Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 13, 2007

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट - अचाट आणि अतर्क्य » मन डोले मेरा तन डोले.... » Archive through September 13, 2007 « Previous Next »

Farend
Wednesday, September 12, 2007 - 9:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापरे म्हणजे नवीन जानी दुश्मन ने जुना जानी दुश्मन RGV सारखा update केलेला दिसतोय. आम्हाला एकावेळी एका चित्रपटात नाग किंवा भूत यापैकी एकच काहीतरी बघायची सवय होती. समोर दिसणारे कॅरेक्टर मनुष्य, नाग का भूत आहे हे मनिषा कोइराला च्या अभिनयावरून ठरवायचे म्हणजे अवघड आहे.

Nandini2911
Wednesday, September 12, 2007 - 9:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्या नविन जानी दुश्मन मधे ११ हीरो आहेत आणि ते कॉलेजमधे एका वर्गात शिकत असतात.
आदित्य पाचोली, सुनील शेट्टी, अक्षय कुमार, सोनु निगम, सनी देओल. आफ़ताब शिवदासानी, अर्शद वारसी, शरद कपूर इत्यादी एकाच वर्गात शिकत असतात,
त्याच्या हीरॉईन्सची नावे मला आठवत नाही. :-)
पण मनिशा पण त्याच्याबरोबर शिकत असते. एके दिवशी एका वडाच्या झाडाखालून एक नाग येतो आणि मनिशाला सांगतो मीच तुझा प्रेमी
"दो हजार साल पहले हम इसि जगह पे मिले थे..." फ़्लॅशबॅकमधे गाणे,
ती विश्वास ठेवत नाही. (??)
मग नंतर तिचा रेप होऊन खून होतो. ती भूत बनते. तिला असं वाटतं जी या उपरोक्त व्यक्तीचा यामधे हात आहे. आणि ती आणि तो कपिल नावाचा नाग मिळून सर्वाचा बदला घेतात. राज बब्बर पाद्री असतो. तो त्याना एक ताईत देतो, हा ताईतवर ओम चंद्र आणी क्रॉस असतो. मग सनी देओल त्या नागाचा आणि त्या भुताचा खातमा करतो

(नवीन आणि जुना दोन्ही जानि दुश्मन राजकुमार कोहली नावाच्या व्यक्तीनेच बनवले आहेत)


Shraddhak
Wednesday, September 12, 2007 - 10:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तो ओम आणी चंद्र क्रॉस असतो<<<<
नंदिनी वाक्य खाल्लं आहेस का? अर्थ लागत नाहीये.

Zakki
Wednesday, September 12, 2007 - 1:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आऽयला! नंदिनी२९११, काय अफलातून इश्टोरी आहे! असला धमाल सिनेमा, हिंदी असला तरी दोन तीनदा पहायला पाहिजे. मला हिंदी चांगले येत असले तरी पहिल्यांदा पहाताना 'आता हा कोण, ही कोण, ही इथे कशी आली, तो तिकडे का गेला' असे बरेच प्रश्न पडतात. कारण सगळे भारतीय मला सारखेच दिसतात.

शिवाय बहुतेक हिंदी सिनेमे Bourne Ultimatum सारखे एकदा पाहून लगेच समजण्याइतके सरळ नि सोप्पे नसतात.
Maitreyee
Wednesday, September 12, 2007 - 3:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आदित्य पाचोली, सुनील शेट्टी, अक्षय कुमार, सोनु निगम, सनी देओल. आफ़ताब शिवदासानी, अर्शद वारसी, शरद कपूर इत्यादी एकाच वर्गात शिकत असतात, >>>>हर्रे राम हा कुठला वर्ग म्हणे! प्रौढ साक्षरता वर्ग असेल बहुधा
त्या अनुराधा पौडवाल च्या 'त्यू' चे अजून एक ढळढळित उदाहरण 'त्यू मेरी जिन्दगी है.. त्यू मेरी हर खुशी है.. त्यूही प्यार त्यूही चाहत त्यूही आशिकी है

Kedarjoshi
Wednesday, September 12, 2007 - 4:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नागीण मूळ नागीण रूपात असताना कपडे घालत नाही म्हणून मनुष्यरूपातही ती कमीत कमी कपडे घालते.) >>>>


एकदम ढिंगच्याक लिहीलय.


Amruta
Wednesday, September 12, 2007 - 4:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एवढ्या सगळ्या हिरोंची नाव लिहिली आणी मुख्य नागोबाच नाव राहील की ग नंदिनी :-)
तर त्या राजकुमार कोहोली नावाच्या व्यक्तीने आपल्या हिंदीत फ़्लाॅप असलेल्या अरमान कोहोलीला त्या नगोबाचा (बाकी घोड तरुणांपेक्षा मोठ्ठा) role दिलाय आणि एक से एक फ़ंडु actions दिल्यात.


Sunidhee
Wednesday, September 12, 2007 - 5:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय भयानक साप आहेत एकेक!! सॉलिड मजा आली श्रध्धा. आणि इतर प्रतिक्रिया वाचताना पण.
"नगीना" जास्त आवडले.

अनुराधा आणि "त्यु"!!!!!!! अगदी अगदी... "दुल्हा त्यु द्युलहन्न मै बेन जा SS ऊंगी".. अगदी असे म्हणतात बाईसाहेब. ऐकवत नाही..
slarti काय कतरनाक लिहिलेत!! मनीशा का कोण हिरोच्या पाठीवर उभी राहुन वळवळ???? पाठदुखी लागली असेल त्याला..


Mi_anu
Thursday, September 13, 2007 - 4:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जबरदस्त आहे हे नाग पुराण! लेख पण आणि प्रतीसाद पण.


Shraddhak
Thursday, September 13, 2007 - 5:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुनिधी, मनीषा नाही सुरुवातीच्या काळातली अतिगुटगुटीत रेखा चाळिशीला आलेल्या सुनील दत्तच्या पाठीवर वळवळताना ( ?) दाखवलीये.

गाणे:
न अपनी खबर है, न किसकी खबर है
तेरे प्यार का मुझ पे हुआ ये असर है

चेहर्‍यावर स्लिप डिस्क झाल्यासारखे भाव! मग ती दारूच्या ग्लासात विष टाकते. ( स्लार्तीने लिहिलेय तसे थुंकते.) मग तो ग्लास तो एका दमात पिऊन एकदम जमिनीवर पडतो. हिला वाटते तो मेला, तरी खात्री करून घेण्यासाठी ती त्याच्या पाठीवर नृत्य करते. तरी तो उठत नाही. ही खूष, नाचत नाचत त्याला एक प्रदक्षिणा घालते आणि.....
गाणे continue करत तो उठतो. हिची निराशा वगैरे वगैरे.

मनीषावाला सिनेमा म्हंजे जानी दुश्मन ( नवा)
:-)

Manjud
Thursday, September 13, 2007 - 6:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यामारी, काय तरी एकेकाचे पेशन्स आहेत हे असले सिनेमे बघायचे.... मी आजतागायत बघितलेले नाहीत आणि पुढेही बघेन असे वाटत नाही.

मी शाळेत असताना सांस्कृतिक कार्यक्रमात एकतरी डान्स असायचा, 'मैं तेरी दुश्मन' वर आणि तसेच पांढरे कपडे घालून.

बाकी अनुराधा त्यु, रेखा सुनिल दत्त, ११ हिरो आणि अरमान कोहली वगैरे धमाल लिहिलंय.


Nandini2911
Thursday, September 13, 2007 - 7:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमृता, तो अरमान कोहली, त्या राजकुमार कोहलीचा सुपुत्र.

जितेंद्र आणि हा अरमान वगैरे नाग बाप्ये स्कर्ट घालून गाणी म्हणतात. डोक्याला एक पट्टी बांधलेली असतेच आणि काहीतरी आदिवासीपण घालत नसतील असे दागिने घातलेले असतात.

त्याच्या नागिणी, पांढरे किंवा काळे ते धोतरसदृश काहीतरी नेसतात. कंचुकी काय ते म्हणतात ते घालतात. डोक्यावर तो एक मुकुट असतोच अन त्यात तो नागमणी काही दिसत नाही. आणि काम धाम नसल्यासारखे गात आणि नाचत सुटतात. गाणी पण असली बोअर असतात. अरे चांगले रोमॅंटिक गाणं म्हणा की रे बाबानो....Mi_anu
Thursday, September 13, 2007 - 7:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला हेच कळत नाही, या चित्रपटवाल्यांना नागनागिणीच ईच्छाधारी का दिसल्या? इतर प्राणी नव्हते का? उदा. इच्छाधारी कबूतर, इच्छाधारी मांजर, इच्छाधारी कुत्रा, इच्छाधारी पोपट इ.इ...
आणि हा इच्छाधारी काय प्रकार असतो बुवा? नाग माणसाच्या रुपात की माणूस नागाच्या रुपात?
जुनून मधे राहुल रॉय कसा इच्छाधारी वाघ असतो!! आणि त्याला म्हणे माणूस ते वाघ या संक्रमणात असतानाच मारावे लागते, कोणत्याही एका पूर्णरुपात मारता येत नाही. आणि तो वाघाचा माणूस असताना वाघोबा कसे निसर्गावस्थेत असतात तसाच जागा होतो. (कपडे लॉकर मधे वगैरे लपवून ठेवत असेल का?आणि दुसरीकडे जागा झाला तर?)


Shraddhak
Thursday, September 13, 2007 - 7:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जुनून मधे राहुल रॉय कसा इच्छाधारी वाघ असतो<<<<
इच्छाधारी नाही. तो werewolf सारखा were वाघ असतो. त्याला शाप नाही मिळत?

आणि त्याला म्हणे माणूस ते वाघ या संक्रमणात असतानाच मारावे लागते,<<<<
ही कल्पना नृसिंहावतारावरून आली असेल काय? ( माणूस नाही, वाघही नाही... रात्र नाही पहाटही नाही.)

कपडे लॉकर मधे वगैरे लपवून ठेवत असेल का?आणि दुसरीकडे जागा झाला तर?)
<<<<
भलत्याच शंका तुला अनू. सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन केले, म्हणून आत टाकतील मग त्याला. :-P

नंदिनी, नागिन मधले रीना रॉयचे केस बघितलेयस का? ती जितेंद्रसोबत गाणं म्हणतानाचे? चेहरा दिसू नये इतका केशसंभार...


Sush
Thursday, September 13, 2007 - 8:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनु,
इच्छाधारि नागच ठिक आहे.
बापरे इच्छाधारि कबुतर, पोपट, कुत्रा वगैरे,
विचार कर नागिणिचे वळवळ्णारे न्रुत्य ठिक आहे, हे इतर प्राण्यांसाठि न्रुत्य काय प्रकार होतिल.
(बाकि त्यामुळे कोरिओग्राफर चे काम मात्र वाढेल. आणि त्यांचे खरे कौशल्य पणाला लागेल.)


Vijaykulkarni
Thursday, September 13, 2007 - 12:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नागिणीच्या अन्गावर कपडे नसतात.
मग तिचे रुपान्तर हिरॉईन मध्ये झाल्यावर तिच्या ही अन्गावर
कपडे असू नयेत.

सम्बन्धीत अधिकारी इकडे लक्ष देतील काय?


Zakki
Thursday, September 13, 2007 - 1:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जोपर्यंत तिच्या अंगावर कपडे आहेत, तोपर्यंत अधिकारी लक्ष देणार नाहीत.Maanus
Thursday, September 13, 2007 - 1:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणत्यातरी एक चित्रपटात प्रभु देवा chameleon होता पाहीजे त्या व्यक्तीचे रुप तो त्यात घेऊ शकायचा, जानी दुश्मचा हिरो देखील पाहीजेल ते रुप घ्यायचा. नाहीतर हे साधे नाग नागीन generally एकच कोणाचेतरी रुप घेऊ शकत असतात.

Aashu29
Thursday, September 13, 2007 - 2:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाहिरे, माणुस, नागिन मधे ती रीना राय प्रत्येक हिरोच्या हिरोइनीचे रूप घेत असते

Vaatsaru
Thursday, September 13, 2007 - 3:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मान्यवर झक्की ह्या विषयात चांगलेच 'अधिकारी' आहेत :-)

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७


 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators