पण हारली असती. आम्हाला फ़ार कंटाळा यायचा तिच्या हळूपणाचा. तीला भुताच्या गोष्टी ऐकायला फ़ार आवडायचे.

ज़्या दिवशी मला हे समजले तो तीच्या आयुष्यातील (मला माहित असलेला) सर्वात वाईट क्षण! त्या दिवशी रात्री मी तीला आमच्या हॉस्टेल मागील गल्ली मध्ये भूत आहे हे पटवुन दिले.

तीची खोली माझ्या पेक्षा दोन मजले खाली होती.
दुसर्‍या दिवशी पासुन रात्री माझ्या खिडकीतून एक भयानक चित्र तीच्या खिडकी बाहेर नाचवायला सुरवात केली. सोबतीला आमचे आवाजतर होतेच. ति ते नक्कि बघेल याची खात्री तिच्या रूममेटला करायला सांगीतली आणि तीने दाखवल्यावर तिथे काहिच नाही असे भसवायलाही सांगीतले.
रोज संध्याकाळी येऊन बाईसाहेब माझ्याकडे रडायच्या की मलाच भूत का दिसते. मलाच का आवाज ऐकु येतात.
तर तीला सांगीतले की तु हळुबाई आहेसना मग भूतालाही माहीत आहे की तू पळू नाही शकणार म्हणुन तुझ्याच मागे लागले आहे.




Athak
Thursday, September 06, 2007 - 4:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरच काय इब्लिसलोकांचे एक एक इब्लिस किस्से आहेत :-)

Zakasrao
Saturday, September 22, 2007 - 5:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे रे. काय ह्या BB ची दुरावस्था. चाफ़्याला वेळ नाही वाटत अलिकडे
गुरुकाकानी एक विनोदाच्या BB वर जोक टाकल होता त्यावरुन मला एक किस्सा आठवला. अर्थात हा मी केलेला नाही पण माझ्या डोळ्यासमोर झालेला प्रकार.

दोन टारगट पोरं एखादा नुकताच दहावी झालेला किंवा दहावीत असलेला भोळा भाबडा विद्यार्थी पकडतात. आणि त्याला सांगतात," अरे एक मस्त नोकरी आहे तुझ्यासाठी.
सरकारी नोकरी आहे. शिक्षणाची अट नाही. त्यात तु तर दहावी म्हणजे तुला आधी घेतील. काम एकदम निवांत आरामात एका जागी बसुन. पगार ५००० रु (अर्थात हा किस्सा १९९४-९५ मधला आहे आणि त्याकाळी ५००० ला किम्मंत होती. :-))"
आता हे ऐकुन त्या "बकर्‍याची" उत्सुकता चाळवली जाते. तो खुष होउन पुढे अजुन माहिती विचारतो.
त्यावर उत्तर मिळत "अरे पोस्टात नोकरी. आणी सरकारी नोकरी म्हणजे आयुष्याची ददात मिटते. बोल जर तुझी इच्छा असेल तर सांगेन."
अर्थात इतक सर्व ऐकुन समोरचा सांग म्हणनारच ना. मग उत्तर मिळत "अरे पोस्टात जावुन बसायच.काम काही नाही फ़क्त तोंड आ वासुन बसायच आणि जिभ बाहेर काढायची.** लोक येवुन stamp ओले करुन घेतील.


Sheshhnag
Saturday, September 22, 2007 - 6:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकासराव, डोळ्यादेखत म्हणजे तुम्हालाच कोणी नाही ना केले `बकरा'?
दिवे घ्या हो...


Giriraj
Saturday, September 22, 2007 - 7:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक झकास बकरा! :-) .. .. ..

Chaffa
Thursday, October 04, 2007 - 7:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपला खास दोस्त झकास बाबा झाला. तर आता आपण सर्व मायबोलीकरांचे महत्वाचे काम चालु होते त्याच्या मुलाचे नाव काय ठेवावे बरे.......? सुचवा सुचवा नावं

Dakshina
Friday, October 05, 2007 - 8:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Recently आमच्या office मध्ये एक PM मुंबईहून transfer झाला. त्याला जे work station दिलं होतं. तिथे त्याच्या बर्‍याच requirements होत्या. जसं की म्हणे i didn't like the furniture, want to change it, also need some cupboards. want 2 lines phone insruments. वगैरे वगैरे... आता PM असला म्हणून काय झालं? सगळ्यांनाच हवं ते कुठे मिळतं? अगदी Band & Grade चा विचार केला तरी, हा बिचारा B4 आणि मागण्या B6 - B 7 सारख्या....

पहील्या दिवशी म्हणलं मेल टाक. त्याने मेल टाकली, मग रोज आमचा follow up घ्यायला यायचा... आम्हाला माहीत होतं की त्याची requirement काही आम्ही पुर्णं करू शकत नव्हतो. रोज त्याला थापा असायच्या.. की कोटेशन मागवलंय, वेंडरच आला नाही... इत्यादी..

एकेदिवशी बात मारली की, यात Admin काही करू शकत नाही, आता Projectwise requirement suffice करण्यासाठी PO (परचेस ऑर्डर) ज्याला त्याला raise करावी लागेल. मग त्याला ती कशी create करायची ते सांगून COO चं नाव aprover म्हणून choose करायला सांगितलं.

तो ते काम जवळ जवळ आठवडाभर करत होता. कारण Peoplsoft मधे PO बनवणं ही मोठ्या जिकीरीचं काम आहे.

आणि आम्हाला पण माहीती होतं की त्याची ही PO जन्मात कधी approve होणार नाही ते. कुठल्या COO ला कंपनीला खर्चात टाकावसं वाटेल?

आणि झालं पण तसंच.... आमच्या मागचा follow up टळावा म्हणून हा इब्लिसपणा करावा लागला...



Sheshhnag
Friday, October 05, 2007 - 8:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिनंदन झकासराव! आता झकासचा मुलगा झकासच असणार. मग झकासच्या पुढची आवृत्तीला काय बरं म्हणता येईल? (विचारमग्न चेहरा)

'फक्कड' चालेल का?

दिवे घ्या हो.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators