Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 19, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » मराठी लोकांचे हिन्दी » Archive through July 19, 2007 « Previous Next »

Chinya1985
Friday, July 06, 2007 - 9:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुनी जाम भारी किस्सा लिहिला आहे. u know phufaat ?काय हे???

Manjud
Wednesday, July 11, 2007 - 6:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज सकाळचा माझा आणि आमच्या वॉचमनचा संवाद :

मी : अरे वॉचमन सुनो, तुम्हे नल को वाइसर लगाना आता है?
वॉचमन : हां आता है ना, लेकिन आपके पस पक्कड है ना?
मी : नही, पक्कड नही है पण चिमटा है, उससे काम चलायेगा क्या? वो नल रातभर गल रहा है, दिमाग की वाट लग गई है...
नवर्‍याने आणि सासर्‍यानी महतप्रयासाने मला थांबवून सांगितलं की प्लंबरला निरोप दिला आहे तेव्हा तुम्ही तुमच्या ऑफिसच्या वाटेला लागा. आम्ही बघून घेऊ गळक्या नळाचे काय करायचे ते.....


Dakshina
Wednesday, July 11, 2007 - 6:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मन्जू......
खुर्चीतून पडता पडता वाचले.


Monakshi
Wednesday, July 11, 2007 - 6:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'रातभर गल रहा है, दिमाग की वाट लग गई है... '



Sanghamitra
Wednesday, July 11, 2007 - 8:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंजू नल गल रहा है
पण दिमाग की वाट लग गई है हे मीही म्हणते बर्‍यचदा.
पूर्वी हे असलं बंबैय्या ऐकून जाम हसू यायचं.
क्या फरक गिरता है?
मेरेको परवडता नही यार.
अरे भाईसाब रोज वापरो कुछ नही होगा.
तेरे दिमाग मे साला कांदेबटाटे भरे है.
आता काही वाटत नाही. थोडक्यात काय तर मेरे हिंदी की वाट लग गई है.


Zakasrao
Wednesday, July 11, 2007 - 9:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़ुफ़ाट आणि मंजु
.. .. .. .. ..


Gajanandesai
Wednesday, July 11, 2007 - 12:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमची मॅनेजर खूप आधीपासून अमक्या ठिकाणी पावसाळी पिकनिक काढायची म्हणून नाचत होती. आता कुणीतरी म्हटलं की, "कधीपासून नाचत होतीस, आता पाऊस सुरू झाला आणि नाव पण काढत नाहीस पिकनिकचे."

तर ती म्हणाली की "अरे अभी मेरा ही 'किस में कुछ नही', इस के लिए मै चूप हूँ" ('कशात काही नाही'चे हिंदीकरण.)


Zakki
Wednesday, July 11, 2007 - 10:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आजकाल मराठी लोकांचे मराठी सुद्धा काय दिव्य असते! 'तू fast local घेऊन बांड्र्याला change कर slow मधे. that will नक्कीच stop in Parle .'

'अबे, लक्ष्मी road ला बराच section one way आहे. रिक्षेवाले यायला refuse करतात चक्क!'


Pancha
Wednesday, July 11, 2007 - 11:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्कि, हे बघा (ऐका) :
मजेशीर मराठी संभाषण


Monakshi
Thursday, July 12, 2007 - 7:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा खरा इंग्रजी चे हिंदीतून झालेल्या भाषांतराच नमुना आहे पण तसा बीबी इथे नसल्याने इथेच टाकते. माझ्या ऑफिसमधल्या मैत्रिणीने सांगितलेला.

तिच्या शेजारी एक सिंधी कुटुंब रहाते. एक दिवस ही त्यांच्या घरी गेली असताना सिंधी बाई तिला म्हणाली, "अभी बच्चे स्कूल से आयेंगे तो उन्हे टोपरामेन दूंगी खानेको" माझ्या मैत्रिणीच्या डोक्यावर हेलिकॉप्टर तरंगायला लागलं. तीने विचारलं की नक्की काय प्रकार आहे ते, तेव्हा त्या माऊलीने ते पेकेट तीला दाखवलं तर ते होते....

TOP RAMEN जे meggi सद्रुश्य काहीतरी असते ते.


Prajaktad
Thursday, July 12, 2007 - 7:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंजु , मोनाक्शी धमाल किस्से आहेत.
कॉलेजच्या दिवसातिल एक किस्सा , मी आणि मैत्रिण practical बूक भरत बसलो होतो...तिची शाळकरी बहिण हिन्दीच पुस्तक घेवुन शन्का विचारायला आली
तिने विचारल " बापक माई " म्हणजे काय?आम्हाला लवकर कळेना की हा कोणता शब्द?संदर्भ वाचल्यावर कळल...ते होत " बापकमाई " .


Dakshina
Wednesday, July 18, 2007 - 6:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राजक्ता... माझ्या बाबतीत पण असाच किस्सा घडला होता. पुर्वी दांडेकर पूलाजवळ शिळि मकर लॉटरी सेंटर असं दुकान होतं मला नेहमी प्रश्नं पडायचा.. ही शिळि मकर काय भानगड आहे?

शेवटी एकदा माझ्या भावने सांगितलं ते शिळी मकर नाही, शिळिम कर आहे... म्हणजे आडनाव...


Yashwant
Wednesday, July 18, 2007 - 8:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा मित्र एकदा विचारत आला. अरे उपडा कपाल म्हनजे काय? नीट वाचले तर ते उप डाकपाल होते. पोस्टातुन काही पत्र घेवुन यायच्री नोटीस होती.

Ajjuka
Wednesday, July 18, 2007 - 8:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्ही आमच्या एका मित्राला कधी कधी गमतीत भडक मकर अशी आडनावाने हाक मारतो.

Gajanandesai
Wednesday, July 18, 2007 - 9:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या एका मित्राचं आडनाव 'आ केर कर' आहे.

Dakshina
Wednesday, July 18, 2007 - 9:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा collegue हिंदी अत्यंत चुकिचं पण खूप अत्मविश्वासाने बोलतो.

मगच्या आठवड्यात आम्ही कंपनीच्या गेस्ट हाऊस मध्ये गेलो होतो काहीतरी काम होतं म्हणून, तर तो Care Taker दोनदा तीनदा म्हणाला, सर खाना खाके जओ... खाना खाके जओ... तर हा त्याला म्हणे देख कृष्णा... तु मुझे ज्यादा आग्रह मत कर.. नही तो मै सारा खाना खायेगा और तेरे लिए कुछ उरेगा नही...

काल आणि एक किस्सा घडला... seat allocation बद्दल कोणाशीतरी फोनवर बोलत होत... तिकडचा काहीतरी बोलला वाटतं की जागा नाहीए... तर हा म्हणे... 'देख देवेन तू मुझे ये सब मत बोल, मुझे मलूम है. उधर जगा की कोई कमतरता नही हैं.......

आणि जस्ट २ मिनिटांपुर्वी, त्याच्या assistant ला झापत होता.. देख चिन्मय, तु बिल में कुछ गडबड मत कर, क्यूंकी मैं हर बिल इतना बारकाईसे नहीं देखता....


Rutu_hirwaa
Wednesday, July 18, 2007 - 9:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा
मग तुमची फ़ुकट मस्त करमणूक आहे की..


Runi
Wednesday, July 18, 2007 - 1:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा माझ्यासारखे बरेच आहेत की, मी पण शाळेत असतांना एकदा सुतक ताई असेच वाचले होते आणि खुप वेळाने कळले होते मला कि ते सुत कताई आहे. माझी एक मैत्रीण धन्कवडी ला धनक वडी म्हणाय्ची.

Dakshina
Thursday, July 19, 2007 - 5:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोल्हापुरवासियांना 'वडणगे' हे गाव माहीती असेल, एकदा T.V वर मराठी बातम्या देणारी बाई वड्णगे..
म्हणाली.. आणि आम्ही लहान पोरं पोरी जाम हसलो होतो...


Rutu_hirwaa
Thursday, July 19, 2007 - 6:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा
आम्ही तर "वडिन्गे" ऐकलेय बुवा कोल्हापुरात :-)
काय वडिन्ग्याहून आलाईस का
असे..


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators