Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 01, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » मला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिराती » Archive through June 01, 2007 « Previous Next »

Swa_26
Friday, May 25, 2007 - 7:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परेश रावलचीच कुरकुरे की कशाचीतरी जाहीरात आहे, ती पण सही आहे...
परेश रावल खात असतो, मॅनेजर येऊन सांगतो, फ़ॅक्टरीला आग लागली,
हा बोलतो,"मुझे क्या?"
मॅनेजर परेशान... बोलतो,"आपकी फ़ॅक्टरी है".
तर त्यावर परेशचे उत्तर,"तो तुझे क्या??"....


Dakshina
Friday, May 25, 2007 - 10:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सध्या TV वर दाखवण्यात येणारी अत्यंत गलिच्छ जाहीरात म्हणजे एक बाई नदीच्या किनार्‍यावर नवर्‍याची underwear आपटून आपटून आणि वर तल्लिन होउन धूत असते...
काय जाहीरात आहे, अरे देवा...
असल्या जाहीराती काढणार्‍यांना हे स्वतःच कर्तृत्व आहे हे दखवण्याची लाज वाटत नसेल का?


Giriraj
Friday, May 25, 2007 - 11:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला बजाज च्या सगळ्याच जाहिराती आवडतात! क्रिकेट विश्वचषकातून भारतिय हात हलवत परतले त्यानंतर दाखवली जाणारी बजाज अवेन्जर ची I feel like a god तर अगदी मस्त वाटली! मूळच्याच जाहिरातिला फ़क्त दोन तीन नवीन वाक्ये टाकून जबरी बनवलिये!

दक्षिणा,ती जाहिरात अमुल underwear ची आहे... या अमूल चा त्या अमूल शी काही संबंध आहे की नाही माहित नाही पण नसावा कारण अमूल the taste of india च्या सगळ्याच जाहिराती खूप कल्पक आणि छान असतात!


Ajjuka
Friday, May 25, 2007 - 11:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

करेक्टेय दक्षिणा.. अगं पण जाहिरातीबरोबर क्रेडीट लिस्ट नसते ना. :-)

Ajjuka
Friday, May 25, 2007 - 11:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमूल टेस्ट ऒफ इंडिया च्या सगळ्या जाहिराती भरत दाभोळकरच्या असतात. आणि खरंच मस्त असतात. ही जाहिरात सुद्धा खरंतर डोकेबाज आहे पण व्हल्गर आहे.

Dakshina
Friday, May 25, 2007 - 11:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि त्या बाईच्या चेहर्‍यावरचे हावभाव पाहीलेत का? किती cheap आहेत.
असं वाटतं की आत्ता अंगावर धावून येईल की काय...


Giriraj
Friday, May 25, 2007 - 12:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ती जाहिरात आणि त्यातलं product हे पुरुषांसाठीच आसल्याने तशी बनविली असावी जाहिरात..

खूपश्या जाहिरातींमध्ये ओरडून जिंगल्स म्हण्ण्याची पद्धत आलिये.. जसे की आया मौसम ठंडे डर्मी कूल का...

माह्या फ़ार जिवावर येते त्यांचे विव्हळणे!


Sayuri
Friday, May 25, 2007 - 3:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिम्काची जाहिरात..'बूंदोंमैं..बूंदोंमैं...बूंदोंमैं...बूंदोंमैं'
अरे पण पुढे काय? मला एवढा एकच शब्द ऐकू येतो!


Robeenhood
Saturday, May 26, 2007 - 3:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्व शिक्षा अभियानाच्या सर्वच जाहीराती फारच ग्रेट असतात. अगदी कमर्शियलपेक्षाही. उदा. स्कूल चले हम, पोपटाचे ऍनिमेशन.' जबाबदारी आपली आहे... ई.

Manjud
Saturday, May 26, 2007 - 9:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हल्ली ठाणे जनता सहकारी बॅंकेची जाहीरात लागते. सचिन सुप्रियाची. ते काय दोघे tjsb bank ... tjsb bank करुन नाचत असतात मला तर बरेच दिवस ती कुठल्या मसाल्याची वगैरे जाहीरात वाटत होती.

Gobu
Saturday, May 26, 2007 - 10:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला अमिताभची ची एक जाहीरात खुप आवडते
वॉशिन्ग पॉवडरच्या या जाहीरातीत एक गोड छोकरा आहे
तो म्हणत असतो "यलो यलो डर्टी फेलो!"
छोकरा खुपच गोड आहे ह!


Dakshina
Monday, May 28, 2007 - 6:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"नाव बनी रे नाव बनी, देखो कैसी नाव बनी..." ही Reliance PCO ची आणि
"बातोंमें हैं रंगसे..." ही Reliance Mobile ची, दोन्ही जाहीराती अप्रतिम.




Cool
Tuesday, May 29, 2007 - 5:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नुकतीच हच च्या Live search ची जाहीरात बघण्यात आली, प्रचंड कल्पकता वापरलीय मस्त आहे जाहीरात. गावागावातुन, रस्त्यावरुन, वाहनातुन एस्किमोज चालतांना दिसतात, सगळे मिळुन शेवटी एका घरात शिरतात, तर तिकडे एकाने मोबाईल मधे Eskimos word search केलेला असतो, एस्किमोज घरात शिरल्याबरोबर Message दिसतो Search complete वा... !!
Nokari.com ची Hari Sadu असे नाव असलेल्या Boss ची जाहिरात मस्त आहे.

अशीच एक मेल मधुन आलेली जाहीरात सुद्ध मस्त होती, बेगॉन ची असावी बहुतेक, चित्रात फक्त बेशुद्ध होतुन पडलेल्या Spiderman चा हात दिसतो, आणि कोपर्‍यात Begon चे चित्र
जुन्या जाहीरातींपैकी एक जाहीरात फारच तोंडात खेळत रहाते, निरमा सुपर ची. त्यातील 'मान गये, आपकी पारखी नजर और निरमा सुपर दोनो को !!' हे वाक्य अगदी कधीही बाहेर पडते. Testing TL ने Defect list पाठवल्यानंतर त्याच्या मेल ला मी न चुकता 'मान गये, आपकी पारखी नजर और निरमा सुपर दोनो को !!' असा Reply पाठवत असतो


Saee
Tuesday, May 29, 2007 - 5:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'you and I... in this beautiful world..' हचचं जिंगल पण छान आहे कूल:-)

आणि 'मान गए...'च्या आवाजावरुन आठवलं, त्याच आवाजात पुर्वी 'जो बिवी से करे प्यार वो प्रेस्टिज से कैसे करे इन्कार' याही ओळी होत्या!!:-)

हल्ली विक्सची (विक्सचीच ना?) एक जाहिरात लागते, त्यात एक स्थळे सुचवणारी बाई आणि २ - ३ लग्नाळू भवान्या दाखवल्यात. त्यात त्या मुलीला ओळी आहेत त्या म्हणजे 'काकू तो तुमचा एक मुलगा 'तिकीट कलेक्टर' निघाला आणि आता हा काय कॅनडात 'हजामत' करतो?'!!!
म्हणजे?? ही दोन्ही क्षेत्रे कमी महत्वाची आहेत का? सडकून काढायला पहिजे एकेकीला!!


Nkashi
Tuesday, May 29, 2007 - 6:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Nokia - N series (बहुदा) ची ad खुप छान वाटते... (हे लगा लगा लगा... अस काहीस) ३ मुलं, एकाला पोलिस पकडतो आणी उठा-बश्या काढायला लावतो, २ र्या चे गुलाब बकरी खाते.... etc

Bhramar_vihar
Tuesday, May 29, 2007 - 7:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सध्या दाखवत असलेली Happyudent ची ऍड मस्त आहे. मुस्कराले.. झगमगाले!

Ajjuka
Wednesday, May 30, 2007 - 5:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्या mad angles आणि bingo च्या जाहीराती पाह्यल्यात?
mad angles ची सही आहे! twisted humor ... shopping चे कार्यक्रम असतात ना ज्यात एखाद्या product ची माहिती देतात आणि मग किंमत आणि कुठे ऑर्डर करायचं ते सगळं असतं. परत परत ते product वापरणार्‍या लोकांच्या artificial मुलाखती असतात. आणि त्या dubbed असल्या तर फारच विचित्र आवाजात असतात. त्यावर spoof असल्यासारखी ही जाहीरात आहे. बोले तो डोका!
बिंगो पण अशीच आहे.. तामिळ भाषेत या, बसा आणि जा ला काय म्हणतात इत्यादी.. सगळे 'गो' ने end होते म्हणून तामिळ. असे सांगून मग कशाला एवढं confusion तुम्ही फक्त 'बिंगो' म्हणा...


Dakshina
Thursday, May 31, 2007 - 11:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Happy Recharge to you ही Airtel ची जाहीरात माझ्या टाळक्यात जाते.
कुणा मुर्खाने काढली आहे कोणजाणे.


Anahut
Thursday, May 31, 2007 - 12:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरच airtel happy recharge च्या add मधला तो गाणारा मुलगा तर फारच डोक्यात जातो

Marathi_manoos
Friday, June 01, 2007 - 10:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Close up ad was good" Kya aap close up karte hai?" ..One of my favs is Cadbury's ad..whr the guy hits a six and gal dances on ground "Kya baat hai Zindagi mein"

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators