Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 07, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » मला चुकीची ऐकू आलेली गाणी » Archive through August 07, 2007 « Previous Next »

Yogesh_damle
Monday, August 06, 2007 - 12:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह. ह. पु. वा!! :-)) मी सुद्धा लिरिल वाचलं!! :-) (ही त्या 'नन्हा साबुन' ची कमाल)

'उड़एं जब जब ज़ुल्फ़ें तेरी' मधली एक ओळ 'उत्थे जाऊं के संवर कभी सज के, के जहाँ मेरा यार बसदा' आहे ती मी नेहमी 'उस गांव के सुअर कभी सजते' ऐकायचो.... : D

______
चप्पा चप्पा चरखा चले,
औनी-पौनी आरियां तेरी,
बौनी बौनी बेरियों तले

(चप्प्-चप्प आवाज करत चरखा फिरतोय, बोराच्या छोट्या छोट्या झाडांखाली तुझी अर्धवट (औनी-पौनी) करवत फिरतेय) असं ते आहे...


Aschig
Monday, August 06, 2007 - 3:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"नन्हा साबुन खिलेगा अंगना"

श्रद्धा, मलाही असेच ऐकु यायचे (पण आमच्या अंगणात निदान रीठ्याचे झाड होते).


Marathifan
Monday, August 06, 2007 - 5:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नन्हा साबुन = = रीठा
आइग.........धन्य !!!!!!!!!!
फ़ारच गोड उपमा


Disha013
Monday, August 06, 2007 - 7:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनु,हहपुवा गं!
गुलाजारच्या महानतेबद्दल शंकाच नाही.पण अशी गाणी ऐकुन मला प्रश्ण पडायचा की इतकी अवघड गाणी सामान्य माणसांच्या आयुष्यात कुठे फ़िट्ट बसतील?
अजुन एक गाणं असच
'चई चप्पा छई,
चप्पा की छई
पानीयों पे चिटे उडाती हुई लडकी
आती हुई लहरोपे जाती हुई लडकी'

मला वाटायचे लहान मुलावरचे गाणे असावे,पण ते आहे सुनील शेट्टी नि तब्बु वर चित्रीत झालेले....


प्रजापिता ब्रम्हकुमारी.....
हीहीही....
मग प्रतिभा पाटील 'राष्ट्रपती' का...
त्यांना 'राष्ट्रपत्नी' म्हनायाला हवे... :-)


Chinnu
Monday, August 06, 2007 - 9:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग आई ग.. मी पण लिरिल वाचलं! :-)
योगेश, मला ती ओळ 'उस गांव के सुवर के भी सदके' अशी वाटायची आतापर्यंत! आता उसगाव =US म्हटले तर किती महान तो अर्थ!


Mi_anu
Tuesday, August 07, 2007 - 2:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चरख्याबद्दल सर्वांचे आभार..
मला पण नेहमी 'उस गाव के सुअर' ऐकू आले आहे. मी त्याचा अर्थ असा लावायचे, 'ज्या गावात माझा प्रियकर राहतो त्या गावचे डुक्करसुद्धा मला सुंदर वाटतात.'


Itgirl
Tuesday, August 07, 2007 - 3:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

...मी त्याचा अर्थ असा लावायचे, 'ज्या गावात माझा प्रियकर राहतो त्या गावचे डुक्करसुद्धा मला सुंदर वाटतात.' ......

याहून विनोदी काही असूच शकत नाही....!!

नमस्कार सर्वजण :-)


Ajjuka
Tuesday, August 07, 2007 - 4:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रियकराच्या गावातले डुक्कर... ही ही ही ही ही ही ही ही

आपण सगळे कसले 'समजूतदार' आहोत.. काही ऐकू आलं तरी त्या गाण्यांना कसलं मस्त 'समजून' घेतो..


Mi_anu
Tuesday, August 07, 2007 - 5:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'ऑंशिक बनांयां ऑंपंनें' गाण्यात पहिल्या ओळीत एकदम आप वगैरे म्हणून आदर दाखवला आहे. आणि दुसर्‍या ओळीत लगेच 'तेरेबिन' म्हणून अरे तुरे वर! हिमेश चे म्हणजे हे असे असते बघा. आधी 'ओ.... हुजूर ऽऽ' म्हणून प्रेयसीला राणीसारखा आदर द्यायचा आणी पुढच्या ओळीत लगेच 'त्तेरा त्तेरा त्तेरा सुरूर ऽऽ' म्हणून एकदम दोस्तीखात्यात अरेतुरेच सुरु करायचं.
ते नवं 'इटस रॉकिंग..यारा कभी इश्क तो करो' गाणं आहे त्यात मध्ये मध्ये किनर्‍या आवाजात विंग्रजीमध्ये एक माणूस काय म्हणत असतो? रिमिक्स मधले र्‍याप तुकडे इंग्रजी असलेच पाहिजेत आणि ते न समजणार्‍या उच्चारात किंचाळून म्हटलेच पाहिजेत असा नियाम आहे का?
तारारमपम च्या पहिल्या गाण्यात(ज्यात जावेद चिका चिका लेटस गो चिका असे काहीतरी म्हणून नाचतो आणि त्याने जाणवण्याइतपत जांभळी लिपस्टिक लावली आहे) त्यात मधे मधे काय म्हणतात? 'ब्रिंग इट ऑफ जाना हमको फॉरेव्हर' म्हणजे काय? हे वाक्य आमच्या तर्खडकरी व्याकरणात नीटसे कळत नाही म्हून विचारते..


Gajanandesai
Tuesday, August 07, 2007 - 6:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनु, LOL
मला वाटायचे की मलाच उच्चार कळत नाहीत किंवा शब्द माहीत नाहीत किंवा जे ऐकायला येतं त्याचा अर्थ माहीत नाही किंवा संदर्भ लागत नाहीत.

बंटी और बबली मध्ये 'धडक धडक' गाण्यात, 'हम चलें हम चलें ओये रामचन्दरे' अशी ओळ आहे त्यात रामचंदर किंवा रामचंग रे असे काही आहे ते काय आहे?


Mi_anu
Tuesday, August 07, 2007 - 6:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'देवा रामचंद्रा, आम्ही चाललो रे बाबा!!' असे म्हणायचे असावे.

Shraddhak
Tuesday, August 07, 2007 - 6:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'देवा रामचंद्रा, आम्ही चाललो रे बाबा!!' असे म्हणायचे असावे. <<<<
' आम्ही जातो आमुच्या गावा ' ची हिंदी आवृत्ती असेल. :-P

हे एक मला चुकीचं ऐकू आलेलं गाणं...
कल चौदहवीकी रात थी...
छतपर रहा चर्चा तेरा...
आणि हे बरोबरही वाटायचं. चौदहवीका चांद बघायला सगळे गच्चीवर जमले असताना त्या हिरॉईनसंदर्भात काही चर्चा झाली असणार.
नंतर कळलं, शबभर आहे म्हणे तो शब्द.


Psg
Tuesday, August 07, 2007 - 7:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योगेश, 'सुवर'! अगदी सेम!

अनु, तू नुस्ती गाणी ऐक गं, अर्थ कशाला लावायला जातेस?


Sheshhnag
Tuesday, August 07, 2007 - 8:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

...मी त्याचा अर्थ असा लावायचे, 'ज्या गावात माझा प्रियकर राहतो त्या गावचे डुक्करसुद्धा मला सुंदर वाटतात.' ......

याहून विनोदी काही असूच शकत नाही....!!


=====

खरंच इतका जबरदस्त विनोद खूप दिवसात वाचला नव्हता.


Madhavm
Tuesday, August 07, 2007 - 8:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा बीबी वाचूनच देवकी पंडीत सारेगम च्या स्पर्धकांना उच्चार सुधारा* असे सांगू लागल्या असाव्यात. म्हणजे पुढील गायकांची गाणी आपल्याला नीट समजतील.

Maudee
Tuesday, August 07, 2007 - 9:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

.. .. अनुमोदन sheshhnag :-)

Shailaja
Tuesday, August 07, 2007 - 9:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी किशोरी आमोणकराचे गाणे "जाईन विजारीत रानमुला"
असे ऎकायची

Deemdu
Tuesday, August 07, 2007 - 10:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योगेश मलाही ते गाणं तसच ऐकायला यायच, आणी परत पुढे कडव्यात " पानी लेने के बहाने आजा " वगैरे असल्यामुळे ते खरच सुवर च असाव अस वाटल होत.

आणि अर्थासाथी अनुला same pinch :-)


Swa_26
Tuesday, August 07, 2007 - 10:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मलापण हेच ऐकु यायचे... :-) आणि वर ते माहेरचे कुत्रे पण सुंदर वाटते तसे काहीतरी असेल असे वाटायचे...

Runi
Tuesday, August 07, 2007 - 12:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आई शप्पथ काय काय गाणी ऐकतात सगळेजण, लिरील साबुन काय, उसगाव के सुवर काय... जबरी
श्रद्धा ते छतपर नाहीये हे मला आत्ताच कळतय.
मी एकदम सेम तुझ्यासारखाच अर्थ काढत होते


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators