Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 27, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » मला चुकीची ऐकू आलेली गाणी » Archive through September 27, 2007 « Previous Next »

Shyamli
Friday, August 10, 2007 - 3:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनु
जबरीच आहे हे गाण (त्या मौलीच्या आवाजात ऐकायला मस्त वाटेल )

योगेश अरे पुरे पुरे........... काहिही

Dakshina
Tuesday, August 14, 2007 - 8:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज सकाळीच रेडिओ मिर्चीवर 'कल हो ना हो' मधलं सोणी सोणी आजा माहीवे....
हे गाणं ऐकत होते तेव्हा मला ते गाणं नीट कळलं.
पुर्वी मी 40-20-6 सोणी सोणी.. असं ऐकायची...
म्हटलं की 40-20-6 ही काय भानगड आहे? मग विचार केला असेल, कहीतरी sign अपण नाही का लहान मुलांना सांगत
की 'मी साडे - माडे, तीन म्हणलं की मगच उडी मारायची बर का..'
तसं हा गायक यानं 40-20-6 म्हणलं की मग मागच्यांनी 'सोणी सोणी' म्हणायचं


Zakki
Tuesday, August 14, 2007 - 6:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मग ते नक्की काय आहे?

Tiu
Tuesday, August 14, 2007 - 11:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मग ते नक्की काय आहे?

every body sing, soni, soni, aaja mahi ve...

every (40) body (20) sing (6)!!!


Anjut
Wednesday, August 15, 2007 - 5:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुर्वी एक गाण होत
अपनी कहानी छोड जा कुछ तो निशानी छोड जा
............मौसम बीता जाय ते मी ऐकायचे मोसम्बी ताजा है


Rajya
Friday, August 24, 2007 - 10:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक गाणं आहे

आऽऽऽऽऽऽ जुन से पहली मुलाकात होगी
फिर होगा क्या, क्या पता, क्या खबर

मला नेहमी प्रश्न पडायचा जुन महीन्याच्या आधी यांची मुलाकात होणार आहे तर हे साहेब कुठल्या महीन्यात गाणं म्हणत असतील?

नंतर कळलं ते
आज उनसे पहली मुलाकात होगी असं आहे.


Ana_meera
Saturday, August 25, 2007 - 11:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

युं हसरतों के दाग
मुहोबत से छीन लिए
खुद दिलसे दिलकी बात करी
और रो लिएSSSSS

nantar kaLle kee te muhobat me Dho liye aahe!!!!

Zakasrao
Monday, August 27, 2007 - 4:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काशी, काल कुठला तरी अवार्ड चा प्रोग्राम पाहताना गोविंदा आणि सलमान यानी त्या पार्टनर अधल्या गाण्यावर डान्स केला.
ते गाण मला आई शप्पत परत तु बोलल्या प्रमाणेच ऐकु आल.
तस बायकोला बोललो तर ती प्रचंड हसली आणि मग योग्य शब्द सांगितले तिने. :-)
अरे हा त्या गाण्याच्या सुरवातीला जे म्हणतात ना ते "ओ पार्टनर" ते मला वाटत की रस्त्याच्या खाली टाकण्यासाठी ज्या जलवाहिन्या असतात मोठ्या मोठ्या, त्यात तोंड घालुन म्हणलय त्यामुळे तो आवाज तसा घुमुन येत असावा :-)
राज्या तो मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गाण म्हणत असेल.
म्हणजे कस पगार झालेला असतो, दिल खुश असत वै..... :-)


Kashi
Monday, August 27, 2007 - 8:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकस.... :-) :-) :-) चला म्हणजे मीच चुकीचे एकत नाही तर.....:-)
हा मी लहान असतांनाचा कीस्सा- सुंदर ते ध्यान उभे विटेवरी...कर कटावरी ठेवोनीया... हे मी कर्कटा वरी ठेवोनीया.. असे एकायचे...कर्कटक घेवुन सुंदर असणार्याचे 'ध्यान' करतायत असे वाटे...


Mahesh_k
Friday, September 14, 2007 - 12:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी लहान असताना

'लेक लाडकी या घरची
होणार सून मी त्या घरची'
हे गाणे

'लेक लाडकी या घरची,
होणार सून मी दहा घरची...'

असे ऐकू यायचे.. ;-)



123098
Friday, September 14, 2007 - 8:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी एक मावसबहीण लहान असताना 'लिखे जो खत तुझे' हे गाणे असे म्हणायची--
लिखे जो खत तुझे वो तेरि याद मे
हजारो रंग के नजारे बन गये
सबेरा जब हुआ तो फूल बन गये
जो रात आयी तो लुटेरे बन गये

मी तिला नेहमी सांगायची की ते लुटेरे नाहीये पण ती म्हणायची की छे छे रात्र झाल्यावर लुटेरेच येणार ना. आणि ती बरीच मोठी होइपर्यन्त ते तसेच म्हणायची.


Zakki
Saturday, September 15, 2007 - 1:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी लहानपणी 'हवा सतू' असे ऐकत असल्याने मला प्रशन पडायचा की सतू म्हणजे काय? सतीश ला सतू म्हणतात का?
मग कळले की ते 'हवास तू' असे आहे.


Manuswini
Saturday, September 15, 2007 - 6:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला खरे तर अजूनही ह्या गाण्यात गोंधळ होतो नक्की काय कुठे घालायचे ते, कधी कुठे ते,

मुझे छू रही है तेरी नर्म सांसे...
मग ती म्हणते
तेरी गर्म सांसे...

मी आलटून पालटून पाहीजे तिथे पाहीजे तेव्हा नर्म, गर्म टाकून म्हणत असायचे. मग थोडेसे डोक लढवून कळले की जवळ आल्यावर सांसे तापणारच ना :-) body heat हो....... :-)
मग ती मुलगी नर्म का म्हणते सांसे गर्म असल्यावर?
हे गाणे एकताना खरेच गोंधळ होतो......... एकून बघा.
एकदा गर्म, एकदा नर्म...........



Gajanandesai
Sunday, September 16, 2007 - 5:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हवा के साथ साथ
घटा के संग संग ओ साथी चल

या जुन्या गाण्यात पुढे असे आहे-

मुझे लेके साथ चल तू
यूँ ही दिनरात चल तू
संभल मेरे साथ चल तू
ले हाथों में हाथ चल तू

यातला साथ हा शब्द मला दोन्ही ठिकाणी 'सास' असा ऐकू यायचा. अर्थ अर्थातच लागायचा नाही. इथे आता हिची सासू कुठून आली? पण वाटायचे- काही का असेना.. अरे तुरे करतेय खरी, पण सासूला बरोबर घेऊन, सांभाळून चालतेय, बरी आहे!



Chchotu
Tuesday, September 25, 2007 - 6:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी बरेच दिवस "झाल्या तिन्हिसान्जा" य गान्याचि पुढिल ओळ "करुन शिरा आनी सान्जा" असे म्हणत होतो.

Chchotu
Tuesday, September 25, 2007 - 6:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इश्क दी गली विच कोइ कोइ "लन्गडा" म्हनजे काय?
प्रेम केल्यावर मार खावुन झाला असेल का "लन्गडा"?


Maanus
Tuesday, September 25, 2007 - 9:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दादा कोंडके ला चक्कर यायची. :-)

ह्या गाण्यातली नायीका कोण? त्या उषा पेक्षा बरीच (लै) चांगली आहे दिसायला


Chchotu
Wednesday, September 26, 2007 - 4:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेरे सामने वाली खिडकी मे....... कुछ उघडा उघडा रहता है. (असे लहानपनी म्हनायचो.)

Chchotu
Thursday, September 27, 2007 - 11:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मानुस,
त्या नायिकेचे नाव अन्जना मुम्ताज असे ऐकले आहे.


Dineshvs
Thursday, September 27, 2007 - 4:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आंधळा मागतो डोळा, सिनेमातली नायिका का ? ती अंजना च होती. पुढे मला वाटतं लग्नानंतर ती मुमताज लावु लागली.
मेहमुदच्या पण एका सिनेमात होती ती. बहुदा दो फ़ुल मधे.
मग टिपिकल माँच्या भुमिकात दिसु लागली.
मैने तेरे लिये रे जग छोडा, तु मुझको छोड चली, हे नागोबागाणे पण तिच्यावरच चित्रीत झालेय. गाणभर ती मेलेली असते, मग शेवटीशेवटी जिवंत होते.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators