Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
लक्षात आलेले सामाजिक प्रश्न.. ...

Hitguj » My Experience » बहु(जनांकडून)श्रुत » लक्षात आलेले सामाजिक प्रश्न.. « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through October 17, 200720 10-17-07  1:09 pm
Archive through January 24, 200820 01-24-08  8:56 pm
Archive through March 11, 200820 03-11-08  12:07 pm

Ajjuka
Tuesday, March 11, 2008 - 1:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>उशीराने लग्न करणे हा वैयक्तिक प्रश्न असू शकतो पण स्त्रीच्या वाढलेल्या वयात झालेली संतती हा गंभीर प्रश्न होऊ शकतो. अशी जन्मजात विकृती असलेली मुले हा समाजावरील प्रचंड बोजा होतो. तेव्हा पहिले गरोदरपण ३५ वर्षे वयानंतर येणे ( व ते करीअरच्या पायी) हा नक्कीच गंभीर प्र. आहे.<<शी किती assumptions!
तुमच्या पोस्टमधल्या काही खटकलेल्या गोष्टी..
१. ३५ नंतर अत्यंत निरोगी संतती जन्मू शकते. ३५शी नंतर होणारे मूल हे defective च असेल असं काही नाही. आणि २०व्या वर्षी झालेले मूल हे विकृत (तुमचाच शब्द आहे मी अश्या मुलांना विकृत म्हणू शकणार नाही) असणारच नाही याची काहीही gurantee नाही.

२. शारीरीक दृष्ट्या सक्षम असूनही अनेक मानसिक विकृत माणसे या जगात आहेत, अनेक खायला काळ भुईला भार अशी माणसे या जगात आहे. त्यांनाही समाजावरील बोजा मानायला हवं तुमच्या तर्काप्रमाणे. केवळ जन्मतः दोष असलेल्या मुलांनाच का बोजा मानायचं नाही का? आणि त्यांचं काहीतरी केलं पाहीजे असं पण म्हणता येईल नाही का!

३. करीयरच्या पायी असं म्हणत तुम्ही बाईने करीयर करणं हा गुन्हा असल्यासारखा सूर लावलात. जो मला मुळात विकृत वाटतो त्याचं काय करूया?

४. तुमच्याआमच्यासारखे नसलेले म्हणून मूल विकृत? हे कसे काय? आपल्याला त्याच्याशी योग्य त्या प्रकारे संवाद साधता येत नाही म्हणून ते मूल विकृत? एक defect (आपल्यामते) जेव्हा असतो त्या मुलामधे तेव्हा एक जास्तीची चांगली गोष्ट पण असणारच की. फक्त आपण ती शोधायला कमी पडतो.


जन्मणार्‍या मुलाला योग्य त्या सगळ्या गोष्टी योग्य त्या पद्धतीने देता येतील तेव्हाच मूल होऊ देणे या हेतूमधे काहीही चुकीचं नाहीये. उशीर करू नये हे सगळ्याच मुलींना माहित असतं. असल्या भडक आणि derogatory शब्दात ते दुसर्‍या कोणी सांगायची गरज नसते. आणि कुणाची उशीर करण्याची कारणं योग्य आणि कुणाची अयोग्य हे ते ठरवण्याचा तुम्हाआम्हाला अधिकार नाही. त्यांचं आयुष्य जेव्हा आपण जगू तेव्हाच तो अधिकार आपल्याला प्राप्त होईल. त्यामुळे जो काही त्या व्यक्तीचा निर्णय आहे तो त्या त्या व्यक्तीचा खाजगी निर्णय म्हणून त्याचा आदरच बाळगला पाहिजे.


Marathifan
Tuesday, March 11, 2008 - 2:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुकाला अनुमोदन... HKumar ह्यांच्या post मधिल सगळ्यात खटकलेली गोष्ट
अशी जन्मजात विकृती असलेली मुले हा समाजावरील प्रचंड बोजा होतो
का समाज काय करतो हो(त्यांच्या शाळा वगैरे असतात..त्यान्च्या बद्दल पूर्ण आदर आहे )? आइ-वडिल आणि जवळचे सगे-सोयरे करतात त्यान्च...
भारतत अशी कोणती support system आहे त्यांच्यासाठी सांगा
आणि अशी मुले बोजाच का हो..मुल मुल असत जस असेल तस त्याला सक्षम करायच हा उपाय असतो...भांडायचा मुळीच उद्देश नाही..पण मनाला लागल म्हणुन लिहील.. नहीतर मी साधारण readonly mode मधे असते..


Shankasoor
Tuesday, March 11, 2008 - 3:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

H Kumar तुमच्या post मधला मुद्दा मला अजिबात पटत नाही.
will you please justify your statement? I don't see a single chance of you giving a valid justification around it.
तुम्ही medical doctor आहात, तुम्ही कदाचीत medical justification द्याल, पण त्यावरून तुम्ही जे generalization करत आहात, ते नक्कीच चुकीचे आहे.
मी कित्येक पालक असे पाहिले आहेत, ज्यांची अपत्ये शारीरीक वा मानसीक दृष्ट्या विकलांग आहेत, आणि ते पालक अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांचे पालनपोषण करतात. I have seen many parents accepting this as a challenge and succeed in it being great parents.
कदाचीत, आजुबाजूचा समाज हाच त्या पालकांसाठी एक मोठं प्रश्णचीन्ह उभं करतो. त्या मुलांना कायम hatred सहन करावी लागते.



Ajjuka
Tuesday, March 11, 2008 - 3:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्हणजे खरा प्रश्न त्या मुलांचा किंवा त्यातल्या काही जणांच्या मोठ्या वयाच्या आईचा नसून त्या मुलांना विकृत, समाजावरील बोजा म्हणू धजावणार्‍या मानसिकतेचा आहे आणि हा मात्र नक्कीच महत्वाचा सामाजिक प्रश्न आहे.


Uday123
Tuesday, March 11, 2008 - 6:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एच कुमार्- उशीरा होणारी संतती (३५+) आणि जन्मजात विकृत मुले यांचा संबंध आहे असे आपण सुचवत आहात. थोडी विश्लेषण कराल कां? जर माहितीपुर्ण लिंक असेल तर कळवा.

समाजावर बोजा हा शब्द चांगलाच खटकला.

आजुबाजूचा समाज हाच त्या पालकांसाठी एक मोठं प्रश्णचीन्ह उभं करतो- शंकासूर एकदम बरोबर.



Dineshvs
Wednesday, March 12, 2008 - 3:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा, मायबोलिकर चंपक ला आलेल्या भीषण अनुभवाबद्दल लिहायलाच हवे.

गेल्या रविवारी, तो घरात एकटाच होता. दुपारच्या वेळी, पाच धिप्पाड फ़ेटा घातलेले तरुण त्याच्या घरी आले. त्याने साखळी लावुन दरवाजा उघडला, तसे त्यातल्या एकाने, हात घालुन ती साखळी उघडली.
लंगरसाठी १०० किलो तांदुळ द्या म्हणून मागणी करु लागले, तो म्हणाला घरात इतके तांदुळ कुठुन असणार, तर ते म्हणाले कि पैसे द्या.
तो एवढा भोळा, कि हातातले पाकिट दाखवत म्हणाला, सुट्टे नाहीत, आणि नंतर त्याला दिसले कि त्याच्या पाकिटातली हजाराची नोट गायब आहे.
भानावर आल्यावर तो वरच्या मजल्यावर धावला, तर तिथेही त्या लोकानी त्याला बाजुला बोलण्यात गुंगवुन ठेवले आणि वरच्या मजल्यावर राहणार्‍या लोकानाही लुटले.

त्या नंतर मी त्याला भेटलो, हे कसे घडले तेच त्याला आठवत नव्हते.

सिख लोक कधीच लंगरसाठी कुणाकडे हात पसरत नाहीत. त्यांच्या देणग्या आणि श्रम कायम आपमर्जीने दिलेल्या असतात.
त्यांच्या गुरुद्वारात जेवणाची व्यवस्था कायम असते आणि ती सर्वांसाठी खुली असते. मी स्वतः अनेक गुरुद्वारात जाऊन प्रसाद घेतला आहे, आणि त्या धर्माचे नाव घेऊन चोरी करावी याचे मला सर्वात वाईट वाटले.

चंपकने पोलिसाना कळवले पण त्याचा उपयोग झाला नाही. मी त्याला वर्तमानपत्रात लिहिण्याचे सुचवले आहे. त्याच्या वतीने मी इथे लिहितोय.

आणि देवाचा शाप वगैरे सब झुट आहे. कुठेतरी छानसे वाचलेले मधे मी, नीता गद्रे यांचा एक मोठा उतारा पोस्ट केला होता. तो अवश्य वाच.


Hkumar
Thursday, March 13, 2008 - 2:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उदय२३, अशा खूप links आंतरजालावर आहेत. उदा.
http://www.gbmc.org/genetics/harveygenetics/prenataldx/PatientInformation/maternalage.cfm .
अशा high risks preg संबंधीच्या lab tests माझ्या lab मध्ये होत असतात तेव्हा त्या जोडप्याची बिघडलेली मानसिक स्थिती मी बघत असतो. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे....

Dakshina
Friday, March 14, 2008 - 10:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रद्धा, अगं आम्ही असंच करतो. रादर आता आम्ही इतके पटाईत झालोयत की, बेलच्या टोन वरून कळते बाहेर कोण आहे ते. पण आपल्यासारखे सगळेच बोल्ड असतिल आणि पैसे न देता त्यांच्या तोंडावर दार बंद करणारे असतील असं नाही ना? कित्येक परिस्थिती नसलेले लोक पण असल्या शापाच्या भितीला घाबरून, असतील नसतील ते द्यायला सुद्धा कमी करणार नाहीत.

दिनेश, तुम्ही सांगितलेला किस्सा वाचून घाबरलेच. आम्हाला ही अता निट चौकस राहीले पाहीजे. नीत गद्रेंचा लेख वेळ मिळाला की वाचते.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators