Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 28, 2007

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट - अचाट आणि अतर्क्य » अचाट सीन आणि अतर्क्य लॉजिक » Archive through September 28, 2007 « Previous Next »

Deepanjali
Thursday, September 27, 2007 - 7:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बॉबी मधे ' हम तुम एक कमरेमे बन्द हो ' गाण्यात एक ओळ आहे ...
हम तुम किसी जंगल से गुजरे और शेर आ जाए
शेर से मै कहू तुमको छोड दे , मुझे खा जाए '
त्या ओळीच्या वेळी डिंपल जॅकेट काढून गुडघ्यावर का बसते ?
आधीच कपडे काढून ठेवले तर सिंहाला खायला सोपे जाईल म्हणून का ??


Avyakta
Thursday, September 27, 2007 - 7:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डीजे अगं जॅकेट प्राण्यांच्या कातडीपासुन बनवलेलं असेल त्यामुळे सिंहाला चालत नसेल खायला. .. म्हणुन असेल कदाचीत.

Psg
Thursday, September 27, 2007 - 8:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'ज्युली' मधलं 'बोल्ड' म्हणून अतिगाजलेलं गाणं 'भूल गया सब कुछ' नुकतंच पुन्हा पाहिलं.. त्यात त्या विक्रमचे expressions पहा.. अरे गाणं काय, situation काय, हीरॉईनपण तिला जमेल तितकी sensuous expressions द्यायचा प्रयत्न करतीये आणि हा बाबा आपला सारखा त्याच्या घश्यावरून हात फ़िरवतोय!!! कशासाठी??? मी 'प्यासा' आहे वगैरे दाखवायचा हा प्रयत्न आहे का? बरं ती हीरॉईन अगदी टाचक्या आणि घट्ट कपड्यात आणि हा चक्क झब्बा-पायजम्यात!!! गाण्यात पुढेतर ती नुसत्या चादरीत दाखवली आहे.. तरी याचा घश्यावरचा हात फ़िरणं थांबत नाहीये.. उलट शेवटी तर तो तिच्या घश्यावरून हात फ़िरवतोय.. अरे sensuous गाणं आहे की गंमत? त्याला टेन्शनच आलं असावं हे गाणं करताना.. :-) ती बया मात्र अगदी बिन्धास्त आहे हं! :-)

आपण लहान असताना नक्की कशाला लाजून हे गाणं पहात नव्हतो? :-)


Deepanjali
Thursday, September 27, 2007 - 8:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

rofl पूनम , गळा !! पाहिलं ते गाणं तेवढ्या सथी परत !!
बाकी ती जुली कसली चावट आहे ना !
ती प्रचंड sensuous आणि तो विक्रम आगदी मा ssss ठ आहे येडपट !


Farend
Thursday, September 27, 2007 - 8:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विक्स किंवा Strepsils ने सहज स्पॉन्सर केले असते हे गाणे :-) पाहायला पाहिजेत ही दोन्ही गाणी पुन्हा एकदा

Zakasrao
Thursday, September 27, 2007 - 8:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

DJ आणि पुनम
पुनम तुला नसत्या शंका :-)
BTW तो ड्रॅक्युला आहे की काय सारख घशाकडे हात जातोय
की नाक कान घसा तज्ञ? :-) अशी शंका यायला मात्र हरकत नव्हती.
आणि गाण्याचे शब्दच त्याला काय झालय ते सांगतात की भूल गया सब कुछ'



Kandapohe
Thursday, September 27, 2007 - 8:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समोर अशी बया असल्यावर घशाला कोरड पडणारच ना? काय पण तुम्ही लोक, एवढे नाय कळत.

Chinya1985
Thursday, September 27, 2007 - 2:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे आपल्या घशाला कोरड पडल्यावर काहि समोरच्याचा घशावरुन हात फ़िरवतात का??
माझ तर मत आहे की ती ज्युलिच सगळ्यांना सिड्युस करत असते. नंतर ती दुसरी बया तिला अस काय सांगते की ती वेश्या बनते??


Dineshvs
Thursday, September 27, 2007 - 4:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला आठवतय, त्या गाण्याची आमच्या आयानी इतकी धास्ती घेतली होती, कि उघडपणे गुणगुणायची पण चोरी होती. त्यावेळी टिव्हीवरचे प्रोमोज नव्हते, पण थिएटरवरची पोस्टर्स बघण्यावरच समाधान मानावे लागत असे.
पण याच विक्रमने पुढे सितम नावाचा सुंदर सिनेमा निर्माण केला होता. स्मिता, नासिर आणि तो होता.


Disha013
Thursday, September 27, 2007 - 5:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारी चर्चा चाललिये!
डिंपल खाली का बसली, तो घशावरुन का हात फ़िरवतो.... हीहीही.......
जुलीबर असे हाल त्याचे,मल्लीकाबर काय होईल?


Farend
Thursday, September 27, 2007 - 8:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अशा विनोदी चित्रीकरण असलेल्या गाण्यांचा एक वेगळा फोल्डरच उघडता येईल. सुनील दत्त आणि आशा पारेख चे एक गाणे आहे 'इतना न मुझसे तू प्यार बढा के मै एक बादल आवारा'(ऐकायला खूप छान आहे) यात 'है नाम मेरा जल की धारा' या वाक्याच्या प्रत्येक उच्चाराला आशा पारेख हातांची ओंजळ करून पाणी ओतल्यासारखी action करते. ते एकदा ठीक वाटते पण नंतर प्रत्येक वेळा दिसल्यावर एकदम हास्यास्पद दिसते.

Chinya1985
Thursday, September 27, 2007 - 9:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे हा कुठला जुली पिक्चर आहे??मी तर नेहा धुपियावाल्या ज्युलि बद्दल लिहिल होत. तरिच मी विचार करत होतो हे कोणत गाण आहे त्या सिनेमात. मला तर एकच गाण आठवत्-ज्युलि.......इ.....इ

Farend
Friday, September 28, 2007 - 12:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा बघा लोकहो
बार बार दिन ये आये अफलातून डान्स आहे. जीतूने गळ्यात काय घातले आहे ते नीट कळत नाही पण टाय वाटत नाही. नाचणार्‍यांत एक फर कॅप वालाही आहे.
कायम नुकतीच झोपेतून उठल्यासारखी दिसणार्‍या बबीताला 'तू बहार खुद कहलाये' वगैरे म्हंटलेले सहन करायची तयारी असेल तर :-)

Tiu
Friday, September 28, 2007 - 12:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

lol psg

आमच्या observation प्रमाणे ह्या गाण्यात हिरो ७ वेळा स्वत:च्या घश्यावरुन आणी ७ वेळा हिरोईनच्या घश्यावरुन हात फिरवतो...

शिवाय हे कमी म्हणुन कि काय, हिरोईन २ वेळा हिरोच्या घश्यावरुन हात फिरवते! :-)

मानलं पाहिजे director ला...


Ashwini_k
Friday, September 28, 2007 - 5:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्या, तुझा जन्म १९८५ चा आहे का? ( ID वरून असे वाटते). ज्यूली आला तेव्हा तू जन्मलाच नसशील. ज्यूली सिनेमा आला तेव्हा मी शाळेत जात होते. तेव्हा फ़क्त एवढंच ऐकले होते की ज्यूली हा काहीतरी वाईट पाहू नये, वाईट ऐकू नये, वाईट बोलू नये यापैकी प्रकार आहे. मोठं झाल्यावर T.V. वर थोडासा पाहीला.

जुन्या ज्यूलीमध्ये षोडशा श्रीदेवी आहे (मला वाटते ज्यूलीची धाकटी बहीण).

ते "घसा" गाणे शूट करायच्या आधी लक्ष्मी व विक्रम ने "बरका फ़णस" खाल्ला असेल व तो घशात अडकला असेल (मी स्वानुभवावरून बरक्या फ़णसाचा धसका घेतला आहे).

तो विक्रम नंतर "स्वामी" सारख्या सुंदर सिनेमात आला होता, गिरिश कर्नाड व शबाना आझमी बरोबर्-आठवा ते गाणे "पलभरमें ये क्या हो गया, वो मै गयी वो मन गया, चुनरी कहे सुनरी पवन, सावन आया अबके सजन, दिनभर मुझे ये सताये, तुमबीन अब तो रहा नही जाये"


Swa_26
Friday, September 28, 2007 - 5:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असेच फनी चित्रीकरण 'सांग तु माझाच ना' या मराठी गाण्याचे आहे.
सविता प्रभुणे जितक्या वेळा ते 'सांग तु माझाच ना' म्हणजे तितक्या वेळा तो उदय टिकेकर आपली मान हलवत असतो... हो म्हणुन!!
एक दोन वेळा ठिक आहे पण प्रत्येक वेळी!!


Ana_meera
Friday, September 28, 2007 - 6:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग स्वाती, नाचात किंवा गाण्यात समेवर यावं लागतं की नाही, ते प्रेक्षकांना कळण्यासाठी तीच तीच action करत असतील..

Psg
Friday, September 28, 2007 - 6:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़ारेंडा पाहिलं ते गाणं.. कसली अचाट कोरीयोग्राफ़ी आहे! आणि बबिता काय लहान मुलीसारखा फ़्रॉक उडवतीये.. काहीच्याकाही दाखवतात बाबा!

बरं पण ते रहस्य काय आहे? ते खुणा कशाला करत असतात? बबिताला कोणी नंतर 'फ़सवतं' का?


Farend
Friday, September 28, 2007 - 8:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम तो काहीतरी बॉन्ड सारखा रोल आहे त्यामुळे काहीतरी बबीताशी संबंध नसलेले कारस्थान मागे चालू असावे. पण तेव्हाचे दिग्दर्शक आपल्या प्रेक्षकांना मठ्ठ समजत असावेत. कारण कारस्थान चालू आहे हे प्रेक्षकांना कळत नसल्यासारखे सगळे जण एकमेकांना डोळे मारत असतात.

याउलट सलीम जावेद च्या स्क्रिप्ट्स मधे हे गृहीत धरलेले असते की नीट दाखवले तर आपोआप समजेल. जसे डॉन मधे अमिताभ त्या पुलावर चालत जाऊन खाली उभ्या असलेल्या इफ़्तेकार ला उद्देशून म्हणतो "मै डॉन के बारे मे इतना जान गया हूॅ के अब मेरी याद्दाश्त वापस आ सकती है". यात कोठेही काहीही समजावण्याचे पाल्हाळ लावलेले नाही, पण समस्त जन्तेस बरोबर कळते त्याला काय म्हणायचे आहे ते :-)


Shraddhak
Friday, September 28, 2007 - 8:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़ारेंड... .. तो पूर्ण सिनेमा आता पाहीन म्हणतेय. अचाट नि अतर्क्य मध्ये अख्ख्या सिनेमाबद्दलच लिहिन म्हणते. :-P
त्या गाण्यात वाईनसाठी द्राक्षं तुडवतात तसा एक फुगे तुडवण्याचाही सीन आहे शेवटी शेवटी.
त्यामधल्या बायांच्या काही डान्स स्टेप्स पाहून मला नकीताचीच ( वीराना फ़ेम) आठवण आली.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators