Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 29, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » माझा वेंधळेपणा » Archive through June 29, 2007 « Previous Next »

Zakasrao
Friday, June 22, 2007 - 8:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग, पण नवरा नाही न वेन्धळा...>>>
सगळ्यानी वेंधळ असुन कस चालेल बर! कोणीतरी हवच ना तुमचा वेंधळेपणा निस्तरणारं :-)

Manjud
Monday, June 25, 2007 - 12:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी एकदा बघितलेले चेहरे कधिच विसरत नाही. पण काल जरा गम्मतच झाली. काल मुलुंड स्टेशनवर गाडी बराच वेळ थांबली होती. मला ठाण्याला उतरायचं होतं म्हणून मी दारात येऊन थांबले होते.तेवढ्यात स्टेशनवर मला माझा ex-colleague दिसला. मी जोरात त्याला विचारले, "सूर्यकांत, काय म्हणतोस? किती दिवसानी दिसतो आहेस. मला ओळखलस ना?" माझा प्रश्नांचा भडीमार ऐकून एव्हाना स्टेशनवरचे बाकीचे लोक सुद्धा माझ्याकडे बघायला लागले होते. तेवढ्यात तो मुलगा मला अगदी सभ्यपणे म्हणाला," आप मुझे जो समझ रही हो वो मैं नही हुं". झाल ना!! म्हणजे माझा अगदी पार पोपटच. ती गाडी लवकर सुरू होइल तर बरे असे मला वाटायला लागले अगदी.




Monakshi
Tuesday, June 26, 2007 - 5:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगं मग तू पटकन त्याला सांगायचं ना 'मै भी कहां आपसे बात कर रही हूं

Yashwant
Tuesday, June 26, 2007 - 11:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल सकाळी पुणे एअर पोर्ट वर जाताना येरवडा जेल शेजारुन जात होतो. तर मित्र म्हनाला मी या जेल मध्ये जावुन अलोय. गाडीतले सगळेच एकदम शान्त झाले आणि त्याच्याकडे बघु लागले. त्याला त्याची चुक कळल्यावर तो लगेच म्हनाला "माझे वडील जेलर आहेत".

Sas
Tuesday, June 26, 2007 - 10:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

यशवंत, मंजु सही :-)
ईथल्या सर्वांचे किस्से भन्नाट आहेत.

Indian sotre मध्ये भाजी घेत असतांना नवरा बाजुलाच उभा आहे समजुन मी बोलत होते;
चांगल ५-७ मी.बोलले,वळुन बघितल तर दुसरच कोणितरी होत :-(


Today is my वंधळेपणाचा Day:-

आज मी पाव-भाजी केली. लागणार्‍या सर्व भाज्या चिरुन घेतल्या व बाटाटे आणी चिरलेल्या भाज्या कुकर मध्ये लावुन कुकरवर झाकण ठेवले, लावले नाही नुसतेच ठेवले थोड्यावेळाने शिट्टिच्या एवजी वेगळेच आवाज येवु लागले. :-).

कुकर झाल्यावर चिरलेला कांदा तेलावर परतुन त्यात उकडलेल्याला भाज्या, मसाले टाकले, थोड्यावेळाने भाजीतयार झाली म्हणुन चव घेतली तर वेगळी चव येत होती म्हणुन परत मसाले टाकले, भाजी थोडी पातळ वाटत होती म्हणुन पुन्हा उकळी घेण्याचे ठरविले व बर्नर High केला, थोड्यावेळाने बाजुला पडलेले उकडलेले बटाटे दिसले :-), (मी पावभाजीत बटाटे टाकायाला विसरले होते हे सांगायला नकोच)

मायबोलिवर वरच लिहायला बसले व दुसरी भाजी शिजायला ठेवलीय विसरले, जळण्याचा वास आला म्हणुन धावत जावुन Stove बंद करुन आले. :-)

Storvi
Wednesday, June 27, 2007 - 1:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुला आता व्यसनमुक्ति ची गरज आहे :-O

Rutu_hirwaa
Wednesday, June 27, 2007 - 5:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

storvi
saheee .. vyasanmukti :-)

Sanghamitra
Wednesday, June 27, 2007 - 6:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>> Indian sotre मध्ये भाजी घेत असतांना नवरा बाजुलाच उभा आहे समजुन मी बोलत होते
नवराच उभाय असं समजून अनोळखी माणसाच्या हातातल्या ट्रॉलीमधे भाजी टाकण्यापेक्षा बरंय.

Sush
Wednesday, June 27, 2007 - 6:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सन्घमित्रा, स्वानुभव वाटत!!! मग दोघीजणी समदुख्खी.

Yogita_dear
Wednesday, June 27, 2007 - 8:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आत्ताच केलेला वेंधळेपणा....
lunch ला जायच होत.घाईघाईत frnd ला सांगायच होत lunch ला जाते म्हणुन..
Gtalk च्या window मध्ये लिहायच सोडुन pen घेतला होता हातात वहीवर लिहायला....


Indradhanushya
Wednesday, June 27, 2007 - 9:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

O Dear मायबोलीवर लिहिताना pen drive वापरला असाल ना?

Manjud
Wednesday, June 27, 2007 - 10:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरेचदा मी train मध्ये बर्याच जणीना भायखळ्याला उतरायचे आहे का असे विचारायच्या ऐवजी रीलायन्सला उतरणार का? असे विचारते.

"तन्द्रटलेलि" असं माझा नवरा मला म्हणतो.


Chyayla
Wednesday, June 27, 2007 - 11:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज बाबानी सकाळी आन्घोळ केल्यावर नवीन पायजामा घातला, आम्हाले वाटले की जुना टाकायचा असेल म्हणुन नवीन काढला म्हणुन आम्ही विशेश लक्ष नव्हते दीले. आणी थोड्या वेळानी बाबाच म्हणाले की आपली वॉशिन्ग मशीन खुपच छान झाली आहे कपडे अगदी स्वछ्: स्वछ्: निघताहेत.
मग आमच्या डोक्यात प्रकाश पडला मी आणी आई पोट धरुन हसायला लागलो तेन्व्हा बाबान्च्या लक्षात आले की आज त्यान्चा वेन्धळेपणा झाला आहे.


Sas
Thursday, June 28, 2007 - 2:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झालय ना तसपण, घेतलेली भाजी दुसर्‍या कुणाच्या ट्रॉलीमधे
मध्ये पण ठेवलिय आणी दुसर्‍याची ट्रॉली आपली समजुन ढकलली पण आहे :-)

Sas
Thursday, June 28, 2007 - 2:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पायजम्या वरुन 2-३ वर्षांपुर्विचा किस्सा आठवला ,एकदा माझीएक मैत्रिण तिच्या नवर्‍याचा पायजमा घालुन आलेली College मघ्ये, (We were Lecturer in college) मला येवुन सांगते "किसिको बताना मत आज मैने गलतीसे उनका पायजमा, सलवार समझकर पहन लिया, कबसे मुझे कुछ अजिब लग रहा था अब समझा क्या बात है" :-)

Siddhitadas
Friday, June 29, 2007 - 8:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझाही असाच एक वेधळेपणाचा अनूभव शेअर कराव वाटतो.
मी एकदा अशीच शॉपिन्गला गेले होते.एक मुलगी दिसली दुकानात.मे क्शणभर तिच्याकडे पाहीलं.तिला एकदम मागे ओढलं आणि ओरडले "मेघा तु?"ती घाबरली. :-)
मग मे जेवढ्य जोरात तिला ओढलं होतं तेवढ्या हळु स्वरात "सॉरी" म्हणाले आणि पसार झाले.
आणि पायजम्यावरुन आठवलं,१२ वीत असतना आमची एक शिकवणी सकाळी ६ वाजता असायची.माझी एक मैत्रिण अर्धवट झोपेत असायची.ती ब-याच वेळा उलट पायजमा घालून यायची.:-))



Supermom
Friday, June 29, 2007 - 4:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पायजम्यावरून मला पण आठवलं.
माझ्या नवर्‍याचा एक मित्र नि नवरा दोघे ऑफ़िसच्या कामासाठी परगावी गेले होते.
रात्री बॅग उघडल्यावर त्याच्या मित्राला कळले की चुकून पायजम्या ऐवजी बायकोचा परकर आणलाय.


Manish2703
Friday, June 29, 2007 - 7:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Supermom .. .. ..

Chyayla
Friday, June 29, 2007 - 7:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या पायजम्यानी बराच घोळ घातलेला दीसतोय.

सुपरमॉम अरेच्या असाच वेन्धळेपणा माझ्या मावशीनीपण केला होता ९:२४ ची पोस्ट बघ.


/cgi-bin/hitguj/discus.cgi?pg=next&topic=644&page=125906

Paul
Saturday, June 30, 2007 - 3:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सु मा. हे त्या मित्राच्या बायकोला माहित पाहीजे. की ह्यांनी परकर नेला आहे नाहीतर परत घरी आल्यावर तुमच्या ब्यागेत परकर कसा म्हनून महाभारत चालू व्हायच

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators