Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 21, 2007

Hitguj » My Experience » ऑर्कुट किंवा इतर चॅट वर अनोळखी लोक असे approach होतात... » Archive through August 21, 2007 « Previous Next »

Storvi
Monday, August 13, 2007 - 10:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>आपल्या मातोश्री पण विवाहित असतीलच...>>याला म्हणतात शॉट :-O

Ajjuka
Tuesday, August 14, 2007 - 2:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिल्पे... असा शॉट मारला नाही तर ही घाण किती पिडेल सांगता येतय का! :-)

Abhijit_sane
Tuesday, August 14, 2007 - 4:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I had a very good experience on orkut, bharpur june mitra maitrini bhetle. Parat ekda bhet zalyacha anand zala.
Kahi anolkhi loka suddha bhetle, tyatun ek veglach anadn hoto.

Alpana
Tuesday, August 14, 2007 - 8:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला पण आधी म्हटल्याप्रमाणे जुने मित्र-मैत्रिणी भेटले... कॉलेजातले जुनियर्स पण भेटले.. त्यातल्या काही जणांची तर आधी ओळख नव्हती, पण त्याच मित्रांचा मला बर्‍याचदा उपयोग झाला.. काही दिवसांपुर्वी माझ्या बहिणीला आय आय टी दिल्ली मध्ये प्रवेश घ्ययचा होता, तेंव्हा पण इथल्या मित्राचीच मदत झाली

Dakshina
Tuesday, August 14, 2007 - 9:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका, अगं तू काय ग्रेट आहेस.. पण बरं झालं सॉल्लिड उत्तर दिलस त्याला ते.
त्य ऑर्कुटवर कुणाला कुणाचा धरबंध नाही.


Ashishmate
Tuesday, August 14, 2007 - 12:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ajjuka nice reply... :-)
I think tya sandipcha mansik santulan bighadlela asnar..... :-)
ani the 2nd eg u hv given tyala sopya bhashet lampat pan mahntat....

dont take FLRT in wrong way it just another way to make frnds... i dont know much abut orkut approching but on yahoo if u r in room tht meance u r thr to chat so ppl will buzz u till u r thr..... mage lagna ha prakar tikde pan ahe pan it's a part of game (nagerians r worst) .... aata kahi kadhi bhandana hoyta mostly with paki ppls(including gals) and indian bhayas but again it just argument nothing else.... coz all knows tht we cant do any thing else... shevti sagle tikade time pass karayla asta :-)

mazya orkut war more thn 50 frnds r thr 90% lokanan me bhetalo ahe baki chat frnds but from long time...

so exp. differs person 2 person but at the end thing is good if u use it in good way.... we cant stop othrs :-)

ani ho DEAR is comman word in this kind of communications but if u dont like thn tht person should hv accepted it... the ways he replyed u realy makes me think tht he lost his mentel balance.....:-)
ASHish....

Dakshina
Tuesday, August 14, 2007 - 12:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आशिषच्या मताशी मी सहमत आहे. Flirting हा एक मार्ग आहे मुलींशी मैत्री करायचा. जो फ़क्त मुलंच अवलंबतात असं नाही तर मुली पण.. आणि खास करून ऑर्कुटवर...

माझ्यामते तर समाजामध्ये विशेषतः अपल्यापेक्षा थोड्या वयाने मोठ्या असलेल्या लोकांमध्ये ऑर्कुटची प्रतिमा फ़ार चांगली नाहीए. लोक फ़क्त तिथे वेळ घालवायला जातात असं त्यांना वाटतं जे तिथल्या ८०% लोकांनी सिद्धं केलं आहे. घाणेरडे मेसेजेस पाठवणारे लोक तर नुसते बोकाळले आहेत. ज्यामुळे ऑर्कुटची genuinity कमी झाली आहे.

आणि शेवटी कसं असतं माणूस म्हणलं की चांगल्या आणि वाईट दोन्ही प्रवृत्ती असतातच. मनातल्या सुप्त इच्छा लोक इथे येऊन पुर्णं करतात. ऑर्कुटवरच्या कोणत्याही Community मध्ये जा. सेक्सविषयी कुठे लिहीलेलं नाही असं नाही.
मला तर शंका आहे की ऑर्कुटवर अशा प्रकारच्या लोकांची २ - २ profiles असावीत. एक चांगलं आणि एक वाईट. आणि आजकाल तर काय तिकडे account open करायला invitation ची पण गरज लागत नाही.

काही लोकांना मुलींना फ़क्त त्रास देण्यातच Interest असतो. म्हणजे दुसर्‍याला निव्वळ मनःस्ताप देणे. अशा प्रकारच्या मेसेजेस मुळे काही sensitive मुली आपण खरंच तसे आहोत का? असा विचार करतात आणि परिणामी ऑर्कुटवरचे account डिलिट करून टाकतात. दुर्दैवाने तिथे तुमच्या scrapbook मधे काय लिहीलंय हे अख्खं जग वाचू शकतं त्यामुळे 'अशा' लोकांचा आनंद द्विगुणितच होत असेल.

मलाही एकदा विनाकारण कुणितरी गरज नसताना घाणेरडा मेसेज केला होता.. तो वाचून मी प्रचंड upset झाले होते, रडले पण होते. पण तोपर्यंत एकूण मला तिथली परिस्थिती माहीत झाली होती, त्यामुळे मी थोड्यावेळाने normal झाले.

आज्जुका तुला आलेल्या अनुभवावरून मला असं वाटतं की तो जो कोणी मेसेजेस पाठवतोय तो तुला ओळखत असला पाहीजे, आणि दुसर्‍याला 'उचकवणे' हा त्याचा छंद असला पाहीजे. तू फ़ार लक्ष देत नसशिलच.




Chaffa
Tuesday, August 14, 2007 - 6:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे सगळे अनुभव वाचुन गंमतपण वाटली आणी वाईटही वाटले असो गंमतीचा भाग एकदा माझ्याबरोबर झालेला. ऑर्कुटवर एक मेसेज आला नेमका मी ऑनलाईन असतानाच. तो प्रकार झाला असा
तो: Hi
मी: Hallo
तो: what R U Doing?
मी just TP
तो: (आता थेट मराठीत) tu kitavit shikates?
एव्हाना माझा फ़्युज उडायला आला होता म्हंटल बाबा आधी निट profile तरी वाच माझा अरे चाफ़्फ़ा म्हणजे काय मुलगी वाटते काय? नंतर मात्र खुप उशीरा त्याचा रिप्लाय आला.

















Ashishmate
Wednesday, August 15, 2007 - 11:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>माझ्यामते तर समाजामध्ये विशेषतः अपल्यापेक्षा थोड्या वयाने मोठ्या असलेल्या लोकांमध्ये ऑर्कुटची प्रतिमा फ़ार चांगली नाहीए.

asa bolashil tar sarwa jan boltil mala orkut aavadt..... :-)
ASHish....

Aktta
Friday, August 17, 2007 - 7:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा scrap माझ्या एका मैत्रीनी च्या scrap book मधुन उचलला आहे... मी नाही केला आहे... पन ज्याने केला तो कीती पकाउ असेल... :-)

Hi !!
I Was going through ur profile, found it interesting, so am writing to u..... As a normal routine, I know u must be tired of people saying, "hiii there, u r cute, u r pretty, i like ur smile, i like ur eyes....... and stuff"......and i can imagine how irritating it can be when someone out of know where jumps up and says....... "DO u wanna be my friend, or can i be ur friend" and u feel like, Man DO i KNow u .......... Hence i would definately not do the same, neither would i ask u to be my friend... All i shall say is, "WHy dont we start a conversation and let friendship develop on its on....." Hope u would...
एकटा...

Ajjuka
Saturday, August 18, 2007 - 3:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आयला.. मलाही आला होता हा स्क्रॅप! म्हणजे fwds सारखे हे intro scraps पण रेडीमेड आहेत की काय!!

Aktta
Saturday, August 18, 2007 - 8:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका... मग याला तुझा रीप्ल्याय काय होता.....
must be somthing interesting ना... :-)
एकटा...


Ajjuka
Saturday, August 18, 2007 - 9:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डिलीट
एवढीच क्रिया सुचली मला यावर...


Savyasachi
Saturday, August 18, 2007 - 1:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका, एकटा अशी सही होती का तुझ्या पण स्क्रॅप खाली? :-)

Aktta
Saturday, August 18, 2007 - 2:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

.... आनी असेल तरी तो मी मुळीच न्हवे.....
एकटा...


Ajjuka
Sunday, August 19, 2007 - 10:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सव्या.. अरे सह्या बिह्या कोण बघत बसणार एवढं.. एवढं कोणाला महत्व थोडंच द्यायचं असतं? ही ही ही :-)

Disha013
Monday, August 20, 2007 - 7:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सामनातील ऑरकुटविषयीची बातमी वाचलीत का?
सावध रहा रे बाबांनो.


Ashishmate
Tuesday, August 21, 2007 - 11:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

kay बातमी hoti .... link taka ki kuni tari...
ASHish...

Mansmi18
Tuesday, August 21, 2007 - 1:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

be careful
ऑर्कुट मित्राने घेतला बळी

इंटरनेटवर अनोळखी व्यक्तीशी संवाद साधताना खबरदारी घेण्याची सूचना अनेकदा सायबर सेलकडून केली जाते. मात्र ही खबरदारी अनेकांकडून कधीच घेतली जात नाही. त्यातूनच मग विविध प्रकारचे गुन्हे घडतात. मुंबईच्या अदनान पत्रावाला या सोळा वर्षाच्या मुलानेही ही खबरदारी घेतली नाही आणि त्यामुळे मोठ्या संकटाचा सामना त्याला करावा लागला.

ऑर्कुटवरुन नवे मित्र जोडताना त्यांना स्वतःची सर्व खरी माहिती लगेच देऊ नये ही साधी गोष्ट अदनान विसरला. त्याने नव्याने ऑळख झालेल्या तीन ऑर्कुट मित्रांना आपल्याबाबतची सगळी माहिती दिली , अगदी वडीलांच्या व्यवसायाचीही. ही एक चूक त्याला चांगलीच महाग पडली.

पैशांच्या लोभाने त्याच्या तीन्ही मित्रांनी (आयुष भट , सुजीत नायर , हितेश अंबावत) त्याला शनिवारी रात्री पार्टीसाठी आमंत्रण पाठवले. अदनानने ते आमंत्रण आनंदाने स्विकारले. रात्री तो आयुष , सुजीत , हितेशला भेटला. या तिघांनी मात्र त्याला फसवून कोंडले आणि घरी फोन करुन अदनानच्या पालकांकडून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली. अदनानच्या वडीलांनी पोलिसांकडे तक्रार केली. या बाबतची बातमी प्रसिध्द झाली. पोलिसांच्या भीतीने अदनानचे अपहरण करणा-या आयुष , सुजीत , हितेशने त्याची रश्शीने गळा आवळून हत्या केली आणि त्याचा मृतदेह तुर्भे येथे रस्त्यावर त्याच्याच स्कोडा गाडीत घालून फेकला.

पोलिसांनी तपासाअंती अदनानच्या मित्रांना अटक केली असली तरी जोपर्यंत इंटरनेटवर युजर्स खबरदारी घेत नाहीत तोपर्यंत असे गुन्हे थांबणार नाहीत असे त्यांचे म्हणणे आहे.



Aktta
Tuesday, August 21, 2007 - 4:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१०० वी पोष्ट माझी बरका....
I LOVE ORKUT,YAHOO, मायबोलि
एकटा....


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators